बेक्ड पोटॅटो वेजेस

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in पाककृती
21 Apr 2011 - 6:34 pm

आमचे आहो: म्हणजे 'बटाट्याच्या भाजलेल्या काचऱ्या'.
मी: काय हे? अगदी कचरा केलास रे वेजेस चा! पोटॅटो वेजेस म्हंटल की कसा मस्त भारदस्त स्टायलिश आयटम वाटतो!

पण खरं ते इथे मान्य करायला हरकत नाही (आमचे आहो अजून मिपा वर नाहीयेत तोवर हि सुट घेता येतीये हो!) - पोटॅटो वेजेस म्हणजे भाजलेल्या बटाट्याच्या काचऱ्या. ह्यांनी जरी त्याचं देसी नामकरण केलं असलं तरी पदार्थ असतो लई फक्कड! आणि करायला कित्ती कित्ती सोपा! फक्त बटाटे, लाल तिखट, मीठ आणि थोडं तेल- एवढाच जिन्नस सुद्धा पुरतो. मी मात्र इथे 'गार्लीकी वेजेस' ची पाक्रु देतीये बरं का! असं काय? मला माझं वेगळेपण दाखवायला नको? :)

सामग्री:

बटाटे : हवे तेवढे (मी ४ घेतले), स्वच्छ धुवून (एखाद्या जुन्या टूथ ब्रश ने घासून), पुसून कोरडे करून - त्याचे वेजेस करा (लांबट चिरा), सालं काढू नका (त्याने वेजेस अधिक कुरकुरीत होतात शिवाज त्यातील पौष्टिकता टिकून राहते )
१ मोठा चमचा तेल : कुठले पण (मी उगीच ओलिव्ह ओईल वापरले, चवीत फारसा फरक पडत नाही. त्यामुळे 'स्वस्त ते मस्त' वापर!)
१ चमचा किंवा अधिक : लाल तिखट
काळी मिरीपूड आणि मीठ चवीनुसार
हवे असल्यास ओरेगानो घाला
६ -८ पाकळ्या लसूण, बारीक किसून. विकतची तयार पेस्ट घालण्याचा विचार देखील मनात येऊ देऊ नका (त्याच्यातल्या व्हिनेगर ने वेजेस एकदम बंडल लागतात)

कृती:

- सर्व सामग्री एका बेकिंग दिश मधे घेऊन हाताने व्यवस्थित कालवा. सगळ्या बटाट्याला मसाला नीट लागला पाहिजे.
- मग ओव्हन ला टोस्ट मोड (दोन्ही रॉड तापतील असे) २५० डिग्री वर चालू करून त्यात ती बेकिंग डिश २५ मिनिटे ठेवा.
-अगदीच राहावेनसं झालं की मग हळूच ओव्हन उघडून (जपून) एका चिमट्याने एक वेज काढून, फुंकर मारून खाऊन बघा. अप्रतिम कुरकुरीत आणि चमचमीत वाटला म्हणजे वेजेस तयार आहेत. नाही तर थोडं वेळ अजून ओव्हन मधे ठेवा. आणि हो, ज्यांनी कोणी हे वेजेस करण्याचे कष्ट घेतले असतील त्यांनी आधीच किमान १/४ ऐवज स्वतासाठी वेगळा काढून ठेवावा. सगळ्यानसमोर ठेवलं कि ५ मिनिटात चट्टा मट्टा होतो.
- ४ बटाट्यांचे वेजेस नाही न पुरले? म्हणूनच मी हवे तेवढे (झेपतील एवढे) बटाटे घ्या असे लिहिले आहे! ;)

प्रतिक्रिया

कौशी's picture

21 Apr 2011 - 6:50 pm | कौशी

आवडली ..

आमच्या पाकशाळेत याच नाव नोंदवल आहे. ;)

प्रास's picture

21 Apr 2011 - 7:11 pm | प्रास

ग्रहणीस्थानी प्रचंड दाह होत आहे. फोटो बघून भूक लागलीय बहुतेक..... :-P

इनो ऐवजी मगाशी आले-लिंबाच्या पाचकाचा वापर केलेला आता या भाजलेल्या बटाट्याच्या काचर्‍यांनी पुन्हा एकदा घात केलेला आहे, आता काय घ्यावे? ;-)

खादाड अमिता's picture

21 Apr 2011 - 7:34 pm | खादाड अमिता

प्रास,

लगेच एक बटाटा शोधून वेजेस करून खा वे!

छान!
फ्रेंच फ्राईजपेक्षा बेक्ड चांगलेच.
क्यालरीजचा किती फरक पडतो ते जरा सांगाल का?

अंतु बर्वा's picture

21 Apr 2011 - 7:39 pm | अंतु बर्वा

मस्तच... आणी सोपी सुध्धा...

टारझन's picture

21 Apr 2011 - 7:48 pm | टारझन

जगदंब ... जगदंब .. :)

-( उकडलेला बटाटा ) टारझन

प्राजु's picture

21 Apr 2011 - 7:52 pm | प्राजु

सह्ही!
फोटो जबरा आला आहे.

हे वगळता पाककृती आवडली.

धनंजय's picture

22 Apr 2011 - 1:49 am | धनंजय

छान - सोबत रताळी पण घालता येतात. थोडी गोडसर असल्यामुळे आलटून पालटून बटाट्याच्या काचर्‍यांबरोबर रताळ्याच्या काचर्‍या छान लागतात.

निवेदिता-ताई's picture

22 Apr 2011 - 4:36 pm | निवेदिता-ताई

भाजलेली रताळी......मस्तच....लहानपणची आठवण झाली, आई नेहमी द्यायची चुलीमध्ये भाजून रताळी.

बाकी तुझे बेक्ड पोटॅटो मस्त्च......करुन पहाते...

खादाड अमिता's picture

26 Apr 2011 - 1:20 pm | खादाड अमिता

रताळी तर मस्तच लागतात... असेच बीट चे चिप्स पण छान लागतात बेक करून.
उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या मामा कडे नाशिक ला जायचो तेव्हा तो असे बटाटे, रताळी, बीट, कांदा असे भाजून द्यायचा शेकोटीत!

धनंजय's picture

27 Apr 2011 - 7:56 pm | धनंजय

परवाच काचर्‍या केल्या. मात्र बेक करण्याऐवजी ब्रॉइल केल्या. ब्रॉइलरमध्ये टाकण्यापूर्वी ३-४ मिनिटे काचर्‍या वाफाळल्या. वरून भाजक्या, आतून नरम झाल्या.

देशी फ्रेंच फ्राईज म्हणायला मस्त वाटले आणि खायला तर मजा येईल.

- पिंगू

निकिता_निल's picture

22 Apr 2011 - 9:50 am | निकिता_निल

अगदी मस्त फोटो आलाय.

नंदू's picture

22 Apr 2011 - 10:01 am | नंदू

व्वा फारच छान दिसतायत. थंडगार बियरची बरोबर तर फारच मजा येईल.

सहमत .. बिअर सोबत हा पदार्थ कसला भारी लागेल......ह्याची कल्पना करुनच बैचेन झालो.. काय करणार बिअर सोडली आहे ना आता..

स्वाती दिनेश's picture

22 Apr 2011 - 11:47 am | स्वाती दिनेश

पोटॅटो वेजेस मस्तच,फक्त ते फ्राइड नसून बेक्ड असल्याने कमी कॅलरींच्या नादात जरा जास्तच खाल्ले जातात,;)
तमाम जर्मनांचे बटाट्यावर भारी प्रेम,'ब्राट कार्तोफेल्न' हा याच वेजेसचा चुलत भाऊ आहे.
स्वाती

दीविरा's picture

22 Apr 2011 - 5:46 pm | दीविरा

करणार आजच :)

सूर्य's picture

24 Apr 2011 - 10:42 am | सूर्य

फोटु तर जबरा दिसतोय. लै भारी.

- सूर्य

सुत्रधार's picture

24 Apr 2011 - 3:16 pm | सुत्रधार

आवडली

प्राजक्ता पवार's picture

25 Apr 2011 - 7:19 pm | प्राजक्ता पवार

मस्तंच !

खादाड अमिता's picture

26 Apr 2011 - 1:28 pm | खादाड अमिता

आता... सांगा पाहू कुणी कुणी करून बघितले ते?

वेताळ's picture

27 Apr 2011 - 8:13 pm | वेताळ

मी उद्या करुन बघेन. वाचतानाच तोंडाला पाणि सुटले.....