उकडीचे मोदक
साहित्य उकडसाठी:
२ वाट्या सुवासिक तांदुळाची पिठी
२ वाट्या पाणी
२ टेस्पून तेल
चिमूटभर मीठ
पा़कृ:
जाड बुडाच्या पातेल्यात २ वाट्या पाणी +२ टेस्पून तेल घालून उकळत ठेवावे.
उकळी आली की त्यात मीठ व २ वाट्या सुवासिक तांदुळाची पिठी घालून चांगले ढवळावे.
गॅस मंद करुन चांगल्या दोन वाफा आणाव्यात.
उकड गरम असतानाच खूप मळून घेणे.
साहित्य सारणः
२ वाट्या खोवलेले ओले खोबरे
दीड वाटी चिरलेला गूळ
२-३ टेस्पून साखर (ऐछिक)
१ टीस्पून वेलचीपूड
१/२ टीस्पून जायफळपूड
पाकृ:
गूळ्,खोबरे व साखर एकत्र करुन शिजवणे.
सारण बोटाला चिकट लागले की गॅसवरून उतरवून त्यात वेलचीपूड-जायफळपूड घालणे.
सारण ओलसरच हवे फार कोरडे नको.
पारंपारीक पद्धतीत उकडेचा गोळा घेऊन त्याची वाटी तयार करतात व मुखर्या पाडतात.त्यात सारण भरून मग मोदकाचे तोंड बंद करतात. मला अजुन ते नीट जमत नाही म्हणून मी मोदकाचा साचा वापरते.
साच्याला तेल लावावे.
उकडीचा छोटा गोळा घेऊन तो नीट साच्यात भरावा व बोटाने सगळीकडे आतून दाबावा.
त्यात सारण भरून साच्यातुन बाहेर आलेल्या पिठाला खालून पसरवून नीट बंद करावे (मोदकाचा बेस बंद करणे).
मोदकपात्रात, चाळणीवर ओला रूमाल ठेवावा व त्यावर पाण्यात बुडवून मग मोदक ठेवावे (असे केल्याने मोदक फुटत नाही).
१५ मिनिटे उकडणे.
साजुक तुपाबरोबर खायला देणे.

वाचन
13783
प्रतिक्रिया
0