सल्ला हवा आहे

परिकथेतील राजकुमार's picture
परिकथेतील राजकुमार in काथ्याकूट
18 Mar 2011 - 4:34 pm
गाभा: 

नमस्कार मिपाकरांनो,

तसे जगातले सर्व ज्ञान असणारे काही थोडी लोकं मिपावर आहेत त्यात आमचा, नानाचा वगैरे नंबर लागतोच. मात्र काही काही गोष्टी ह्या चार जणांच्या सल्ल्यानीच कराव्यात असे जुने-जाणते, अनुभवी वडिलधारी सांगुन गेले आहेत. तेंव्हा एका महत्वाच्या गोष्टीत तुमचा सल्ला हवा आहे.

मी व आमचा परम मैतर नाना बरेचशे धंदे भागिदारीत करत असतो. त्यातले काही ऑनलाईन असतात तर काही ऑफलाईन. मात्र सर्व सहसा संगणकाशी संबंधीतच असतात. चार पैसे सुटले, रात्री दोन पेग सुटले की झाले असे आपले आमचे सोपे गणित असते. त्यामुळे खुप रक्कम गुंतवणे, कामाचा फार बोजा घेणे, व्यवसायाची जाहिरात करणे आम्ही कायमच टाळले.

मात्र आता आमचे अजुन एक परम मैतर श्री. कुंदन हे स्वतःच्या दुबैतील कामाला वैतागल्याने नव्या व्यवसायात शिरण्याचे मनसुबे करत आहेत. त्यांचा (अजुनतरी) आमच्यावर विश्वास असल्याने त्यांनी पहिली ऑफर आम्हालाच दिली आहे. त्यांना आमच्या व्यवसायात भागीदार म्हणुन उडी मारायची आहे. इथे हे प्रकर्षाने नमुद करावेसे वाटते की ह्या सर्व व्यवहाराचा वा मिसळपावचा अथवा आमच्या मिसळपाववरील वावराचा संबंध नाही. आमच्या वैयक्तीक संपर्कातुन हे पुढे आले आहे.

आता तज्ञ, सुज्ञ व प्रगल्भ मिपकारांचा काही महत्वाच्या गोष्टीत सल्ला हवा आहे :-

१) कुंदन ह्यांनी त्यांच्या नावानी सरळ पैसे गुंतवावेत का आम्ही ते पैसे आमच्या नावे गुंतवावेत ? म्हणजे अनिवासी व्यक्तीची गुंतवणुक फायदेशीर असेल, का मी व नानाच्या नावे केलेली ?

२) सर्व व्यवसाय कुंदनच्या नावावर दाखवल्यास भारतात काही जास्तीच्या सोयी उपलब्ध होऊ शकतील काय ?

३) कुंदन ह्यांना स्लिपिंग पार्टनर दाखवल्यास त्याचे काही फायदे अथवा तोटे ?

४) व्यवसाय हा संगणक क्षेत्राशी संबधीत असल्याने IT गुंतवणुकीचे काही फायदे होऊ शकतील काय ?

५) ह्या गुंतवणुकी संदर्भात कायदेशीररीत्या काय काय कागदपत्रांची पुर्तता करावी लागेल?

६) रक्कमेच्य सुरक्षेच्या दृष्टीने ह्या गुंतवणुकी संदर्भात कुंदन ह्यांनी काय सावधगिरी बाळगावी. तसेच मी व नानाने देखील काय सावधगिरी बाळगावी.

७) ह्या व्यवसायासाठी शॉप अ‍ॅक्ट काढताना काही अडचणी येऊ शकतील काय ?

८) काही काळाने सर्वसंमतीने व्यवसायासाठी कर्ज काढल्यास कुंदन ह्यांची जबाबदारी काय राहिल ? भारतीय कायदा ह्याबद्दल काय सांगतो ?

अजुनही काही प्रश्न आहेत, ते नाना व कुंदन विचारतीलच.

धन्यवाद.

प्रतिक्रिया

भवानी तीर्थंकर's picture

18 Mar 2011 - 4:59 pm | भवानी तीर्थंकर

इथे मी नवी आहे. सूज्ञ, प्रगल्भ वगैरे नक्कीच नाही. त्यामुळं व्यावहारीक जगातलं जेवढं कळतं, तेवढंच लिहिते.
सर्वप्रथम नव्या व्यवसायाला शुभेच्छा.

१) कुंदन ह्यांनी त्यांच्या नावानी सरळ पैसे गुंतवावेत का आम्ही ते पैसे आमच्या नावे गुंतवावेत ? म्हणजे अनिवासी व्यक्तीची गुंतवणुक फायदेशीर असेल, का मी व नानाच्या नावे केलेली ? अर्थात, त्यांच्याच नावाने. अनिवासी व्यक्तीची गुंतवणूक केव्हाही फायद्याचीच. आणि त्यातही तुम्ही आयटीशी संबंधित काही करत असल्याने नक्कीच. दुसऱ्याच्या नावे केलेल्या गोष्टींनी काय होतं याचा अनुभव मला आहे. म्हणून हे अधिकारानं सांगतेय...

२) सर्व व्यवसाय कुंदनच्या नावावर दाखवल्यास भारतात काही जास्तीच्या सोयी उपलब्ध होऊ शकतील काय ? कुंदन यांच्या वैयक्तिक गुणवत्ता आणि पात्रतेवर ते अवलंबून आहे. ते माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित असतील तर नक्कीच काही फायदे होतील. फायदा होतो म्हणजे सोय होतेच.

३) कुंदन ह्यांना स्लिपिंग पार्टनर दाखवल्यास त्याचे काही फायदे अथवा तोटे ? इश्श, त्यात कसले आले आहेत स्वतंत्र फायदे आणि तोटे? दुसऱ्या पर्यायानुसार गेलात तर स्लिपिंग पार्टनर वगैरे दाखवण्याची गरज नाही. एरवी स्लिपिंग पार्टनर हा जाहीर थोडाच असतो? त्यामुळे त्याचे काय फायदे असणार?

४) व्यवसाय हा संगणक क्षेत्राशी संबधीत असल्याने IT गुंतवणुकीचे काही फायदे होऊ शकतील काय ? वर म्हटलं आहे तसं. आयटी कंपनी म्हणून एसटीपीआयमध्ये नोंदणी वगैरे करावी लागते म्हणतात. त्याची मात्र चौकशी करून घ्या.

५) ह्या गुंतवणुकी संदर्भात कायदेशीररीत्या काय काय कागदपत्रांची पुर्तता करावी लागेल? गुंतवणुकीसाठी कायदेशीर पूर्तता बरीच असते. त्यासाठी आधी तुमच्या व्यवसायाचे संघटनात्मक स्वरूप निर्धारित करा. प्रा. लि. कंपनी, की फर्म, भागिदारी की एकल मालकी वगैरे गोष्टी आहेत.

६) रक्कमेच्य सुरक्षेच्या दृष्टीने ह्या गुंतवणुकी संदर्भात कुंदन ह्यांनी काय सावधगिरी बाळगावी. तसेच मी व नानाने देखील काय सावधगिरी बाळगावी. गुंतवणूक सल्लागारच इथं अधिकाराने काही सांगू शकेल.

७) ह्या व्यवसायासाठी शॉप अ‍ॅक्ट काढताना काही अडचणी येऊ शकतील काय ? नाही. थोडा वरकड खर्च लागतोच इतकंच.

८) काही काळाने सर्वसंमतीने व्यवसायासाठी कर्ज काढल्यास कुंदन ह्यांची जबाबदारी काय राहिल ? भारतीय कायदा ह्याबद्दल काय सांगतो ? पाचव्या प्रश्नाच्या उत्तरात मी मांडलेल्या मुद्यावर पुढील बाबी अवलंबून राहतील.

भडकमकर मास्तर's picture

18 Mar 2011 - 5:17 pm | भडकमकर मास्तर

जलीय वेव्हाराबद्द्ल कल्जि ग्या
विषय संपला

आज दंगा करायचा मूड दिसतोय पराचा!

परिकथेतील राजकुमार's picture

18 Mar 2011 - 5:51 pm | परिकथेतील राजकुमार

नै नै :(

खरच जाणकार लोकांची मदत हवी आहे.

सुहास..'s picture

18 Mar 2011 - 6:31 pm | सुहास..

कुंदन शेठ ,

पार्लर ची वाट तुमच्या मुळे लागली आता तुम्ही सौंदर्य-फुफाट्याची वाट लावु नका ;) असो जोक्स अपार्ट !!

नाना चे प्रश्न समोर येवु द्यात , मगच आम्ही उत्तर दक्षिण काय असेल ते देवु .

>>>>नाना चे प्रश्न समोर येवु द्यात , मगच आम्ही उत्तर दक्षिण काय असेल ते देवु .

अबे हे वरचे प्रश्न आम्हा दोघांना पडलेले आहेत.

बाकी नानाचे प्रश्न म्हणून वेगळा काही अर्थ अभिप्रेत असेल तर तसा खुलासा करावा.

रमताराम's picture

18 Mar 2011 - 6:41 pm | रमताराम

पैसे इकडे द्या नि विसरून जा... प्रश्न म्हणतोय मी. सारे काही आम्ही निस्तरू... अगदी दिवाळे जाहीर करेपर्यंत सगळे.

पैसे इकडे द्या नि विसरून जा >>>

अगदी हेच म्हणणार होतो , पण त्या कंजुष कुंद्या कडनं कधी एखाद नाण तरी सुटायच का ? ;)

@नाना , अबे हे वरचे प्रश्न आम्हा दोघांना पडलेले आहेत.

अच्छा , गब्बर मोड >>> माहीत असेल च ;)

परिकथेतील राजकुमार's picture

18 Mar 2011 - 6:46 pm | परिकथेतील राजकुमार

मौजमजेबरोबर खरच थोडी माहिती मिळाली तर आनंदच वाटेल.

अवलिया's picture

18 Mar 2011 - 6:48 pm | अवलिया

असेच म्हणतो.

गणपा's picture

18 Mar 2011 - 7:16 pm | गणपा

तुमचं झाल का कळवाल आम्हालाही. ?

जाणरावांच्या प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत. सुधीरचंद्र काळेसाहेब आणि इंद्राज ह्यांची अभ्यासु प्रतिक्रिया वाचण्यास उत्सुक

धमाल मुलगा's picture

18 Mar 2011 - 8:02 pm | धमाल मुलगा

उअगाच इकडं तिकडं चौकशा करत बसू नका. अर्धवट महितीच्या आधारे लोक काय वाट्टेल ते बडबडतात. इतर गोष्टीत ठीक आहे, इथं दमड्या गुंतवण्याची बाब आहे.

ऑनसाईट-ऑफशोअर मॉडेलसाठी मदान किंवा हिली कन्सलटन्ट्स सारख्या सल्लागारांची मदत घ्या.

देशांतर्गत बाबींसाठी ब्रुक कन्सल्टिंग सारख्या कंपन्या मदत करु शकतील.

कंपनी सेक्रेटरीयल बाबींसंदर्भात पुणेस्थित सी.एस.केळकर & असो. सारखे सल्लागार कामी येऊ शकतील.

ह्यासारख्या सेवा देणार्‍या सल्लागारांसाठी अर्थातच पैसे मोजावे लागतील. पण 'देअर इज नो फ्री मिल' हे ध्यानी घेतलं तर सल्ल्यासाठी देऊ केलेले पैसे ही एक योग्य गुंतवणुक समजली जावी.

(हा धागा केवळ दंगा-मजेमजेसाठी असल्यास माझा प्रतिसाद रद्दबादल समजावा. :) )

- (वायनरीसाठी व्हेंचर क्यापिटलिष्टच्या शोधात) ध. ;)

आनंदयात्री's picture

18 Mar 2011 - 8:09 pm | आनंदयात्री

धम्याशी सहमत आहे.

>>वायनरीसाठी व्हेंचर क्यापिटलिष्टच्या शोधात

हिरव्या नोटांशी काही वैर नसेल तर शे दोनशे डॉलर टाकु शकेन म्हणतो ;)

धमाल मुलगा's picture

18 Mar 2011 - 8:27 pm | धमाल मुलगा

हिरव्या, निळ्या, पिवळ्या, जांभळ्या, मळक्या कोणत्याही नोटेशी बिलकुल वैर नाही. शेवटी काय आहे ना, "माना की पैसा खुदा नहीं, मगर खुदा से कम भी नहीं" अशा तत्वाचा अंगीकार केलेला बरा असं आम्हाला वाटतं. :)

शे-दोनशे डालरात काही होत नाही. वट्ट सा कोटी रुप्पयं पायजेत.

आनंदयात्री's picture

18 Mar 2011 - 8:32 pm | आनंदयात्री

>>शे-दोनशे डालरात काही होत नाही. वट्ट सा कोटी रुप्पयं पायजेत.

आयो !!! मला आपलं माझ्या अल्प बुद्धीप्रमाण वाटलं काहीतरी भट्टी बिट्टी लावायची असेल ...सव्वा कोटी .. चुकलं बा. आयटी डिपार्टमेंटमधे नोकरी दे बाबा तेवढी आणि प्यायला पाण्याच्या ऐवजी ते तुमचे द्राक्षासव !

बाय द वे, डान्या काय करु शकेल रे आपल्या कंपनीत ? तो कार बनवतो ना ? ट्रान्सपोर्टेशन देउन टाक त्याला ;)

हॅ हॅ हॅ
-
(हावरट) आंद्या

धमाल मुलगा's picture

18 Mar 2011 - 8:36 pm | धमाल मुलगा

प्रोजेक्ट रिपोर्टनुसार सुरुवातीला (अक्षरी:) सहा कोटी (अंकी: ६,००,००,०००) फायजेत. पुढचं रोलिंगमध्ये करता येईल. :)

आनंदयात्री's picture

18 Mar 2011 - 8:39 pm | आनंदयात्री

अवांतर: द्राक्ष चांगली झालीयेत की नाही ते पहायला 'दुर्बिण' लागती काय बे !!
=)) ;)

द्राक्षं जर डेक्कनावर असतील अन तुम्ही जर कोथरुडात असाल तर दुर्बिण लागेल. ;-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Mar 2011 - 6:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

अवांतर: द्राक्ष चांगली झालीयेत की नाही ते पहायला 'दुर्बिण' लागती काय बे !!

दुर्बिणीला द्राक्षातलंही काही कळतं हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न!

असो द्मु, 'देअर इज नो फी मील' असं म्हणावं रे! नायतर मी आपली उगाच वायनरीसाठी गिरणी का हवी याच्या विचारात पडले.

'देअर इज नो फी मील'

चुकुन देअर इज नो फीमेल असं वाचलं अन विचाराबरोबरच काळजीत पडलो.

नि३'s picture

19 Mar 2011 - 12:22 pm | नि३

हा ..हा...;-)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Mar 2011 - 11:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

द्राक्ष वगैरेंच्या उल्लेखाने 'र' अडकला बहुदा घशातच! ;-)

अप्पा जोगळेकर's picture

19 Mar 2011 - 2:54 pm | अप्पा जोगळेकर

अहो एक्दम एवढी हनुमान उडी कशाला. आधी एखाद वाईन शॉप टाका की याच लायसन्स आणि लायसन्स मंजूर करणार्‍यांना खाउ-पिउ घालण्याचे मिळून ६-७ लाखच होतात अस ऐकून आहे. दायरेक्ट ६ कोटी म्हणजे ..... जावदे. जीव घाबरा झालाय.

विकास's picture

19 Mar 2011 - 12:49 am | विकास

उअगाच इकडं तिकडं चौकशा करत बसू नका. अर्धवट महितीच्या आधारे लोक काय वाट्टेल ते बडबडतात. इतर गोष्टीत ठीक आहे, इथं दमड्या गुंतवण्याची बाब आहे.

सहमत! तसेच कायद्याच्या कक्षेत योग्य उत्तरांवरच चर्चा होउंदेत (नाहीतर पोलीसाला सांगेन. ;) ).

एव्हढ्यात बायनरी वेंचर नको.

जयंत कुलकर्णी's picture

18 Mar 2011 - 8:25 pm | जयंत कुलकर्णी

श्री धमू यांचा सल्ला अत्यंत योग्य असल्यामुळे माझा प्रतिसाद संपादित केला आहे. मुळात एवढ्या कमी माहीतीवर आधारीत सल्ले देणे चुकीचे आहे. ( जरी माझा सल्ला बरोबर असला तरी तो परिपूर्ण निश्चितच नसणार).

धमू यांनी डोळे उघडल्याबद्द्ल त्यांचे आभार.

अधिक माहीती व सल्यासाठी संध्याकाळी भेटणे आवश्यक आहे..... :-)

.

धमाल मुलगा's picture

18 Mar 2011 - 8:33 pm | धमाल मुलगा

अहो, काय हे कुलकर्णीसाहेब,
तुमचा मुद्दाही बरोबर होताच की. परिपुर्ण की नाही ते अलाहिदा.पण बरोबर होता हे महत्वाचंच. मिट्ट काळोखात चाचपडताना अंधुक प्रकाशही महत्वाचा ठरतो ना. :)

>>धमू यांनी डोळे उघडल्याबद्द्ल त्यांचे आभार.
मालक, लाजवू नका राव आम्हाला. :)

>>अधिक माहीती व सल्यासाठी संध्याकाळी भेटणे आवश्यक आहे....
हे सगळ्यात बेष्ट. आवडलं आपल्याला. :)

कवितानागेश's picture

19 Mar 2011 - 12:22 am | कवितानागेश

सल्ला हवा आहे >>
फी हवी आहे!

आमच्याकडे फुकट सल्ला विकत नाहीत,
शेजारच्यांची कडी वाजवावी.

;)

विनायक प्रभू's picture

19 Mar 2011 - 9:06 am | विनायक प्रभू

प्रायवेट लिमिटेड कंपनी करा.(पाच सोडता सर्व प्रश्नांची उत्तरे)
पाचवा प्रश्न फारसा- काहीही त्रास नसतो.

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Mar 2011 - 9:18 am | श्री गावसेना प्रमुख

आमच्या सोबत या खासदार करतो,ते पण पंकज भुजबळांविरुध्द(गुंतवणुक सेफ राहील अन कलाकलाने वाढेल)

नगरीनिरंजन's picture

19 Mar 2011 - 10:37 am | नगरीनिरंजन

धंदा आणि कायदा या दोन्ही गोष्टींपासून चार हात दूर असल्याने आपला पास.

अप्पा जोगळेकर's picture

19 Mar 2011 - 2:56 pm | अप्पा जोगळेकर

रक्कमेच्य सुरक्षेच्या दृष्टीने ह्या गुंतवणुकी संदर्भात कुंदन ह्यांनी काय सावधगिरी बाळगावी. तसेच मी व नानाने देखील काय सावधगिरी बाळगावी.
जालीय व्यवहाराचे जळजळीत उदाहरण डोळ्यांसमोर आहेच.

'स्लीपींग पार्टनर' याचा अर्थ काय ?

तेच ना सुज्ञांस बहुत सांगणे न लगे !!

- (पिसाळलेला द्रव्यप्रेमी)

सुधीर१३७'s picture

21 Mar 2011 - 12:57 pm | सुधीर१३७

>>>>> 'स्लीपींग पार्टनर' याचा अर्थ काय ?

काय अप्पा,

कसले अश्लील प्रश्न विचारताय ?????? ..................... :wink:

......... ..... झोपणारा, झोपलेला, झोपविलेला किंवा ज्याला झोपविता येते असा भागीदार ........ :wink:

......... ....... तर कधी कधी झोपेचे सोंग घेऊन मलई खाणारा भागीदार ......... :wink:

अमेरिकन त्रिशंकू's picture

21 Mar 2011 - 5:24 pm | अमेरिकन त्रिशंकू

मित्रांबरोबर पुढे मैत्री ठेवायचा विचार असेल तर त्यांच्याबरोबर धंदा/भागीदारी करण्याच्या भानगडीत पडू नका.
सुरुवातीला सगळं गोडीगुलाबीत असतं पण नंतर काही सांगता येत नाही.

इंटरनेटस्नेही's picture

21 Mar 2011 - 11:38 pm | इंटरनेटस्नेही

मित्रांबरोबर पुढे मैत्री ठेवायचा विचार असेल तर त्यांच्याबरोबर धंदा/भागीदारी करण्याच्या भानगडीत पडू नका.
सुरुवातीला सगळं गोडीगुलाबीत असतं पण नंतर काही सांगता येत नाही.

मला पण असंच वाटतं.. षक्यतो ही रिस्क न घेतलेली बरी. पार्टनर्सषी मैत्री करा हवं तर, पण मित्रांशी पार्टनरषिप नको.

अविनाशकुलकर्णी's picture

21 Mar 2011 - 9:26 pm | अविनाशकुलकर्णी

परा यांना शुभेच्या..
दुधो नहो फुलो फळो

मराठमोळा's picture

21 Mar 2011 - 9:58 pm | मराठमोळा

>>आता तज्ञ, सुज्ञ व प्रगल्भ मिपकारांचा काही महत्वाच्या गोष्टीत सल्ला हवा आहे

म्हणजे आमचा विषयच संपला की वो पँटवालं. ;)
बाकी इथे इतके तज्ञ, सुज्ञ व प्रगल्भ मिपाकर आहेत हे कळाल्याने आम्हालाही पुढे याचा लाभ होईल अशी अपेक्षा बाळगतो.

हे बारे होयिल
पण हे हि लक्ष्यात ठेवा स॑ध्याकळि दोन पेग चा एक जोडिदार मिळाल्याचा आन॑द

विनित‍