दम आलू

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
9 Mar 2011 - 5:51 am

साहित्यः
८-१० बेताचे उकडलेले छोटे बटाटे (सालं काढून घेणे)
२-३ मध्यम कांदे बारीक चिरून किंवा किसून
२ मोठे टोमॅटो बारीक चिरून
पाऊण वाटी दही
३ टीस्पून आले-लसूण वाटून
२ तमालपत्र
१-२ दालचिनीच्या काड्या
पाव चमचा जिरे
१ चमचा लाल तिखट ( आवडीनूसार कमी-जास्त करणे)
१ चमचा कश्मिरी मिरची पावडर
१ चमचा गरम मसाला
१ टेस्पून खसखस भिजवून वाटलेली
१ टीस्पून कसूरीमेथी
मीठ चवीनूसार
तेल
चिरलेली कोथिंबीर

पाकृ:
उकडलेल्या बटाट्यांना काट्याने टोचे मारुन घेणे.
सर्व बटाटे तेलात खमंग तळावेत व बाजूला टीश्यूवर ठेवावेत.
दुसर्या भांड्यात तेल तापवून तमालपत्र, दालचिनीच्या काड्या आणी जिरे घालावे.
त्यावर चिरलेले किंवा किसलेले कांदे घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतावे.
वाटलेले आले-लसूण, लाल तिखट, कश्मिरी मिरची पावडर आणी गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
तेल सुटायला लागले की त्यात दही घालून चांगले घोटावे,वाटलेली खसखस घालून चांगले परतावे.
चिरलेले टोमॅटो आणी बटाटे घालावे.
चवीनूसार मीठ घालून सर्व एकत्र करावे. सगळा मसाला बटाट्यांना नीट लागला पाहिजे.
रस्सा किती दाट हवे असेल त्याप्रमाणे पाणी घालून दोन वाफा आण्याव्यात.
वरून चुरडलेली कसूरीमेथी घालणे.
कोथिंबीर घालून गरम-गरम नान, पराठ्यासोबत खायला देणे.

.

प्रतिक्रिया

लुक्स यम्मी!!!

दम आलू कश्मिरी आणि यामध्ये काय फरक असतो?? की हीच ती डिश आहे?

निवेदिता-ताई's picture

9 Mar 2011 - 8:16 am | निवेदिता-ताई

मस्त....करुन पाहिले पाहिजे .....:)

सजावट अतिशय सुंदर...खूप आवडली.

सानिका, एकदम सोपि पाक्रु दिलि आहेस या प्रकाराची. धन्यवाद.

दम आलु हा दम बिर्याणिचा भाउ काय ? कारण पाक्रु मध्ये त्याला कुठे दम दिलेला दिसला नाही. बिचा-याला टोचे मारलेले दिसले / वाचले.

आमच्याकडे दम आलु करताना, बटाटा १०% शिजल्यावर तो आतुन पोखरुन घेउन त्यात मसाला भरतात. व नंतर अजुन थोडा शिजवुन ,( पुर्ण गचका नाही.), मग तो रस्स्यात घालुन सगळा शिजवतात.

मागच्या महिन्यात केलेला प्रयोग म्हणजे, बटाटे शिजवताना पाण्आलु, दोन - तीन हिरव्या मिरच्या कुटुन टाकायच्या. असा नुसता बटाटा पण मस्त लागतो खायला.

सानिकानं दिलेली पाक्रु ही दम आलु काश्मिरि आहे असे वाटते, दम आलु पंजाबी हा प्रकार जरा जास्त मसालेदार व तिखट असतो, अर्थात हे हॉटेल मधले अनुभव आहेत.

सानिकास्वप्निल's picture

9 Mar 2011 - 10:40 am | सानिकास्वप्निल

कश्मिरी दम आलू मध्ये कांदे वापरत नाही :)

निवेदिता-ताई धन्यवाद

@ ५० फक्त

वरील पा़कृमध्ये दम आलू ला दम दिलेला आहे "रस्सा किती दाट हवे असेल त्याप्रमाणे पाणी घालून दोन वाफा आण्याव्यात." :)

सानिका, मला दम बिर्याणि बरोबर तुलना करुन म्हणायचे होते, बिर्याणिला जसं मंद आचेवर झाकण ठेवुन त्याला कणिक लावुन शिजवतात ना तसं काही करतात का दम आलुला पण. ?

बाकी, दम आलु काश्मिरी व पंजाबीचा फरक दिल्याबद्दल धन्यवाद. शनिवारी कांदे न घालता करुन पाहतो आणि कंळवतो. पण एक शंका आहे, जर कांदे घातले नाही तर रस्स्यात काय घालणार त्याऐवजी ?

सानिकास्वप्निल's picture

9 Mar 2011 - 8:47 pm | सानिकास्वप्निल

बिर्याणिला जसं मंद आचेवर झाकण ठेवुन त्याला कणिक लावुन शिजवतात तसं काही दम आलुला करायचे नाही कारण आपण बटाटे बेताचे उकडून घेतले आहेत :)

काश्मिरी दम आलू मध्ये कांदे नाही घातले तर टोमॅटो चा दाट रस काढून घ्यावा आणी दही चे प्रमाण थोडेसेच वाढवून रस्सा बनवावा.बाकी पा़कृ तशीच राहील.
बनवून नक्की कळवा :))

पियुशा's picture

9 Mar 2011 - 10:43 am | पियुशा

झक्कास!

अमोल केळकर's picture

9 Mar 2011 - 10:47 am | अमोल केळकर

अफलातून सजावट :)

अमोल

नगरीनिरंजन's picture

9 Mar 2011 - 11:07 am | नगरीनिरंजन

दमदार पाककृती! दिसायला फारच आकर्षक आहे, चवीला उत्तम असणार यात शंका नाही.

दम आलू करताना नक्की कुणाला दम लागणार? बटाट्यांना का मला.. ;)

- पिंगू

डावखुरा's picture

9 Mar 2011 - 12:28 pm | डावखुरा

छान...

परिकथेतील राजकुमार's picture

9 Mar 2011 - 12:50 pm | परिकथेतील राजकुमार

वा र लो !!

डावखुरा's picture

13 Mar 2011 - 10:54 am | डावखुरा

सुरेख स्मायली परा...

अवलिया's picture

9 Mar 2011 - 12:59 pm | अवलिया

मेलो!! मेलो !! ठार मेलो !!

पर्नल नेने मराठे's picture

9 Mar 2011 - 1:00 pm | पर्नल नेने मराठे

सुरेख फोटो व सजावट सुध्डा !!!

प्यारे१'s picture

9 Mar 2011 - 4:05 pm | प्यारे१

नाव : पर्नल नेने मराठे आणि

प्रतिक्रिया 'सुरेख फोटो व सजावट सुध' इथपर्यंत वाचून अ‍ॅटॅ़क यायचाच बाकी होता.

चुचुतै एवढे शुद्ध ल्हिवते????

नंतरच्या 'डा' ने जीवात जीव आला.

बाकी सनिकाची पाकृ म्हणजे एक णंबर असणारच.

सजावट आणि पाकृसाठी ९ १/२ गुण.

RUPALI POYEKAR's picture

9 Mar 2011 - 1:21 pm | RUPALI POYEKAR

साधी आणि सोपी पाकॄ

छान आहे पाकृ.. मी अजुन कधी हे कश्मीरी आलु खाल्ले नाहीये. एकदा try करायला पाहिजे.

प्राजक्ता पवार's picture

9 Mar 2011 - 5:35 pm | प्राजक्ता पवार

छान . सुरेख सजावट .

सानिकास्वप्निल's picture

9 Mar 2011 - 8:48 pm | सानिकास्वप्निल

आभार सगळ्यांना :)

रेवती's picture

10 Mar 2011 - 12:05 am | रेवती

छान पाकृ आणि फोटूही!