साहित्य:- तांदूळ पिठी एक वाटी, हि.मिरच्या दोन-तीन,
मिठ-साखर चवीनुसार,कढीपत्ता पाने सात-आठ,कोथींबीर,आंबट ताक अर्धी वाटी,
पाणी दीड वाटी, फ़ोडणीचे साहित्य- मोहरी जिरे- हिंग , तेल एक डाव.
कॄती :- तांदूळ पिठी ताक व पाणी घालून कालवुन घ्यावी, त्यातच मिठ-साखर चवीनुसार घालावे,
तेलाची खमंग फ़ोडणी करुन त्यात कढीपत्ता पाने,मिरच्या तुकडे टाकावेत व त्यात कालवलेली तांदूळ पिठी घालावी व
चांगले ढ्वळावे, गुठळी होउ देवु नये, चांगल्या दोन - तिन वाफ़ा आणाव्यात,
ही उकडपिंडी तय्यार.
गरम गरम खाण्यास द्यावी.
हा झटपट होणारा पदार्थ आहे. व पौष्टीकही आहे.
प्रतिक्रिया
13 Mar 2011 - 1:07 pm | पर्नल नेने मराठे
माझ्यामते हि उकड आहे.
उकडपेन्ढी हा खान्देशी पदार्थ असावा.
13 Mar 2011 - 2:09 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आमच्या घरी या प्रकाराला उकडच म्हणतात. उकडपिंडी प्रकार खानदेशी आहे का नाही माहित नाही पण आमच्या विदर्भातल्या नातेवाईकांच्या हातचा खाल्ला आहे.
13 Mar 2011 - 5:40 pm | सुबक ठेंगणी
आम्हीही याला उकडच म्हणतो.
आणि वरून साध्या फोडणी ऐवजी लसणीची चरचरीत फोडणी घालतो.
14 Mar 2011 - 2:27 am | वेदनयन
खानदेशी उकडपेन्ढीत तांदूळ पिठी आणी ताक वापरत नाही. गव्हाचे पिठ वापरतात.
बाकी पाकृ छानच - फोटो हवा होता.
13 Mar 2011 - 3:48 pm | अरुण वडुलेकर
सोलापूरकडे याला उकड पिंडी (किंवा खरं तर उकड पेंडी )असेच म्हणतात.
माझा अगदी आवडीचा पदार्थ. हल्ली फारसा प्रचलित नाही. माझी आजी खूप छान करायची.
पण पाकृ वाचून पुन्हा बालपणात गेलो. पुन्हा एकदा आजोळी गेल्या सारखे वाटले.
आजीची आठवण करून दिलीत. धन्यवाद.
13 Mar 2011 - 11:13 pm | शिल्पा ब
हा पदार्थ गव्हाच्या पिठाचा खाल्लेला आहे. मी बनवायचा प्रयत्न केला तर ओलसर आणि अर्धा तास शिजवला तरी कच्चाच राहील्यासारखा वाटला. :(
तुमची तांदळाच्या पिठाची पाकृ करुन बघते.
13 Mar 2011 - 11:29 pm | पैसा
कोकणात या पदार्थाला उकड म्हणतात. आणि करताना लसणीची फोडणी देतात. तसंच खाताना वर शेंगदाण्याचं कच्चं तेल घालून खातात. आठवणीनेच तोंडाला पाणी सुटलंय..
13 Mar 2011 - 11:38 pm | माझीही शॅम्पेन
एकदम शोलिड पदार्थ आहे हा !;):) पा.क्रु बद्दल धन्यवाद !
14 Mar 2011 - 1:11 am | चित्रा
उकड मी तरी तांदळाच्याच पिठाची केलेली पाहिली आहे. उकडीसाठी फोडणीत हळद आणि आलेही घालतात.
उकड शिजल्यानंतर चांगली चमकदार, मऊ, पूर्ण शिजलेली अशी झाली पाहिजे.
14 Mar 2011 - 3:31 am | निनाद
उकड पेंडी असेच ऐकले आहे. उत्तम खाद्य! लहानपणी खूप खाल्ला आहे. आता परत करून पाहतो.
14 Mar 2011 - 5:27 am | कौशी
मस्त रेसीपी .. करून बघणार.
" शिल्पा ब " उकड पेंडी करताना गव्हाचे पिठ खुप भाजावे लागते. पण मन्द आचेवर भाजावे जो पर्यत खमन्ग सुगन्ध सुटत नाही तोपर्यत भाजावे. मग कच्चा राहणार नाही. परत एकदा करून बघा. विदर्भातला स्पेशल पदार्थ आहे हा.
14 Mar 2011 - 6:02 am | शिल्पा ब
ओक्के...करुन बघते उद्याच. टीपेबद्द्ल धन्यवाद.
14 Mar 2011 - 8:30 am | स्पंदना
ताई.....वाफा कश्या मोजायच्या?
मनापासुन विचारते आहे. तुम्ही वर म्हणालात ना? चांगल्या दोन तीन वाफा आणा म्हणुन ?
14 Mar 2011 - 6:32 pm | रेवती
तांदळाची असते त्याला आमच्याकडे उकड म्हणतात. खवलेला नारळ, ताक, आलं, लसूण , मिरचीचा ठेचा पीठ कालवतानाच घालायचा. मग फोडणी. उकडपेंडी ही गव्हाची करतात. एकदा कोणाकडे तरी खाल्ली होती ती भन्नाट चवीची झाली होती. नंतर काही खाल्ली नाही. मला जमेल असे वाटत नाही पण करून बघते.:)
14 Mar 2011 - 7:01 pm | सानिकास्वप्निल
हो आम्हीसुद्धा ह्याल उकडच म्हण्तो
एकदा गव्हाची उकडपेंडी करून बघीतली पाहिजे :)
16 Mar 2011 - 8:52 am | अन्या दातार
परवाच घरी जाऊन आलो तेंव्हा आईला सांगायला हवे होते उकड करायला! :(