कारवाई

नमस्कार,

गेल्या काही काळात मिपावर असभ्य वर्तन केल्यामुळे मिपासदस्यं Nile यांचेवर आठ दिवसांची निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

तसेच अन्य काही लोक याच यादीत आहेत त्यांनी आपले वागणे ताबडतोब सुधारावे.ही विनंती.

१) टारझन
२) निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
३) लंबुटांग

या सदस्यांनी आपले वागणे वेळीच सुधारावे असे म्हणतो.

- सरपंच

प्रतिक्रिया

मी आजपर्यंत मिपाचे प्रत्येक धोरण लक्षात ठेवूनच लिखाण करत आलोय.

मी कोणावरही कोणत्याही लेखात अथवा प्रतिक्रीयेत वैयक्तिक टीका केलेली नाही. त्याउपर काही चुकले असल्यास उदाहरण द्यावे म्हणजे पुढे काळजी घेता येईल.

मी आपल्या विनंती नुसार ह्या पुढे माझे मिपावर वर्तन ठेवेन
ह्या पुढे मला कंपूबाजी चा त्रास झालाच तर मी जाहीर रित्या कोणाविषयी वयक्तिक लिखाण करणार नाही .
आपणस संपर्क करेन .
मिपावर नवीन होतो .त्यामुळे अशी चूक झाली.

संपादक मंडळाचा व नीलकांत ह्यांचा कोणताही निर्णय भविष्यात विना तक्रार मी मान्य करेन
कारण ही लोक माझ्यासारखीच मिपाकर असून निस्वार्थ भावनेने मिपावर कार्यरत आहेत . ह्याची मला पूर्ण जाणीव आहे .

आंगाआश्शी...
यांनी पार वावरं उलगावली हायत.
सरपंच यान्ला पहिल्यांदा कोंडवाड्यात घाला. बाया पाहिनात का माण्सं पाहीनात. तिज्यायला.
एक सदस्य म्हणुन माह्यावाला पाठींबा.

ब्रिगेड्च्या मनाचा कानोसा हा लेख काढावा

अशी कारवाइ करावी लागावी ह्याचं वाइट वाटतय.
कारवाइ केलिये हे इथे जाहिर करण्याचं काय प्रयोजन असेल बुवा?

--मनोबा

पुढच्यास ठेच मागचा शहाणा...!!! काय भाऊ तुम्ही पण ना...???

पुन्हा असा नाठाळ्पणा, वाह्यातपणा कोणी करू नये म्हणून जाहीर कारवाई. शाळेत असताना कस, सर्वांसमोर बाई पायाचे अंगठे धरून उभे करायच्या आगाऊ पोरांना तस....

हेच लिहायला आलो होतो ;-)

जाहीर केले ते बरोबरच केले कारण मग उगाच गोंधळ उडत रहातो. कळतच नाही कोण निलंबित झाले आहे आणि अजुन कोण जिवंत आहे. बाकी कारवाई बरोबर की चुकीची यावर काही टिप्पणी करत नाही कारण ते माझे कार्यक्षेत्र नाही.

एक मिपाकर म्हणून माझे मत आहे की कारवाई योग्य आहे व ती जाहीर करणे सुद्धा
ह्यापुढे वयक्तिक टीका /कंपूबाजी ( त्याने होणारे लेखात अवांतर ,व इतर वेळी होणारे अवांतर अश्या अनेक गोष्टीना मिपावर थारा नाही हे ह्या निमित्ताने दिसून आले आहे .)
सध्या वाचक म्हणून असलेले अनेक भविष्यातील मिपाकर ह्यांची नोंद घेतील .व अनेक दर्जेदार साहित्य कृती आपणास वाचायला मिळतील .अशी आशा करूया .

ह्यापुढे वयक्तिक टीका /कंपूबाजी ( त्याने होणारे लेखात अवांतर ,व इतर वेळी होणारे अवांतर अश्या अनेक गोष्टीना मिपावर थारा नाही हे ह्या निमित्ताने दिसून आले आहे .)
सध्या वाचक म्हणून असलेले अनेक भविष्यातील मिपाकर ह्यांची नोंद घेतील

'मान्यवरांच्या विरुद्ध विदुषकी विडंबन करून स्वयं सिद्ध संपादक अगर लेखक होणे आम्हास जमणे नाही'' ( कथा अर्धवट लिहिणारा साहित्यातील अन्नू मलिक मुक्काम पोस्ट)

अहो ब
निनाद ह्यांचा आभासी जगतातील मुक्काम पोस्ट जर्मनी ह्या त्यांच्या व्यक्ती रेखेशी काल राडा झाला .
ह्यात निनाद ह्यांनी आपल्या व्यक्तिरेखेला प्रश्न विचारला '' तुम्हाला प्रसिद्ध लेखक का होता येत नाही ? शेकड्याने प्रतिसाद लक मिळवता येत नाही? का तुझा येथे कंपू बनत नाही ?
का ..............................? .
त्यावर मु पो ज ने बाणेदार पणे उत्तर दिले .( ह्याचे उत्तर मी वरच्या प्रतिसादात दिले आहे )
''संपादक मंडळाचा व नीलकांत ह्यांचा कोणताही निर्णय भविष्यात विना तक्रार मी मान्य करेन.
कारण ही लोक माझ्यासारखीच मिपाकर असून निस्वार्थ भावनेने मिपावर कार्यरत आहेत . ह्याची मला पूर्ण जाणीव आहे .''

अर्थात म्हणून मु पो ज म्हणाले '' मला प्रस्तापितांच्या विरुध्ध विदुषकी चाळे जमणार नाही ''.
ह्यावर निनाद ह्यांनी उसळून मु पो ज ह्यांना विचारले
तुम्ही जुन्या प्रसिद्ध रहस्य कथा ,भयकथा लिहिणाऱ्या लेखकांचे प्रसिध्द प्रवास वर्णन ( जर्मनी ह्या विषयावरील ) शोधून त्यातील निवडक उतारे शब्द बदलून तुमच्या जर्मन आख्यानात लिहितात .
वर कथा अर्धवट टाकतात ( आता पहा आख्यानाचा ९ भाग टाकून महिना होत आला पण १० व्या भाग काही अजून येत नाही ) कहर म्हणजे जाहिरात बाजी करतात .
आता अश्या ह्या निनाद( वास्तविक ) व मु पो ज ह्या त्यांच्या( आभासी) जगतातील व्यक्तिरेखेची शाब्दिक चकमक ह्या दोघांनी मिळून शालजोडीतील निखळ इनोदी लिखाण करत स्वताच्या स्वाक्षरीत मांडली
.स्वताच्या स्वाक्षरीत का ?
( उगाच दुसर्याचा विडंबन किंवा लेखात अवांतर नको म्हणून )
इति निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी

अवांतर --( जे मला अवांतर वाटत नाही )
लंबू टांग ह्यांच्या दुसऱ्या लेखात अनेक मिपाकर व मान्यवर म्हणाले'' आता बस करा'' ह्याच अर्थाने नीलकांत ह्यांनी आमच्यावर उचित कारवाई केली
.
ह्यावर आम्ही दोघेही थांबलो ( त्यांनतर त्या पेकेज च्या लेखात मी सभ्य भाषा वापरली व तुम्ही त्याबद्दल धन्यवाद दिले ).
पण त्याच्या दुसर्या दिवशी परत एक विडंबन लेख आला. (लेख वर काढण्यात आला)
तो कोणाविषयी व कोणत्या भावनेतून व का लिहिला गेला हे देवच जाणे?
त्यांना ''आता बस करा, नव्याने सुरु करू नका , एक नवी सुरवात नव्या दमाने करा आणी करू द्या '' अश्या अर्थी कोणीही विनंती केली नाही .उलट त्यांचे काही जणांनी कौतुक केले .
असो .
.
.
आता राडा हा शब्द ( ह्या शब्दामागे फार मोठी राजकीय चळवळ व तिचा इतिहास आहे व लहानपणापासून ती चळवळ पाहत मोठा झाल्याने हा शब्द लिखाणात सारखा येतो )
पण आदर वाईज आम्ही सध्या सौजन्यात आहोत .

जो हुआ ठिक नही हुआ
किसीको अस बेदखल करायला नको
मुआफ कर दो और जो हुआ उसे भुलकर नया सिरेसे चालू करो

छोड दो यार ! जिंदगी खत्म व्हायला एक पल नाही लागत तिथ तुम्ही आठ दिनांची बात करता ठिक नाही लगता

सहमत आहे. सगळ्यांनाच परत बोलवावे. मिपा हे एक हसते खेळते कुटुंब आहे टारझन सारख्या लोकांना हाकलून हसणे कमी होऊन जाइल.

+१

माझ्यावर केलेली कारवाई पक्षपातीपणाची होती असे मला वाटते असा खुलासा मी करू इच्छितो.

कुठले वर्तन असभ्य होते? याप्रश्नाला मला व्यवस्थापनाकडून कुठलेही उत्तर आजवर आलेले नाही. जाहीर धागा काढून कुणावर असभ्यतेच्या ठपका ठेवला जातो तेव्हा किमान तो दावा सिद्ध तरी करावा अशी अपेक्षा वाजवी पेक्षा जास्त नसावी.

मिपावरील एक विद्वान सदस्य 'निनाद मु.पो....' यांच्या "विद्वत्तापूर्ण" प्रतिसादांना उत्तर देताना मी सभ्यतेचे उल्लंघन केले असे मला मोघम सांगण्यात आले. म्हणुन मी माझे प्रतिसाद जाऊनन तपासले असत त्यात मलातरी कुठला प्रतिसाद असभ्य होता हे कळाले नाही. मिपावरील दुसर्‍या एका विद्वान सदस्याने माझ्या एका प्रतिसादाबाबत नोंदवलेला आक्षेप आढळला. पण त्या प्रतिसादात मी वापरलेले शब्द तर मिपावर रोज वापरले जातात असे त्या शब्दाचा शोध घेता आढळले(दुसर्‍याच दिवशी, क्रिकेट संबंधीच्या एकाच धाग्यावर तोच शब्द इतक्यावेळा वापरला गेला आहे, की मिपावरतरी त्या शब्दाच्या वापराला असभ्य समजत असावेत असे वाटत नाही.) आणि जरी तो प्रतिसाद असभ्य होता असे मानले तरी, आमच्यावर कारवाई होउन अनेक तास लोटल्यानंतरही तो प्रतिसाद तसाच होता. म्हणजे तो प्रतिसाद नसावाच!

बाकी अजुन एका शोधात मी वापरलेल्या शब्दांपेक्षा कित्येक असभ्य प्रतिसाद मिपावर सदस्यांनी, अगदी व्यवस्थापनाच्या काही सदस्यांसमवेत, सापडले. कारवाई तर सोडाच ते संपादितही झालेले नाहीत म्हणजे हे असभ्य शब्दांचे जे काही नियम आहेत ते माझ्याच बाबतीत कठोर करण्यात आले असे म्हणायला मला वाव आहे.

त्याशिवाय, इतर अनेकवेळा, व्यवस्थापन सदस्यांवर कारवाई करायच्या अगोदर 'वॉर्निंग' देते अशी ग्वाही व्यवथापनाने दिलेली मिपावरील इतर कारवायांसंबंधित धाग्यात मी वाचलेली आठवते. अश्या प्रकारची कुठलीही वॉर्निंग मला कारवाई अगोदर देण्यात आलेली नाही. कारवाई करण्यात दाखवलेली तत्परता आणि आठ दिवसांची कारवाईची मुदत संपूनही खाते अनब्लॉक करण्यात दाखवलेली 'तत्परता' माझ्या पक्षपातीपणाच्या दाव्यास सुसंगतच आहे.

माझ्यावर कारवाई करुन इतरांना सुचित करण्याचा प्रकार म्हणजे, मला 'बळीचा बकरा' करण्याचा प्रकार आहे असेच माझे मत यामुळे झाले आहे. त्याशिवाय, मिपावरील व्यवस्थापकांचा माझ्या सभ्यासभ्यतेचे परिक्षण करण्याइतका वावर आहे का नाही हे स्वतःच्या पुष्कळ वावराने मला ठावुक आहेच. काही संपादकांच्या दाखवुन दिलेल्या चुकांमुळेही माझ्यावर कारवाई करण्यास विशेष इंटरेस्ट निर्माण झाला असु शकतो असे मला वाटते. असे नाही असे मात्र व्यवस्थापनातर्फे मला सांगण्यात आले आहे.

असो. माझा हा खुलासा जर संपादीत झाला तर पक्षपातीपणाच्या माझ्या दाव्यांना दुजोराच मिळेल. मात्र, मूर्खांमुळे माझ्यासंबंधित काहीतरी घडावे, मग ती कारवाई का असेना, ही जाणीव आनंददायक नक्कीच नाही. तस्मात, इथुन पुढे मिसळपाववर किती सहभाग ठेवावा याबाबतीत मी साशंक आहे. तरी कमी झालेला सहभाग कुणी असभ्य वर्तनाची कबुली मानू नये म्हणून हा खुलासा.

तळटीपः सदर प्रतिसाद सभ्यतेच्या गाळणीतून गाळून मगच प्रकाशित केला आहे याची कृपया नोंद घेणे अन्यथा असभ्य म्हणून संपादित व्हायचा!

अर्थात, आमच्यावर सदर कारवाई केल्यामुळे आम्ही मिसळपावावरुन ब्यान झालेल्या थोर हुतात्म्यांच्या पंगतीत जाउन बसू शकलो याबद्दल मिसळपाव व्यवस्थापनाचे तहेदिलाने आभार मानतो.

प्र. का. टा. आ.

जेव्हा असे जाहीर धागे काढून आरोप केले जातात तेव्हा स्पष्टीकरण पण जाहीरच असावे अशी माफक अपेक्षा.

वर माझेही नाव आलेले आहे कोठेही कोणावरही वैयक्तिक चिखलफेक केलेली नसताना.

पहिल्याच प्रतिसादात किमान एक उदाहरण दाखवा असे लिहीले होते पण बहुधा सापडले नसावे कारण मी प्रत्येक लेख व प्रतिसाद मिपाची धोरणे लक्षात ठेवून पूर्ण विचारांतीच लिहीलेला असतो.

तसे पहिल्या गेले तर हा धागाच एक वैयक्तिक चिखलफेक आहे उपरोल्लेखित सदस्यांवर.

मला कोणाच्या काडीचेही तथ्य नसलेल्या आरोपांनी फरक पडतो असे नाही. तसेच मला स्वत:ला निर्दोष सिद्ध करायचीही गरज वाटत नाही. पण हे तत्वत: चूक आहे एवढेच नमूद करू इच्छितो.