फिनिक्सची भरारी....?

Primary tabs

इन्द्र्राज पवार's picture
इन्द्र्राज पवार in क्रिडा जगत
6 Mar 2011 - 5:29 pm

आयर्लंडकडून जबरदस्त चपराक बसल्यावर आणि समस्त इंग्लिश क्रिकेटप्रेमींच्या टीकेचे लक्ष्य झालेली स्ट्रॉस आणि कंपनी ढेपाळून गेलीच होती आणि तिचे प्रत्यंतर आजच्या दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर ज्या पद्धतीने क्रमाने त्यांचे फलंदाज नांगी टाकीत गेले ते पाहिल्यावर असेच वाटले की आजच इंग्लंडची टीम " पुरे झाले बाबानू....जातो आम्ही लॉर्डसकडे परत..." म्हणत आज पॅकिंग करणार. १७१ चे सोपेसे लक्ष्य गाठायला स्मिथ, अमला आणि कलिस किती ओव्हर्स घेणार एवढाच प्रश्न होता.

~~~~ आणि क्रिकेट किती अनिश्चततेचा खेळ आहे याची परत एकदा प्रचिती आली. इंग्लंडच्या फलंदाजांनी नव्हे तर त्यांच्या गोलंदाजांनी नेमक्या वेळेला कमाल केली.....आणि ही रोमहर्षक लढत केवळ ६ धावांनी जिंकली.....१७१ धावा द.आफ्रिकेचे बलाढ्य फलंदाज काढू शकले नाहीत....आणि ब्रॉड्+अ‍ॅण्डरसन या दुकलीने स्ट्रॉसच्या आशा पुन्हा प्रज्वलित केल्या.

सारा भारत बेंगलोरकडे लक्ष देऊन बसल्याने द.आफ्रिका वि. इंग्लंड हा सामना किती रंगतदार होईल याची कल्पनाही कुणाला आली नाही.

इन्द्रा

क्रिकेट

प्रतिक्रिया

भडकमकर मास्तर's picture

6 Mar 2011 - 5:43 pm | भडकमकर मास्तर

आणि आम्ही ती म्याच पहायचीच विसरलो... तो क्यालिस गेल्यापर्यन्त पाहिली होती.. पण म्हटले तरी हे लोक आरामात मारतील... आणि आपली सुमार बोलिन्ग पाहिली... आणि फक्त शेवटच्या दोन अफ्रिकेच्या विकेट्स पाहिल्या...

स्ट्रॉसला शुभेच्छा.... बरा खेळ.. खूप मोठा हो

अवांतर;: हरणार हे माहित असते तर क्यालिस "चालला" असता का?

फेमस वॉक्स आर ऑलवेज सीन व्हेन द टीम इज इन गूड पोझिशन--- जालिन्दर जलालाबादी

पैसा's picture

6 Mar 2011 - 5:55 pm | पैसा

"It's a matter of winning three ties, and we have beaten South Africa, West Indies and Bangala Desh before!" असं स्ट्रॉसने सामन्याआधी म्हटलं होतं!

आणि दक्षिण आफ्रिकेने 'चोकर्स' हे नाव कधीचं कमावलेलं आहेच.

रमताराम's picture

6 Mar 2011 - 5:55 pm | रमताराम

आम्ही हीच म्याच पहात होतो. इंग्लंडने अतिशय अचूक बोलिंग करून अगदी जखडून टाकले होते. फील्ड्-प्लेसिंग सुद्धा अतिशय अचूक होते, हॅट्स ऑफ टू स्ट्रॉस. मझा आला.

स्साला आपली बोलिंग बघता क्वार्टरफायनलला पोहोचलो तरी भैरोबाला क्वार्टर देईन म्हणतोय (प्रसाद शेवटी भक्तालाच मिळतो हे ध्यानात ठेवून. ;) )

आम्ही दोन्ही मॅचा पाहिल्या. इंग्लंडने अनपेक्षित निकाल द्यायचं ठरवलेलं दिसतंय. आधी जिंकलेली भारताबरोबरची मॅच ड्रा करुन घेतली मग आयर्लंड बरोबर तर हागलेच, पण आज छोट्या स्कोअरसमोरही हारले नाहित. (आफ्रिकेची बॅटिंग खराब झालीच अर्थात)

शाहरुख's picture

6 Mar 2011 - 6:16 pm | शाहरुख

>>इंग्लंडने अनपेक्षित निकाल द्यायचं ठरवलेलं दिसतंय

+१

इंग्लंड स्विंग्ज लाईक अ पेंड्युलम डू !