मेथीची पचडी --

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
30 Mar 2011 - 2:29 pm

कोवळी मेथी पाने फक्त घ्यावी.. देठ घेउ नयेत, बारीक चिरावी.
.त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा, मीठ,शेंगदाणा कुट आणी फ़ोडणी मिरच्यांचे तुकडे घालून बनवणे.व त्यात एकत्र मिसळून घेणे,
वरुन अर्ध्या लिंबाचा रस घालून पुन्हा एकत्र करा...झक्कास तोंडीलावणे तय्यार.

प्रतिक्रिया

गुड्डु's picture

30 Mar 2011 - 3:11 pm | गुड्डु

हे कडु लागत नाहि का?

गवि's picture

30 Mar 2011 - 4:12 pm | गवि

+१

हेच म्हणतो.

गवि साहेब , पचडी छान लागते. खाऊन पहा. मेथी मात्र एकदम बारीक चिरलेली हवी.
आमच्या घरी फोडणी न देता कच्चेच तेल वापरतात. वरील सर्व जिन्नस त्यात असतात फक्त फोडणी नाही. ऑलीव्ह चे तेल तर छानच लागेल त्यात.

@निवेदिता ताई - पछडी असा शब्द पहिल्यांदाच ऐकला. ह्या रेसिपीला पचडी म्हणतात असेच आतापर्यत ऐकलेले आहे.

वहिनी's picture

30 Mar 2011 - 3:41 pm | वहिनी

खू प छान ?

वहिनी's picture

30 Mar 2011 - 3:41 pm | वहिनी

खू प छान ?

वहिनी's picture

30 Mar 2011 - 3:41 pm | वहिनी

खू प छान ?

आमच्या वहिनीबाईंना पचडी खूपच आवडलेली दिसते.;)
तसे असेल तर शाल्मलीने अश्याच प्रकारची कांद्याच्या पातीची कोशिंबीर दिलेली होती. तीही आवडेल.

रेवती's picture

30 Mar 2011 - 8:45 pm | रेवती

क्यामेरा नविन घेतला काय नि-ता?:)
आम्ही याला पचडी (च चा उच्चार चमच्यातल्या च सारखा करावा.) म्हणतो आणि भन्नाट आवडते.
हे फ्याटी फूड नसल्याने खाताना अपराधीपणा जाणवत नाही.

योगप्रभू's picture

30 Mar 2011 - 9:28 pm | योगप्रभू

निवेदिता ताई,
आम्ही पचडीत चिमूटभर साखरही भुरभुरतो. म्हणजे मग मेथी (किंचित कडवट), लिंबू (आंबट), मीठ (खारट), मिरची (तिखट) आणि साखर (गोड) असे पंचरस पूर्ण होतात.

मेथी थोडी चिरुन कच्चे तेल, तिखट-मीठ, बारीक कांदा टाकून खाल्ली तरी चविष्ट लागते.

सानिकास्वप्निल's picture

31 Mar 2011 - 12:59 am | सानिकास्वप्निल

:)

निवेदिता-ताई's picture

31 Mar 2011 - 10:43 am | निवेदिता-ताई

हो हो पचडीच म्हणायचे होते पण चुकुन छ् झाले ....माफी असावी.

कच्ची कैरी's picture

31 Mar 2011 - 11:59 am | कच्ची कैरी

मलाही आवडेल ही पचडी खायला .मी यात लसुन्-शेंगदाणा चटणी आणि कच्चे तेल घालते मस्त लागते.-कच्ची पचडी

प्राजक्ता पवार's picture

31 Mar 2011 - 1:34 pm | प्राजक्ता पवार

:)

आम्च्याकडे मेथीची पाने चिरत नाही. तसेच ह्यात कांदा आणि टोमॅटो बारीक चिरुन, वर थोडं शेंगदाण्याचं किंवा तिळाचं कुट, तिखट, मीठ, चिमुटभर साखर, छोटा चमचा कढवलेलं तेल, आणि थोडंस लिंबू असं सगळं घालतो. ह्याला आम्ही घोळाना म्हणतो. हे सॅलर्ड लै भारी लागते... शिवाय ह्यात गोड, कडू (मेथीचा कडवटपणा), आंबट, आणि खारट अश्या सगळ्या चवीपण आहेत!

मदनबाण's picture

1 Apr 2011 - 9:54 am | मदनबाण

ह्म्म... बाय डिफॉल्ट ताई... मेथीची पचडी हा नवा प्रकार कळला. कोबीची पचडी मला लयं आवडते.चकली तायच्या ब्लॉगवर त्याची पाकॄ सापडेल.

(बाय डिफॉल्ट खादाड) ;)

नितिन महाजन's picture

3 Jul 2012 - 1:39 pm | नितिन महाजन

मेथीचा खुडा सुध्धा म्हणतात याला.

शिल्पा ब's picture

3 Jul 2012 - 10:31 pm | शिल्पा ब

मस्त. मला मेथीचा कोणताही प्रकार आवडतो. करुन बघते.

सुनील's picture

4 Jul 2012 - 2:01 am | सुनील

पाकृ दिसतेय छान पण मेथीची अशी फक्त पाने खुडून घेणे म्हणजे अगदी कंटाळवाणे काम :(

मी तर, मेथीची भाजीदेखिल देठासकट करतो. शिजल्यावर देठ कळतही नाही.