चिकन विंग्स्

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
10 Mar 2011 - 3:20 am

साहित्यः
६ चिकन विंग्स्
२ टेस्पून आले-लसूण वाटून
१/२ टीस्पून लिंबाचा रस
१/२ टीस्पून खाण्याचा लाल रंग ( ऐछिक)
१ कप टोमॅटो सॉस
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१/२ टीस्पून कुटलेली काळीमिरी
१ कप मैदा / कॉर्न्फ्लवर
मीठ चवीनुसार
तेल

पाकृ:
चिकन विंग्स् ला वाटलेले आले-लसूण, लिंबाचा रस, हळद आणी काळीमिरी चोळून ठेवावी.
लाल तिखट, खाण्याचा लाल रंग आणी मीठ लावून एकत्र करणे.
मैदा आणी टोमॅटो सॉस एकत्र करून ही पेस्ट चिकन विंग्स् ला लावून , झाकून ४-५ तास मुरू द्यावं.
पॅनमध्ये तेल तापवून मंद गॅसवर हे चिकन विंग्स् चांगले तळून घ्यावेत.
हवे असल्यास जास्त तेलात ही तळू शकतात (डीप फ्राय).
सॅलॅड्सोबत खायला द्या.

.

प्रतिक्रिया

शेखर's picture

10 Mar 2011 - 3:32 am | शेखर

तोंडाला पाणी सुटले.... स्मोक्ड चिकन विंग्जची पण पाकृ द्यावी अशी विनंती

शेखर

मस्त... तोंडाला पाणी सुटले. :)

मी शाकाहारी असले तरी पाकृ फोटू आवडले.
गणपाची आठवण झाली.
सानिका आणि मृणालिनीबाईं आणि निवेदिता ही नवी टीम जोरात आहे.
अमिताबाई या सगळ्या गोष्टींना आवर घालतील अशी आशा.....नाहीतर आमचे डाएट गडबडणार आहे.;)

कच्ची कैरी's picture

12 Mar 2011 - 10:29 am | कच्ची कैरी

हं मस्त दिसताय चिकन विन्ग्ज !

देव तुमचं कल्याण करो ... खरंच हळवा झालो फोटो पाहुन .. त्वांड लाळावलं बगा !!

अविनाशकुलकर्णी's picture

16 Mar 2011 - 9:01 pm | अविनाशकुलकर्णी

एक शंका...
न शिजवता तळले तर व्यवस्थित आतुन शिजले जाते का?
कच्चे रहाण्याची भिति असते का??

अविनाशकुलकर्णी's picture

16 Mar 2011 - 9:01 pm | अविनाशकुलकर्णी

एक शंका...
न शिजवता तळले तर व्यवस्थित आतुन शिजले जाते का?
कच्चे रहाण्याची भिति असते का??

गणेशा's picture

18 Mar 2011 - 11:36 am | गणेशा

बेस्ट