झोपेत चालणे..

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
31 Mar 2011 - 4:11 pm
गाभा: 

काहि लोकांना झोपेत चालण्याची सवय असते असे वाचनात आले..
काहींना विस्मृती व वैचारिक गोंधळामुळे चमत्कारिक वागण्याचा त्रास होतो. अशा स्थितीत माणसे झोपेत चालतात किंवा इतर हालचाली त्यांच्याकडून जाणीव नसताना होतात..
नायक वा नायिका झोपेत चालते या वर चित्रपटात हि बरेच प्रसंग आपण पाहिले असतिल..
स्लिप वॉकर नावाचा एक सिनेमा पण येवुन गेला होता..रात और दिन सिनेमात नरगीस वर असे सिन चित्रीत केले गेले होते.
काहि लोक झोपेत चालत जावुन दाराच्या कड्या उघडतात अश्या पण गोष्टी ऐकिवात आहेत...
आपल्या वाचनात वा पहाण्यात असे काहि आले का? अनुभव शेअर करणार का?

प्रतिक्रिया

आमच्या एका नातेवाईकाला एक विचित्रंच सवंय आहे .. ते झोपेत चक्क घोरतात . काय घोर प्रकार आहे नै ?
अय्या , ऐकावे ते णवलंच, नै ?

- (झोपेत झोपणारा) टारोबा स्लिपर

कवितानागेश's picture

31 Mar 2011 - 4:23 pm | कवितानागेश

मी तर झोपेत काय वाट्टेल ते वाट्टेल तसे लिहिणारे पण काहीजण पाहीलेत. ;)
फारच भितीदायक प्रकार असतो हा!
कायमचा धसका घेतलाय मी अशा लोकांचा.

लंबूटांग's picture

31 Mar 2011 - 6:43 pm | लंबूटांग

मी तर जागेपणी पण काय वाट्टेल ते वाट्टेल तसे लिहिणारे पण काहीजण पाहीलेत. ;)
फारच हास्यास्पद प्रकार असतो हा!
कायमचा फुसका लेख असतो अशा लोकांचा.

============
लिहू :)

लंबूऽऽ अरे बाबा नको पुन्हा सुरु करूस!;)

मानसिक विकारांचा काही संबंध नाही.

जेव्हा आपण गाढ झोपतो तेव्हा एका स्टेजला आपला मेंदू रॅपिड आय मूव्हमेंट नावाच्या झोपेच्या स्टेजला पोहोचतो. या स्टेजमधे मेंदूत प्रचंड उलथापालथी आणि सिग्नल्स चालू असतात. स्वप्नंही याच वेळी पडतात. (अ‍ॅक्चुअली आर ई एम स्लीपच्या वेळेत आपण जागे झालो तर स्वप्नं अगदी तपशीलवार आठवतात.)

तर अशा मेंदू जागृत पण शरीर शिथिल अशा अवस्थेत त्यावेळी आपल्या शरीराने त्या मेंदूतल्या रँडम सिग्नल्सनुसार काही हालचाल, गडबड करु नये यासाठी शरीरात स्वतःनेच बनवलेले जालीम अ‍ॅनेस्थेटिक सोडले जाते. त्यामुळे सर्व व्हॉलंटरी स्नायू (हातपाय वगैरे) पॅरेलाईझ होतात. ही नैसर्गिक यंत्रणा आहे.

स्लीप पॅरॅलिसिस नावाचा एक प्रकार आहे. त्यात होतं असं की मनुष्य (मेंदू) अर्धवट जागा होतो आणि तरीही या अ‍ॅनेस्थेटिकचा स्नायूंवरचा इफेक्ट उतरत नाही. तेवढ्या मधल्या काळात व्यक्तीला आजूबाजूचे दिसत आणि ऐकू येत असते पण कणभरही हालचाल करता येत नाही. याचवेळी भासही होतात.

आपल्यातल्या काहींना हा अनुभव क्वचित आला असेल. काहींना वरचेवर येत असेल.

याच्या बरोबर उलट अवस्था म्हणजे ते नैसर्गिक अ‍ॅनेस्थेटिक नीटपणे न पसरणे / इफेक्टिव्ह न होणे.

अशा वेळी झोपेत मेंदू वर म्हटलेल्या आर ई एम अवस्थेत पोहोचला तरी स्नायू पॅरेलाईझ होत नाहीत आणि त्यामुळे व्यक्ती जणू जागृत असल्याप्रमाणे हालचाली करते आणि नंतर त्याची आठवण राहात नाही.

हेच ते झोपेत चालणे. (बोलणे, बडबडणे, हातवारे करणे इ इ इ)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

31 Mar 2011 - 4:47 pm | विश्वनाथ मेहेंदळे

सुंदर माहिती !!! गवि, तुमचे नक्की क्षेत्र कुठले? विमान, बँक की शरीरशास्त्र (की झोप)?
( झोपेत हालचाल हा विषय वैमानिकाच्या प्रशिक्षणात असतो का असे विचारायचा मोह टाळतो आहे. नाहीतर बरेच जण विमानप्रवास कमी करतील ;-) )

एव्हिएशन मेडिसिनमधे असते हे.

त्याच्याशी असलेल्या संदर्भातूनच माहिती झाले होते. शिवाय स्लीप पॅरेलिसिसचा अनेकदा अनुभव आल्याने यात जास्त इंटरेस्टेड झालो.

अशा अनुभवांना लोक बर्‍याचदा साक्षात्कार, दर्शन, एन्लाईटन्मेंट असे समजतात.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

31 Mar 2011 - 5:35 pm | विश्वनाथ मेहेंदळे

मला स्लीप पॅरेलिसिसचा अनुभव एकदा आला होता. उठल्यावर मला वाटले की कदाचित मला स्वप्न पडले असेल. बरे झाले हे सगळे सांगितलेत.

शंका :- एखाद्या पायलटने झोपेत विमान चालवण्याचा प्रसंग घडला होता काय हो?
(२२ आठवडे आणि ५ दिवसांपूर्वी मला हा प्रश्न नसता पडला)

गवि's picture

31 Mar 2011 - 5:52 pm | गवि

:) :)

असा काही प्रकार रेकॉर्डवर असल्यास मला माहीत नाही.

एक उदाहरण मात्र खूप दणकट आणि इंटरेस्टिंग आहे. पहिले नॉनस्टॉप एकट्याने केलेले अटलांटिक ओलांडणारे सिंगल इंजिन उड्डाण ज्याने केलं तो चार्ल्स लिंडबर्ग आणि त्याचं विमान स्पिरिट ऑफ सेंट लुईस..

http://www.charleslindbergh.com/plane/index.asp

या सलग साडेतेहतीस तासांच्या (एकट्याने केलेल्या) उड्डाणात लिंडबर्गचा सर्वात मोठा शत्रू आणि अडथळा "झोप" हाच होता. आणि एक्-दोन प्रसंगी त्याला पूर्ण अनकॉन्शस वाटेल इतका झोपेने त्याच्यावर ताबा मिळवला होता. हाईट म्हणजे नॉर्मली विमान एरोडायनॅमिकली स्टेबल असतं. म्हणजे एकदा सरळ उडायला लागल्यावर ते वरखाली डेव्हिएट होत नाही. पण हे विमान मुद्दाम अनस्टेबल बनवण्यात आलं होतं आणि सतत चुकीची करेक्शन करुन ते उडवत राहणं भाग होतं. उड्डाणाच्या थोडाच काळ आधी झालेल्या या बदलाचं कारण उड्डाणादरम्यान लिंडबर्ग सतत अ‍ॅलर्ट राहून त्याची झोप उडावी हे होतं.

त्याच्या या साहसामुळे पॅसेंजर्ससाठी विमाने उडणे सुरु झाले.

वपाडाव's picture

31 Mar 2011 - 6:09 pm | वपाडाव

लैच मोठा खजिना गवसलाय हो मिपाला....
__/\__
भारी हो गवि.. न्यानात भर...

५० फक्त's picture

31 Mar 2011 - 6:36 pm | ५० फक्त

वैमानिकाने झोपु नये अशाच यासाठी जशी काळजी घेतली जाते तशीच व्यवस्था काही बसेस मध्ये पण असते. ड्रायव्हरच्या मागे बरोबर त्याच्या मानेवर नेम धरुन एक हाय स्पिड एसी व्हेंट असतो. आणि त्यातुन विशिष्ट वेळाने एक अतिशय थंड हवेचा झोत ड्रायव्हरच्या मानेवर फेकला जातो. याचा परिणाम होउन ड्रायव्हरला झोप लागु शकत नाही.

अशी सोय आता मागच्या आठवड्यात मुंबई पुणे प्रवासात एका व्होल्व्हो मध्ये पाहिली होती. तसेच महिंद्रा व टाटाच्या नव्या डंपर्स मध्ये पण ही सोय असल्याचे ऐकले आहे.

गवि's picture

31 Mar 2011 - 6:43 pm | गवि

also, dead man's handle driving arrangement in train.
Motorman must keep it pressed all time.
Train will stop when positive pressure on springloaded lever is released.
This is to ensure train will run only with alert alive and awake operator.

अरे ५० कल्पना चांगली आहे पण आपल्या कडल्या मरणाच्या उकाड्यात अशी एसीची थंड झुळुक आली तर झोप उडेल की गंगाईगीत गाईल्याचा फील येईल?

५० फक्त's picture

31 Mar 2011 - 7:01 pm | ५० फक्त

अरे तसं नाही गणपा, ती एसीची झुळुक नसते, तो जेट टाईप फ्लो असतो. हा फ्लो खुप सहन होणार नाही असा थंड, जास्त वेगानं येणारा आणि कण्याच्या शेवटच्या मणक्यावर वार करण्यासारखा असतो. ८-१० डिग्री तापमानाचं एक तांब्याभर पाणि त्या वरच्या मणक्यावर टाकुन पहा, लगेच झोप जाईल.

मला पण हीच शंका होती, म्हणुन ही त्या ड्रायव्हरनं वर सांगितलेली युक्ती मी घरी येउन करुन पाहिली, सहन करु शकत नाही. आणि बसेसचं ड्रायव्हर केबिन एसि नसतं , असलं तरी त्याचं तापमान comfortable लेवलला सेट करता येत नसतं.

ह्या गोष्टीमुळं एक प्रकारचा uncomfortable feel येतो, आणि मेंदु पुन्हा काही नव्या प्रतिक्रिया सुरु करतो ज्यामुळं झोप येउ घालणं हे काम बाजुला पडतं.

हे uncomfortable feeling तत्व मी गाडी चालवताना वेगळ्या पद्धतीनं पाळतो.

प्रदीप's picture

31 Mar 2011 - 6:25 pm | प्रदीप

एखाद्या पायलटने झोपेत विमान चालवण्याचा प्रसंग घडला होता काय हो?

अगदी झोपेत नव्हे, पण पायलट व त्याची फर्स्ट ऑफिसर ह्या दोघांच्याही अपुर्‍या झोपेमुळे २००९ साली एका बाँबार्डियरला अपघात होऊन ते सरळ खाली कोसळले, सर्व ४९ जण मृत्यूमुखी पडले.

वरील दुव्यात ह्याविषयी उल्लेख नाही. पण नॅटजियोच्या डॉक्युमेंटरीत ह्याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. दुर्घटनेच्या चौकशीतील प्रार्थमिक निष्कर्ष होता की पंखांवर बर्फ जमा झाल्याने विमान कोसळले. पण खोलात चौकशी केल्यावर आढळून आले की बाँबार्डियरमधे बर्फ साठल्यावर येणार्‍या ड्रॅगवर मात करता यावी म्हणून एक विशीष्ट 'मोड' पायलट अ‍ॅक्टिव्हेट करून शकतो. तो पायलटने केलेला होता. पण जेव्हा स्टिक गदगदा हलू लागली (ही स्पीड्ची वॉर्निंग वैमानिकाला देण्याची पद्धत आहे) तेव्हा पायलटने तिला हव्या त्याच्या नेमक्या विरूद्ध दिशेस खेचले, त्यामुळे विमान स्टॉल झाले. हे समजल्यावर मग चौकशी समितीने असे त्या दोघांच्या हातून का घडले असावे ह्याचे अनुमान बांधण्याच्या दृष्टिने अधिक माहिती गोळा केली. तेव्हा समजले की ह्या फ्लाईटच्या अगोदर ते दोघेही आपापल्या रहायच्या ठिकाणांहून (एक मियामी, दुसरी डेट्रॉईट) न्यू वार्कला सकाळच्या फ्लाईटसाठी रात्रभर प्रवास करून पोहोचले होते. ते दोघेही फ्लाईटच्या अगोदर वैमानिकांच्या लाउंजमधे झोपलेले होते (हे नियमाच्या विरूद्ध आहे) वगैरे माहिती मिळाली.

प्रदीप's picture

31 Mar 2011 - 7:06 pm | प्रदीप

पायलट नव्हे पण एयर ट्रॅफिक कंट्रोलर झोपलेला असतांना दोने विमाने उतरल्याची घटना नुकतीच वॉशिंग्टन डी. सी. त घडली! (तो एकमेव कंट्रोलर त्यावेळी ड्युटीवर होता). दोन्ही विमाने सुखरूप उतरली.

आत्मशून्य's picture

31 Mar 2011 - 10:22 pm | आत्मशून्य

अशा अनुभवांना लोक बर्‍याचदा साक्षात्कार, दर्शन, एन्लाईटन्मेंट असे समजतात.

साक्षात्कार, दर्शन, एन्लाईटन्मेंट वगैरे वगैरे काहे माहीत नाही पण तूम्हाला लुसीड ड्रीमींग असं काही सूचवायचे आहे काय ?

गवि's picture

31 Mar 2011 - 10:29 pm | गवि

Hallucinations, लुसीड ड्रीमींगच असते हो. लोक त्यालाच साक्षात्कार, दर्शन, एन्लाईटन्मेंट वगैर "समजतात".

चुकून समजतात आणि त्यांना खरंच साक्षात्कार, दर्शन, एन्लाईटन्मेंट वगैर वाटतं..

असो..

विश्वनाथ मेहेंदळे's picture

31 Mar 2011 - 4:26 pm | विश्वनाथ मेहेंदळे

या निमित्ताने तुमचाच जुना दह्याचा धागा आणि तिथे झालेली चर्चा आठवली. (आणि डान्राव पण आठवले ;-) )

(स्मरणशील) रिकामटेकडा-लाडू

टारझन's picture

31 Mar 2011 - 8:59 pm | टारझन

सॅन होजे मधल्या काकांनी सांगितल्या प्रमाणे काहींना झोपेत कडक सोवळे करायची सवय असते.
ही आळशी आणि निरस पणाची हाईट आहे असे जोडु इच्छितो.

काही लोकांना झोपेत बरेच काही करण्याची सवय असते. सगळं का सांगायचं बरं?

टारुने अपेक्षेप्रमाणे पहिली पतिक्रिया देऊन (अकु- लेखक, टारु- पतिसादक) आपले णाव राखण्यात यश मिळवलेले आहे.

पु स=सवयीसाठी शु.

धन्यवाद.

स्पा's picture

31 Mar 2011 - 4:29 pm | स्पा

आता हेच विषय येणे बाकी होते

माझे चार आणे

तुम्हाला स्वप्नं पडतात का?
तुम्ही मधेच दचकून जागे होता का?
१ नंबर / २ नंबरला जाता का?
घोरता का?
लाथा झाडता का?
दात खाता का?
झोपेत रडता का ?
इत्यादी इत्यादी

स्पा लिस्टमध्ये काहीतरी मिसिंग नाही का वाटत रे ?? ;)

स्पा's picture

31 Mar 2011 - 4:35 pm | स्पा

हा हा
असो विषयांतर नको ;)

कच्ची कैरी's picture

31 Mar 2011 - 4:45 pm | कच्ची कैरी

काही लोकांना झोपेत बोलण्याची सवय असते .बाकी कुणाच्या झोपेतल्या सवयी जाणुन घ्यायच्या अस्तील तर लग्नाच्या वर्‍हाडासोबत झोपावे बरच काय काय माहित पडेल;)

तर लग्नाच्या वर्‍हाडासोबत झोपावे...........

अश्लिल अश्लिल....

गणप्यान् माझा प्रतिसाद चोरला ... मेल्या तुझ्या आता १२वी नंतर अडचणीच बंद होतील बघ .. शॉप देतो तुला :)

सूड's picture

31 Mar 2011 - 5:09 pm | सूड

:D

कच्ची कैरी's picture

31 Mar 2011 - 5:14 pm | कच्ची कैरी

अरे चोराच्या घरात चोरी झाली म्हणायची बाकी तुला अशा गोष्टींमध्ये जरा जास्तच इंटरेस्ट आहे माहित आहे मला .

गणपा...
अग्गायाय्यायाया
बोटांना काही मास रे तुझ्या...
झडली कशी नाहीत रे टंकताना....

कच्ची कैरी's picture

31 Mar 2011 - 5:11 pm | कच्ची कैरी

यात काय अश्लील मला काय कळले नाही :(
लग्नाघरी प्रत्येकाला वेगळी झोपण्याची सोय नसते तिकडे सगळ्या बायका एका घरात शेजारी-शेजारी गाद्या टाकुन झोपलेल्या असतात आणि सर्व पुरुष मंडळीची सोय वेगळी केलेली असते तेव्हा एकमेकांच्या झोपेतील बोलण्याच्या किंवा घोरण्याच्या ,लाथ मारण्याच्या किंवा दात खाण्याच्या सवयी माहित पडतात .
बाप रे !!!मिपावर प्रतिसाद देतांना ४ ते ५ वेळा विचार करावा लागेल .

मी नाही त्यातली ... आणि काल मॅच बघितली
ह्या उक्तीचा अर्थ आज मला कळाला

बाकी विचार करणे विचारवंतांचे काम आहे :)

- कोच्ची पुडी

मिपावर प्रतिसाद देतांना ४(०) ते ५(०) वेळा विचार करावा लागेल .

एकेक शुन्य अजुन जोडा त्यात..

नितिन थत्ते's picture

31 Mar 2011 - 5:19 pm | नितिन थत्ते

चांगला झोपलो होतो तर अविनाशकुलकर्णींनी उठवलं. :(

चाचांचा हा प्रतिसाद त्यांनी झोपेत असतानाच दिल्या गेला आहे का????

कच्ची कैरी's picture

31 Mar 2011 - 5:19 pm | कच्ची कैरी

>>बाकी विचार करणे विचारवंतांचे काम आहे
हो म्हणुन ते मी करुन घेईल ,बाकी हे वडाच पान पिंपळाला जोडण सोडुन दे -पिंपळपान

वेताळ's picture

31 Mar 2011 - 6:23 pm | वेताळ

???

काही लोकांना झोपेतच अनेक काथ्याकुटाचे विषय प्रसवायची सवय असते असे पाहण्यात आले आहे..
ही अवस्था फार वेळ टिकत नसल्याने अगदी कमी शब्दात निरर्थक काथ्या कुटल्यासारखे वाटते..
काहींना विस्मृती व वैचारिक गोंधळामुळे चमत्कारिक काथ्याकुटाचा त्रास होतो. अशा स्थितीत माणसे झोपेत लिहीतात किंवा इतर हालचाली (उदा. मराठी संस्थळावर लॉगिन करणे) त्यांच्याकडून जाणीव नसताना होतात..
नायक वा नायिका झोपेत लिहीते या वर मराठी संस्थळात हि बरेच प्रसंग आपण पाहिले असतिल..
काहि लोक झोपेत जावुन दुसर्‍याच्या धाग्यांवर काड्या करतात अश्या पण गोष्टी ऐकिवात आहेत...
आपल्या वाचनात वा पहाण्यात असे काहि आले का? अनुभव शेअर करणार का?

--असुर

अगगाग्गा

असुर्याने बाजार उठवल्या आहे

५० फक्त's picture

31 Mar 2011 - 6:40 pm | ५० फक्त

ती झोप मंद हळविशी , एक कॉल प्रसवुनि गेली.

गवि म्हणतात त्याप्रमाणे मलाही स्लीप पॅरेलिसीसचा अनुभव आला होता.
माझ्या आतेभावालाही झोपेत चालण्याची सवय होती.
झोपेतच दाराची कडी काढून बाहेर चालत जाऊन एकदा परत आला होता.
नंतर आत्यानं दाराला आतून कुलुप लावून ठेवायला सुरुवात केली.
असेच एकदा कुलुप लावल्यामुळे दार उघडेना.......आणि हा जागाही होइना.
बॅल्कनीत जाऊन रात्रीच्या बारा वाजता रस्त्यावरून जाणार्‍या एकुलत्या एका माणसाला
"शुक शुक, दाराला बाहेरून कडी आहे ती काढता का?" असे विचारले.
तो बुवाही ग्रेट, त्याने पाहिले आणि दाराला बहेरून कडी नसल्याचे सांगितले.
दोन सेकंद थांबून पुन्हा "शुक शुक, दाराला..............."
तो माणूस त्यानंतर पळत सुटला.
काका आपल्या मुलाचं निरिक्षण करत होते त्यामुळे हे सगळे समजले.
आतेभावाचा हा त्रास त्याचे एम टेक होइपर्यंतच होता. ती दोन वर्षे आत्यानं भयंकर ताणाखाली घालवली.;)

रेवती किस्सा ऐकायला मजेशीर असला तरी त्या माउलीच काळजी व्यर्थ नसावी.
मी स्वतः याचा (झोपेत चालण्याचा) अनुभव घेतलेला नसला तरी एकदा दुपारी सोफ्यावर झोपलो असताना माझा चुलत भाऊ (जो जमिनीवर झोपला होता.) अचानक माझ्या पेकाटावर पाय देउन भिंत धरायला लागला वर ओरडत होता "अरे ती बघ पडतेय पडतेय." दोन मिनिटं काही सुचलच नाही पोटातुन जोरदार कळ उठली होती. शेवटी लक्षात आलं म्हाराजं झोपेत होते.
उठल्यावर त्याला हा किस्सा सांगीतला तर त्याने कानावर साफ हात ठेवले आणि मलाच वेड्यात काढले.

दुसरा किस्सा माझे बाबा सांगायचे तो असा की त्यांचा आत्ये भाऊ शाळेत असताना रात्री झोपेत दाराची कडी काढुन परसातल्या विहिरी पाशी जाउन बसायचा. पुढे काही अनर्थ होउ नये म्हणुन रोज झोपताना त्याचे पाय पलंगाला बांधुन ठेवत असत.

गविंनी वर न्यानात भर घातली आहे त्या बद्दल धन्स.

गणेशा's picture

31 Mar 2011 - 9:19 pm | गणेशा

भारीच

वपाडाव's picture

1 Apr 2011 - 11:02 am | वपाडाव

चला नशीब थोरलं आहे माझं...
कारण मला आतेभाउच नाहिये...

प्यारे१'s picture

1 Apr 2011 - 1:28 pm | प्यारे१

माझा आतेभाऊ कॉटवर झोपला होता.

झोपेत कॉटवरुन खाली जमिनीवर पडला.

त्याच अवस्थेत तसाच परत झोपला.

माझा आतेभाऊ जमिनीवर झोपला होता.

झोपेत जमिनीवरुन कॉटवर पडला.

त्याच अवस्थेत तसाच परत झोपला.

प्यारे१'s picture

1 Apr 2011 - 2:19 pm | प्यारे१

२ तास ३८ मिनिटांमध्ये आपल्याला आतेभाऊ आला?

आपले आणि आपल्या नातेवाईकांचे मनापासून हार्दिक अभिनंदन.

नन्दादीप's picture

1 Apr 2011 - 4:35 pm | नन्दादीप

हा हा हा.....जबरा परतवलात...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Apr 2011 - 12:39 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मलाही बर्‍यापैकी असाच अनुभव आहे.

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट! भाऊ आधीच झोपला होता आणि मी बर्‍याच उशीरापर्यंत वाचत बसले होते. आडवी झाले आणि झोप लागायच्या आतच पुस्तकांचं एक कपाट, बर्‍यापैकी आवाज करत, आपली भिंतीला चिकटून असलेली नेहेमीची जागा सोडून भुईसपाट झालं होतं. त्याचा बराच मोठा आवाज झाला. भावाने अर्धवट झोपेत माझं बकोट पकडून मला चोर समजून जवळजवळ मारायला सुरूवात केलीच होती. मी जीवाच्या आकांताने, "अरे, जागा हो; मी अदिती आहे; चोर नाहीये... कपाट पडलंय" म्हणून ओरडत होते. मला पुरेशी भीती वाटल्या/दाखवल्यानंतर महाराज जागे झाले आणि लगेच "काय झालं, तू का ओरडते आहेस? आधी दिवा लावतो मी!" म्हणाले.

थोड्या वेळात भिंत, कपाट यांचा सर्व्हे झाला, "उद्या सकाळी काय ते पाहू" म्हणत दोघंही आडवे झालो आणि पुन्हा पुस्तकांचा, कपाटाच्या लाकडाचा आवाज झाला. मी पुन्हा एकदा घाबरून काही होण्याच्या आतच "पांढरू (मांजर) आहे, चोर नाही" म्हणून ओरडायला सुरूवात केली. रात्री उशीरा एवढा आवाज करू नये म्हणून तो मला सांगायला लागल्यावर मी त्याला, त्याने मला मारण्याचा प्रकार सांगितला... पण आजही तो या प्रकारावर विश्वास ठेवत नाही.

प्रदीप's picture

2 Apr 2011 - 6:16 pm | प्रदीप

किस्सा ऐकायला मजेशीर असला तरी त्या माउलीच काळजी व्यर्थ नसावी

अगदी सहमत आहे. वरील दोन्ही अनुभव तसेच अदिती व योगप्रभूंचे स्वानुभव बरेच काही सांगून जातात.

माझ्या आईकडून तिच्या एक मामाविषयी मी असाच एक अनुभव ऐकला होता. हा गृहस्थ मेडिकलला असतांना हॉस्टेलमधे रहायचा. तेव्हा एका रात्री झोपेत त्याने आपल्या रूम पार्टनरलाच उचलले व खिडकीतून खाली फेकून देण्याचा प्रयत्न केला. पार्टनरने 'असे, काय करतो आहेस?' असे दोन तिनदा विचारूनही साहेब जागे होईनात. शेवटी अगदी जीवाच्या निकराने त्या पार्टनरने ह्याला एक मुस्काटीत ठेऊन दिली व स्वतःची सोडवणूक करून घेतली.

ह्या घटना हसण्यावारी नेण्यासारख्या नव्हेत, अगदी अनावस्था प्रसंग ह्यातून ओढवू शकतात.

ह्यामागील गविंनी दिलेली माहिती छान आहे.

निवेदिता-ताई's picture

31 Mar 2011 - 8:15 pm | निवेदिता-ताई

ह.ह.पु.वा................:)

झोपेत चालणारी हिरॉईन नीलकमल मध्ये होती. तुझको पुकारे मेरा प्यार .. असे हिरोने म्हटल्यावर झोपेत चालत जात होती. ( आमची बायको ती जागे असताना जरी आम्ही हे गाणे म्हटले, तरी येत नाही.)

नरेशकुमार's picture

1 Apr 2011 - 5:45 am | नरेशकुमार

( आमची बायको ती जागे असताना जरी आम्ही हे गाणे म्हटले, तरी येत नाही.)

प्रेम कमि पडते आहे.
प्रेमाने घ्या. ('प्रेमाने घ्या' म्हनजे 'माझा प्रतिसाद हलके घ्या', उगा काही वेगळा अर्थ लाउ नका)

इरसाल's picture

31 Mar 2011 - 11:01 pm | इरसाल

गविना मानाचा मुजरा.

खादाड_बोका's picture

31 Mar 2011 - 11:51 pm | खादाड_बोका

मी तर झोपे मध्ये धावणार्या बद्दल ऐकले आहे. आणी झोपेच्या आधी करणार्या व्यायामाबद्दल सुद्धा?
कोणाला काही नवल वाटते काय? ज्याला जे करायचे ते करू द्या ना . आपली तंगडी कशाला मध्ये आडकायची ?

विकास's picture

1 Apr 2011 - 12:59 am | विकास

गविंची माहिती मस्तच!

मला एकदम जुनी ब्रिटानिया डिलाईटची झोपेत चालणार्‍या माणसाची (कलाकार?) जाहीरात आठवली. ब्रिटानिया डिलाईट असे बडबडत तो स्वैंपाकघरात जातो आणि बिस्कीटे संपली असलीतरी रिकाम्या पुड्यात हात घालून खायचा प्रयत्न करत रहातो.. तूनळीवर मिळाली नाही.

बाकी झोपेत चालण्यापेक्षा, झोप लागत असताना कधी कधी जो उंचावरून पडल्याचा भास होतो तो रोचक असतो आणि त्यावेळेस आपण कुठले तरी स्वप्न बघत असतो पण कुठले ते या विशिष्ठ प्रकारात आठवत नाही!

नरेशकुमार's picture

1 Apr 2011 - 5:41 am | नरेशकुमार

मि झोपेत मिपा वाचतो.

अरेच्च्या झोपेत चालत चालत या धाग्यावर पोहचलो तर !!! ;)

(गोड स्वप्न पाहणारा...) ;)

कच्ची कैरी's picture

1 Apr 2011 - 10:24 am | कच्ची कैरी

काही लहान मुल झोपेत मुत्रविसर्जन करतात असही मला नेहमी एकायला मिळाले आहे .
माझ्या वरील प्रतिसादाबद्दल कुणाला काही आक्षेप असल्यास त्यांनी कृपया माझ्या खवत येऊन प्रतिक्रिया नोंदवावी .

इंटरनेटस्नेही's picture

1 Apr 2011 - 10:55 am | इंटरनेटस्नेही

काही लहान मुल झोपेत मुत्रविसर्जन करतात असही मला नेहमी एकायला मिळाले आहे .
माझ्या वरील प्रतिसादाबद्दल कुणाला काही आक्षेप असल्यास त्यांनी कृपया माझ्या खवत येऊन प्रतिक्रिया नोंदवावी .

होय हे खरे आहे. त्यावर उपचार म्हणुन होमिओपेथिच्या ए-पिल्स या औषधी गोळ्यांची मी जाहिरात पाहिली आहे, गृहशोभिका* तसेच साप्ताहिक सकाळ मध्ये.

* आपली मजल गृहशोभिकेपर्यंतच! ;)

गवि's picture

1 Apr 2011 - 10:58 am | गवि

काही लहान मुल झोपेत मुत्रविसर्जन

काही नव्हे, सर्वच लहान मुले झोपेत मूत्रविसर्जन करतात.

सकाळी उठल्यावर लक्षात आलं की रात्रीत झोपेत एकदाही झालेलं नाही, तर ताबडतोब डॉक्टरकडे न्यावे.

विमान चालवले होते.

नरेशकुमार's picture

1 Apr 2011 - 12:10 pm | नरेशकुमार

तेव्हाच ना , जेव्हा मि को-पायलट होतो.
काय मज्जा आली व्हती म्हनुन सांगु !

योगप्रभू's picture

1 Apr 2011 - 1:19 pm | योगप्रभू

मला स्वतःला लहानपणी झोपेत चालण्याची सवय होती. अर्थात 'नीलकमल' चित्रपटात वहिदा रेहमान जशी रेल्वेची साखळी ओढून पार स्टेशनवरुन पडक्या महालापर्यंत चालत जाते, तशी काही माझी कुवत नव्हती. माझी धाव जास्तीत जास्त दारापर्यंत. त्या वेळी पडलेली स्वप्ने मला आजही आठवतात. पण त्याचे लिंकिंग दिवसभर आपला मेंदू जे सतत विचार करतो त्याच्याशी असते, असे वाटते.

माझे बालपण गरीब मध्यमवर्गीय कुटूंबात आणि वाडा संस्कृतीत गेले. रेशनच्या दुकानात रॉकेल आलंय, असे कुणी शेजार्‍याने सांगितले, की ऐकणारे सगळे कार्ड आणि कॅन उचलून दुकानाकडे पळत सुटायचे. एक दिवस अशीच आम्ही रॉकेलची प्रतिक्षा करत होतो. नेमके त्या दिवशी आई-वडिलांना जवळच्या गावी जायचे कारण घडले. आईने मला बजावून सांगितले, की कार्ड, पैसे आणि कॅन वरच ठेवले आहेत. रॉकेल आलंय असं कळलं की अळंटळं न करता पहिला दुकानात जा. दिवसभर मी त्याच काळजीत. पण त्या दिवशी रॉकेलची गाडी आलीच नाही. संध्याकाळी आई-बाबा परतले. त्यांना सांगून टाकले. पण रात्री झोपेत गंमत झाली. मी एकदम उठून कॅन घेऊन दार उघडायला लागलो. कडीशी खेळण्याचा आवाज येताच घरातले जागे झाले. त्यांनी विचारताच मी झोपेतच सांगू लागलो, 'चला चला रॉकेल आलंय. शेजारच्या काकांना पण सांगतो जाताना.' मग वडिलांनी दामटून झोपवले.

उन्हाळ्याच्या दिवसांत आम्ही गार वार्‍यासाठी ओसरीवर झोपायचो. शाळेत कुठल्याशा स्पर्धेत पहिला नंबर आला म्हणून आईने प्रेमाने मला दोन रुपये दिले. (त्या दोन रुपयांना ३०-३५ वर्षांपूर्वी बरंच महत्त्व होतं कारण पिक्चरचे तिकिट, चांदोबा मासिकाचा अंक, भेळ अशी बरीच चैन तेवढ्या पैशांत करता यायची) तर दुर्दैवाने ती नाणी माझ्या वरच्या खिशातून कुठेतरी पडली. दिवसभर शोध घेऊनही सापडली नाहीत. आणि रात्री झोपेत मी दोन फूट उंच ओसरीवरुन अंगणात उडी मारली. धप्प आवाज ऐकून सगळे जागे झाले. त्यांना वाटले की चोर वगैरे आला काय? बघतात तो आमचे ध्यान जमीन चाचपत बसलेले. विचारल्यावर मी बरळू लागलो, 'माझे पैसे पडले आहेत. ते शोधतोय.' घरच्यांनी कपाळाला हात लावला.

(लग्नानंतर हे किस्से माझ्या बहिणींनी माझ्या बायकोला चवीने सांगितले. त्यावर ती म्हणाली, 'अजुनही त्या सवयी शिल्लक असल्या तर मग प्रॉब्लेमच आहे. दुसरीकडे गेल्यावर झोपेत इतर कुणाचा हात धरला नाही म्हणजे मिळवले. :))

माझे बालपण हुच्च मध्यमवर्गीय व राडा संस्कृतीत गेले. राणीच्या (मॉल) दुकाणात णविण माल आला असे शेजार्याने सांगितले, की ऐकणारे सगळे आपापले क्रेडिट कार्ड व पर्सा उचलुन मॉलकडे पळत सुटायचे. एक दिवस अशीच आम्ही मालाची प्रतिक्षा करत होतो. नेमके त्या दिवशी आई-वडिलांना जवळच्या क्लबात पत्ते खेळण्यासाठी जायचे कारण घडले. आईने मला बजावून सांगितले, की क्रेडिट कार्ड, पर्स आणि फरारीच्या किल्ल्या वरच ठेवले आहेत. माल आला असं कळलं की अळंटळं न करता पहिला मॉलात जा. दिवसभर मी त्याच काळजीत. पण त्या दिवशी मालाची डिलिव्हरी आलीच नाही. संध्याकाळी आई-बाबा परतले. त्यांना सांगून टाकले. पण रात्री झोपेत गंमत झाली. मी एकदम उठून किल्ल्या घेऊन फरारीचे दार उघडायला लागलो. थिफ डिटेक्टरचा (ट्यॅव..ट्यॅव..ट्यॅव..) आवाज येताच घरातले जागे झाले. त्यांनी विचारताच मी झोपेतच सांगू लागलो, 'चला चला माल आलाय. शेजारच्या काकांना पण सांगतो जाताना.' मग वडिलांनी लाडावुन झोपवले.

उन्हाळ्याच्या दिवसांत आम्ही गार वार्‍यासाठी एसीत झोपायचो. शाळेत कुचकामी कोण स्पर्धेत पहिला नंबर आला म्हणून आईने प्रेमाने मला दोन हजार रुपये दिले. (त्या दोन हजार रुपयांना ३०-३५ वर्षांपूर्वी माझ्या लेखी *ट महत्त्व नव्हतं कारण चैन तेवढ्या पैशांत करताच नै यायची) तर दुर्दैवाने तो चेक बँकेत बाऊंस झाला. दिवसभर बँकेत फिरुनही काही शोध लागेना. आणि रात्री झोपेत मी बँकेच्या दोन माळ्याच्या बिल्डिंगवरुन खाली उडी मारली. धप्प आवाज ऐकून सगळे जागे झाले. (प्रत्यक्षात मी हॉलच्या वर जाणार्‍या जिन्यावरुन खाली उडी मारली होती.) त्यांना वाटले की चोर वगैरे आला काय? बघतात तो आमचे ध्यान जमीन चाचपत बसलेले. विचारल्यावर मी बरळू लागलो, 'माझा चेक बाउंस झालाय. अन मॅनेजर पळुन जातोय. त्याचा पाठलाग करतोय.' घरच्यांनी कपाळाला हात लावला.

[[लग्नानंतर हे किस्से मी माझ्या बायकोला चवीने सांगेन.]]
यापुढचं तिच्यावर सोडुन देतोय ;)

वपाडाव ह्यांचा हा प्रतिसाद मात्र खरच त्यांनी झोपेत लिहिल्यासारखा वाटतोय.

चालु द्यात.आता माझी "जवळ जवळ" झोपायची वेळ झालीये.

अभिज्ञ.

या सगळ्या प्रतिसांदांवरून असे कन्क्लुजन काढता येईल की
आत्तेभावाना झोपेत चालायची सवय असते.
ज्याना आत्तेभाऊ नाही त्याना झोपेत चालण्याची सवय माहीत नसते.

स्पंदना's picture

1 Apr 2011 - 4:27 pm | स्पंदना

आमच धनी स्वप्नात सुद्धा कंप्युटर्वर काम करत असतात. दोनदा पाहिलय मी . दोन्ही हात हवेत वर अन बोट हलताहेत.

मी विचारल काय करतोयस अक्षय तर मला म्हणतो एव्हढ कॉन्फिगर झाल की संपलच बघ! मग सिस्टम री बुट कर.

अविनाशकुलकर्णी's picture

13 May 2011 - 2:25 pm | अविनाशकुलकर्णी

मुंबई।। दोस्त उसकी नींद में चलने की बीमारी का मज़ाक उड़ाया करते थे और उसे चिढ़ाते थे, आज वे उसकी मौत पर दुखी हैं और अफसोस कर रहे हैं कि उन्होंने उसकी बीमारी को मज़ाक में क्यों लिया? मुंबई के मुलुंड (पश्चिम) इलाके में बुधवार को 21 वर्षीय सागर चेत्री की नींद में चलते हुए दूसरी मंजिल से गिरने के कारण मौत हो गई।

बुधवार सुबह करीब 4.15 बजे मुलुंड की महावीर शिखर सोसायटी में दूसरी मंजिल पर रहने वाला सागर नींद में अपने फ्लैट की खिड़की से कूद गया और उसके पैरंट्स यह सब देखते हुए भी उसे बचा नहीं सके। जब तक वह अपने बेटे को पकड़ते तब तक वह खिड़की से कूद चुका था। उनके पैरंट्स के लिए बेटे के जाने का दुख अपराधबोध बन चुका है, क्योंकि वह बेटे को न बचा पाने के लिए लिए खुद को ही दोष दे रहे हैं।
http://navbharattimes.indiatimes.com/articleshow/8291171.cms