साहित्य उकडसाठी:
२ वाट्या सुवासिक तांदुळाची पिठी
२ वाट्या पाणी
२ टेस्पून तेल
चिमूटभर मीठ
पा़कृ:
जाड बुडाच्या पातेल्यात २ वाट्या पाणी +२ टेस्पून तेल घालून उकळत ठेवावे.
उकळी आली की त्यात मीठ व २ वाट्या सुवासिक तांदुळाची पिठी घालून चांगले ढवळावे.
गॅस मंद करुन चांगल्या दोन वाफा आणाव्यात.
उकड गरम असतानाच खूप मळून घेणे.
साहित्य सारणः
२ वाट्या खोवलेले ओले खोबरे
दीड वाटी चिरलेला गूळ
२-३ टेस्पून साखर (ऐछिक)
१ टीस्पून वेलचीपूड
१/२ टीस्पून जायफळपूड
पाकृ:
गूळ्,खोबरे व साखर एकत्र करुन शिजवणे.
सारण बोटाला चिकट लागले की गॅसवरून उतरवून त्यात वेलचीपूड-जायफळपूड घालणे.
सारण ओलसरच हवे फार कोरडे नको.
पारंपारीक पद्धतीत उकडेचा गोळा घेऊन त्याची वाटी तयार करतात व मुखर्या पाडतात.त्यात सारण भरून मग मोदकाचे तोंड बंद करतात. मला अजुन ते नीट जमत नाही म्हणून मी मोदकाचा साचा वापरते.
साच्याला तेल लावावे.
उकडीचा छोटा गोळा घेऊन तो नीट साच्यात भरावा व बोटाने सगळीकडे आतून दाबावा.
त्यात सारण भरून साच्यातुन बाहेर आलेल्या पिठाला खालून पसरवून नीट बंद करावे (मोदकाचा बेस बंद करणे).
मोदकपात्रात, चाळणीवर ओला रूमाल ठेवावा व त्यावर पाण्यात बुडवून मग मोदक ठेवावे (असे केल्याने मोदक फुटत नाही).
१५ मिनिटे उकडणे.
साजुक तुपाबरोबर खायला देणे.
प्रतिक्रिया
23 Mar 2011 - 10:29 pm | रेवती
अगदी सुंदर दिसताहेत मोदक!
मुखर्या करता येत नसल्यास साच्यात केलेला मोदक छान दिसतो,
अन्यथा वेडेवाकडे मोदक बघावे लागतात.
अर्थात अश्या चुका मी भरपूर केल्यात.;)
25 Mar 2011 - 10:27 pm | निवेदिता-ताई
मला का दिसत नाहियेत???????????
23 Mar 2011 - 11:23 pm | पिंगू
अहा.. लाळ गळाली.. किती तरी दिवसांनी आवडत्या खाद्याचे दर्शन घेतोय. :)
- (मोदकप्रेमी) पिंगू
24 Mar 2011 - 12:28 am | चिंतामणी
या ऐवजी लोणी घालुन मोदक करावेत.
एकदा करून बघा. पारीत किती फरक पडतो तो.
बाकी छान.
नेहमीच्या मोदकात थोडा बदल हवा असल्यास येथे पहावे.
24 Mar 2011 - 4:04 am | चित्रा
सुबक मोदक. रेखीव फोटो.
24 Mar 2011 - 4:30 am | विंजिनेर
छान.
बाप्पा पण गोंडुले आहेत :)
24 Mar 2011 - 6:50 am | मदनबाण
वा... माझा फार आवडता पदार्थ !!! :)
बाप्पा आणि मोदकुचा फोटु मस्तच आला आहे... :)
24 Mar 2011 - 10:04 am | इरसाल
मेर को क्यु नि दिखरा ?
24 Mar 2011 - 1:12 pm | स्पंदना
शाय्द हिंदी बोल्या करके गणपती बाप्पा चिडेला है!
24 Mar 2011 - 6:48 pm | रेवती
खी खी खी!
ताय बराबर बोलरेली|;)
24 Mar 2011 - 1:14 pm | स्पंदना
मला पण या मोदकाच्या (उकडेच्या ) मुखर्या घालता येत नाहित.
पण जेंव्हा कणिकेच्या करते तेंव्हा फार सुन्दर मुखर्या येतात.
मोदक लाजवाब!!
24 Mar 2011 - 9:22 pm | सानिकास्वप्निल
हो तळायचे मोदक करताना मी पण कणिकेचे करते तेव्हा छान मुखर्या पडतात :)
24 Mar 2011 - 3:29 pm | दीविरा
मोदक किती सुबक आहेत :)
फोटो तर १ नंबर :)
24 Mar 2011 - 9:23 pm | सानिकास्वप्निल
सगळयांना आभार :)
28 Aug 2012 - 5:14 pm | मोदक
धन्यवाद. :-)
28 Aug 2012 - 5:29 pm | सूड
सानिकातैंची रेशिपी आणि साच्यातले मोदक ? ये बात कुछ हज़म नही हुई।
29 Aug 2012 - 1:52 pm | अत्रुप्त आत्मा
@सानिकातैंची रेशिपी आणि साच्यातले मोदक ? ये बात कुछ हज़म नही हुई।>>> यहीच बोल्ता है...अगदी मनापासुन बोल्ता है।
29 Aug 2012 - 2:09 pm | sagarpdy
+1
3 Sep 2012 - 5:37 pm | सानिकास्वप्निल
अजून हाताने पारी करून , मुखर्या बनवायला जमत नाही :(
असो ह्यावेळेस पुन्हा प्रयत्न करणार आहे .....
20 Sep 2012 - 12:46 am | सूड
ओके, मी माझ्या माहितीप्रमाणे पारी आणि मुखर्या बनवायची सोपी पद्धत सांगायचा प्रयत्न करतो.

सर्वप्रथम, उकड काढलेल्या पीठीचा पेढ्याच्या आकारात गोळा बनवून घावा.
त्यानंतर त्या गोळ्याला बाहेरच्या बाजूने चिमटीने हळूहळू दाब देत पसरट करत न्यावे, जेणेकरुन पीठीचा मधला भाग फुगीर राहील.
आता हा पीठाचा फुगीर भाग चिमटीने हळूहळू बाहेरच्या दिशेने पसरत न्यावा, म्हणजे वाटीच्या आकाराची पारी तयार होईल.
आता अंदाजे सारण भरावं. मुखर्या करताना हाताची तर्जनी पारीच्या आतल्या भागात ठेवावी आणि तर्जनी ठेवलेला पारीचा भाग अंगठा व मधल्या बोटाने अलगद चिमटीत पकडून तर्जनी उचलावी.
याच पद्धतीने सर्व मुखर्या कराव्यात.
हळूहळू मोदक वळत बंद करत आणावा.
मोदक काहीसा असा दिसेल.

20 Sep 2012 - 7:31 pm | मोदक
छ्या.... नकटा मोदक बघून जीव कळवळला.. :'(
शेवटचा फटू तरी नीट टाकायचा रे....
20 Sep 2012 - 9:39 pm | सूड
सगळेच मोदक मोठ्या नाकाचे नसतात मित्रा !! काहींची नाकं अंगलटीला शोभेलशीही असतात.
20 Sep 2012 - 11:19 pm | अत्रुप्त आत्मा
छ्या........! नाक कापलन ब्वा मोदकाचं ;-)
22 Sep 2012 - 7:34 am | किसन शिंदे
खाता येईना तोंड वाकडं अशातला प्रकार दिसतो आहे.
29 Aug 2012 - 1:28 pm | कॉमन मॅन
फारच देखणी पाककृती केली आहे आपण.
मनापासून आभार..