ओक साहेब, नाडी केंद्रवाले गप्प का?

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
6 Apr 2011 - 4:22 pm
गाभा: 

ओक साहेब नाडी केंद्रवाले गप्प का?

माझ्यासारखा नाडी ग्रंथ प्रेमीने प्राचीन महर्षींबद्दल लिहिताना-बोलताना, वाचले-ऐकले. पण एखादा नाडी केंद्रवाला नाडी ग्रंथांबाबत काय म्हणतो त्यांचे काय विचार आहेत. विशेषतः बुद्धिवादी विचारकांचे म्हणणे त्यांच्या कानावर जात असेल तेंव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होते ते आपण सांगावे असा एक अभिप्राय नुकताच कळला. हैयोहैयैयोंनी गूढप्रश्न करून तमिळ भाषासौंदर्याचा आढावा घेऊन लेखन केले. त्याच बरोबर वाचकांना नाडीकेंद्र चालक श्री. जी. ईश्वरन यांचे विचारदर्शन व्हावे यासाठी त्यांची मुलाखत घेऊन शब्दांकित केलले त्यांचे विचार.
आंतरऱाष्ट्रीय कीर्तीचे प्रख्यात बुद्धिवादी नाडीग्रंथांच्या संदर्भातील आपल्या कलुषित विचारांचे मत प्रदर्शन कसे करतात. याचा नमुना सोबत मराठीवाचकांसाठी प्रथमच प्रकाशित करत आहे.
(संदर्भ- इंडियन स्केप्टिक मासिकाच्या नोव्हेंबर १९९६ मधील अंकात नाडी ग्रंथांवर केले गेलेले भाष्य)

आत्तापर्यंत अनेक बुद्धिवाद्यांच्या संस्था व व्यक्तींच्या विचार प्रदर्शनाला नाडीग्रंथ केंद्रांतर्फे उत्तरे पाठवण्यात कोणत्याही नाडीकेंद्राने रस दाखवला नव्हता. मात्र यावेळी नाडीकेंद्रांतर्फे पुण्यातील केंद्र संचालक श्री. जी.ईश्ववरन यांनी बुद्धिवाद्यांच्या अशा कैफियतींवर आपले मत प्रदर्शन केले आहे. त्यांनी आपली प्रतिक्रिया शब्दात मांडण्यासाठी विंग कमांडर शशिकांत ओकांना विनंती केली. नाडीविरोधकांची मते विविध प्रसारमाध्यमांतून दणक्यात व ठळक मथळ्यांनी प्रकाशित होत असल्याने नाडी ग्रंथप्रेमींच्या मनात गोंधळ उडतो. ज्यांनी नाडी ग्रंथांचे अवलोकन केलेले नाही त्यांची मने आधीच कलुषित होतात अस लक्षात घेऊन त्यांनी हे पाऊल उचलले आहे.

प्रेषक – जी. ईश्वरन पुण्या व मुंबईतील नाडी केंद्राचे संचालक.
वाचक मित्रहो,
नुकतेच मला इंटरनेटवर एका नाडी ग्रंथप्रेमी फोरमवर काही मते प्रदर्शित केली गेल्याचे कळले. त्या संदर्भात माझ्या जवळची माहिती मी आपणांशी शेअर करू इच्छितो. प्रथम मी माझी ओळख करून देतो. सन १९९९ पासून माझा संपर्क मुंबईतील नाडी ग्रंथांशी आला. प्रथम भाषांतरकार व त्यानंतर संचालक या नात्याने मी अंबरनाथला एक व पुण्यात सध्या दोन केंद्रे गेल्या ९-१० वर्षांपेक्षा अधिक काळ चालवतो. त्यामधून अगस्त्य, वसिष्ठ, महाशिव, कौशिक आदि अनेक महर्षींच्या नाडी पट्ट्या आम्ही हाताळतो व वाचायला घेतो. याशिवाय गेली १०-११ वर्षे अत्री जीव नाडीमधून अनेकांना आमच्या केंद्रातून मार्गदर्शन केले जाते.
या व्यवसायात येण्याआधी मी एक फॅशन डिझायनर म्हणून परदेशातही नाव कमावले. मी तमिळ असलो तरी जन्म मराठी मुलखातील असल्याने मला मराठी व हिंदी भाषा अवगत आहेत. त्या ज्ञानाचा फायदा मित्रत्वाच्या नात्याने माझ्या घराशेजारील नाडी केंद्र थाटल्यांनी घ्यायला सुरवात केली. नंतर मी माझी नाडी ग्रंथ पट्टी पाहिली. त्यात तुला हेच काम आता या पुढे करावयाचे आहे. असे आल्यावर थोड्याशा नाराजीने मी या कामाला लागलो. नंतर मला या कामात रस आला व मी या व्यवसायात पडलो.
माझे दोनही भाऊ सध्या मला या कामात मदत करतात. मोठा पशुपती थेरगावचे तर कृपानंद डोंबिवलीला केंद्र चालवतो. अशा तऱ्हेने माझी इथल्या अनेक केंद्रातील नाडीवाचकांशी व तमिळनाडू मधील त्यांच्या पालक नाडीकेंद्रांच्या संचालकांशी व्यावसाय़िक संबंध आहेत.
नाडीभविष्यामुळे माझी विंग कमांडर ओकांशी ओळख झाली. त्यांच्या विविध भाषेतील लेखांमुळे, चर्चांमधून भाषणांमधून प्राचीन अनेक महर्षींच्या दिव्यज्ञान चक्षूंच्याज्ञानव भांडाराचे देशातील अनेक भागातील लोकांना मार्गदर्शन झाले. त्यांच्या बोलण्यातून असे कळले की श्री. बसव प्रेमानंद नावाचे एक आंतरराष्ट्रिय कीर्तीचे नास्तिकवादी संस्थाचालक इंडियन स्केप्टिक या नावाच्या मासिकातून आपले विचार प्रकट करत असतात. अनेक भारतीय व विशेषतः महाराष्ट्रातील निरीश्वरवादी चळवळीची ज्योत सन ८२-८३मधे पेटवण्याला त्यांचे मार्गदर्शन कारणीभूत होते. त्यामुळे त्यांचा दरारा व प्रभाव संपूर्ण भारतात फार मोठा मानतात. त्यांची मते ही दगडावरील रेघ मानणारे अनेक मराठी नेते मंडळी आहेत. अशा या नरोत्तमांची नाडी ग्रंथांवरची मते अंतिम सत्य मानली गेली तर नवल नाही. अशा या बी. प्रेमानंदांचा व महाराष्ट्रातून नाडी ग्रंथांना खोटे ठरवण्याचा चंग बांधलेल्या एका ग्रहस्थांचा (श्री. मा. श्री. रिसबुड हे त्यांचे नाव. त्यांचे सन २००७ मधे निधन झाले. काही काळापुर्वी बी. प्रेमानंदांचे निधन झाल्याचे कळते.) पत्रव्यवहारातून जी चर्चा झाली ती नोव्हेंबर १९९६च्या अंकातून एकत्रिक प्रसिद्ध झाली. फलज्योतिषशास्त्राचे अभ्यासक श्री रिसवबूड अंनिस संस्थेतर्फे ज्योतिषाच्या विरोधाचा गड तेंव्हा सांभाळत असत. बी प्रेमानंदांनी संकलित केलेल्या ‘एस्ट्रॉलॉजी सायन्स ऑर ईगो ट्रिप’ नावाच्या पुस्तकात त्यांनी ज्योतिष विषयावर संयुक्तपणे लेखन केले होते. उभयतांची इतकी वैचारिक घनिष्ठता असूनही या लेखात बी.प्रेमानंद त्यांच्याशी कसे हिणकस वागतात हे रंजक आहे. असो.
नोव्हेंबरच्या अंकातील सादरीकरण प्रश्नोत्तर स्वरूपाचे आहे. ते साधारणतः तसेच ठेऊन त्यांच्या विचारांवर मी माझे स्पष्टीकरण / प्रतिक्रिया देत आहे. रिसबुडांनी विचारलेले प्रश्न लाल रंगात असून बी. प्रेमानंदांनी दिलेली उत्तरे काळ्यारंगात असून माझे स्पष्टीकरण निळ्या जाड टाईपात केले आहे. आशयाप्रमाणे काही प्रश्नांना एकत्रिक करण्याची स्वतंत्रता घेतली आहे. एकंदरीत असे वाटते की बी प्रेमानंदांनी दिलेल्या उत्तरानी रिसबुड समाधानी नसावेत वा सहमत नसावेत. या लेखाची दखल इतक्या वर्षांनी घेण्याचे कारण एक तर मला कळले इतक्या उशीरा. पण हा विषय न शिळा होणारा व सामान्यांच्या जिव्हाळ्याचा असल्याने उत्तर देणे माझ्यासारख्याला उशीरा का होईना क्रमप्राप्त आहे. असो.
१. रिसबुडांचा प्रश्न - ‘बुचकळ्यात टाकणारा प्रश्न असा की व्यक्तीची नावे(नाडीच्या) पट्टीवर दिसतात कशी? बी. प्रेमानंदांचे उत्तर क्रमशः ... पुढे चालू....

प्रतिक्रिया

ज्या लोकांची अगस्ति / कौशिक जन्मपट्टी सापडत नाही.... त्यांना "अत्रि" पट्टी म्हणजे कामधेनू / कल्पवृक्षाप्रमाणे वरदान ठरते....
ज्यान्ना एखाद्या प्रश्नाचे अर्जन्ट सोल्युशन हवे असते आणि म्हणून जे अगस्ति/ कौशिक पट्टी शोधण्यासाठी नाडीकेन्द्रात येतात... पण दुर्दैवाने म्हणूया.. किन्वा वेळ / योग जुळून नाही आला म्हणून... पण ज्यान्ना त्यान्ची पट्टी सापडत नाही... त्यान्ना "कवड्यांचे दान" टाकून अत्रि पट्टीद्वारा आप्ल्या प्रश्नांचे योग्य ते उत्तर व मार्गदर्शन साक्षात अत्रि-मुनी व अनसूया मातेकडून मिळू शकते...

अर्थात.... ज्याला खरंच तहान लागली आहे.... तोच पाणी शोधतो... त्याप्रमाणे ज्याला खरोखर नाडी-भविष्यावर भरोसा आहे... तो स्वतः नाडी केन्द्र शोधतो.. व आपली पट्टी बघतो....

त्यामुळे शशिकान्त्'जी , मला इतकेच वाटते... की ज्यांना खरोखर गरज आहे आणि ज्यान्चा विश्वास आहे... अश्यांसाठी आपले मार्गदर्शन व अनुभव खरोखर मदतगार ठरतील... पण ज्यांचा यावर विश्वास नाहीये... त्या लोकांच्या कडवट प्रतिक्रियांमुळे नाडी-जोतिषाचा पर्यायाने महान तपस्वी ऋषी मुनींचा व त्यांच्या साधनेचा अपमान होऊ नये... :|

कारण याआधीचे अनुभव आपल्यालाही माहित आहे.. आणि मलाही! .. :)

मृगनयनी
बुद्धिवाद्यांच्या दांडगाईला घाबरुन उपयोगाचे नाही

ओक साहेब
मुलाखत येउ द्या..............

आत्मशून्य's picture

7 Apr 2011 - 10:31 pm | आत्मशून्य

घाबरायचे तर ज्योतीष-वाद्यांना असते. मूलाखत आलीच पाहीजे.

गणेशा's picture

6 Apr 2011 - 8:07 pm | गणेशा

शशिकांत जी ...

तसा भविष्य पाहण्यावर माझा विश्वास नव्हता.. पण जेंव्हा विश्रांतवाडीला मी माझ्या फ्रेंडच्या घरी गेलो तेंव्हा या बाबत मे पहिल्यांदाच ऐकले ..
आणि मी २ दा श्री अयप्पन यांना भेटुन माझी पट्टी ऐकली.. विश्वास बसत नाहि इतके सत्य होते ते. पण तेंव्हा कॉलेजलाच असल्याने मी ते लिहिलेले आणि कॅसेट लांब ठेवून दिली ...
पुन्हा विचार करत होतो जाण्याचा पण नेमके त्यांचा पत्ता बदलला होता.. कॅसेट वरील फोन लागत नव्हता ..
तुम्हीच मला पुण्यातील पत्ता द्या .

बाकी येथे नविन असल्याने आधीच्या धाग्यांची काहीच माहिती नाही ..
पण येव्हडेच विरोध करीत असलेली मंडळी आणु अनुभव आलेली मंडळी यात फरक असणारच ..
असो

पुढे वाचण्यास इच्छुक........

आत्मशून्य's picture

6 Apr 2011 - 10:47 pm | आत्मशून्य

‘बुचकळ्यात टाकणारा प्रश्न असा की व्यक्तीची नावे(नाडीच्या) पट्टीवर दिसतात कशी?

ओक साहेब, प्लीज मूलाखत येऊद्याच मलाही कूतूहल आहे हे नाडीबाबत जाणून घ्यायच. तसेच पूढील काही प्रश्न पण आहेत.

१) ज्या प्रमाणे विश्वामीत्र रूशींनी रामायण हे राम जन्माच्या अगोदरच लीहले होते तसेच जगातील सर्व लोकांच्या जन्मा अगोदर त्यांचे भवीष्य लीहण्या मागची प्रेरणा व प्रयोजन काय आहे ?

२) जर पट्टी अचूक असेल तर भवीष्य प्रारब्ध चूकण्याच्या वा बदलायच्या काही शक्यता अस्तीत्वात आहेत काय ?

३) सर्व लोकांचे भवीष्य आधीच नाडीपट्टीद्वारे अस्तीत्वात असल्याने व पृथ्वीचा अंत हा २०१२ मधे होणार नसल्याची श्रध्दा असल्याने या जगातील सर्वात शेवटचा जन्म कोणाचा व केव्हां आहे व त्याचे भवीश्य काय आहे हे नाडीपट्टीद्वारे जाणून घेण्यास ऊत्सूक.

कृपया वरील प्रश्नांबाबत मला 'जीनाइन' कूतूहल आहे , व त्यावर आपले प्रतीसाद वाचण्यास मी आतूर आहे.

ईश आपटे's picture

6 Apr 2011 - 10:58 pm | ईश आपटे

रामायण विश्वामित्राने लिहीलेले नाही. सामान्य लोकांची सामान्य आयुष्ये आणि श्रीरामाची कथा ह्यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे.

पृथ्वीचा अंत हा २०१२ मधे होणार नसल्याची श्रध्दा असल्याने
???? म्हण़जे २०१२ च्या अफवेमुळे आपण भयभीत झाला की काय ????

आत्मशून्य's picture

7 Apr 2011 - 3:35 pm | आत्मशून्य

रामायण विश्वामित्राने लिहीलेले नाही.

वाल्मीकीने लीहले :)

सामान्य लोकांची सामान्य आयुष्ये आणि श्रीरामाची कथा ह्यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे.

पण भवीष्य जाणून घ्यायची पध्दत एकच आहे ना ? जो राम जन्मा आधी त्याची नाडी लीहू शकतो तो कोणत्याही माणसाची पट्टी सहज लीहू शकतो असा सरळ सोपा यूक्तीवाद आहे.

???? म्हण़जे २०१२ च्या अफवेमुळे आपण भयभीत झाला की काय ????

त्या अफवेला कोणतेही ठोस प्रमाण देता येत नसल्याने , व प्रमाणाचा अतीरेक नसावा या हेतूने मी २०१२ च्या अफवेला गंभीर बळी पडलो होतो. पण तो इथला वीशय नाही तर नाडी प्ट्ट्यांमधून मनूष्य जातीला काही महत्वाची उकल होएल काय हा तो वीचार आहे, मला नाडीप्ट्यांबाबत अधीक जाणून घ्यायचे आहे ? तूम्ही कोणते नाडी केंद्र चालवता काय ?

रामपुरी's picture

7 Apr 2011 - 2:13 am | रामपुरी

"सर्व लोकांचे भवीष्य आधीच नाडीपट्टीद्वारे अस्तीत्वात असल्याने"
तुम्हाला असा प्रश्न कधी पडला नाही का कि एवढ्या लोकांच्या (पक्षी ६ अब्ज + आधी होऊन गेलेली + पुढे येणारी ) पट्ट्या नक्की कुठे ठेवल्या आहेत? हा एकच प्रश्न मी ओकांना नेहेमी विचारला आहे आणि आजतागायत त्यांनी त्याचे उत्तर दिलेले नाही. तुम्ही पण विचारून बघा काही उत्तर मिळते का... मग नाडीवाल्यांकडे जायचा विचार करा.

(जाहिरात करणार्‍याला जाहिरात करण्याचे पैसे मिळतात)

मी ही त्यांना विचारले होते की एखाद्याची पट्टी मिळाल्यावर ती त्याला देऊन का टाकत नाहीत किंवा नष्ट का करत नाहीत? तेवढाच पुढील शोधण्याचा त्रास कमी नाही का? त्याचे उत्तर सोयीस्कररीत्या टाळले होते.

आत्मशून्य's picture

7 Apr 2011 - 3:38 pm | आत्मशून्य

म्हणजे ६ अब्ज गूणीले १०० पीढ्या गृहीत धरूयात आता सांगा कीती पट्ट्या होती आणी त्या कूठे जतन केल्या असतील ? खरं तर १०० पीढ्या हा फार लहान आकडा आहे, वस्तूस्थीती ही आहे की हे आदरणीय नाडी लेखन करणारे रूशी हज्जारो(? )वर्षांपूर्वी होउन गेले असावेत, मग आता बोला एकूण पट्यांची संख्या कीती आणी त्या कूठे ठेवल्या असाव्यात ?

रणजित चितळे's picture

7 Apr 2011 - 9:00 am | रणजित चितळे

........ छान लेख वाचतो आहे

शशिकांत ओक's picture

7 Apr 2011 - 12:28 pm | शशिकांत ओक

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद,
मी लिहित बसायचे कष्ट घ्यायचे तर धागा निदान ५०० वाचकांच्या पुढे गेला तर लिहावे असे ठरवून आहे. यानंतरच्या भागांना हजार वाचने व्हावीत अशी संकल्पना करून लेखनाची बॅटिंग करावी असे वाटून आहे. तेंव्हा तो आकडा पटापट पार करायला तिरकस तिरंदाजांना विनंती करतो!

लंबूटांग's picture

7 Apr 2011 - 10:34 pm | लंबूटांग

ह्या क्षणी 747 वाचने झाली आहेत.

पुष्करिणी's picture

7 Apr 2011 - 1:01 pm | पुष्करिणी

पुढील भागांच्या प्रतिक्षेत

प्रकाश घाटपांडे's picture

7 Apr 2011 - 3:42 pm | प्रकाश घाटपांडे

मिपा च्या नवीन वाचकांना तसेच पाहुण्यांना माधव रिसबूड यांचा परिचय इथे पहाता येईल.

सर्व तार्किक / लॉजिकल शंका झाल्या. ते बाजूला ठेवले तरच काही ऐकता येईल.

(की नाडीपट्ट्या ऐनवेळी लिहिल्या जातात?) ... नको नको. तर्क नको.

पण शंकेखोर स्वभाव जाता जात नाही ?
.

तिरकस तिरंदाजांना प्रात्यक्षिकाला निमंत्रण दिले तर कामाच्या व्यस्ततेची आडकाठी होते...
काही हरकत नाही... ज्या काहींना खरोखरच नाडीग्रंथांवर गंभीर विचार करायला आनंद वाटेल त्यांचे स्वागत..

गवि's picture

18 Apr 2011 - 11:18 am | गवि

सर, तुम्ही इकडची अवतरणे तिकडे असे क्वोट करुन सगळीकडे रिप्लाय देत आहात. आत्मशून्य यांचे एक म्हणणे मला आता पटायला लागले आहे की तुम्ही कोणत्याही प्रश्नाला तिथल्यातिथे थेट नि:संदिग्ध उत्तर देत नाही. काहीवेळा पुस्तकाकडे रेफर करता, काहीवेळा प्रत्यक्ष संपर्क करायला सांगता, काहीवेळा प्रात्यक्षित अरेंज करुन अचानक निमंत्रण देता.

माझ्यासारखे अनेक वाचक आधी साध्या कुतूहलजन्य प्रश्नांची उत्तरे इथेच याच फोरममधे मिळवू इच्छितात. आम्ही वाचकांनी इथे किंवा इतरत्र विचारलेल्या प्रश्नांमधले (ज्यातले माझ्या एका प्रतिक्रियेतले अवतरण आपण वर वापरलेत) त्यातल्या एकातरी प्रश्नाचे उत्तर "थेटभेट, प्रात्यक्षिकाला हजेरी, पुस्तक विकत घेणे" या ऑप्शन्स शिवाय इथेच मिपावर दिलेत तर पुढे काही जाणून घेण्याची इच्छा होईल.

आत्तापर्यंत वाचलेले सर्व लिखाण हे निव्वळ टीजर आणि वाचकाला घोळात पाडणारे वाटले. टायटलमधे वाचकांचे नेमके प्रश्न पण उत्तर मात्र लेखात नाहीच.

दुर्दैवाने नुसते असंख्य शब्द वापरत राहूनही प्रत्यक्षात एकाही प्रश्नाचे मुद्द्याचे उत्तर तुम्ही स्वत: दिलेले नाही. (कोणाच्याही इतरांच्या तोंडून भूतकाळात तिसर्‍याला गेलेले उत्तर नव्हे)

जर प्रत्यक्ष भेटून / समोरच्याची नाडीतल्या इंटरेस्टची सत्यता जोखून आणि तरीही अन्य मार्गांनी अप्रत्यक्ष उत्तरेच द्यायची असतील तर मिसळपाव या पब्लिक फोरमवर लेख लिहिण्यात काय हशील ? मग कोणी नुसती जाहिरातबाजी म्हटले तर त्यात चूक म्हणता येत नाही.

मी माझे (आणि इतर अनेकांचे) प्रश्न (मनापासून सांगतो, की खोचक, तिरकस वाटत नसलेले प्रश्न) मी खाली पुन्हा लिहितो.

अनेक नाडीकेंद्रे आहेत. पूर्वी जन्मलेल्या, सध्या जिवंत आणि पुढे येणार्‍या प्रत्येकाची नाडी तिथे आहे. म्हणजे अब्जावधी नोंदी असणार. आपण आपल्या जवळच्या नाडीकेंद्रात (समजा महाराष्ट्रात अशी ८० आहेत) जाऊन ती शोधू शकतो. (जशी आत्मशून्य यांना पुण्यात मिळाली)

म्हणजे सर्वच्या सर्व माहिती (पत्रे / नाड्या) सर्व केंद्रात रिप्लिकेट केलेल्या असतात का?

प्रत्येकाची पट्टी प्रत्येक केंद्रात....म्हणजे अनेक अब्ज गुणिले शेकडो केंद्रे इतक्या पट्ट्या कितीही पातळ बनवल्या तरी तेवढी ताडाची झाडे असतील का आणि तितकी रिप्लिकेशन कशी झाली / स्टोरेज स्पेस कशी उपलब्ध झाली.

गोडाऊनसारखे असते का केंद्र ?

प्राथमिक पातळीचे प्रश्न आहेत. सर्वांनाच उत्तरे वाचायला आवडतील. मला एकट्यालाच नव्हे. तेव्हा नेमकी उत्तरे काय आहेत हे सांगावे (इथेच..) ही विनंती..