दम आलू
साहित्यः
८-१० बेताचे उकडलेले छोटे बटाटे (सालं काढून घेणे)
२-३ मध्यम कांदे बारीक चिरून किंवा किसून
२ मोठे टोमॅटो बारीक चिरून
पाऊण वाटी दही
३ टीस्पून आले-लसूण वाटून
२ तमालपत्र
१-२ दालचिनीच्या काड्या
पाव चमचा जिरे
१ चमचा लाल तिखट ( आवडीनूसार कमी-जास्त करणे)
१ चमचा कश्मिरी मिरची पावडर
१ चमचा गरम मसाला
१ टेस्पून खसखस भिजवून वाटलेली
१ टीस्पून कसूरीमेथी
मीठ चवीनूसार
तेल
चिरलेली कोथिंबीर
पाकृ:
उकडलेल्या बटाट्यांना काट्याने टोचे मारुन घेणे.
सर्व बटाटे तेलात खमंग तळावेत व बाजूला टीश्यूवर ठेवावेत.
दुसर्या भांड्यात तेल तापवून तमालपत्र, दालचिनीच्या काड्या आणी जिरे घालावे.
त्यावर चिरलेले किंवा किसलेले कांदे घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतावे.
वाटलेले आले-लसूण, लाल तिखट, कश्मिरी मिरची पावडर आणी गरम मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतावे.
तेल सुटायला लागले की त्यात दही घालून चांगले घोटावे,वाटलेली खसखस घालून चांगले परतावे.
चिरलेले टोमॅटो आणी बटाटे घालावे.
चवीनूसार मीठ घालून सर्व एकत्र करावे. सगळा मसाला बटाट्यांना नीट लागला पाहिजे.
रस्सा किती दाट हवे असेल त्याप्रमाणे पाणी घालून दोन वाफा आण्याव्यात.
वरून चुरडलेली कसूरीमेथी घालणे.
कोथिंबीर घालून गरम-गरम नान, पराठ्यासोबत खायला देणे.
वाचने
10639
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
लुक्स यम्मी!!! दम आलू कश्मिरी
मस्त....करुन पाहिले पाहिजे
सानिका, एकदम सोपि पाक्रु दिलि
कश्मिरी दम आलू
In reply to कश्मिरी दम आलू by सानिकास्वप्निल
सानिका, मला दम बिर्याणि बरोबर
In reply to सानिका, मला दम बिर्याणि बरोबर by ५० फक्त
बिर्याणिला जसं मंद आचेवर
झक्कास!
अफलातून सजावट अमोल
दमदार पाककृती! दिसायला फारच
दम आलू करताना नक्की कुणाला दम
छान...
वा र लो !!
In reply to वा र लो !! by परिकथेतील राजकुमार
सुरेख स्मायली परा...
मेलो!! मेलो !! ठार मेलो !!
सुरेख फोटो व सजावट सुध्डा
In reply to सुरेख फोटो व सजावट सुध्डा by पर्नल नेने मराठे
नाव : पर्नल नेने मराठे आणि
साधी आणि सोपी पाकॄ
छान आहे पाकृ.. मी अजुन कधी
छान . सुरेख सजावट .
आभार
छान पाकृ आणि फोटूही!