बेक्ड पोटॅटो वेजेस
आमचे आहो: म्हणजे 'बटाट्याच्या भाजलेल्या काचऱ्या'.
मी: काय हे? अगदी कचरा केलास रे वेजेस चा! पोटॅटो वेजेस म्हंटल की कसा मस्त भारदस्त स्टायलिश आयटम वाटतो!
पण खरं ते इथे मान्य करायला हरकत नाही (आमचे आहो अजून मिपा वर नाहीयेत तोवर हि सुट घेता येतीये हो!) - पोटॅटो वेजेस म्हणजे भाजलेल्या बटाट्याच्या काचऱ्या. ह्यांनी जरी त्याचं देसी नामकरण केलं असलं तरी पदार्थ असतो लई फक्कड! आणि करायला कित्ती कित्ती सोपा! फक्त बटाटे, लाल तिखट, मीठ आणि थोडं तेल- एवढाच जिन्नस सुद्धा पुरतो. मी मात्र इथे 'गार्लीकी वेजेस' ची पाक्रु देतीये बरं का! असं काय? मला माझं वेगळेपण दाखवायला नको? :)
सामग्री:
बटाटे : हवे तेवढे (मी ४ घेतले), स्वच्छ धुवून (एखाद्या जुन्या टूथ ब्रश ने घासून), पुसून कोरडे करून - त्याचे वेजेस करा (लांबट चिरा), सालं काढू नका (त्याने वेजेस अधिक कुरकुरीत होतात शिवाज त्यातील पौष्टिकता टिकून राहते )
१ मोठा चमचा तेल : कुठले पण (मी उगीच ओलिव्ह ओईल वापरले, चवीत फारसा फरक पडत नाही. त्यामुळे 'स्वस्त ते मस्त' वापर!)
१ चमचा किंवा अधिक : लाल तिखट
काळी मिरीपूड आणि मीठ चवीनुसार
हवे असल्यास ओरेगानो घाला
६ -८ पाकळ्या लसूण, बारीक किसून. विकतची तयार पेस्ट घालण्याचा विचार देखील मनात येऊ देऊ नका (त्याच्यातल्या व्हिनेगर ने वेजेस एकदम बंडल लागतात)
कृती:
- सर्व सामग्री एका बेकिंग दिश मधे घेऊन हाताने व्यवस्थित कालवा. सगळ्या बटाट्याला मसाला नीट लागला पाहिजे.
- मग ओव्हन ला टोस्ट मोड (दोन्ही रॉड तापतील असे) २५० डिग्री वर चालू करून त्यात ती बेकिंग डिश २५ मिनिटे ठेवा.
-अगदीच राहावेनसं झालं की मग हळूच ओव्हन उघडून (जपून) एका चिमट्याने एक वेज काढून, फुंकर मारून खाऊन बघा. अप्रतिम कुरकुरीत आणि चमचमीत वाटला म्हणजे वेजेस तयार आहेत. नाही तर थोडं वेळ अजून ओव्हन मधे ठेवा. आणि हो, ज्यांनी कोणी हे वेजेस करण्याचे कष्ट घेतले असतील त्यांनी आधीच किमान १/४ ऐवज स्वतासाठी वेगळा काढून ठेवावा. सगळ्यानसमोर ठेवलं कि ५ मिनिटात चट्टा मट्टा होतो.
- ४ बटाट्यांचे वेजेस नाही न पुरले? म्हणूनच मी हवे तेवढे (झेपतील एवढे) बटाटे घ्या असे लिहिले आहे! ;)
वाचने
7955
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
मस्त!!
आमच्या पाकशाळेत याच नाव
आई गं....! (पुन्हा एकदा)
In reply to आई गं....! (पुन्हा एकदा) by प्रास
आता काय घ्यावे
छान! फ्रेंच फ्राईजपेक्षा
मस्तच... आणी सोपी सुध्धा...
जगदंब ... जगदंब .. -(
सह्ही! फोटो जबरा आला आहे.
(एखाद्या जुन्या टूथ ब्रश ने घासून)
छान - सोबत रताळी पण घाला
In reply to छान - सोबत रताळी पण घाला by धनंजय
आहा....................
In reply to आहा.................... by निवेदिता-ताई
रताळी
In reply to रताळी by खादाड अमिता
परवाच केल्या
देशी फ्रेंच फ्राईज म्हणायला
अगदी मस्त फोटो आलाय.
व्वा फारच छान
. बिअर सोबत हा पदार्थ कसला भारी लागेल
:)
मस्त !!
फोटु तर जबरा दिसतोय. लै
सुन्दर पाककला
मस्तंच !
सगळ्यांना धन्स!
मस्त अमिता