शेतकर्‍याची कर्जमाफि !

नुकतेच केन्द्र सरकारने शेतकर्‍याना कर्जमाफि दिली परन्तु हि कर्जमाफि विदर्भच्या शेतकर्‍यासाठी
कितपत फायदेशिर ठरलि या विशयावर चर्चा व्हावी !

आपली मते मांडा !

शेतकर्‍याची कर्जमाफि !

त्या मधे फक्त प्.महा. तील शेतकर्‍याचा च फायदा जास्त आहे.
विदर्भाच्या शेतकर्‍याच काय ?

निकष आणि वास्तव

कर्जमाफीचा निकष ठरवतांना आमच्या मा. कृषीमंत्र्यांनी आपल्या आवडत्या राजकिय आखाड्यात म्हणजे प. महाराष्ट्रातील सर्वसाधारण धारणाक्षेत्र समोर ठेवलेले लक्षात येते. कारण फक्त दोन हेक्टर जमीन असलेल्या शेतकर्‍यांनाच ही कर्जमाफी आहे. ऊस आणि इतर बागायती पिकांसाठी दोन हेक्टर हे क्षेत्र जास्त किंवा पुरेसं असेल कदाचीत मात्र विदर्भासारख्या भागात कोरडवाहू शेतीत दोन हेक्टर कापसाची शेती कुठल्याच प्रकारे फायद्याची होऊ शकत नाही.

विदर्भात धारणा क्षेत्र चार हेक्टर व त्या पेक्षा जास्त असेच आहे. शेती चार हेक्टर पेक्षा जास्त आहे म्हणून तो शेतकरी लागलीच श्रीमंत होत नाही. तर कोरडवाहू आणि बागायती असा मोठा फरक बा़की असतो. मात्र आमच्या सरकारला सब घोडे बारा टक्के आहेत असं वाटतं. म्हणूनच सर्वात जास्त कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या विदर्भात झालेल्या आहेत आणि कर्जमाफीचा सर्वात जास्त फायदा प. महाराष्ट्राला !

विदर्भातील एकून लाभार्थीं पैकी केवळ १६.०८% लोकांना या कर्जमाफीचा फायदा झालेला आहे. ( संदर्भ - सकाळ सर्वेक्षण )
त्यामुळे ह्या अश्या निकषांचा आणि वास्तवाचा कसा ताळमेळ बसवावा याचाच विचार आता चाललेला आहे.

विदर्भासाठी आलेल्या पॅकेजचे सुध्दा असेच हाल आहेत. निधी पडून आहे किंवा कागदोपत्री वापरला जातो आहे. अपवादानेच शेता पर्यंत पोहोचतो आहे.

माझ्या मते कर्जमाफी हा उपाय होऊच शकत नाही. शासनाने ही परिस्थिती का आली याचा विचार करायला हवा आणि अश्या परिस्थितीशी शेतकर्‍याला लढता आलं पाहिजे अशी काहीतरी व्यवस्था तयार करायला हवी. येत्या दहा वर्षासाठीचा आराखडा तयार करून मग त्यासाठी वार्षीक नीधीची तरतूद असायला हवी.

नीलकांत