हा ध्वजाचा अपमान नाही का?

Primary tabs

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
3 Apr 2011 - 5:29 pm
गाभा: 

काल वल्डकप जिकल्यानंतर स्टेशियम वर जो उन्माद बघायला मिळाला त्यात एक घॄणास्पद गोष्ट बघायला मिळाली. हरभजनसिंग आणि युवराजने राष्ट्रीय ध्वज चेहेर्‍यावरचा घाम पुसायला तसेच नाक पुसायला वापरला. सचिनने तर स्वत:ला राष्ट्रध्वजामध्ये शाली सारखे लपेटून घेतले होते. ही गोष्ट कितीजणांच्या लक्षात आली कुणास ठाऊक?.

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

3 Apr 2011 - 5:34 pm | युयुत्सु

मला तरी या प्रकाराची आणि या खेळाडूंची काल किळस आली.

चिंतामणी's picture

5 Apr 2011 - 11:50 pm | चिंतामणी

विजुभाउंनी हेच काल लिहीले आहे.

अप्पा जोगळेकर's picture

3 Apr 2011 - 5:46 pm | अप्पा जोगळेकर

सचिनने तर स्वत:ला राष्ट्रध्वजामध्ये शाली सारखे लपेटून घेतले होते.
मग यामधे प्रॉब्लेम वाटण्यासारख काय आहे ? सायना नेहवाल, अभिनव बिंद्रा, विजेंदर सिंग यांनीसुद्धा असंच स्वतःला ध्वजामधे लपेटून घेतलेलं पाहिलं आहे. कारण तेंव्हा ते भारत देशाचं प्रतिनिधित्व करत असतात.

हरभजनसिंग आणि युवराजने राष्ट्रीय ध्वज चेहेर्‍यावरचा घाम पुसायला तसेच नाक पुसायला वापरला.
चेहर्‍यावरचा घाम पुसताना पाहिले. पण नाक पुसायला याचा अर्थ काय? म्हणजे नाक शिंकरायला असं म्हणायचं आहे का ? नाक शिंकरताना मी तरी पाहिले नाही.
चेहर्‍यावरचा घाम पुसणं हे खटकलं इतपत ठीक आहे. पण ते जाणीवपूर्वक केले आहे असे वाटले नाही.
सगळा भारत विश्वविजयाचा आनंद घेत होता तेंव्हा तुम्हाला खेळाडूंची किळस वाटत होती हे वाचून गंमत वाटली.

चालायचंच.. कुणाला दगडातला देव दिसतो.. कुणाला देवातला दगड..

मग यामधे प्रॉब्लेम वाटण्यासारख काय आहे ? सायना नेहवाल, अभिनव बिंद्रा, विजेंदर सिंग यांनीसुद्धा असंच स्वतःला ध्वजामधे लपेटून घेतलेलं पाहिलं आहे. कारण तेंव्हा ते भारत देशाचं प्रतिनिधित्व करत असतात.

ते करतात म्हणजे चांगलेच आहे असे कोण म्हणते?????? ते असे करत असतील तर तीसुध्दा चूकच आहे त्यांची.

सायना नेहवाल, अभिनव बिंद्रा, विजेंदर सिंग हे भारताचे प्रतिनीधित्व करतात. BCCI म्हणते का की ही टिम भारताची आहे?????? तशी असती तर आशीयाई स्पर्धेत भारताचा संघ का नव्हता? (अप्पा BCCI याचे उत्तर देणार नाही. आपण देउ शकता आणि द्यावेत)

हरभजनसिंग आणि युवराजने राष्ट्रीय ध्वज चेहेर्‍यावरचा घाम पुसायला तसेच नाक पुसायला वापरला.
चेहर्‍यावरचा घाम पुसताना पाहिले. पण नाक पुसायला याचा अर्थ काय? म्हणजे नाक शिंकरायला असं म्हणायचं आहे का ? नाक शिंकरताना मी तरी पाहिले नाही.
चेहर्‍यावरचा घाम पुसणं हे खटकलं इतपत ठीक आहे. पण ते जाणीवपूर्वक केले आहे असे वाटले नाही.
सगळा भारत विश्वविजयाचा आनंद घेत होता तेंव्हा तुम्हाला खेळाडूंची किळस वाटत होती हे वाचून गंमत वाटली.

पण ते जाणीवपूर्वक केले आहे असे वाटले नाही.
म्हणजे काय?????? जाणिवपुर्वक कृत्य केले असेल तरच गुन्हा असतो??????

कायद्याचे दृष्टीने "कायदा माहीत नसणे अथवा चूकून होणे" ही माफिची कारणे असू शकत नाहीत.

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Apr 2011 - 10:26 am | llपुण्याचे पेशवेll

चिंतामणींशी सहमत आहे. राष्ट्रध्वज खांद्यावर घेण्यात झालंच तर लपेटून घेण्यातही काही तितकेसे चूक वाटले नाही. पण घाम पुसणे वगैरे म्हणजे अतीच होते. जो ध्वज खांद्यावर घेतला आहे त्याच मान राखला नाही तर काय उपयोग आहे. देशासाठी खेळलात (असे म्हणूया) म्हणून काय वाट्टेल तसे वागायचे का? प्रथमच युयुत्सुंशी सहमत आहे.

अमोल केळकर's picture

4 Apr 2011 - 11:06 am | अमोल केळकर

+१ सहमत

अप्पा जोगळेकर's picture

4 Apr 2011 - 2:10 pm | अप्पा जोगळेकर

कायद्याचे दृष्टीने "कायदा माहीत नसणे अथवा चूकून होणे" ही माफिची कारणे असू शकत नाहीत.
सहमत आहे. घाम पुसणे हा गुन्हा नाही असे मी लिहिलेले नाही. ते मुद्दामून केलेले नाही असे वाटले असे लिहिले आहे.
'चेहर्‍यावरचा घाम पुसणं हे खटकलं इतपत ठीक आहे.' असे स्पष्टपणे लिहिलेले आहे.

या कारणासाठी खेळाडूंची किळस वाटली हे विधान हास्यास्पद आहे हे पुन्हा एकदा नमूद करतो.

ते करतात म्हणजे चांगलेच आहे असे कोण म्हणते?????? ते असे करत असतील तर तीसुध्दा चूकच आहे त्यांची.
ते करतात म्हणून नाही. ते एक उदाहरण आहे. मुळामधे या खेळाडूंनी ध्वज अंगाला लपेटून घेणे यातच काही गैर आहे असे वाटत नाही.

BCCI म्हणते का की ही टिम भारताची आहे??????
BCCI चं माहिती नाही. भारतातली आम जनता तरी असंच मानते हे त्रिवार सत्य आहे. आय्पीएल च्यामॅचेस आणि विश्वचषकातले सामने यामध्ये फरक आहे हेही लोकांना ठाउक आहे.
समजा आयपील्चा सामना हैद्राबादने जिंकला तर तिथे रात्री दिवाळी साजरी होत नाही.
पण भारताने विश्वचषक जिंकला तेंव्हा हैद्राबादच काय भारतभर दिवाळी साजरी होते यावरुनच काय ते समजा.
परवाच्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत फिकट निळ्या कपड्यात खेळाणारी टीम जिंकली तेंव्हा मी आणि माझ्यासारखे असंख्य भारतीय लोक तरी हा सामना भारताने जिंकला आहे असं म्हणत होते.
तुम्ही त्यां टीमला काय म्हणत होतात हे माहीती नाही.

कायद्याच्या कोनातुन सुध्दा ही भारताचीच टीम आहे.

आणि हे न्यायालयाने मान्य केलेले तत्व आहे ज्यामध्ये बी सी सी आय ही संस्था 'घटनेच्या कलम १२ मध्ये समावेश असलेल्या 'स्टेट' या व्याख्येत बसते...!'

यामुळे हा भारताचा "official" संघ आहे... यामुळे हा विजय देशाचा विजय मानायला हरकत घेणे योग्य वाटत नाही.

अप्पा जोगळेकर's picture

5 Apr 2011 - 7:51 pm | अप्पा जोगळेकर

धन्यवाद.

चिंतामणी's picture

7 Apr 2011 - 1:02 am | चिंतामणी

या क्लिपमधे युवराज ध्वजाने तोंड (घाम) पुसताना दिसेल.

(फक्त २.२६ मीनीटाची क्लिप आहे.)

तरीही मला वाटते काही वेळा फार वाईट पद्धतीने ध्वज हाताळला आहे.
भज्जी आणि विराट कोहलीचा १.३७ मीनीटाला येणारा फोटो बघा. भज्जीच्या हातातील चोळामोळा केलेला ध्वज बघा (आणी तो कुठे धरला आहे हेसुद्धा बघा.)

लॅपमारताना पुढील ओळीतील पियूष चावला आणि कोहली ध्वज कसा घेउन चालले आहेत हे बघा.

.

पैसा's picture

3 Apr 2011 - 5:48 pm | पैसा

राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये. युवराज चेहर्‍यावरचा घाम राष्ट्रध्वजाने पुसत होता, तर सचिनच्या अंगावरील ध्वजाला चक्क शाल किंवा स्वेटरसारखी गाठ मारली होती.

विसोबा खेचर's picture

4 Apr 2011 - 9:39 pm | विसोबा खेचर

राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये. युवराज चेहर्‍यावरचा घाम राष्ट्रध्वजाने पुसत होता, तर सचिनच्या अंगावरील ध्वजाला चक्क शाल किंवा स्वेटरसारखी गाठ मारली होती.

असे जर असेल तर ते नक्कीच चुकीचे आहे..

परंतु निदान सचिनबद्दल तरी मी असे म्हणेन की ते त्याच्याकडून आनंदच्या भरात आणि खरोखरच अनवधानने झाले असावे...आणि तसे झाले असलेच तरी गेल्या २२ वर्षाच्या त्याच्या उत्तुंग कालावधीत प्रथमच झाले असावे..!

सचिन जेवढा मोठा खेळाडू आहे त्याहूनही अधिक तो एक सच्चा देशप्रेमी आहे, आणि एक अत्यंत विनम्र, मर्यादाशील व्यक्ती आहे याबद्दल वाद नाही..

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Apr 2011 - 5:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काल जेव्हा मैदानावर खेळाडू ध्वज घेऊन वावरत होते, धावत होते तेव्हा मला उगाच शंकेची पाल चुकचुकलीच होती. आनंदाच्या आणि भावनेच्या भरात भारतीय खेळाडूंकडून ध्वजाचा अवमान तर होणार नाही ना ? होऊ नये असेच सारखे वाटत होते. आणि झाले नाही असे मला वाटते. कारण, तसे झाले तर विजयाचा आनंद सोडून दिवसभर विविध वाहिन्या आणि प्रसारमाध्यमं नसलेल्या विषयाचा चोथा करुन आनंदाला गालबोट लावतील. बाकी, ध्वजाचा वापर नाक पुसायला केला हे मात्र दिसले नाही. बाकी, खेळाडूंची किळस वगैरे कै च्या कैच वाटले राव.

-दिलीप बिरुटे

डावखुरा's picture

3 Apr 2011 - 6:01 pm | डावखुरा

मलाही थोडेफार हे जाणवले...युवराजच्या बाब्तीत जास्त...

चिंतामणी's picture

3 Apr 2011 - 6:02 pm | चिंतामणी

हा ध्वजाचा अपमान नाही का?

युयुत्सु- चांगल्या विषयाला तोंड फोडले आहेत. कालच्या प्रकारात राष्ट्रध्वजाचा अपमान नक्कीच झाला आहे. पण राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वज यांच्या पावित्र्याबद्दल कितीजण जागरूक असतात?

अनेकांनी आंधळ्या क्रिकेट प्रेमापाई आणि क्रिकेटीयर देवांपाई सर्वांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे.

लिहीण्यासारखे खूप आहे. तुर्त एव्हढेच लिहून थांबतो. वेळ मिळाल्यावर परत लिहीनच.

अप्पा जोगळेकर's picture

3 Apr 2011 - 6:02 pm | अप्पा जोगळेकर

बाकी, खेळाडूंची किळस वगैरे कै च्या कैच वाटले राव.
भरपूर लोकांना सांगून पाहिले असेल पण सगळ्यांनी खिल्ली उडवली म्हणून मग यांनी धागा काढला बहुतेक.

मन१'s picture

3 Apr 2011 - 8:06 pm | मन१

प्र का टा आ
खाली दिलेल्या पकाकाकांच्या प्रतिक्रियेशी सहमत .

प्रकाश घाटपांडे's picture

3 Apr 2011 - 6:17 pm | प्रकाश घाटपांडे

राष्ट्रध्वजाचा अवमान ही तांत्रिक बाब आहे. अनेक राष्ट्रशोषक बगळे मोठ्या भक्तीभावाने राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना आपण पहातोच.

चतुरंग's picture

3 Apr 2011 - 6:21 pm | चतुरंग

'राष्ट्रशोषक बगळे' ह्या शब्दांबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत! ;)

-रंगा

प्राजु's picture

3 Apr 2011 - 6:43 pm | प्राजु

शब्दाबद्दलहि आणि प्रतिसादाबद्दलही.
:)

विकास's picture

3 Apr 2011 - 7:47 pm | विकास

सहमत!

प्रकाशरावांकडे सिक्सर कशी मारावी याचे शिक्षण घेण्याचा सध्या विचार आहे. ;)

चिंतामणी's picture

4 Apr 2011 - 1:45 am | चिंतामणी

राष्ट्रशोषक बगळे मोठ्या भक्तीभावाने राष्ट्रध्वजाला मानवंदना देताना आपण पहातोच.

राष्ट्रशोषक बगळे मोठ्या भक्तीभावाने राष्ट्रध्वजाला मानवंदना देतात. (खोटी का होईना). जाहीररीत्या नाक/ घाम पुसायला नाही वापरत राष्ट्रध्वज.

कुंदन's picture

4 Apr 2011 - 2:55 am | कुंदन

>>राष्ट्रशोषक बगळे मोठ्या भक्तीभावाने राष्ट्रध्वजाला मानवंदना देतात. (खोटी का होईना). जाहीररीत्या नाक/ घाम पुसायला नाही वापरत राष्ट्रध्वज

बास , मग आता त्यांचाच आदर्श आपण यापुढे ठेवुयात , काय ?

राष्ट्रशोषक बगळे मोठ्या भक्तीभावाने राष्ट्रध्वजाला मानवंदना देतात
__/\__

चतुरंग's picture

3 Apr 2011 - 6:18 pm | चतुरंग

असामान्य यशाच्या उन्मादात अजाणतेपणाने असे होऊ शकते. ध्वज खांद्यावर टाकून किंवा लपेटून घेणे ह्यात मला गैर वाटले नाही परंतु घाम जर पुसला असेल तर तसे व्हायला नको होते असे नक्कीच वाटते. परंतु खेळाडूंची किळस वगैरे यावी असे काही मला वाटत नाही. तो सगळा विजयोत्सव साजरा करताना घडलेला प्रकार असावा. त्याचा इतका बाऊ केला जाऊ नये.

-तिरंगा

आनंदयात्री's picture

3 Apr 2011 - 6:54 pm | आनंदयात्री

रंगाशेठशी सहमत आहे.

विकास's picture

3 Apr 2011 - 7:52 pm | विकास

असेच म्हणतो. सचिनचे तत्वतः चुकले असावे पण यात अपमान वाटला नाही. तेच युवराजबद्दल वाटते की अनावधानाने झाले. सांगितले पाहीजे हे नक्की...

तरी देखील हरभजनची पद्मश्री संदर्भातील बातमी वाचून थोडे शिक्षण देण्याची गरज आहे असे वाटले...

Learn from Sachin, Gill tells Dhoni, Harbhajan

बाकी ठीक पण गिल म्हणजे तेच ना ज्यांनी एका महीला हॉकी खेळाडुशी असभ्य वर्तन केले म्हणुन केस झाली होती आणि दाबली गेली?

धागा नेहमीप्रमाणेच रोचक. प्राजुशी सहमत.

चिंतामणी's picture

4 Apr 2011 - 9:15 am | चिंतामणी

"ते" के.पि.स गिल. हॉकी असोसिएशनचे प्रेसीडेंट होते ( व I.P.S. अधीकारी होते. त्यांनी एका I.A.S. महीलेचा विनयभंग केला होता)

हे डॉ. एम.एस.गिल. हे केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री आहेत. वरील उदगार काढले त्यावेळी ते क्रिडा खात्याचे मंत्री होते.

(अवांतर- टेनीस खेळाडु रूचिका गेहरोत्राचा विनयभंग करून तीला आत्महत्या करण्यास भाग पाडलेला I.P.S. अधीकारी हरयाणा लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष एसपीएस राठोड होत.

त्यांनी रूचीकाच्या कुटुंबियांनासुद्धा खूप त्रास दिला. परंतु या घटनेची साक्षीदार असलेली तिची मैत्रीण आराधना गुप्ताने या राठोड विरूध्द कायदेशीर लढा देउन त्याला तुरुंगवास घडवला.

या बद्दलची सवीस्तर माहिती येथे वाचा.)

(के.पि.स गिल आणि एसपीएस राठोड या दोघांबद्दल एक लेख येथे वाचा)

शिल्पा ब's picture

4 Apr 2011 - 10:25 am | शिल्पा ब

मला माहीत नव्ह्ते की हे दोन्ही गिल वेगळे आहेत म्हणुन. धन्यवाद.

कायद्याचे दृष्टीने "कायदा माहीत नसणे अथवा चूकून होणे" ही माफिची कारणे असू शकत नाहीत.

वरती एकदा लिहीले आहे. पुन्हा लिहीतो.

कायद्याचे दृष्टीने "कायदा माहीत नसणे अथवा चूकून होणे" ही माफिची कारणे असू शकत नाहीत.

रंगाभाउ- एक सांगा. एखाद्या सामान्यमाणसाला काही लाखांची लॉटरी लागली. आणि त्या "यशाच्या उन्मादात अजाणतेपणाने" त्याने वाहन चालवताना तुम्हाला धडक मारली. तर माफी देणार काय?

अप्पा जोगळेकर's picture

4 Apr 2011 - 2:58 pm | अप्पा जोगळेकर

अगदी असेच म्हणतो.

कै च्या कै!!
मान -अपमानाच्या कक्षा आपण ठरवायच्या असतात. अंगावर लपेटणे यात गैर काहीच वाटले नाही.
घाम वगैरे पुसला असेल.. "चला... आता राष्ट्रध्वजाने घाम पुसूया.." असं म्हणून जाणूनबुजून कोणीच केलं नसेल/नसणारच. विजयाच्या उन्मेदामध्ये होऊ शकतं, पण याचा अर्थ राष्ट्रध्वजाच्या अपमान झाला असा होत नाही. असल्या फाल्तू गोष्टींनी अपमान होण्यासारखा इतका खालच्या पातळीचा आणि स्वस्त आपला राष्ट्रध्वज नक्कीच नाहीये.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला रस्त्यांवर काडीला लावलेले कागदाचे राष्ट्रध्वज ५ - १० रूपयांना मिळतात आणि १६ ऑगस्ट आणि २७ जानेवारीला रस्ते लोटणार्‍या बायका हे राष्ट्रध्वज उचलून कचर्‍यात टाकतात.. तो अपमान नसतो का?
नक्की मान कशाने वाढतो आणी अपमान कशाने होतो.. याची सीमारेखा आखली पाहीजे. आपल्या अपमानाची कक्षा इतकी अरूंद ठेवली तर दर २-४ पावलांवर अपमान होतो.

मला राष्ट्राबद्दल, राष्ट्रध्वजाबद्दल अभिमान वगैरे नाही असा समज कोणी करून घेऊ नये.. पण somewhere you have draw the line..! उद्या हे असले धागे वाचून पुन्हा कोणी माथेफिरू राष्ट्रध्वजाचा अपमान झाला म्हणून दंगा घडवू शकतो आणि चांगल्या गोष्टिकडे व्यवस्थित दुर्लक्ष होऊ शकतं. नक्की कशाला किती महत्व द्यायचं हे समजायलाच हवं.
माझ्या दृष्टीने या धाग्याला काहीही अर्थ नाहीये. हा धागा काढायची गरज नव्हती. तुम्हाला वाटलं अपमान झाला.. तुमच्यापर्यंतच ठेवायला हवं होतं.. इथे लिहून ज्यांच्या लक्षात ते आलं नव्हतं त्यांना लक्षात आणून देण्याइतकी मोठी गोष्ट ही नक्कीच नाहीये. असो..
बाकी चालूद्या.. शहाण्यास सांगणे न लागे.

सखी's picture

3 Apr 2011 - 9:19 pm | सखी

प्राजुशी सहमत. मी तर पाहीले तेव्हा हरभजनने आधी डोळे पुसले होते, नंतर घाम. सचिनने किंवा आणि कोणी त्याच्या भोवती शालीसारखा ध्वज गुंडाळला तर ते काय लगेच तो काढुन घडी करुन टिव्हीवाल्यांशी बोलणार का? समजा तुमची जी भावना आहे तीच भावना मनात ठेवुन तशी कृती केली असती तर ब-याच लोकांना तोही राष्ट्रध्वजाचा अपमान वाटला असताच की.

ही घटनाच अगदी माझ्यासारख्या सामान्य भारतीयालासुद्धा ह्रदयात सामावाणारी (Overwhelmed ला अजुन चांगला मराठी शब्द?) नाही तर जिथे त्यांचा कस लागला त्यांची काय कथा. आधीचा सगळा तणाव, लोकांचे, मिडीयाचे प्रेशर, राजकीय व्यक्तींची उपस्थिती, एखादा कोणी किंवा स्वत: तो खेळाडु चांगला नाही खेळला तर ती होणारी चिडचिड आणि नंतर २८ वर्षांनी मिळवलेला तो विजयी कप! हे सगळे फार मोठे आहे हो, त्याचा अर्थ असा नाही की या गदारोळात राष्ट्रध्वजाचा अपमान व्हावा, झाला तर चालतो, कोणीही हे मुद्दाम केलेले नाही. आणि प्राजु म्हटली तसं अशा वेळी गळा काढणारे किती लोक १६ ऑगस्ट आणि २७ जानेवारीला रस्त्यांवर पडलेल्या हजारो ध्वजाची काळजी घेतात?

उपेन्द्र's picture

6 Apr 2011 - 11:35 pm | उपेन्द्र

सहमत..

जाज्वल्य राष्ट्राभिमानासाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश पाठीराखे राष्ट्रध्वजाच्या चड्ड्या करुन घालतात आणि मॅच पहायला येतात. तिथे कुठे राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याच्या बातम्या ऐकल्या नाहीत. किंबहुना आपण राष्ट्रध्वज परिधान करतो या बद्दल अभिमानच वाटतो त्याना..
आपण इतके दिवस आपला राष्ट्रध्वज सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरच ठेवला होता. नविन जिंदालच्या प्रयत्नाने तो आता आपल्याला अभिमानाने फडकावता तरी येतो. ऑलिंपिक सारख्या स्पर्धात बहुतेक देशांचे विजेते राष्ट्रध्वज शालीसारखा अंगावर पांघरतात. राष्ट्रगीत चालू असताना ढसाढसा रडतात. ते काही अपमान करण्यासठी नव्हे.. तर देशाबद्दलचे अपार प्रेम व्यक्त करण्यासाठी.. अशा अविस्मरणीय क्षणी खेळाडुंच्या मनात असलेल्या भावनांचा विचार न करता दोष देणे हे छिद्रान्वेषीपणाचे लक्षण वाटते..
या संदर्भातला एक किस्सा आठवतो..
एकदा एका ब्रिटीश खलाशाने एका अमेरिकन खलाशाला राष्ट्रध्वज उलटा फडकविल्याबद्दल हटकले. अमेरिकन खलाशी ताडकन उत्तर देता झाला, " आमचा झेंडा उलटा लावला तर कळते तरी.. तुमचे तसेही नाही.."

गणपा's picture

3 Apr 2011 - 9:19 pm | गणपा

प्राजुताईशी सहमत.
JAGOMOHANPYARE चा खालिल मुद्दाही लक्षात घेण्यासारखाच आहे.

पिंगू's picture

3 Apr 2011 - 9:51 pm | पिंगू

राष्ट्रध्वज अंगाला गुंडाळल्याचे मी सुद्धा पाहिले आणि विजयोन्मादाच्या जल्लोषात कोणीही त्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही हे खरे. हे काही जाणूनबुजून केले नसावे.

त्यामुळे प्राजुतायशी सहमत..

मान -अपमानाच्या कक्षा आपण ठरवायच्या असतात. अंगावर लपेटणे यात गैर काहीच वाटले नाही.
घाम वगैरे पुसला असेल.. "चला... आता राष्ट्रध्वजाने घाम पुसूया.." असं म्हणून जाणूनबुजून कोणीच केलं नसेल/नसणारच. विजयाच्या उन्मेदामध्ये होऊ शकतं,

वरची प्रतिक्रीया वाचा. रंगाभाउंना प्रश्ण विचारलेला आहे. तो तुम्हालासुद्धा लागू आहे. आपण त्याचे उत्तर द्यावे.

१५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला रस्त्यांवर काडीला लावलेले कागदाचे राष्ट्रध्वज ५ - १० रूपयांना मिळतात आणि १६ ऑगस्ट आणि २७ जानेवारीला रस्ते लोटणार्‍या बायका हे राष्ट्रध्वज उचलून कचर्‍यात टाकतात.. तो अपमान नसतो का?

तो सुद्धा अपमान आहेच. याची जाणीव असलेल्या जागरूक नागरीकांनी संघटना स्थापून लोकजागृती करायला सुरवात केली आहे. त्याच बरोबर याची जाणीव असलेले स्वयंसेवक हे पडलेले ध्वज गोळा करतात आणि राष्ट्रध्वजासंभंदी असलेल्या नियमांप्रमाणे पुढील कारवाई करतात. राष्ट्रध्वजासंबंधी नियम/कायदे आहेत. त्यामधे खराब झालेले राष्ट्रधज कसे निकाली काढावेत (निकाली काढणे या मराठी शब्दावरून वाद होउ शकतील म्हणून इंग्लीश शब्द सांगतो dispose off) या संबंधी मार्गदर्शन आहे.

नक्की मान कशाने वाढतो आणी अपमान कशाने होतो.. याची सीमारेखा आखली पाहीजे. आपल्या अपमानाची कक्षा इतकी अरूंद ठेवली तर दर २-४ पावलांवर अपमान होतो.

या संबंधी नियम/कायदे आहेतच. त्याची माहिती करून घ्या.
(वैयक्तीक आयुष्यात "मान कशाने वाढतो आणी अपमान कशाने होतो" हे सांगता येते का?) ह.घ्या.

माझ्या दृष्टीने या धाग्याला काहीही अर्थ नाहीये. हा धागा काढायची गरज नव्हती. तुम्हाला वाटलं अपमान झाला.. तुमच्यापर्यंतच ठेवायला हवं होतं..

अपमान धागाकर्त्याचा नाही झाला. तो राष्ट्रध्वजाचा झाला. म्हणजेच देशाचा झाला. ही चूक नजरेसमोर आणणे गैर नाही.

देशाच्या ध्वजाचा आणि राष्ट्रगिताचा मान राखणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे.
(आजकाल फक्त हक्कच माहीत असतात. कर्तव्यांची ऐशी तैशी)

कुंदन's picture

4 Apr 2011 - 2:57 am | कुंदन

>>(आजकाल फक्त हक्कच माहीत असतात. कर्तव्यांची ऐशी तैशी)

३३% कर भरल्यावर काही हक्क माफक प्रमाणात तरी का मिळु नयेत ?

शेखर's picture

4 Apr 2011 - 5:19 pm | शेखर

दुबई मध्ये केंव्हा पासुन कर घ्यायला सुरवात झाली? ;)

प्रशांत's picture

4 Apr 2011 - 12:23 pm | प्रशांत

सहमत सहमत सहमत

राष्ट्रध्वजाचा आकार प्रमाणात नसेल तर तो राष्ट्रध्वज ठरु शकत नाही.. तशी काळजी घेऊनच अशा गोष्टी बनवल्या जात असाव्यात बहुतेक

मला तरी ध्वज लपेटून घेण्यात काहीच वाटले नाही. घाम पुसल्याचं जाऊ दे हो युयुत्सु!
त्यांनी राष्ट्राला अभिमान वाटावा असे काम केले मग त्यात काय एवढे.
राष्ट्रध्वजाला साष्टांग नमस्कार घालत वाईट खेळून हरले असते तर वेगळी टीका झाली असती.
यावेळी कधी नव्हेतो तुमचा धागा पाहून आनंद झाला हे काय कमी आहे.;)
चक्क पुरुषांवर कसला का होइना आरोप केला आहे म्हणून म्हटले.

विकास's picture

3 Apr 2011 - 8:05 pm | विकास

चक्क पुरुषांवर कसला का होइना आरोप केला आहे म्हणून म्हटले.

कदाचीत, हरभजन -युवराजला, पांडेबाईंच्या भितीने घाम आला असावा आणि भयग्रस्त अवस्थेत आपण तो कशाला पुसतोय याचे भान राहीले नसावे. ;)

शक्यता आहे. हे ध्वज त्यांनी बराचवेळ जवळ बाळगले असतील्.........ही मुलगी कुठेही नैसर्गीक अवस्थेत दिसली तर तिच्या अंगावर लपेटता येतील म्हणून. तरीच काल पुढच्या सेलिब्रेशनबद्दल कोणी काहीही बोलत नव्हते. नक्की काय (किंवा काय काय) होणार ते त्यांनाही माहीत नसावे.;)

राजेश घासकडवी's picture

3 Apr 2011 - 8:43 pm | राजेश घासकडवी

त्यांनी राष्ट्राला अभिमान वाटावा असे काम केले मग त्यात काय एवढे.

सहमत. प्रत्यक्ष कामगिरीकडे दुर्लक्ष करून चुकून झालेल्या प्रतीकात्मक चुकीकडे लक्ष देऊ नये. या खेळाडूंमुळे एकुणात राष्ट्रध्वजाची शान वाढली असंच मी म्हणेन.

ही मुलगी कुठेही नैसर्गीक अवस्थेत दिसली तर तिच्या अंगावर लपेटता येतील म्हणून.

तसं झालं तर राष्ट्रध्वजाची शान वाढेल की कमी होईल?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Apr 2011 - 10:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

काही काही लोकं तर गालावर राष्ट्रध्वजाचे रंग लावून फिरत होते. आता हा ध्वजाचा अपमान, ध्वजाचं विडंबन का आणखी काही?

विजुभाऊ's picture

3 Apr 2011 - 11:17 pm | विजुभाऊ

काही काही लोकं तर गालावर राष्ट्रध्वजाचे रंग लावून फिरत होते.
ध्वजा संदर्भात काही प्रथा आवर्जून पाळल्या जातात. सूर्यास्तानन्तर ध्वज उतरवले जातात.
गालावरचे ध्वज उतरवणार कसे.... ;)

llपुण्याचे पेशवेll's picture

4 Apr 2011 - 10:30 am | llपुण्याचे पेशवेll

ते कोणाच्या गालावर आहेत त्यावर अवलंबून.

प्रशांत's picture

4 Apr 2011 - 12:26 pm | प्रशांत

काय Logic आहे

ते कोणाच्या गालावर आहेत त्यावर अवलंबून.
काय बोलणार ? महान आहेस .. दंडवत !

देवदत्त's picture

3 Apr 2011 - 11:15 pm | देवदत्त

एखाद्याला अमका पुरस्कार मिळाला म्हणून त्या पुरस्काराची शान वाढली असे मानक काही ठिकाणी चालेल. सगळीकडेच नका लावत जाऊ राव.
आणि तसे म्हटले तरी असे काही करणे पटत नाही.

प्रत्यक्ष कामगिरीकडे दुर्लक्ष करून चुकून झालेल्या प्रतीकात्मक चुकीकडे लक्ष देऊ नये.
मध्ये एकदा रिकी पोंटिंगने शरद पवारांना मंचावरून खाली उतरायला लावले तेव्हा मग ती प्रतीकात्मक चूक वाटत नाही, चूकच वाटते. असे का? कारण ती बाहेरच्याने केली आहे ?

युयुत्सुंनी असला धागा काढुन राष्ट्रध्वजाचा अपमान केल्या आहे . आणि त्यांचे हे कृत्य पाहुन मला माईंदळ किळस आल्याने उंम्दळायला होतं आहे . ही किळस एवढी तीव्र आहे की आमच्या आजुबाजुच्यांना पण युयुत्सुंच्या कृत्याची किळस आल्या गेली आहे .
काय समजायचे ते समजा.

-किळुत्सु

युयुत्सु's picture

3 Apr 2011 - 8:27 pm | युयुत्सु

या बहूतांश प्रतिसादातून ध्वनित होणारा संदेश म्हणजे या उन्मादात कुणी सिग्नल तोडला आणि एखाद्याचा जीव घेतला तरी त्याकडे दूर्लक्ष करायला पाहिजे.

कारण सम आर मोअर इक्वल दॅन अदर्स!

शिल्पा ब's picture

3 Apr 2011 - 11:23 pm | शिल्पा ब

या उन्मादात कुणी सिग्नल तोडला आणि एखाद्याचा जीव घेतला तरी त्याकडे दूर्लक्ष करायला पाहिजे.

आपल्या समजशक्तीचे कायम कौतुकच वाटत आले आहे.

रेवती's picture

4 Apr 2011 - 12:15 am | रेवती

कश्याची तुलना कशाशी करताय?
काहीपण्......इथं कुणाचा जीव गेलाय?

राष्ट्रध्वजाचा आणि राष्ट्रगिताचा अपमान हा संपुर्ण देशाचा अपमान आहे आपणास वाटत नसल्याने आपणास काहिही सांगणे चुकीचेच आहे.

कुंदन's picture

4 Apr 2011 - 2:52 am | कुंदन

हे राष्ट्रध्वज काल मैदानात खेळाडूना उपलब्ध कोणी करुन दिले त्याना पण पकडा ना.

अवांतर : चेहरा पुसला - नाक पुसले असे वेगवेगळे का सांगतायत , नाक हा चेहर्‍याचाच एक भाग आहे नै का?

छोटा डॉन's picture

3 Apr 2011 - 8:29 pm | छोटा डॉन

जाऊ द्या की राव, असा कुठे काय राष्ट्रध्वजाचा अपमान होतो काय ?
भावना समजुन घ्या की राव ...

बाकी लोकांच्या राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रध्वजाच्या सन्मान ह्याबाबतच्या भावना आणि त्यांचे प्रदर्शन दिवसेंदिवस दिखावु होत चालले आहे ह्याचा देख वाटतो.

अवांतर :
बाकी युयुस्तुराव काल सामना पहात असतील तर भारताच्या राष्ट्रगीताच्यावेळी जिथे असतील तिथे सन्मान देण्यासाठी 'सावधान' पोझमध्ये उभे राहिले असतील असे गृहीत धरतो. ;)

- छोटा डॉन

चतुरंग's picture

3 Apr 2011 - 8:53 pm | चतुरंग

श्रीलंकेचे राष्ट्रगीत संपून आपले राष्ट्रगीत सुरु झाले तेव्हा मी सावधान उभा राहिलो होतो.
अशावेळी माझा ऊर नेहेमीच भरुन येतो.

-(राष्ट्रप्रेमी)रंगा

छोटा डॉन's picture

3 Apr 2011 - 9:01 pm | छोटा डॉन

हेच म्हणतो.

>>श्रीलंकेचे राष्ट्रगीत संपून आपले राष्ट्रगीत सुरु झाले तेव्हा मी सावधान उभा राहिलो होतो.
+१, मी पण.
बाकी मैदानावर ११ प्लेयर्स आणि त्यांचे हजारो पाठीराखे ह्यांनी एकसाथ गायलेले कुठल्याही देशाचे राष्ट्रगीत ही बाब मला नेहमीच सुखावणारी वाटली आहे.
भले ते भारताच्या क्रिकेट सामन्यातले असो वा स्पेन / जर्मनी / इटली ह्यांचे फुटबॉल सामन्यातले असो, त्यातुन मिळणारा आनंद आणि सुख हे सारखेच असते.

- छोटा डॉन

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Apr 2011 - 12:26 pm | llपुण्याचे पेशवेll

बाकी मैदानावर ११ प्लेयर्स आणि त्यांचे हजारो पाठीराखे ह्यांनी एकसाथ गायलेले कुठल्याही देशाचे राष्ट्रगीत ही बाब मला नेहमीच सुखावणारी वाटली आहे.

सहमत आहे. आम्हालाही पाकीस्तानचे राष्ट्रगीत आणि भारताचे राष्ट्रगीत झाल्यावर असेच वाटले होते. त्यातल्या त्यात पाकीस्तानचे राष्ट्रगीत जास्त आक्रमक वाटले.

योगी९००'s picture

4 Apr 2011 - 10:02 am | योगी९००

श्रीलंकेचे राष्ट्रगीत संपून आपले राष्ट्रगीत सुरु झाले तेव्हा मी सावधान उभा राहिलो होतो.
?? .....पण आपले राष्ट्रगीत श्रीलंकेच्या आधी झाले ना? कारण मी जेव्हा TV सुरू केला आपले राष्ट्रगीत चालू झाले होते आणि त्यानंतर श्रीलंकेचे राष्ट्र्गीत सुरू झाले.

आपण श्रीलंकेत राहता का?
-असाल तर ठीक आहे, नसाल तरिही
अवांतर :
सकाळी ७:३० च्या सुमारास रोज (रव्वार वगळुन) माझ्या टेरेसवर राष्ट्रगीत ऐकु येते,
मी तोंडात ब्रश कोंबुन १ मिनिट स्तब्ध उभा राह्तो.
असे करताना काटा येत नसेल तर ते भारतीय नव्हेत..
मले तर ब्वॉ थेटरात पन मज्जा येते...

अप्पा जोगळेकर's picture

4 Apr 2011 - 3:15 pm | अप्पा जोगळेकर

श्रीलंकेचे राष्ट्रगीत संपून आपले राष्ट्रगीत सुरु झाले तेव्हा मी सावधान उभा राहिलो होतो.
मीदेखील अशावेळी नेहमी उभा राहतो. पण उर भरुन येण्याचा अनुभवच आलेला नाही मला कधी.
राष्ट्रगीत वाजत असताना उर भरुन आला नाही तर तो राष्ट्रगीताचा अपमान समजावा का असा माझा युयूत्सूंना साधासुधा प्रश्न आहे.

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Apr 2011 - 12:28 pm | llपुण्याचे पेशवेll

राष्ट्रगीत वाजत असताना उर भरुन आला नाही तर तो राष्ट्रगीताचा अपमान समजावा का असा माझा युयूत्सूंना साधासुधा प्रश्न आहे.

ऊर भरून येताना अनाठायी हालचाल (जशी परवा मॅच संपल्यावर रस्त्यावर चालली होती) झाली तर तो अपमान होत असावा असे युयुत्सुंचे उत्तर असेल असे वाटते.

मेघवेडा's picture

4 Apr 2011 - 10:15 pm | मेघवेडा
बाकी युयुस्तुराव काल सामना पहात असतील तर भारताच्या राष्ट्रगीताच्यावेळी जिथे असतील तिथे सन्मान देण्यासाठी 'सावधान' पोझमध्ये उभे राहिले असतील असे गृहीत धरतो.

राहिले असतील तर त्यांच्याबद्दल आदरच वाटेल! तेच काय इथं पब मध्ये सुद्धा उपस्थित समस्त भारतीय जनता 'सावधान' पोझमध्ये उभी राहते राव. आणि राहायलाच हवं. तुमच्या अंगावर काटा येत नाही का हो डान्राव राष्ट्रगीत ऐकताना? माझ्या तर येतो ब्वॉ! आणि अभिमानानं ऊरही भरून येतो! जेव्हाकेव्हा राष्ट्रगीत सुरू होतं तेव्हा आपण असू तिथं सावधान पोझमध्ये येतो राव!

बाकी युवराजने राष्ट्रध्वजको नाक पुस्या तर उसका चुक्याच बाबा!

गवि's picture

3 Apr 2011 - 9:12 pm | गवि

additional:

सोनिया गांधी रात्री दिल्लीत विजयजल्लोष करण्यासाठी गाडीवर उभ्या राहून रस्त्याने फिरत होत्या.त्यांनीही राष्टध्वज अंगावर लपेटल होता. अवमान झाला का हा तांत्रिक भाग,पण हे फक्त खेळाडूंनीच केले असे नव्हे.

श्रावण मोडक's picture

3 Apr 2011 - 10:30 pm | श्रावण मोडक

नॅशनल फ्लॅगकोड, राष्ट्रध्वजसंहिता, याचा काटेकोर विचार केला तर तिथं जे घडलं तो राष्ट्रध्वजाचा अवमान ठरू शकतो. राष्ट्रध्वज या शब्दाचा ध्वजसंहितेनुसारचा अर्थ "Indian National Flag" includes any picture, painting, drawing or photograph, or other visible representation of the Indian National Flag, or of any part or parts thereof, made of any substance or represented on any substance इतका व्यापक आहे. यात कुठंही अधिकृत आकारमानाचा उल्लेख अपवाद म्हणूनही केलेला नाही. आकारमानासाठीची तरतूद तीनास दोन (ध्वजाची रुंदी तीन असेल तर उंची किंवा लांबी म्हणूया दोन असावी) अशा प्रमाणातील आहे.
स्टेडियममध्ये काल खेळाडूंनी ध्वज स्वतःभोवती शालीसारखा गुंडाळला, हा ध्वजसंहितेनुसारचा अवमान आहे कारण, "using the Indian National Flag as a drapery in any form whatsoever except in state funerals or armed forces or other para-military forces funerals; or using the Indian National Flag as a portion of costume or uniform of any description or embroidering or printing it on cushions, handkerchiefs, napkins or any dress material" हा राष्ट्रध्वजाचा अवमान आहे.
ही कायदेशीर स्थिती झाली. प्रश्न इतकाच - कोणाही खेळाडूचा राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा हेतू होता का?
ज्याने-त्याने या प्रश्नाचे आपापले उत्तर स्वतःलाच द्यावे. विषय संपतो.
त्यापलीकडे कारवाई करावयाची असेल तर बीसीसीआयपासून सुरवात करण्याची तयारी करावी लागेल.
महत्त्वाचा मुद्दा हा नाहीच. बीसीसीआय, त्यांचा संघ, त्याचे भारतीय संघ म्हणून होणारे कोडकौतूक, त्यासाठी त्यांना मिळणाऱ्या सवलती, करमाफी आणि त्या साऱ्याची खरी गरज किती हे मुद्दे अधिक महत्त्वाचे. त्याकडे लक्ष दिले पाहिजे. तिथं काही गोष्टी झाल्या पाहिजेत. भारतात इतर अनेक उद्योग आणि व्यापारांवर कर आहेत. या क्रिकेटनामक उद्योगात त्यांची माफी का? त्या माफीचा फायदा कोणाला खरोखर होतो? भारतात इतर खेळांना असा मान किती मिळतो? प्रोत्साहन म्हणून तरी? त्यांची काही प्रमाणबद्धता आहे का?
जाताजाता - सचिनला भारतरत्न देता येणार नाही, असेही आपले नियम आहेत.

वाहीदा's picture

4 Apr 2011 - 12:35 am | वाहीदा

प्रश्न इतकाच - कोणाही खेळाडूचा राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा हेतू होता का?
ज्याने-त्याने या प्रश्नाचे आपापले उत्तर स्वतःलाच द्यावे. विषय संपतो.

भारतात इतर खेळांना असा मान किती मिळतो? प्रोत्साहन म्हणून तरी? त्यांची काही प्रमाणबद्धता आहे का?
टाळ्या !

चिंतामणी's picture

4 Apr 2011 - 2:25 am | चिंतामणी

ही कायदेशीर स्थिती झाली. प्रश्न इतकाच - कोणाही खेळाडूचा राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा हेतू होता का?
ज्याने-त्याने या प्रश्नाचे आपापले उत्तर स्वतःलाच द्यावे. विषय संपतो.

असे म्हणून हा विषय बंद करू नका. तुम्हाला जे काय वाटत आहे आणि जे कोणि चुकीचे बोलत आहेत, ते त्यांच्या निदर्शनास आणा.

म्हंजे तुम्हाला विषय वाढवायाचाच्.......
काहिहि असो.....
अहो पण कशासाठि?

अप्पा जोगळेकर's picture

4 Apr 2011 - 3:17 pm | अप्पा जोगळेकर

भारतात इतर अनेक उद्योग आणि व्यापारांवर कर आहेत. या क्रिकेटनामक उद्योगात त्यांची माफी का? त्या माफीचा फायदा कोणाला खरोखर होतो? भारतात इतर खेळांना असा मान किती मिळतो? प्रोत्साहन म्हणून तरी? त्यांची काही प्रमाणबद्धता आहे का?
१००० % सहमत.

सुरेख प्रतिसाद..

प्रश्न इतकाच - कोणाही खेळाडूचा राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा हेतू होता का?
ज्याने-त्याने या प्रश्नाचे आपापले उत्तर स्वतःलाच द्यावे. विषय संपतो.
- हेच योग्य आहे.

अविनाशकुलकर्णी's picture

3 Apr 2011 - 10:56 pm | अविनाशकुलकर्णी

राष्ट्र गित गात असताना प्रत्येक खेळाडु समोर एक लहान मुलगा वा मुलगी उभि होति..त्याचे काय प्रयोजन?
=====================================================

क्रिकेट खेळाडू हेच नव्या पिढीचे आदर्श आहेत. ते उभे आहेत म्हणूनतरी तुम्ही उभे रहा हा संदेश पुढच्या पिढीला देण्यासाठी उभे असतील. मग काय्?..........होउन जाऊ देत नवा धागा सुरु!;)

विजुभाऊ's picture

3 Apr 2011 - 11:05 pm | विजुभाऊ

जाताजाता - सचिनला भारतरत्न देता येणार नाही, असेही आपले नियम आहेत.
हे मात्र खरे. आदर्श ची उंची वाढवायला बिनदिक्कत परवानगी देणारे सरकार सचिनच्या जीम ला मात्र नुसती टेरेस वर छज्जा टाकायला परवानगी देत नाही.
राजवर्धन राठोडने भारतासाठी ऑलिंपीक पदक मिळवल्यावर काहीना त्याने खांद्यावर घेतलेला भारतीय झेंडा हा ध्वजाचा अपमान वाटला होता.
प्रत्येक जिल्हापरीषदेच्या इमारतीवर भारतीय झेंडा लावलेला असतो. त्या झेंड्यासमोर उभे राहून तंबाखूच्या पिचकार्‍या मारणे , ज्या इमारतीत तो झेंडा लावलेला आहे त्या इमारतीत बसून पैशे खाणे , त्या इमारतीतील स्वच्छतागृहे अक्षरशः घाणीची आगारे बनवणे हा भारतीय ध्वजाचा कोणता सन्मान करतात हे युयुत्सुनी दाखवून द्यावे.

चिंतामणी's picture

4 Apr 2011 - 8:47 am | चिंतामणी

जाताजाता - सचिनला भारतरत्न देता येणार नाही, असेही आपले नियम आहेत.
हे मात्र खरे. आदर्श ची उंची वाढवायला बिनदिक्कत परवानगी देणारे सरकार सचिनच्या जीम ला मात्र नुसती टेरेस वर छज्जा टाकायला परवानगी देत नाही.

यात संघाचा हात तर नाही ना? (क्रिकेटच्या संघाचा हो. तोंडदेखले गोडबोलून सगळे त्याला निवृत्त करायला निघाले आहेत म्हणून म्हणले. ;))

अविनाशकुलकर्णी's picture

3 Apr 2011 - 11:06 pm | अविनाशकुलकर्णी

सोनिया गांधी रात्री दिल्लीत विजयजल्लोष करण्यासाठी गाडीवर उभ्या राहून रस्त्याने फिरत होत्या.त्यांनीही राष्टध्वज अंगावर लपेटल होता. अवमान झाला का हा तांत्रिक भाग,पण हे फक्त खेळाडूंनीच केले असे नव्हे.
================
पण त्यांनी नाक नाहि पुसले ध्वजाने......धागाकर्त्याचा नाक पुसणे व घाम पुसणे हा कळीचा मुद्दा आहे

विकास's picture

4 Apr 2011 - 8:22 pm | विकास

सुधीर काळे's picture

4 Apr 2011 - 8:58 pm | सुधीर काळे

रंगातील साम्यामुळे घोटाळा तर नाहीं ना होत आहे आपणा सर्वांचा? फक्त आडव्या-उभ्याचाच फरक!

इटालियन ध्वज

धमाल मुलगा's picture

4 Apr 2011 - 9:21 pm | धमाल मुलगा

गुड ओल्' गनस्लिंगर काळेकाका रॉक्स!

हॅट्ट्सऑफ्फ काळॅकाका. लय लऽऽय भारी!

चतुरंग's picture

4 Apr 2011 - 10:02 pm | चतुरंग

'दूसरा' एकदम क्लीन बोल्ड करुन गेला! ;)
लै लै भारी!!

-रंगय्या मुरलीथरन

विकास's picture

4 Apr 2011 - 11:19 pm | विकास

बाकी वरील (सोनियाजींचे) छायाचित्र पाहून, इतरत्र नाचणारे पब्लीक "आम्ही काँगीचे गोंधळी" म्हणत असतील असे वाटले...

बाकी सोनियाजींचे काही चुकलेले नसावे, जे काही राजकीय सल्लागारांनी सांगितले तसे त्यांनी केले. ;)

देवदत्त's picture

3 Apr 2011 - 11:07 pm | देवदत्त

क्रिकेट समोर कुठे असल्या फुटकळ गोष्टींकडे लक्ष देता राव तुम्ही. विश्वचषक जिंकला आहे त्यांनी.

चिंतामणी's picture

4 Apr 2011 - 2:34 am | चिंतामणी

१५ देश (?) खेळत असलेल्या स्पर्धेत यश मिळाले म्हणून राष्ट्राचा अपमान झालेला चालेल.

=D>

बहुतेक देवदत्ताने दुसरा टाकुन चिंतामणींची विकेट घेतली. :)
हलके घ्या हो चिंतामणी... नाही नाही या वादा विषयी नाही, माझ्या प्रतिसादा बद्दल बोलतोय.
बाकी माझं म्हणाल तर मी दोही पार्ट्यांशी ५०-५० सहमत आहे.

पुष्करिणी's picture

4 Apr 2011 - 6:30 pm | पुष्करिणी

मी पण दोही पार्ट्यांशी ५०-५० सहमत आहे.

योगप्रभू's picture

4 Apr 2011 - 12:15 am | योगप्रभू

युयुत्सु,

आता क्रिकेट हा 'सभ्य गृहस्थांचा खेळ' राहिला नसून भारतात तरी 'सामूहिक उन्माद' झाला आहे. तुम्ही कोणकोणत्या गोष्टींबद्दल खंत बाळगणार?
भारत-पाकिस्तान मॅच म्हणजे जणू काही दोन देशांत युद्धच अशा पद्धतीने लोक वागत होते. बरं श्रीलंकेचे काही भारताशी वैर नाही. तरीपण मिडियासकट सगळे त्या सामन्याला 'लंकादहन' म्हणत होते. बघितले तर दोन देशांच्या संघामधला तो एक सामना, पण उपमा काय तर तो अख्खा देश जाळून टाकण्याची. 'लंकादहन' असा शब्दप्रयोग वाचून श्रीलंकेच्या लोकांना काय वाटेल, याचा विचारच कुणाच्या मनात येत नव्हता. आपला संघ कायम जेता नसतो. उद्या कुणी तरी आपल्यालाही हरवणार आहे. त्यावेळी त्या देशाच्या लोकांनी भारताबद्दल अत्यंत वाईट लिहिले तर ते ऐकण्याची तयारी आपण ठेवायला हवी. पायंडा आपण पाडला आहे.

मला शाहिद आफ्रिदीचे कौतुक वाटले. पराभवानंतर पाकिस्तानला परतल्यावर तो आपल्या देशबांधवांना जाहीर म्हणाला, 'आपल्याकडे शादीचे रिवाज भारताप्रमाणे पाळले जातात, हिंदी चित्रपट मोठ्या आवडीने बघितले जातात, मग क्रिकेटचाच विषय आला की आपण इतके खुन्नसबाज का होतो? चुरशीची लढत म्हणून त्याकडे का बघत नाही?' श्रीलंकेचा कर्णधार संगकाराही अंतिम सामन्यानंतरच्या टिप्पणीत मनमोकळेपणाने म्हणाला, की पराभवाची अनेक कारणे देण्यापेक्षा मी इतकेच म्हणेन, की भारतीय संघाने आमच्यापेक्षा सरस कामगिरी केली.' जर खेळाडू इतक्या दिलदारपणाने सामन्यांकडे आणि प्रतिस्पर्ध्यांकडे पाहात असतील तर लोक का बेभान होतात?

विश्वकरंडकाच्या आनंदापुढे ते झेंड्याच्या अपमानासारखे मुद्दे कुणी लक्षात घेणार नाही. लोकांना आता उत्सुकता असेल आयपीएल महोत्सवाची. क्रिकेटच्या या रंगारंग वातावरणात एक गोष्ट हळूच गालिच्याखाली सरकवली गेली आहे. ती म्हणजे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भ्रष्टाचार. लोकांना चर्चेसाठी नेहमी नवे मुद्दे पुरवले म्हणजे ते मागचे विसरुन जातात. कारण 'पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट.'

तेव्हा 'संत म्हणती उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे'

वाहीदा's picture

4 Apr 2011 - 1:14 am | वाहीदा

मी कोलंबोला जानेवारीत गेले होते तेव्हा माझ्या श्रीलंकंन मित्रमैत्रिणींनी चित्रविचित्र शैलित हिंदी गाणी ऐकवून माझे मनसोक्त मनोरंजन ही केले.. याच माझ्या श्रीलंकंन मित्रमैत्रिणींनी आत्ता मला वर्ल्ड कप मैच विश करण्यासाठी साठी फोन अन एसएमएस केला. पण त्यांच्या अनेक प्रश्नांतील एका प्रश्नाचे मी योग्य उत्तर देऊ शकले नाही
आपले पोगो चैनेल्स बरोबर आपले काही न्यूज चैनेल्स ही तिथे दिसतात पण .
I could not answer properly when Two of them asked me 'Wahida, why your media is using the word 'Lanka Dahan ?' :-(
I just said "Thoughts of Fans comes in all shapes and sizes and Media is just Representing that. They are not Ambassador of our country. Believe me Guys Who are actually Playing Cricket will never use such words. Fortunately they all are level Headed ! " :-)

पुष्करिणी's picture

4 Apr 2011 - 6:29 pm | पुष्करिणी

आफ्रिदी आज काहीतरी वेगळच बोलतोय, त्याला तर गौगं नं २६/११ ला धारातीर्थी पडलेल्या मुंबईकरांना मॅच डेडिकेट केली याचाही राग आलाय.

http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/cricket-world-cup-2011...

कुंदन's picture

4 Apr 2011 - 6:35 pm | कुंदन

भेटा म्हणा पुन्हा कधीतरी.
बाकी गौतम गंभीर लै लै भारी खुन्नस देतो पाकड्यांना .

http://www.youtube.com/watch?v=twigfCAwuGg&feature=related

विकाल's picture

5 Apr 2011 - 12:44 pm | विकाल

गौतम चा "idol"{आता याच्या मराठी प्रतिशब्दाची गरिमा हरवलीय....} हा भगत सिंग आहे...

त्याच्या किट मध्ये भगत सिंग यांची प्रतिमा आहे...!

हा विजय २६ ११ हुतात्म्यांना 'डेडिकेट' करताना तो जे बोलला त्याने सरसरून काटा आला...!!

आणि किळस तर कुणाचीच वाटली नाही, वाटू शकत नाही....!!!

वाहीदा's picture

5 Apr 2011 - 1:24 pm | वाहीदा

गौतम चा "idol"{आता याच्या मराठी प्रतिशब्दाची गरिमा हरवलीय....} हा भगत सिंग आहे...

त्याच्या किट मध्ये भगत सिंग यांची प्रतिमा आहे...!

आज पासून गौतम गंभिर आपला IDEAL :-)
स्वोरी धोनी ...

परवा बहुतेक शुद्ध आली नव्हती मार खाउन म्हणुन बेशुद्धावस्थेत भारताबद्दल प्रेमाच्या गोष्टी बोलत होता.
किंवा आज कुणाक्डुन तरी धमकी आलेली दिसते की गरळ ओक अन्यथा काही बरे वाईट होईल.
शेवटी टिंबटिंब चे टिंबटिंब वाकडे ते वाकडेच.

विनायक बेलापुरे's picture

4 Apr 2011 - 12:40 am | विनायक बेलापुरे

चांगला विषय आहे.
राष्ट्रध्वज-राष्ट्रगीता साठी संहिता आहे. ध्वज उलटा लावणे,ठराविक मापाचा नसणे, जमिनी पासून ठराविक उंचीवर फडकावणे, इ इ इ.
ध्वजाला एक फडके समजून घाम पुसणे नक्कीच अवमानकारक ठरु शकेल.

ध्वजाची अंतर्वस्त्रे बनवण्या इतका मुक्तपणा आपल्यात अजुन आला नाही हे सुदैव.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Apr 2011 - 12:42 am | बिपिन कार्यकर्ते

लेटर ऑफ द लॉ : बहुधा अपमान झाला असावा.

स्पिरिट ऑफ द लॉ : त्या खेळाडूंचा घाम पुसताना राष्ट्रध्वजालाच कौतुकाने भरून आले असावे (अभिमानाने मान उंचावली असावी.)

(स्पष्टीकरण : देशाला अभिमानास्पद कृत्य करणारे सगळेच खेळाडू इथे अध्याहृत आहेत. कोणत्याही खेळातले.)

नितिन थत्ते's picture

4 Apr 2011 - 8:32 am | नितिन थत्ते

+++++++

अपमान वगैरे झाला असे वाटत नाही.

तसेही शालीसारखा लपेटून घेणे यात अपमान कसला ते कळत नाही. (नाक/घाम पुसताना पाहिले नाही). उलट शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार होतात तेव्हा झेंडा लपेटलेलाच असतो.

खालील प्रमाणे भिंतीवर ध्वज लावल्यानेही कायदेशीर अपमान होतोच.

अविनाशकुलकर्णी's picture

4 Apr 2011 - 8:17 am | अविनाशकुलकर्णी

ध्वजाची अंतर्वस्त्रे बनवण्या इतका मुक्तपणा आपल्यात अजुन आला नाही हे सुदैव.

अंतर्वस्त्रे काढण्या इतका आला आहे...बरे झाले तिला परवानगी दिली नाहि

खालील घटनेला काय म्हणणार.
या बाई एक थोर अध्यत्मीक गुरु होत्या म्हणे.
त्या एका वजनदार नेत्याची बहीण तसेच आय ए एस अधिकार्‍याची पत्नी देखील होत्या . या घटनेच्या वेळेस ते शेजारीच बसलेले दिसताहेत.

चित्र १
चित्र २

ही घटना ऑगस्ट २००७ मध्ये घडली.

शिल्पा ब's picture

4 Apr 2011 - 10:27 am | शिल्पा ब

हे तर भयानक आहे. या बाईला शिक्षा व्ह्यायला हवी.

चिंतामणी's picture

4 Apr 2011 - 11:09 am | चिंतामणी

१०० % सहमत.

प्राजु's picture

4 Apr 2011 - 7:14 pm | प्राजु

१००% सहमत. चाबकाचे फटके मारायला हवेत हिला.

विजुभाऊ's picture

4 Apr 2011 - 12:44 pm | विजुभाऊ

ती चित्रे या इथे
पहाता येतील
http://www.liveindia.com/news/11jun08.jpg
तसेच
http://www.liveindia.com/news/11jun08b.jpg
या त्या चित्रांच्या लिंक्स आहेत.
अशी चित्रे मिपावर टाकून मिपा पदाधिकार्‍याना सभासदाना ध्वजचा अवमान वगैरे साठी कायदेशीर बाबींत गोवले जावू शकते.तसा त्रास होवू नये म्हणून मीच चित्रे काढून टाकायची विनन्ती केली
( मायला काय जमाना आहे करणाराला काही नाही साम्गणाराला भीति वाटते)

वाहीदा's picture

4 Apr 2011 - 5:23 pm | वाहीदा

अन हे काय ? बाकीचे काय बघे म्हणून बघत आहेत ? या बाईंची एवढी हिंमत कशी झाली हे असे पायाजवळ राष्ट्रध्वज ठेवायची ??
इस महान (?) हस्तीपर तो 'दफा १०९ के तहत मुकदमा' दायर होना चाहिये

sections 353, 109 of IPC and the Prevention of Insults to National Honour Act 1971.

The Prevention of Insults to National Honour Act 1971 prohibits the desecration or insult of the country's national symbols, including the flag, the constitution, and the anthem.

अरे हिला का नाही शिक्षा झाली ??

गवि's picture

4 Apr 2011 - 7:40 pm | गवि

कोण आहे ही बाई??

>>>>

Nirmala mata.

Sahaj yog fame.

She considers herself mother / head of all gods.

Hmm.

निर्मलादेवी..... फार प्रस्त होते/आहे तिचे.... तिच्या भक्तांच्या देव्हार्‍यात देव नसत्..फक्त तिचे फोटो.

काही महिन्यापुर्वीच अवतार संपला ( पक्षी गचकली) त्यामुळे शिक्षा वगैरे तर काही शक्य नाही.

पंगा's picture

5 Apr 2011 - 8:17 pm | पंगा

( पक्षी गचकली)

शब्दनिवड काळजात गृहसंकुल* करून गेली आणि ड्वॉल्यांतून आलेल्या महाप्रलयात नोहाने** होड्या चालवल्या.


* चाळींचा, वाड्यांचा जमाना गेला आता.
** किंवा मनु किंवा आणखी कोणीकोणी जे पुरात होड्या चालवणारे असतील ते. ज्याचीत्याची/जिचीतिची निवड.

अशा लोकांबद्दल "निधन" वगैरे काही वापरावेसे वाटत नाही.

सूर्यपुत्र's picture

4 Apr 2011 - 11:03 am | सूर्यपुत्र

या गोष्टी प्रतिकात्मक होत्या. :)
भारतीय संघ एव्हढा बलाढ्य आहे, की तो सर्व देशांना आपल्या खेळीने घाम फोडतो आणि भल्याभल्यांना नाक मुठीत धरायला लावतो, असे आपल्या संघाने दाखवून दिले... ;)
आणि राष्ट्रध्वज आणि नाक या गोष्टी हातात-हात घालूनच जातात की... फक्त या दोघांचा एकमेकांना स्पर्श होवू न देणे अपेक्षित आहे का?

-सूर्यपुत्र.

कवितानागेश's picture

4 Apr 2011 - 11:28 am | कवितानागेश

राष्ट्रध्वजाचा मान ठेवावा हेच प्रत्येकाकडून अपेक्षित आहे.
पण त्यात इतके 'कडक सोवळे' पाळायची गरज आहे असे मला वाटत नाही.

इरसाल's picture

4 Apr 2011 - 11:46 am | इरसाल

इजुभाव फोटू नाय दिसून रहायले..............

तिमा's picture

4 Apr 2011 - 12:31 pm | तिमा

मुळात स्टेडियममधे राष्ट्रध्वज फलकावणे हेच चुकीचे आहे. क्रिकेट हा खेळ मानला तर त्याठिकाणे देशभक्तीचे प्रदर्शन कशाला ?
राष्ट्रध्वज असा सहजपणे कुणाच्याही हातात मिळावा इतका 'स्वस्त' करु नये, तरच त्याची शान राहील.

चिरोटा's picture

4 Apr 2011 - 1:42 pm | चिरोटा

राष्ट्रभक्ति आणि क्रिकेट ह्या दोन्ही गोष्टींना भारतात कायम 'डिमांड' असतो.ह्या दोन्ही गोष्टी मिसळल्या की प्रचंड डिमांड तयार होतो. मग प्रत्येक धाव 'देशासाठी' घेतली जाते व चेंडु 'विरोधी' देशाला 'ठेचण्यासाठी' वळवला जातो.देशाचे नाव आता 'रोशन' झाल्यामुळे माजी क्रिकेटपटु आणि क्रिडापंडित ह्यांकडुन काही दिवस तरी ही 'देशभक्ति' ऐकण्यावाचुन पर्याय नाही.!

मी अनेक वेळा ऑलिंपिकसारख्या स्पर्धात सुवर्णपदकविजेत्या विजयी वीराला आपल्या देशाचा ध्वज अभिमानाने अंगाभोवती लपेटून विजयाची दौड (Victory March) करताना पाहिले आहे. त्यांना असा ध्वज त्यांचे सवंगडी अगदी अगत्याने त्याला/तिला आणून देतात! (त्यात अमेरिका व पश्चिम युरोपमधील खेळाडू जास्त लक्षात आहेत कारण त्यांचे ध्वज ओळखता आले. अमेरिका करते ते सर्व मला बरोबर वाटते असा अर्थ काढू नये!)
मला त्यात कांहींही गैर तर वाटत नाहींच पण या अभिमानाचे कौतुक करावे असे वाटते. हे आताच्या कायद्यात बसत नसेल तर हा कायदा बदलायला हवा. जिंदल या आमच्या धंद्यातील (Iron & Steelmaking) उद्योगपतीने कोर्टात लढून आपल्या घरावर रोज ध्वज फडकविण्याबद्दलचा अधिकार अलीकडेच कायदा बदलून मिळविला. त्या आधी अशी सवलत सामान्य जनतेला फक्त स्वातंत्र्यदिन व गणतंत्रदिनालाच होता. एरवी फक्त सरकारी इमारतींवर असा ध्वज फडकवायला अनुज्ञा होती. हा कायदा चुकीचा होता व तो बदलून घेण्यात जिंदल यांचा मोठा हात आहे.
एकाद्या युद्धात किंवा दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या वीराभोवती ध्वज अशा अभिमानापोटीच लपेटला जातो. पण देशाला सन्मान देणार्‍या (जिवंत) खेळाडूंना असा ध्वज लपेटण्याला काय म्हणून मज्जाव असावा?
आमच्या तरुणपणी वारद (कीं वारूद) नावाच्या एका गृहास्थांनी ध्वजाचे झालेले अपमान दूर करायचे व्रतच घेतले होते पण त्यावेळी आपल्या ध्वजाचा खरंच दुरुपयोग होत असे. उदा. बिडीच्या बंडलावरही तिरंगा असायचा! पण आज ती परिस्थिती राहिलेली नाहीं.
एक गंमत अभिमानाने सांगतो. आम्ही जवळ जवळ १००-१२५ माणसे "गणेश" नावाच्या जकार्तातील भारतीय भोजनगृहात मोठ्या पडद्यावर मॅच पहात होतो. बियर तर अखंडपणे वहात होती. शेवटच्या षटकाराबरोबर कुणीही न सांगता, प्रॉम्ट न करता, सर्वजण उठले आणि सगळ्यानी अभिमानाने आणि उस्फूर्तपणे "जन, गण, मन" म्हटले. मग त्यानंतर खरे विजयाप्रीत्यर्थ 'पिणे' सुरू झाले. (पीनेवालोंको पीनेका बहाना चाहिये, नाहीं का?)
अशा वेळी जर कुणी अशीच खोट काढली कीं "जन, गण, मन" सगळ्यात शेवटी म्हणायचे असते आणि ते म्हटल्यावर (विजयोत्सवाप्रीत्यर्थही) मदिरेला हात लावणे वर्ज्य असते तर ती चूक खोट काढणार्‍याची आहे. अशा राष्ट्रगीताच्या समयोचितपणे, स्वयंस्फूर्तीने आणि सामूहिकपणे केलेल्या गायनाने माझ्या अंगावर तर रोमांच उभे राहिले होते! पण खोट काढायचीच तर कुणी ती काढूही शकेल! पण ते माझ्या मते चूक आहे.
हा कायदा खरंच असा असेल तर तो बदलायलाच हवा. पण माझ्या मते तो असा असूच शकत नाहीं. जाणकारांनी याची खोलवर चौकशी केली पाहिजे.
मी कुणालाही चेहर्‍यावरचा घाम पुसताना पाहिले नाहीं म्हणून त्याबद्दल मी कांहीं लिहू इच्छित नाहीं. पण अशा वेळी घामाघूम झालेल्या एकाद्याने अनवधानाने तसे केले असल्यास त्याला मोठ्या मनाने माफ करायला हवे!
पूर्वी एकदा सचिनने परदेशी असताना एका समारंभात अनवधानाने तीन रंगात बनविलेला केक कापला होता त्यावेळीही असाच कोलाहल झाला होता. (सचिनच्या चुकांवर टीका करायला टपलेले असे बरेच लोक असतात.) अनवधानाने असली तरी ती सचिनकडून झालेली चूकच होती. पण मग एका सज्जनाने दाखविले कीं सचिनच्या शेजारी भारताचे राजदूत टाळ्या वाजवत उभे होते. देशाच्या परदेशातील "पहिल्या नागरिका"लासुद्धा जिथे अशा बारकाया माहीत नसतात तिथे खेळाडूंच्यावर उगीचच्या उगीच अशी आग पाखडणे अगदी चूक आहे असे मला तरी वाटते.
असो. आता इथे थांबतो!

अप्पा जोगळेकर's picture

4 Apr 2011 - 3:34 pm | अप्पा जोगळेकर

जवळजवळ अंतिम म्हणता येईल असा हा प्रतिसाद आहे. क्रिकेट खेळाचा अकारण द्वेष करणारे काही जण सोडले तर अक्ख्या भारताला परवा अत्यानंद झाला होता. सीमेवरच्या जवानापासून ते हपिसातल्या कार्कूनापर्यंत आणि घाम गाळणार्‍या कामगारापासून मस्तवाल् राजकारण्यापर्यंत सगळेजण आनंदाने बेहोष झाले होते.
काही देशांमध्ये फुटबॉल लोकप्रिय असतो तर काही ठिकाणी क्रिकेट. काही ठिकाणी रग्बी तर काही ठिकाणी बॅडमिंटन. कारण नसताना क्रिकेटच्या नावाने खडे फोडण्यात काही अर्थ वाटत नाही.
अन्य खेळांना अपमानास्पद वागणूक दिली जाणे मात्र कायम खटाकले पाहिजे. प्रत्येकालाच.

अत्यंत संयत प्रतिसाद..!
खूप आवडला. काळे काका.. या तुमच्या प्रतिसादासाठी जोरदार टाळ्या! :)

पंगा's picture

4 Apr 2011 - 11:59 pm | पंगा

पूर्वी एकदा सचिनने परदेशी असताना एका समारंभात अनवधानाने तीन रंगात बनविलेला केक कापला होता त्यावेळीही असाच कोलाहल झाला होता.

यावरून आठवले. आमच्या लहानपणी अनेक रेष्टारंटांत 'थ्री-इन-वन' नावाचे (बहुधा 'क्वालिटी'चे) एक आइस्क्रीम बशीतून मिळत असे, तेही असेच तिरंग्याच्या रंगांत असे, असे आठवते. आम्ही ते आवडीने आणि चवीने खात असू, आणि आमच्याप्रमाणेच अनेक भारतीय बांधवही ते तितक्याच आवडीने आणि चवीने खात असावेत, अशी आम्हास शंका आहे. (कारण खात नसते, तर ते आइस्क्रीम खपते ना, आणि आपोआपच बंद पडते.) पण त्यावरून कधी कोलाहल वगैरे झाल्याचे (किंवा 'क्वालिटी' कंपनीविरुद्ध कोणी आक्षेप घेतल्याचे किंवा निदर्शने वगैरे केल्याचे) काही आठवत नाही.

बशीतील आइस्क्रीम खाताना ते न कापता खाण्याचा एखादा मार्ग उपलब्ध असल्यास निदान आम्हास तरी त्याबद्दल काही कल्पना नाही, हे या निमित्ताने आवर्जून नमूद करावेसे वाटते. इतर भारतीय बांधव यदाकदाचित काही योगक्रियेने ('जुगाड़' अशा अर्थी) ही असाध्य वाटणारी करामत करू शकत असतील, तर त्यांचे कौतुक आहे.

बाकी, कायद्याबद्दल बोलायचे झाल्यास, मुळात असा कायदा का असावा हे कळत नाही. म्हणजे, प्रत्येकाला तिरंग्याबद्दल - किंवा तिरंग्याने प्रतीत होत असलेल्या संकल्पनेबद्दल - वाटत असलेल्या प्रेमातून तिरंग्याबद्दल आदर व्यक्त व्हावा असे आम्हासही वाटते. परंतु ही भावना सर्वांवर लादणे, आणि विशेषतः प्रत्येकाने आपल्याला वाटणारा आदर नेमका कसा व्यक्त करावा - किंवा करू नये - याबद्दल काही काटेकोर नियम कायद्याच्या बळाने सर्वांच्या गळी उतरवणे, यामागील प्रयोजन कळत नाही. आदर हा शेवटी स्वयंप्रेरणेतून आल्यास त्यास किंमत असते, असे बुवा आम्हांस तरी वाटते.

तिरंग्यातून प्रतीत होत असलेल्या संकल्पनेबद्दलच्या आत्मीयतेतून कोणास तिरंगा किंवा तिरंगासदृश आकृती किंवा रंगसंगती असलेले कापड अंगाभोवती लपेटून घ्यावेसे वाटले, तर त्याबद्दलही आक्षेप - आणि तोही केवळ 'असा काहीतरी कायदा कोणीतरी कधीतरी का कोण जाणे, पण केलेला आहे' या कारणास्तव - असण्याचे प्रयोजन कळत नाही. हे म्हणजे, एखाद्या तरुणीने प्रेमाने आपल्या वडिलांच्या गळ्याभोवती हात लपेटावेत, आणि कोण्या तिर्‍हाइताने किंवा तितपतच दूरचा संबंध असलेल्याने असे काही पाहण्याची सवय नसल्याने (किंवा ते 'आपल्या संस्कृतीत' मोडत नाही असे वाटल्याने) त्याबद्दल आक्षेप नोंदवावा, अशा प्रकारचे अनुभव भारतात राहत असताना आमच्या आप्तांस कधीकाळी आलेले आहेत, तशातला प्रकार वाटतो. शेवटी कायदे काय किंवा संस्कृती-संस्कार काय, हे माणसासाठी असतात, आणि याउलट नव्हे, याचाही विचार येथे व्हावा असे वाटते. (आणि हो, लोकशाहीत कायदे बदलण्याकरिताही काही तरतुदी, काही प्रक्रिया असतात, आणि 'अशा कायद्याची आज आवश्यकता आहे काय, मुळात तो सुसंगत किंवा इष्ट आहे काय, तो बदलण्याची किंवा सरसकट रद्द करण्याची आवश्यकता आहे काय', अशा प्रकारच्या मुद्द्यांवर सतत विचारविनिमय करत राहण्यास आणि संवाद सातत्याने चालू ठेवण्यास बंदी नसते, असे वाटते.)

राहिला प्रश्न चेहर्‍यावर तिरंगा रंगवणे वगैरे प्रकारांचा. आम्ही राहत असलेल्या शहरात मागे एकदा ऑलिंपिकनिमित्ताने भारत-पाकिस्तान हॉकीसामना झाला असता त्यास आवर्जून उपस्थित राहून हे प्रकार आम्हीदेखील केलेले आहेत. एवढेच नव्हे, तर आमच्या काही मित्रमंडळींनी संगनमताने काही पांढरे टीशर्ट विकत आणून त्यांवर रात्र जागवून स्वहस्ते तिरंग्यांची चित्रे रंगवली असता असा एक टीशर्ट सामन्याचे वेळी आम्हीही अत्यंत प्रेमाने आणि अभिमानाने अंगावर मिरवलेला आहे. (एरवी हॉकीतले आम्हांस शष्पदेखील कळत नाही. परंतु अशा प्रसंगी जातीने उपस्थित राहणे आणि हे सर्व प्रकार करणे हे आम्हांस निदान त्या वेळी तरी उत्स्फूर्त आद्यकर्तव्य वाटले खरे!) आता असे करताना आमच्या हातून कोण्या आचारसंहितेचे किंवा कायद्याचे उल्लंघन झाले असेल तर असो बापडे. आमच्या सुदैवाने अशा कायद्याचे रिट आम्ही आहोत तेथपर्यंत पोहोचत नसल्याने आम्हास त्याचा वैयक्तिक त्रास नाही.

अतिअवांतर: भारताच्या शेजारी असलेल्या एका राष्ट्रात 'ब्लास्फेमी लॉ' नामक एक कायदा आहे, त्याची या निमित्ताने आठवण आल्यावाचून राहवत नाही. इस्लाम, प्रेषित किंवा कुराण यांचा अपमान अथवा विटंबना यांकरिता शिक्षेच्या तरतुदी या कायद्यात आहेत. आता वस्तुतः इस्लामबद्दल नितांत आदर आणि प्रेम असलेल्या व्यक्तींची बहुसंख्या असलेल्या या राष्ट्रात किमान कोणी मुसलमान नागरिक तरी इस्लाम, प्रेषित किंवा कुराण यांची विटंबना करत असेल, असे वाटत नाही. राहता प्रश्न राहिला अल्पसंख्याकांचा. एक तर लोकसंख्येतील त्यांचे प्रमाण इतके तुरळक आहे, की ते असे काही करू धजत असतील असे वाटत नाही. शिवाय त्यांना असे काही करण्याचे प्रयोजनही दिसत नाही. सबब, असा काही कायदा आजमितीस कायदेपुस्तकांत ठेवण्याचे काही प्रयोजन वरकरणी तरी दिसत नाही.

मात्र अनेकदा, काही जुने स्कोअर सेटल करण्यासाठी या कायद्याचा उपयोग होऊ शकतो अथवा केला जातो, असे वाचनात येते. म्हणजे, काहीबाही सबबी सांगून एखाद्या व्यक्तीने इस्लामचा अपमान केला अथवा प्रेषिताची किंवा कुराणाची विटंबना केली असा आरोप करण्यात येतो, त्याचा गवगवाही केला जातो. जनतेच्या किंवा 'स्थानिक प्रस्थापितां'च्या दबावास बळी पडून पोलिसांनाही अशा व्यक्तीवर केस दाखल करणे, त्याला ताब्यात घेणे भाग पडते. आणि एकदा का मनुष्य या कायद्याच्या कचाट्यात सापडला, की बहुतांश वेळा त्याचे आयुष्य हे वाच्यार्थाने किंवा लाक्षणिक अर्थाने संपल्यात जमा असते. नको असलेल्या व्यक्तींचा काटा काढण्यासाठी अशा व्यक्तींबद्दल या कायद्याच्या तरतुदींखाली तक्रार नोंदवण्याचे प्रकार सर्रास चालतात, असे खुद्द त्या राष्ट्रातून प्रसिद्ध होणार्‍या अग्रगण्य वृत्तपत्रांतील विवेचनांतून अनेकदा वाचलेले आहे.

त्या राष्ट्रातील अनेक विचारवंतांनी, तसेच प्रागतिक विचारांच्या काही राजकारण्यांनीही हा कायदा हटवला जावा म्हणून वेळोवेळी मागणी केलेली आहे. मात्र अशा मागण्यांचा दरवेळी कडाडून विरोध होतो आणि कायदा टिकून राहतो.

अर्थात, त्या राष्ट्रात लोकशाहीचा अभाव आहे, किंवा असल्यास लोकशाहीचा नुसता देखावा आहे, असे म्हटले जाते. भारतात तसे नसल्याने परिस्थिती जरा बरी असावी याची खात्री आहे.

वा वा पंडितजी! झकास प्रतिसाद. जिंदल यांनी दुरुस्त करायच्या आधी हा कायदा इतका जाचक होता कीं सरकारी नोकरांशिवाय आणि सरकारी कार्यालयांशिवाय इतर कुणाला देशभक्ती दाखवायचा हक्कच नव्हता! पण जिंदल यांनी "तो माझा भारतीय म्हणून हक्क आहे" अशा मुद्द्यावर खटला जिंकला.
अर्थात सूर्यास्ताबरोबर ध्वज खाली आणणे वगैरे शिस्त (protocol) तर पाळायला हवीच. पण खेळांच्या स्पर्धांत विजयानंतर आपल्या देशाचा धवज अभिमानाने अंगावर लपेटून मैदानात लोकांना मुजरा करणे याइतकी गौरवाची गोष्ट कुठलीच नाहीं!
पण तीन रंगी आइस्क्रीम, बिडीबंडल वगैरेवर नेमके तेच रंग न ठेवणे जास्त योग्य वाटते.

देशाला विकू पाहणार्‍या आणि घोटाळे करुन जनतेचे पर्यायाने देशाचे पैसे लुबाडणार्‍या मंत्र्यांच्या (हे मी सर्वांविषयी बोलत नाही) अंत्ययात्रेला वापरला जाताना राष्ट्रध्वजाचा अपमान होत नसेल तर खेळाडूंच्या या कृतीने अपमान होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

त्यांचे कर्तुत्व लाचखोर नेत्यांपेक्षा कितीतरी पटींनी देशाला अभिमान वाटण्याजोगे आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Apr 2011 - 5:37 pm | परिकथेतील राजकुमार

आमचा अ‍ॅडीभौ कुठे गेला ?
कॉलिंग अ‍ॅडी...... अ‍ॅडी.... अ‍ॅडी.....

राष्ट्रध्वजाचा चड्ड्यांबाबत त्यांची काही मौलिक मते सर्वांनी ऐकावीत अशीच आहेत.

बाकी अमेरिकेतील लोक राष्ट्रध्वजाच्या चड्ड्या घालु शकतात ह्याची सुप्त असुया काही लोकांच्या प्रतिक्रीयांमध्ये जाणवली.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Apr 2011 - 11:23 pm | निनाद मुक्काम प...

झाला तो प्रकार हा अजाणतेपणी विजयाच्या आनंदात झाला. तरी अश्या गोष्टी घडायला नको .
एका गोष्टीवर सर्व सहमत होतील .की ध्वज अंगावर घेणे किंवा हातात घेऊन फिरणे ह्या गोष्टी परदेशी खेळाडूंकडून आपल्याकडे आल्या .ह्यात गैर असे मला तरी काहीच वाटत नाही .
राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता व ती अंगावर बाळगणे ह्यात गैर ते काय . .पण ती बाळगतांना काही अलिखित संकेत असतात .जसे जमिनीला स्पर्श होऊ न देणे, . किंवा पाठीवर घेतल्यास बसतांना तो आपल्या खाली न येणे .
मी खात्रीने सांगू शकतो हेच जर परदेशात घडले असते तर मोठा इशू झाला असता .
आपल्या देशात खेळाडूंना आदर्श तरुण पिढी मानते .ते खेळत असतांना त्यांच्या अंगावरील लोगो हे दर्शक कळत नकळत पाहतात .( हाच त्या लोगो गणवेषा वर असण्यामागचा मुख्य हेतू असतो .) खेळाडूंच्या सर्व वर्तनावर समस्त देशवासीयांच्या नजरा असतात .
अश्यावेळी युवीच्या ह्या कृती मुळे नकळत पणे चुकीचा संदेश आजच्या यंगिस्तान ला मिळू शकतो .)
आपल्या कडे थेटरात राष्ट्रगीताच्या वेळी उभे राहा असे सांगावे लागते ..नाहीतर काही महाभाग चक्क बसून राहतील . झेंडा वंदन च्या दुसऱ्या दिवशी रस्त्यावर झेंड्यांचा ढीग सापडतो .ह्यात वाढ होऊ नये असे वाटते .
. म्हणूनच अश्या वेळी खेळाडूंकडून जोश मे होश गमावणे नक्कीच उचित नाही .

( विल्यम किंवा हेरी ह्यापैकी( नक्की कोण ते आठवत नाही .) एका इंग्रज राजपुत्राने एकदा पार्टीत नाझी ड्रेस घातला म्हणून गहजब उडाला होता .थोडक्यात देशात व परदेशात ज्या गोष्टी सिंबोलिक व संवेदन शील असतात त्या करतांना ताळतंत्र वापरले नाही तर समस्या निर्माण होतात ., भज्जीने एका नाचाच्या कार्यक्रमात धार्मिक भावना दुखावल्या म्हणून त्याच्याच समाजाने रोष व्यक्त केला होता .)
आपल्या कडे झेंड्या बद्दल सोवळे पाळले जाते (कायद्याने ) ह्याचे कारण म्हणजे अवरीत संघर्ष आणी देशाचा लचका तुटून आपल्याला हा झेंडा मिळाला आहे .
आज जिंदाल ह्यांना घरावर झेंडा फडकवायला अनुमती मिळाली पण एखाद्याला झेंड्याचे अंतवस्त्र किंवा कपडे करायची देशात अजिबात अनुमती मिळणार नाही ( आजही देशातील अनेक गावातील घरटी एक माणूस सैन्यात ह्या झेंड्या साठी जातो .जगात असे उदाहरण क्वचित दुसर्या देशात दिसेन .).
वेस्टन संस्कृती स्वीकारांताना आपल्या मूळ मूल्य व भावनांना तडा जाऊ देता कामा नये ;असे मला वाटते
कर्मवाद व प्रयत्न वादाची शिकस्त करून आपले खेळाडू विश्व विजयी झालेत . पण तरीही धोनीने नवस फेडणे. किंवा भज्जी आणी सचिन ने मुलाखतीत देवाचे आभार मानणे. व विजयाचे श्रेय देवाला देणे. असो
किंवा गुरु म्हणून गेरी ला खांद्यावर घेणे. ( हा त्यांच्या प्रती संघाने आदर व्यक्त केला ) किंवा सचिन सारख्या जेष्ठ व्यक्तीच्या कार्याचा उचित गौरव करतांना विराट व इतर खेळाडूंचे बोल हे भारतीय संस्कृती कुठेतरी जपल्याची आठवण करून देते .
नकळत का होईना पण अशी चूक पुन्हा होऊ नये असे मला वाटते .

मी खात्रीने सांगू शकतो हेच जर परदेशात घडले असते तर मोठा इशू झाला असता .

आले परदेश कैवारी....

आजही देशातील अनेक गावातील घरटी एक माणूस सैन्यात ह्या झेंड्या साठी जातो .जगात असे उदाहरण क्वचित दुसर्या देशात दिसेन.

मला हे नमुद करावेसे वाटते की , खाली दिलेल्या लिश्टमध्ये असे कैक देश आहेत जिथे compulsory military service आहे..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Apr 2011 - 3:14 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>मला हे नमुद करावेसे वाटते की , खाली दिलेल्या लिश्टमध्ये असे कैक देश आहेत जिथे compulsory military service आहे..
आहे ना, पण सक्तीचे नसताना देखील भारतातील अनेक गावातील घरटी किमान एक जण सैन्यात जात असेल तर ते जास्त आदरणीय आहे. सक्ती पेक्षा स्वेच्छेला जास्त मान नाही का मिळणार?

वपाडाव's picture

5 Apr 2011 - 6:19 pm | वपाडाव

विमेजी,
मान्य आहे की स्वेच्छेने भारतातील लोक सैन्यात भर्ती होतही असतील.
आणी जरका परकीय देश ही सक्ती करताना त्यांनी जो काही कायदा पास केला असेल,
त्याला त्या-त्या देशाच्या नागरिकांनी संमती नक्कीच दिली असणार...
अन्यथा अश्या प्रकारचा कायदा पास झाला नसता..
कमीत कमी २/३ बहुमत मिळाले असेल तेव्हाच हे सर्व लागु करण्यात आले असावे..
(जिथ्पर्यंत लोकशाही देशांचा सवाल आहे)
पण जरका, लादण्यात आले असेल तर नक्कीच हा मान आपल्या देशातील स्वेच्छेने सैन्यात भर्ती होणार्‍या जवानांना मिळाला पाहिजे आणी मिळतही असावा...
-२ वेळेस SSB फेल झालेला सैनिक मिपाकर

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Apr 2011 - 6:47 pm | निनाद मुक्काम प...

जगभरातील लोकशाहीची माझ्यामते व्याख्या
''व्यापार्यांनी व्यापारासाठी चालवलेला मोठा व्यापार म्हणजे लोकशाही'' .(प्रगत अप्रगत देशातील जनता निमित्तमात्र असते)
जगातील सर्वात फायदेमंद व्यापार म्हणजे शस्त्र विक्री व ह्यातील काही बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वार्षिक उत्पन्न हे एका देशाच्या आर्थिक बजेट पेक्षा मोठे असते .
एक उदाहरण
नाटो सैन्यातील बहुसंख्य युरोपियन देशातील लोक माझे मित्र मंडळी आहेत .त्यांना व माझ्या बायकोला आपले सैन्य अफगाण मध्ये नक्की काय करत आहे .( म्हणजे अमेरिका व ब्रिटन सारखे युद्ध करत आहे .का बिन लष्करी
सहाय्य करत आहे .) मुळात आपले सैन्य तेथे का आहे .हेच त्यांना ठाऊक नाही आहे . फक्त आपल्या देशात अफगाण मधून एवढे निर्वासित येऊन सरकारी मदत का लुबाडत आहेत असा प्रश्न त्यांना पडतो ..
ह्याची पर्वा कुणालाच नाही .तेव्हा सगळेच कायदे व धोरणे आपण दिलेल्या देशात लोकांच्या इच्छेने होतात हा आपला गोड गैरसमज आहे .
आणी ह्यातील रशिया व त्यांच्या प्रभावाखाली असलेले देशात लोकांना इच्छा हा शब्दच माहीत नव्हता ( जेव्हा जे कायदे झाले .)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

5 Apr 2011 - 5:47 pm | निनाद मुक्काम प...

जर्मन लोकांनी ह्या सक्तीच्या सैन्य भरती बद्दल अनेकदा नाराजी नोंदवली व त्यांच्या संरक्षण मंत्र्यांनी काही वर्षपूर्वी हा कायदा मोडीत काढला .
बाकी परदेशाचा कैवार घेण्याचा प्रश्न येत नाही .कारण ह्या गोष्टी त्यांचे अनुकरण तेही टीवीत पाहून आपल्याकडे खेळाडू व लोकांनी सुरु केले .( त्यात गैर काहीच नाही हे मी आधी नमूद केले आहे .)
माझ्या आख्यानात जर्मन झेंडा खांद्यावर घेऊन इंग्लड च्या सामन्याविरुद्ध वृत्त मी सचित्र दिले आहे .तेव्हा त्या झेंड्याचा आदर राखण्याचा माझ्याकडून प्रयत्न नक्कीच केला गेला .
त्या अनुभवाच्या जोरावर मी हा प्रतिसाद टंकला ( कुठे वाचून नव्हे )

अवांतर अंतिम सामन्याला खलिस्तान गटांची भीती असल्याचे वृत्त आय बी ने दिले होते .व केनेडा मधील शीख समुदायात आय एस आय परत सक्रीय होत आहे ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे .
युवराज व भज्जीने आज जगभरातील शिखांसमोर आम्ही पूर्ण भारताचे व भारत आमचा हे त्यांच्या प्रत्येक कृत्तीतून दाखवले पाहिजे .
युवीने खेळातून हे सिद्ध केले आहे .पण आता गुड बॉय बनायचे असेल तर पूर्ण बन असे माझे मत आहे . .सोशल नेटवर्किंग च्या जमान्यात वॉर ऑफ फोर्थ जनरेशन अर्थात प्रसारमाध्यमांकडून लढले जाणारे युद्ध ही संकल्पना फार प्रचलीत झाली आहे .
एक उदाहरण .भारतीय टीमची एकता अश्या आशयाचे शीर्षक असलेली क्लिप तू नळीवर दिसते
व ती पहिल्या गेल्यावर नेहराने आफ्रिदीचा झेल त्यावेळच्या नवख्या धोनीने सोडला म्हणून केलेली शिवीगाळ कानावर पडतात .
आपली प्रतिमा जगभरात खराब करायला हे डोमकावळे नेहमीच टपले असतात .( अर्थात कामरान व अख्तर ची बा चा बाची सुद्धा येथेच दिसून येईन )स्लेजिंग वर जेव्हा मिपावर लेख येईन तेव्हा जुने स्कोर सेटल करण्यासाठी संघातील अंतर्गत स्लेजिंग हा एक वेगळा मुद्दा असेन असे मला वाटते .
तेव्हा मैदानावर ह्यांनी विचारपूर्व वागले पाहिजे .उगाच राडा नको व्हायला
.स्पायडर मेन मध्ये एक डायलोग युवीला लागू पडतो .
"With great power comes great responsibility." This is my gift, my curse. Who am I? I'm
युवी

युयुत्सूंनी दिलेल्या घटनेने ध्वजाचा अपमान झाला आहे असे मला तरी वाटत नाहीं. पण दारू पिऊन गाडी चालवताना चार लोकांना मारणार्‍या (शेजारी त्याच्या शरीरसंरक्षणासाठी दिलेला पोलीस अधिकारी बसलेला असताना), गुन्हेगार म्हणून शिक्षा झालेल्या व सध्या जामिनावर सुटलेल्या आणि 'अंडरवर्ल्ड'च्या अनेक 'डॉन' मंडळींशी संबंध असल्याचे पुरावे पोलिसांकडे असणार्‍या माणसाच्या घरी राहुल गांधींनी जाणे हा महाभयंकर गुन्हा नाहीं का? ध्वजाचा अपमान करणे तर चूकच पण राहुल गांधींनी केलेले दहापट अधीक गंभीर आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. हा व्हीडियोच पहा!
http://timesofindia.indiatimes.com/Rahul-Gandhi-visits-Salman-Khans-resi...
ही घटना अगदी अलीकडची-विश्वचषक स्पर्धेनंतरची-असावी.
हे अगदी चुकीचे उदाहरण देशवासियांपुढे ठेवून राहुल गांधींनी काय साधले?