साहित्यः
तांदुळ - २ वाट्या
तुरीची डाळ - १ वाटी
पालक - ४ वाट्या बारीक चिरुन
कांदा - १ कप बारीक चिरुन
टोमॅटो - १/२ कप बारीक चिरुन
आले-लसुण-मिरची पेस्ट - १ चमचा
हळद - १ चमचा
काळी मिरी - २-३
लवंग - २-३
जिरे - १ चमचा
गरम मसाला पावडर - १ चमचा
लसुण - ४-५ पाकळ्या बारीक चिरुन
सुक्या लाल मिरच्या - ४-५
तुप - २-३ चमचे
मिठ चवीनुसार
कृती:
१. तांदुळ व तुरीची डाळ निट धुवुन पाण्यात १/२ तास भिजत ठेवावी.
२. कढई मधे १ चमचा तुप गरम करावे. तुप गरम झाल्यावर त्यात काळी मिरी, लवंग व जिरे टाकुन परतावे.
३. जिरे परतल्यावर त्यात हळद व बारीक चिरलेला कांदा टाकुन परतावे.
४. कांदा लाल होत आल्यावर त्यात १ चमचा आले-लसुण-मिरची पेस्ट टाकुन परतावे.
५. ह्यात टोमॅटो टाकुन तेल सुटे पर्यंत परतावे.
६. कांदा टोमॅटोला तेल सुटल्यावर त्यात पालक टाकुन मिक्स करावे.
७. ह्यात भिजवलेले तांदुळ व तुरीची डाळ टाकुन ५ मिनिटे परतुन घ्यावे. त्यात १ चमचा गरम मसाला पावडर टाकुन मिक्स करावे.
८. भाताच्या अंदाजा प्रमाणे मिठ व पाणी टाकुन भात शिजुन घ्यावा.
९. हि खिचडी असल्यामुळे पाण्याचे प्रमाण थोडे जास्त ठेवावे.
१०. दुसर्या छोट्या कढईत २ चमचे तुप गरम करावे. त्यात बारीक चिरलेला लसुण व लाल मिरच्या टाकुन फोडणी तयार करुन घ्यावी.
११. भात शिजल्यावर तो serving plate मध्य काढुन, वरुन लसुण व लाल मिरच्यांची फोडणी टाकुन गरम serve करावा.
टिपः
१. तुरीच्या डाळी एवजी तुम्ही मुगाची डाळ वापरु शकता.
२. पालक आवडत नसल्यास मेथी टाकु शकतो.
प्रतिक्रिया
9 Mar 2011 - 3:22 am | शेखर
विकांताचा मेनु पक्का.... धन्यु
9 Mar 2011 - 5:15 am | सानिकास्वप्निल
मस्त पाकृ मृणाल :)
9 Mar 2011 - 5:54 am | शिल्पा ब
मस्तच...या विकेंडला करुन बघते.
9 Mar 2011 - 8:14 am | प्राजु
उद्याच करेन. आत्ताच जेवण झालं.. आणि खरं म्हणजे रात्री जेवायला काय करावं हा प्रश्न पडलाच होता..!
उद्याच रात्री करेन.. :)
9 Mar 2011 - 10:45 am | पियुशा
पालक आवड्त नाहि ,पन खिचडी मध्ये ट्राय करुन बघेन म्ह्न्नते एक्दा :)
9 Mar 2011 - 11:05 am | पिंगू
मस्तच आहे आणि सोपा प्रकार आहे..
- (खिचडीवाला) पिंगू
9 Mar 2011 - 11:12 am | खादाड अमिता
अगदी रीसोत्तो सारखं दिसतंय. मस्त!
9 Mar 2011 - 1:16 pm | गणेशा
मस्त
9 Mar 2011 - 1:20 pm | परिकथेतील राजकुमार
ज ह ब र्या !!
आमचा एक मित्र असले काय काय खायचा पूनम मध्ये ;) त्याच्या नादानी एकदा खाल्ले होते आणि आवडले देखील होते.
9 Mar 2011 - 5:29 pm | प्राजक्ता पवार
मस्तं :)
10 Mar 2011 - 12:19 am | रेवती
छान फोटू. आज आमच्याकडे रात्रीच्या जेवणात मुगाची खिचडी (पालक, मका, मटार बरेचदा घालतेच) आणि कढी आहे.
उडदाचा भाजलेला पापड आणि लिंबाचे गोडे लोणचे असतेच.;)
मृणालिनीबाई मध्यंतरी बरेच दिवस गायब होत्या......उपास घडला ना आम्हाला!;)
10 Mar 2011 - 12:47 am | Mrunalini
एकदम मस्त मेनु आहे.
आहो, मी इथेच होते आणि दर २-३ दिवसांनी पाकृ पण टाकल्या होत्या मी. :)
10 Mar 2011 - 9:27 pm | अंतु बर्वा
छानचं... कालचं बनवण्यात आली... शेवटची लाल मिरची ची स्टेप तेवढी राहुन गेली... पोटातले कावळे शांत बसत नसल्याने :-) नेक्स्ट टाईम लाल मिरची पक्की...