चॉकलेट फज् : Chocolate Fudge

जाई अस्सल कोल्हापुरी's picture
जाई अस्सल कोल्हापुरी in पाककृती
17 May 2011 - 7:26 pm

रेशमी..जिभेवर वेल्वेटी फील देणारं ...चॉकलेट फज्!
सोप्पं आहे. पण कधी वड्या पडतील याचा परफेक्ट अंदाज यावा लागेल.
साहित्य :
कंडेन्स्ड मिल्क : १ टिन
कूकिंग चॉकोलेट : २०० ग्रॅम्स
साखर १०० ग्रॅम्स
लोणी : ५० ग्रॅम्स
थोडी पिठीसाखर (emergency quick-fix)

कृती :
ट्रे ला तूप / बटर लाऊन घ्या.
सगळं एकत्र करुन नॉन्-स्टिक कढईत घ्या.
सतत हलवत रहा.
कडेनी सुटायला लागल्यावर / गोळा व्हायला लागल्यावर ट्रे मध्ये ओता.
साधारण थंड झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवा. दोन तीन तासानी स्मूद धार वाल्या सुरीनी तुकडे कापा.
https://lh4.googleusercontent.com/_Rpkesq5CUy4/TdJHAIGhYnI/AAAAAAAAAKI/E...

आता हे नक्की आचेवरुन कधी खाली उतरायचं हे नीट समजावं लागतं...... नाहीतर फज ची " फजिती होते. आणि मग एक तर ते वाटीत घेउन खावं लागतं किंवा.... तोंडात भिजत ठेवून खावं लागतं. वर मानहानी होते ती वेगळीच.
या खुणा लक्षात घ्या :
१) बाऊल मध्ये पाणी घ्या. त्यात उलथन्यावरची थेंब टाका. थेंब पटकन विरघळला नाही पाहिजे. तो तसाच तळाशी न पसरता .. स्वतःच्या अंगाबरोबर उभा रहायला हवा. सैल होउन पसरायला नको.
२) मिश्रण हलवताना त्यात उलथने मधुन फिरवले असता त्यात वाट पडते. असं मस्त चकचकीत्....देखणं दिसायला लागतं.
असं झालं कि आच बन्द करुन मस्त घोटा.
२-३ चमचे पिठी साखर घाला.आणि ओता. २-३ तास फ्रीज मध्ये ठेऊन वड्या कापा.

प्रतिक्रिया

सानिकास्वप्निल's picture

17 May 2011 - 8:36 pm | सानिकास्वप्निल

:)

दीविरा's picture

17 May 2011 - 8:58 pm | दीविरा

पार्सल करा हो प्लीज :)

अगदी जबरदस्त फोटो :)

मुलूखावेगळी's picture

17 May 2011 - 10:06 pm | मुलूखावेगळी

वाव यम्मी
नक्कि ट्राय करनार

मुलूखावेगळी's picture

17 May 2011 - 10:06 pm | मुलूखावेगळी

वाव यम्मी
नक्कि ट्राय करनार

पियुशा's picture

18 May 2011 - 3:49 am | पियुशा

मु वे ला जस्ति आवड्ल बघ एक पार्सल तिला !
बाकि यम्मि आहे हा प्रकार चॉकलेट फज्!
:)

मुलूखावेगळी's picture

18 May 2011 - 4:37 am | मुलूखावेगळी

धन्स ग माझ्या साठी पार्सल मागवल्याबद्दल.
(आता तुला द्यावे लागेल मला )

रश्मि दाते's picture

18 May 2011 - 9:01 am | रश्मि दाते

सोपा आणी जास्त साहीत्य न वापरता करता येणारा,मि यात नट्स घालुन करते

रेवती's picture

18 May 2011 - 9:49 am | रेवती

छानच पाकृ!
फोटू तर ग्रेट आलाय.

आत्मशून्य's picture

18 May 2011 - 6:55 pm | आत्मशून्य

चॉकलेट फज घातलेल व्हॅनीला आइस्क्रीम म्हणजे यम्मी............ सूखद उन्हाळा.

डावखुरा's picture

21 May 2011 - 2:09 am | डावखुरा

आयला लय भारी...आम्ही कालच चोकलेट मूज् केल होत....