म्हटलं तर अनावश्यक..

गवि's picture
गवि in काथ्याकूट
4 Mar 2011 - 3:46 pm
गाभा: 

मी आज इथे एक सर्वसाधारण काथ्याकुटाचा मजकूर लिहीतोय. पण त्या मजकुराचा उद्देश आज वेगळा आहे. म्हणजे पुरेसे काथ्याकूट करता येईल इतपत तो विषय चिवडण्याजोगा आहे. पण...

इथे काही वेगळं करता आलं तर बघू म्हणून एक आचरट विनंती करु इच्छितो. माझा निम्ननिर्दिष्ट मजकूर वाचून झाल्यानंतर आपण स्वतःची कॉमेंट न देता इतर कोणा सदस्यमित्राची कॉमेंट (अर्थात कल्पून) लिहावी.

म्हणजे, "क्ष"च्या शंकायुक्त पण मुद्द्याचे धागे बरोब्बर उचकटणार्‍या पांढुरक्या प्रतिक्रिया..

एखाद्याच्या अभ्यासपूर्ण संयत..

...काहींच्या थट्टेखोर आणि शालजोडीतल्या..

कोणाच्या वळणदार पण काय ते नेमके धुक्यात ठेवणार्‍या..

कोणाच्या तडकावणार्‍या..

उदाहरणे पुरेत.. :)

ह.घ्या. गै.क.घे. न. हे वे सां. न.ल.
....
..
..

तर मूळ काथ्याकूट विसरलोच..

...अनावश्यक गोष्टींची आवश्यकता...

कोणीतरी श्रीमंत नट किंवा उद्योगपती पोरीचं भपकायुक्त लग्न काढून त्यात कित्येक कोटींचा चुराडा करतो. खूप विचारवंत पेपरमधे वगैरे मनापासून शिव्या घालतात अशा "उधळपट्टी"ला. देशात अर्धपोटी गरीब आहेत. नव्हे तेच जास्त आहेत. आणि उघडे नागडेसुद्धा खूप खूप. आणि त्याचवेळी कोणाच्या तरी लग्नात कोटींचा चुराडा. हजारांची पत्रिका. लाखांची फुलं. कोटींचा वेडिंग ड्रेस.

पण शांतपणे विचार केला तर लक्षात यायला काही हरकत नाही की या शेठजीकडचा माल एरव्ही खालच्या थरात वाटला गेला नसता. केवळ या "अनावश्यक" लग्नानं (आय मीन लग्नातल्या अनावश्यक भपक्यानं..!!) मांडववाले, फुलवाले, आचारी, वाढपी, मजूर, सराफ, दागिन्यांचे कारागीर, भांडी घासणार्‍या बायका, हजाराची पत्रिका छापणारा प्रिंटर, हातकागद बनवणारा कोणी लघुउद्योजक, कुरियरवाला या सर्वांना शेठ्जीचा पैसा झिरपून झिरपून मिळाला.

हो प्रत्येक भुकेल्या गरीबाला, प्रत्येक आदिवासी कुपोषित मुलाला थेट घास नाही मिळाला. वाईट झालं. लग्नात अन्न वाया गेलं असेल. वाईट झालं.

पण काही थरांपर्यंत तरी पैसा उतरून खाली आला. याहून जास्त चांगलं काही झालं नसतं. शेठजींनी साधेपणानं पोरीचं लग्न करून बाकी सारं दान करावं हा भाबडा आदर्शवाद झाला. ते होणे नाही.

..............................

प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

4 Mar 2011 - 3:53 pm | इंटरनेटस्नेही

सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखुन ठेवत आहे.
-
(वायदेआझम) इंट्या डॉन.

हे आले श्रीमंतद्वेष्टे!
प्रत्येकाने कमावलेले पैसे आहेत. ते कुठे, कसे केव्हा वापरावेत की मुळामुठेत सोडून द्यावेत हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. उगाच पैसे वाटायच्या आणि दानधर्माच्या भंपक कल्पनांच्या मागे लागून नस्ते काकू काढण्यात काहीही हाशील नाही!
त्यासाठी एखादी डायरी ठेवून त्यात लिहावे असा निरिक्षणात्मक सल्ला द्यावासा वाटतो आहे, घ्यायचा असेल तर घ्या, सक्ती नाही!

-- राक्षसकथेतील असुरकुमार

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Mar 2011 - 12:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे

याच्या जोडीने, नाही नाही.... याच्या जोडीला मी दिलेली प्रतिक्रिया उडवली गेली आहे. त्याच्या कारणाचा खुलासा संपादक मंडळ करेल काय?

टवलिया

तळटीप :- वरील प्रतिसाद हा काल केवळ गम्मत म्हणून दिला होता. आज सकाळी घडलेल्या घटनांमुळे खुलासा करू इच्छितो की माझा कुठलाही प्रतिसाद उडवला गेला नाही. वरील प्रतिसाद हे एक विडंबन आहे.

वि.मे.

विजुभाऊ's picture

4 Mar 2011 - 4:29 pm | विजुभाऊ

अच्र्त ब्व्ल्त.
हे क्स्ल ल्ग्न. दुबैत य्पेक्ष चान ल्ग्न अस्त्त.
म्ला इक्दे स्ग्ले चिद्वय्ला ल्ग्लेत. अब ह्म बारात लेके आयेंगे म्ह्नून.
.....चूचू

चिरोटा's picture

4 Mar 2011 - 4:29 pm | चिरोटा

पोरगी शेठजीची.पैसा शेठजीचा.काय का करेना.

पियुशा's picture

4 Mar 2011 - 4:32 pm | पियुशा

छान ग वि ;)
बाकि जानकार यावर टोर्च मारतिल......

©º°¨¨°º© पियुशा©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...

अरुण मनोहर's picture

5 Mar 2011 - 2:36 am | अरुण मनोहर

शक्यता नाकारता येत नाही!

- शक लिया

माझं या विषयावरचं विस्तृत ५३२५ पानांचं, ३५ खंडांच आणि १७६० भागांचं पत्र मी होनोलुलू च्या सरकार ला पाठवलं होत
माझ्या ब्लोग वर तुम्हाला ते वाचता येईल , (आहे हिमंत ? ;))
जो पर्यंत काश्मीर मधून आपण काढता पाय घेणार नाही तो पर्यंत हि समस्या अशीच चालू राहील असा मला वाटत

-- अधीर गोरे

नितिन थत्ते's picture

4 Mar 2011 - 6:10 pm | नितिन थत्ते

मोठे व्हा !!!!!

भाषण झोडक

रमताराम's picture

4 Mar 2011 - 8:01 pm | रमताराम

'भाषण झोडक' या आयडीनामविडंबनाबद्दल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत.

(रटाळ) रमताराम

परिकथेतील राजकुमार's picture

4 Mar 2011 - 6:15 pm | परिकथेतील राजकुमार

आपली करामत पाहिली, अपेक्षित कृती. आता मात्र आमचे डोळे पाणावले.

अर्थात कोणी कसे लिहावे हे सांगण्याचा हक्क मला नाही. मी आपले एक निरिक्षण नोंदवले.

गडबडनाथ गोंधळे

निखिल देशपांडे's picture

4 Mar 2011 - 6:25 pm | निखिल देशपांडे

.

नरेशकुमार's picture

4 Mar 2011 - 6:42 pm | नरेशकुमार

काय एकेक शोधुन काढाल राव , धण्स.
मी तर म्हनतो कि लग्न हे ईमानात केलं पायजे, हवेत, तेवढाच आनखिन पैशाचा चुराडा... आपलं.. वरुन खाली प्रवास.
आनि त्या ईमानाला मात्र कोनताही इंजिन अपघात न होता, त्याचा डायवर येडा न होता ते ईमान झॅकपैकी जमिनिवर लॅण्ड होउद्या....
गवि तुमचि नाडी बघितली एकदा तपासुन घ्या आनी ग्रह तारे पन जागेवर आहे का नाही ते पन रात्री दुर्बिन लावुन निट पाहून घ्या. बाकी, शिस्त बद्ध पद्धतिने आकडेवारी मांडून, ग्राफ वगेरे काढुन तरि हा लेख पाडायचा व्हता. चावायला अजुन मज्जा आलि असती. पन मिस्र देशात जे काही घडलं ते पाहता हे घडुन येइल असे स्वप्नात सुद्धा वाटनार नाय.

गवि लेख लिहिनार , सगळे पागल होनार. निश्चीत !
मिले तो कुत्ता कांट खाऊंगा ! नही मिले तो डॉली/रॅम्बो कांट खाऊंगा.

© © ब्लॅकहोल मधील वॉर्डबॉय. © ©

अभिजीत वाघ's picture

4 Mar 2011 - 6:57 pm | अभिजीत वाघ

ब-याच वेळेला माणसाची आगतिकता त्याच्या सद्सद्विवेकबुध्दीवर मात करताना दिसते,
अन माणूस लग्न,संसार,...अनावश्यक खर्च ह्यांच्या जाळ्यात अडकतो.
ह्या आगतिकतेवर मात करायची कशी? हाच खरा मुद्दा आहे.

लेख आवडला हे.वे.सा. न.

:)

अभिजीतज्ञ

धमाल मुलगा's picture

4 Mar 2011 - 7:00 pm | धमाल मुलगा

आहे हे असं आहे, पटलं तर पहा, नाहीतर चपला घालू चालू पडा.
जास्त गमज्या नाय पायजेल.

- धम्या भयंकर.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Mar 2011 - 7:11 pm | परिकथेतील राजकुमार

आहे हे असं आहे, पटलं तर पहा, नाहीतर चपला घालू चालू पडा.
जास्त गमज्या नाय पायजेल.

आपल्या सारख्या थोर विचारवंतांशी कुठलाही वाद घालण्याची माझी इच्छा या आधी देखिल कधी नव्हती आणि यापुढे देखिल कधी असणार नाही.....आपण माझ्या प्रतिसादावर प्रतिक्रिया दिलीत म्हणुन केवळ टंकतोय......तेंव्हा माझ्याकडुन मी याला इथेच पुर्णविराम देतो आहे....उगीच कुणाच्या भावना दुखवायला नकोत्.....कसे!

"परामिका"

धमाल मुलगा's picture

4 Mar 2011 - 7:14 pm | धमाल मुलगा

विषय संपला. :)
धन्यवाद
-(थोर विचारवंत) धम्या.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Mar 2011 - 7:20 pm | परिकथेतील राजकुमार

तुम्ही काय लिहीलय "विषय संपला" वगैरे मला कळलं नाही. माझ्या प्रतिसादावर अशी ऑफेन्सिव्ह प्रतिक्रिया का हे तर अजिबातच कळलं नाहीये.

ढुशि

नितिन थत्ते's picture

4 Mar 2011 - 7:06 pm | नितिन थत्ते

याबाबत संघाचे नक्की काय मत आहे हे सांगा. भाजपचे मत संघासारखेच आहे का तेही सांगा.

गुज्जुभाऊ

आत्मशून्य's picture

4 Mar 2011 - 7:14 pm | आत्मशून्य

आपलं म्हणन पटतय. कम्यूनीझम घ्या, जोजे वांचील तो ते लाभो प्राणीजात असे आशीर्वाद द्या, अथवा संपत्ती दान करा अशा प्रश्नाना कायस्वरूपी तोडगा हा नसतोच. ऊदा. एखाद्या अलकेमिस्टने लोखंडाचे सोने बनवायचे तंत्र जगजाहीर केले तर लोकांना त्याचा काय फायदा ? सर्वत्र सोने ऊदंड होइलच पण तसेच लोखंडाचा भाव २१,००० रू तोळे नाही का चढणार ?

अवांतरः आणी अशाच काही कारणांनी ते तंत्र जगजाहीर केले नाही की पून्हा हे कधी होतच नसते, ही शास्त्र न्हवे तर भाँदूगीरी आहे, मेंदूची कवाडे बंद झालेल्यांच्या शब्दांने तयार केलेले हे तर फक्त ऊदाहरणांचे बूड्बूडे आहेत वगैरे वगैरे स्तूतीसूमने ऊधळणे तर लोकं आद्य कर्तव्यच समजतात....

काय रे काय गोंधळ चालु आहे ह्या टार्‍या चा ? जरा म्हणुन शांतता मिळु देत नाही हे कार्टं .. ऑनलाईन आलं की सगळा वेळ ह्याच्या तक्रारी निवारण्यातंच जातो.

- भोवती

रेवती's picture

4 Mar 2011 - 8:05 pm | रेवती

अस्सं काय....
बघून घेईन मेल्या...

स्त्रिया या पाशवी असतातच. तेव्हा तुम्ही असे लिहावे यात काय नवल?

कृपया या विधानाला शास्त्रीय आधार द्यावा

कंपुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

सुहास..'s picture

4 Mar 2011 - 8:59 pm | सुहास..

पाशवी ला पाशवी ला अश्या प्रकारचा प्रतिसाद द्यावा हे पाहुन अति-आश्चर्य वाटले.

प्रहार
खेळीन पत्ते ;)

नगरीनिरंजन's picture

4 Mar 2011 - 9:06 pm | नगरीनिरंजन

खी खी खी. =)) =))

हिंसा-अहिंसेचा बादरायण संबंध लावुन उदाहरणं देउन फोलपणाला "उच्च"सिद्ध करण्याचा प्रयत्न काही नविन नाही.

-Pile

धमाल मुलगा's picture

4 Mar 2011 - 9:10 pm | धमाल मुलगा

अर्थात ह्यात नविन काहीच नाही. कारणमिमांसा देण्याची वेळ आली की तोंड लपवून फिरणंदेखील जुनंच.

बाकी चालु द्या.

- धमालूकर्ण.

-------------------------------------------------------------------------
माझा हा प्रतिसाद अश्लिल तर वाटत नाही ना?

प्रीत-मोहर's picture

4 Mar 2011 - 10:49 pm | प्रीत-मोहर

//स'॑/द्व्ल्द्[प्व्र

-कमाल करुया

नगरीनिरंजन's picture

4 Mar 2011 - 9:25 pm | नगरीनिरंजन

मी मनातून मांसाहारी झाले आहे अशी शंका घ्यायला वाव आहे.

जेवती

रेवती's picture

4 Mar 2011 - 9:37 pm | रेवती

खी खी खी.

इंटरनेटस्नेही's picture

5 Mar 2011 - 12:27 am | इंटरनेटस्नेही

प्रत्येक जण मणातुन नॉनव्हेजच असतो असे आमचे मित्र काजु केळकर म्हणतात!

-
दीडडझन.

"व्हॉट द हेल इज गोइंग ऑन?" अर्थात हा प्रश्न मी विचारलेला नसून थोर पाशवीशक्ती कैसाताईंनी कंपुत्सुंच्या न्यायव्यवस्थेला केलेला सवाल आहे.;)
झकास.

प्रीत-मोहर's picture

4 Mar 2011 - 10:49 pm | प्रीत-मोहर

शक्यता नाकारता येत नाही

- ताना

अवो गविभौ, कोनी कसं का लगीन करना, आपन आपल्या परस्थितीपर्मानं र्‍हावं....कसं?
त्यास्नी पैका खरच कराया कारन पन हुवं. काम्हून त्ये तरी दान अन् धरम करत्याल?
शिरिमंत म्हनलं कि त्यांचा पैका समद्यास्नी दिसतुया, त्यांच्या काळज्या न्हायी दिसत?
आता आपल्याकडं लगीन म्हटलं की दाराला आंब्याची पानं आन् झेंडूची चार फुलं लावली की काम हुतय पन यांच्याकडं आर्कीड कि कायसं नाव त्येचं......तीच फुलं लागत्यात म्हनं......जावूद्या, असत्यात येकेकाचे इचार तशे. दोनच लुगडी इकत घेवून त्यानी तरी लगीन का म्हून करावं? आवो माज्या भावाचे रेशमी लुगड्याचे माग हायेत्......त्याचा धंदा तरी कवा चालावा मी म्हनत्ये!;)
सुपर्णा लक्षय.

स्पंदना's picture

6 Mar 2011 - 3:54 pm | स्पंदना

खॉ! खॉ ! खॉ!

खर आहे ग. वी. तुमच म्हणन. आजकाल गरिबांसाठी दान कराव अस लोक म्हणतात म्हणुन श्रीमंतांनी थोडेफार खर्च कमी केल्याने , बर्‍याच लोकांच्या व्यवसायावर परिणाम झालेला आहे.
~आता परवाचीच गोष्ट घ्या. आमच्या येथील एका प्रतिष्ठीतांच्या येथे एक 'तुला' समारंभ होता. आता अश्या वेळी त्या लोकांनी येउन आमच्या मामांकडुन बरेच काही विकत नेउन आमचा व्यवसाय वाढवीला असता. आता आम्ही कायमच आमचा माल ज्या लोकांकडुन विकत घेतो , त्यांचा सुद्धा खप झाला असता. त्या लोकांकडे काम करणारे गरिब मजुर त्यांच्या ही मजुरीला आणखी वाव मिळाला असता. पण नाही यांनी अश्याच समजा पायी,~ जावुन सरळ झोपडपट्टीमध्ये जेवण दिले. त्यामुळे कधी नाही ते पोट भरुन झोपडपट्टीतील लोक दुसर्‍या दिवशी कामाला नाही आले. नेमके दुसर्‍या दिवशी आणखी एका कार्यक्रमाचे नियोजन आमच्या मामांकडे होते, तेथे हाताखाली काम करणारे लोक या झोपडपट्टीतील असल्याने ती आले नाहित व आमचा फार खोळम्बा झाला. माझे मामा पेढीवर येउन रागारागाने आमचा घरोबा असलेल्या कम्युनिस्ट ग्रंथालयातील पुस्तके वाचत राहिले अन तो कार्यक्रम शेवटी मला व आमच्या दिवाणजींना पार पाडावा लागला!

आता यामध्ये किती जणांचे नुकसान झाले ते पहा. मुख्य म्हणजे आयते खायला मिळाल्याने मजुर लोकांची श्रम करण्याची भावना कमी झाली. त्यामुळे आजची मजुरी रहित होउन उद्या काय खायचे हा ~ प्रश्न त्यांच्या अन त्यांच्या कुटुंबा पुढे उभा राहिला ~ कार्यक्रम करणार्‍यांचा हिरमोड झाला. 'तुला' आणायलाच कोणी नसल्याने त्या गृहस्थाने बसायचे कश्यात अन मापायचे कशात हा प्रश्न उभा राहील्याने तुला केली गेली नाही. अन तुला करुन जे शेवटी गोरगरीबात वाटले जायचे होते ~परिणामी ते ही वाटले गेले नाही. ~परिणामी एव्हढी वर्षे केलेले पाप पुण्यात बदलुन घ्यायची त्यांची ईच्छा ही अपुरी राहुन ते काम करणारा 'चित्रगुप्त' ही एका कामास मुकला. त्या मुळे तु झोपा काढतोस असा शेरा त्याला त्याच्या वरिष्ठांकडुन ऐकुन घ्यावा लागला.

फिन्द्राज सवार

(झाल का भरपुर (पुरेस) लिखाण? नाही त्याची ष्टाईल मारायला गेल्यावर काय व्हायच म्हणा? दमले आता . आता एक आठवडाभर एकही प्रतिसाद माझ्या कडुन लिहिला जाणार नाही)

इन्द्र्राज पवार's picture

6 Mar 2011 - 4:52 pm | इन्द्र्राज पवार

ऑफुली वंडरगर्ल धिस अपर्णा इज....रीअली...!!

फिन्द्राज सवाराचा मामा बारामतीच्या पवारांचा पक्का फॉलोअर असल्याने ते कम्युनिस्टाचा लायब्ररीत जावून वाचत बसण्याची सुतराम शक्यता नाही....पण ते चित्र नजरेसमोर आल्यामुळे अंमळ बरे वाटले, कारण फिन्द्राजचा वावर तिथे जरा ज्यादाच असतो.

वेल...आणि तू दमण्यासारखे पर्वतपाय लिखाण काय तुझ्याकडून झालेले नाही....त्यामुळे आठवडाभर प्रतिसाद देणार नाही असा काही ब्याड डिसिजन घेऊ नको.....अगदीच दमली असशील तर "तिळी' भाजून खा....सकाळपर्यंत टुमटुमीत !!

इन्द्रा

माहेरच माणुस असल्यान थोडी हक्कान मजा केली. पण उगा आव आणन फार अवघड आहे बाबा! कस एव्हढ लिहितोस देव जाणे. बाकि ते 'फिन्द्राज' च 'पेनावर सवार ' कराव की काय अस वाटायला लागलय. फिन्द्राज काय जमल नाही.

नगरीनिरंजन's picture

4 Mar 2011 - 8:41 pm | नगरीनिरंजन

आधी शोषण आणि फसवणूक करून नंतर त्यातला काही भाग खर्च केला म्हणजे चांगले झाले असे काही तरी आपल्याला म्हणायचे आहे असे वाटले. सार्वजनिक धनसंपत्तीची राजरोस बेसुमार लूट चालू आहे आणि हे भव्य समारंभ हे त्याचं दृश्य स्वरूप.

मुळात हा प्रश्न फक्त अनावश्यक खर्चाबद्दल आहे असे वाटत नाही तर हा खर्च करणार्‍यांची तेवढी ऐपत कशी झाली त्याबद्दल आहे आणि मुळात हा पैसा जनतेच्या विकासासाठीचा आणि जनतेच्या कमाईतूनच आलेला आहे. अशा समारंभांनी अर्थव्यवस्थेला चालना मिळते, लोकांना काम मिळते असे म्हणणे म्हणजे चोराने आमचे पैसे चोरले पण त्याने केलेल्या खर्चावर आमचे घर चालते असे म्हटल्यासारखे होणार नाही काय? शिवाय अशा खर्चातून किती लोकांचे घर चालते यावर काही संख्याशास्त्रीय विदा आहे काय? ही काळी खर्चव्यवस्था फार माजलीय साली.

- माजेश फासचढवी

सुहास..'s picture

4 Mar 2011 - 8:50 pm | सुहास..

१ )
व्वोके !

किडीश टोणग्या
अंगात 'बनियन' असणं चांगलं.....पण तिच-तिच सारखी घालणं वाईट!

२ )
व्वा काय पण धागा आहे ? कोण पर्वा करतो ..चला चंची काढा रं !

--बेसुर

---------------------------------
तो धागा मंद माणसाचा, डोकेश फिरवुन गेला!

स्वैर परी's picture

7 Mar 2011 - 3:59 pm | स्वैर परी

आवडलेला प्रतिसाद!

धमाल मुलगा's picture

4 Mar 2011 - 9:06 pm | धमाल मुलगा

काय गडबड आहे?
मला जरा सुखानं जगू द्याल की नाही? :)

-धम्या.

चतुरंग's picture

4 Mar 2011 - 9:19 pm | चतुरंग

रोचक विषय. समाजात कोणी किती पैसा कमवावा आणि कसा खर्च करावा हा ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी गोष्टी जेव्हा सर्रास डोळ्यांवर येऊ पहातात त्यावेळी समाजमनाला अंधारी आल्याखेरीज राहत नाही. देजा वू! काय गमतीशीर योगायोग आहे पाहा गेल्याच वीकांताला गर्जेश बोळंकी ह्या आशयसंपृक्त लिहिणार्‍या नवकवीची अशाच आशयाची एक कविता वाचनात आली त्यातल्या काही ओळी इथे दिल्याखेरीज गत्यंतर नाही

हमरस्त्यावरुन जाताना करपट वास आला
म्हणून बाजूच्या बोळात पाहिलं तर दोन भिकारी
बसले होते चिवडत शिळ्या अन्नाचे ढीग आधाशी डोळ्यांनी
पुढच्याच चौकात लागली होती दहा हजाराची लड
कुठल्याशा थुलथुलीत शेठच्या मुलीच्या लग्नाची
तुपकट, ओघळलेली शरीरं सावरत, हातात बुफेच्या
प्लेटा घेऊन जाणारी ती हावरी रांग बघितली
आणि समजलं की देश प्रगतीपथावर आहे!

आठ ओळीत केवढं समग्र आणि समर्थ चित्र उभं केलंय! वा!

-चुक्तसुनीत

विजुभाऊ's picture

5 Mar 2011 - 12:27 am | विजुभाऊ

या कवितेवरून आठवली नवद्दीउत्तरीतल्या महान कवी कर्जेश दहांकी ची एक कविता

शेंबडाच्या पहिल्या थेंबा पासून तीचे मूल
ओरडत होते रडत रडत
अंगावर पिणारे पहीले बाजूला केल्यावर
दुसरे लुचू लागले म्हणून कावरीबावरी ती....
शेठला आता काय सांगायचे
की काम कमी का झाले म्हणुन...
रोजंदारी कमी रोजचीच झालीय.
भिंतीवरच्या किंगफिशरच्या कॅलेंडरच्या चित्राशी बरोबरी साधणार्‍या
फटक्या पातळात शेठची नजर चुकवीत उभी ओशाळवाणी ती....

किती समर्थ चित्र उभे करतो कर्जेश...
.....जाउन झोप राव

धमाल मुलगा's picture

4 Mar 2011 - 9:28 pm | धमाल मुलगा

झकास हां.. वाचून खूप बरें दिसलें.

-वेगवेडा.

*****************************************************************************************
@~^~ स्तोत्रांत इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे, हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे ~^~@

आनंदयात्री's picture

4 Mar 2011 - 9:43 pm | आनंदयात्री

तुन्ना तुन्ना
तक तक तुन्ना

-
aadsule_1172

विश्वनाथ मेहेंदळे's picture

5 Mar 2011 - 12:04 am | विश्वनाथ मेहेंदळे

एकाने पैसा उधळला तर दुसऱ्याच्या बापाचे काय जाते? हरकत घेणाऱ्यांचा अपमान केला पाहिजे. घालून पाडून बोलले पाहिजे. डोक्यात दगड घालायची इच्छा होते अशा माणसांच्या.

आणि लग्न झाल्यावर त्या मुलीचे सासू सासऱ्यांबरोबर पटणार नाहीच. त्यांना घराबाहेर काढणे शक्य नसते, त्यामुळे तिने नवऱ्याबरोबर तडक घराबाहेर पडावे.

विश्वा ढ

एकवेळ भिकार्याला रुपया देणार नाही का गाडी पुसू देणार नाही पण १० हजाराची माळ जरूर लावेन...हरकत घेणार्यांना काय बुद्धी असते का? स्वतःजवळ नाही कवडी पण जीभ कशी चुरूचुरू चालते !! कामं करा..

तुम्हाला बहिण आहे का? असल्यास तिला त्रास झाल्यावरसुद्धा तुम्ही तिला सहनच करत एकत्रच राहायला सांगणार का? तिचे काही बरेवाईट झाले तर जबाबदारी घेणार का? कदाचित घ्याल पण तुमच्या बायकोची त्याला हरकत नसेलच कशावरून?

जगन्नाथ चुगंदळे

नीलकांत's picture

5 Mar 2011 - 12:18 am | नीलकांत

नमस्कार,

या धाग्यावर टारझनने अनावश्यक प्रतिक्रिया देत. मिसळपावच्या व्यवस्थापकीय धाग्याची चेष्टा केली आहे. सदर बाबीची मिपा व्यवस्थापन अत्यंत गंभीर दखल घेत आहे. आणि ती प्रतिक्रिया व त्यासोबतच अन्य उपप्रतिसाद उडवण्यात येत आहेत.

याच सोबत टारझन यांना सक्त ताकीद देण्यात येत आहे की त्यांनी व्यवस्थापकीय लेखांची व सूचनांची अशी टर उडवल्यास यापुढे त्यांचे खाते कुठलीही पुर्वसूचना न देता निलंबीत करण्यात येईल.

चेष्टा मस्करी एका मर्यादेपुढे जाऊ नये हेच उत्तम होईल.

- नीलकांत

टारझन's picture

5 Mar 2011 - 2:41 am | टारझन

त्यांनी व्यवस्थापकीय लेखांची व सूचनांची अशी टर उडवल्यास यापुढे त्यांचे खाते कुठलीही पुर्वसूचना न देता निलंबीत करण्यात येईल.

टर उडवण्याचा कोणता ही हेतु नव्हता . पण बहुतेक व्यवस्थापणाच्या भावना दुखावल्या(दुखावन्याचा कोणताही हेतु नव्हता तरी ) असतील तर माफी मागतो.

जाता जाता, मागे माझा लेख उडाल्याबद्दल जाब विचारला होता ,त्याचं समाधान अजुन झालेलं नाही ( वारंवार विचारणा करुन )

बाकी "आमच्या कडुन" नेहमीच सहकार्य होते / राहिल.

धन्यवाद

-( ब्र म्हणता ... ) टारझन

नीलकांत's picture

5 Mar 2011 - 8:40 am | नीलकांत

जाता जाता, मागे माझा लेख उडाल्याबद्दल जाब विचारला होता ,त्याचं समाधान अजुन झालेलं नाही ( वारंवार विचारणा करुन )

आपला लेख उडल्यास त्याला काही कारणे असतात. त्याची माहिती धोरणात मिळू शकते. अन्यथा सदस्यं संपादन मंडळ किंवा निलकांतकडे चौकशी करू शकतात. ही चौकशी म्हणजे जाब विचारणे असते अश्या भ्रमात कुणीही राहू नये ही विनंती. तसेच केलेल्या चौकशीला बर्‍यापैकी उत्तर देण्याचा प्रयत्न झाला आहे. कुणाचेही समाधान होई पर्यंत प्रयत्न करत राहणे शक्य नाही.

बाकी "आमच्या कडुन" नेहमीच सहकार्य होते / राहिल.

हे अपेक्षीत आ॑हेच.

- नीलकांत

आपला लेख उडल्यास त्याला काही कारणे असतात. त्याची माहिती धोरणात मिळू शकते. अन्यथा सदस्यं संपादन मंडळ किंवा निलकांतकडे चौकशी करू शकतात

साहेब , आता बोललाच आहात तर इथेच नम्रपणे विचारतो. माझी " प्रार्थना किटक" ही पाककृती उडाली, त्याची कारणे आपण सांगितलेल्या खुलाश्या नुसार दोन होती.
१. ती पाककृती ह्या विभागात टाकली होती.
२. त्यातील फोटो ज्यांचे आहेत त्यांनी आक्षेप घेतला होता.
ह्यावर उत्तरा दाखल मी लिहीले होते , की पाककृती चे विडंबण पाककॄती मधे येणार नाही काय ? आणि जरी समजा चुकुन ते पाकृ मधे पडले , तर केवळ सेक्शन चुकला म्हणुन धागा उडवला जाऊ शकतो काय ?
फोटो वर ज्यांचा आक्षेप होता , त्यांचे फोटो काढुन टाकणे सहज शक्य नव्हते काय ? ह्या मुळे १००+ प्रतिसाद देणार्‍या लोकांच्या प्रतिक्रीया देखील उडाल्या होत्या .
वरिल मजकुर मी आपणास मला डिफेंड करण्या साठी विचारला होता. धोरणे आहेत मान्य आहेत , त्याचे पालन करणे हे ही मान्य. पण एखाद्याने जेन्युअनली एखादा लेख लिहावा , आणि तो असा उडवला जावा , ज्याचा धोरणांशी संबंध आहे असे वाटत नाही , हे कितपत योग्य आहे ? हे मला जाहिर लिहीण्याची मुळीच इच्छा नव्हती , परंतु जेंव्हा सहकार्य करतो तेंव्हा थोडे सहकार्य तुमच्याकडुनही अपेक्षित असावे असे वाटते . ह्या मध्ये मिपा प्रशासनाला दोष देण्याचा कुठलाही हेतु नाहीये हे आधीच स्पष्ट करतो ( नाही तर ब्र म्हणता पुन्हा .. .)

ही चौकशी म्हणजे जाब विचारणे असते अश्या भ्रमात कुणीही राहू नये ही विनंती.

"जाब विचारणे " हा शब्दप्रयोग अ‍ॅग्रेसिव्ह वाटला असल्यास क्षमस्व. बाकी भ्रम वगैरे नाही.

सेच केलेल्या चौकशीला बर्‍यापैकी उत्तर देण्याचा प्रयत्न झाला आहे. कुणाचेही समाधान होई पर्यंत प्रयत्न करत राहणे शक्य नाही.

हा बर्‍यापैकी प्रयत्न नसुन एक हस्यास्पद प्रकार आहे. एखाद्याची टिंगल उडवल्याचा किंवा खिजवल्याचा हा प्रकार वाटला. इतर सभासदांनी आणि संपादकांनी जरुर ह्यावर मते कळवावीत .

पुनरागमना नंतर संपादकिय कामात ढवळाढवळ केल्याचे / संपादकांविरुद्ध गरळ ओकल्याचे किंवा मिपा प्रशासनाची प्रतिसादांतुन / व्यनितुन / खरडींतुन खिल्ली उडवल्याचे दाखवुन द्यावे , मी स्वतः लॉगिन करणे बंद करीन .

सहकार्य दोन्ही बाजुंनी अपेक्षित.

वरिल प्रतिसादात जर कुठे शब्द कमी जास्त झाला असल्यास पुन्हा एकदा क्षमस्व.

- (भिकारी) टारझन

अरुण मनोहर's picture

5 Mar 2011 - 9:58 am | अरुण मनोहर

गवि किती महिने मिपावर आहात? सुद्दलेखनाला इथे फाट्यावर मारल्या जाते हे अजून माहीत नाय? इतके शुध्ध लिहीणे मिरवायचे असेल तर तिकडे नमो करा आणि इकडे गत व्हा.
- बात्या मेजर

नितिन थत्ते's picture

5 Mar 2011 - 7:40 am | नितिन थत्ते

सदर धाग्यावर काल रात्री (४ मार्च) ७० च्या आसपास प्रतिसाद होते. त्यातले जवळजवळ ५० आज सकाळला उडाले आहेत. ते सर्व काही मिपा + संपादकीय धोरणांची खिल्ली उडवणारे नव्हते.

माझेही दोन प्रतिसाद होते ते उडाले आहेत. त्यातला एक विजुभाऊंची मस्करी करणारा होता आणि तो हलके घेतल्याचे + आवडला असल्याचे विजुभाऊ यांनी त्यावर दिलेल्या प्रतिसादात दिसले होते.

माझा दुसरा प्रतिसाद श्रामोंची नक्कल करणारा होता. तो हलके न घेता जड घेतला असल्यास माहिती नाही.

सदर प्रतिसाद इथे न लिहिता संमं किंवा सरपंचांना व्य नि करायला हवा होता असे वाटत नाही.

चित्रा's picture

5 Mar 2011 - 9:14 am | चित्रा

संपादकांविरूद्ध इथे काय लिहीले गेले हे मला माहिती नाही, पण नीलकांत यांनी ते काढलेले आहे याचा अर्थ ते काहीबाही असावे. असे सर्व लिहीले गेले तेव्हा आपल्याला असे विचारावेसे वाटले का, की असे का लिहीले जावे? का त्यांच्याबाबतीत मस्करीची कुस्करी चालते? उत्तर खरडवहीतून दिले तरी चालेल.

संपादकीय धोरणांची खिल्ली उडवणे हा एकच निकष असू शकत नाही. एकदा नावांची विडंबने मान्य केली तर नावांची बेबंद विडंबनेही येतात. मग तेवढीच काढली तर संपादकांच्या नावाने पुन्हा गजर केला जातो. तेव्हा हे होणे पन्नास प्रतिक्रिया एकदम गेल्याने टळलेले आहे अशा भ्रमात होते. पण तो गजर झालाच, आणि जाग आली.

चित्रा's picture

5 Mar 2011 - 9:19 am | चित्रा

असे की, मूळ काथ्याकुटाशी संबंधित म्हणून आणि कोणाची तरी नक्कल करून जे प्रतिसाद आले आहेत, ते ठेवलेले दिसत आहेत.

माझेही दोन प्रतिसाद, मिपाच्या संपादकीय कामात ढवळाढवळ न करणारे असून सुद्धा उडवले गेले आहेत,

जाहीर निषेध

प्रीत-मोहर's picture

5 Mar 2011 - 10:10 am | प्रीत-मोहर

माझेही असेच ३-४ पप्रतिसाद उडवलेत ..जे फक्त मस्करीसाठी लिहिले होते ..

माझेही दोन प्रतिसाद, मिपाच्या संपादकीय कामात ढवळाढवळ न करणारे असून सुद्धा उडवले
गेले आहेत.
असेच म्हणतो.

डॉ. कुलदीप ऊठसुटे

वपाडाव's picture

5 Mar 2011 - 10:29 am | वपाडाव

प्र.का.टा.आ.

मुलूखावेगळी's picture

5 Mar 2011 - 9:55 am | मुलूखावेगळी

मी लग्नाला आलो आनि जेवयला ब्सलो तर काय १ आदीमानव १०१वा गुलाबजाम खात आणि वाढत आला आणि बोल्ला "तुम्हीच का ते मठात लिहिता.?"
तेवढ्यात १ पनीरबटरमसाला विथाउट पनीर घेउन १ राजकुमार आला आनि हेच बोल्ला.
मी सुखावलो, तरंगलो, बुडालो .

कुठेही गेले कि होते -विचारणा न पाठलाग
- मैदा

परिकथेतील राजकुमार's picture

5 Mar 2011 - 12:14 pm | परिकथेतील राजकुमार

संपादकीय कार्याचा पुर्ण आदर बाळगुन एक प्रश्न विचारायचा आहे.

मुळ धाग्यातच जर :-

इथे काही वेगळं करता आलं तर बघू म्हणून एक आचरट विनंती करु इच्छितो. माझा निम्ननिर्दिष्ट मजकूर वाचून झाल्यानंतर आपण स्वतःची कॉमेंट न देता इतर कोणा सदस्यमित्राची कॉमेंट (अर्थात कल्पून) लिहावी.

म्हणजे, "क्ष"च्या शंकायुक्त पण मुद्द्याचे धागे बरोब्बर उचकटणार्‍या पांढुरक्या प्रतिक्रिया..

एखाद्याच्या अभ्यासपूर्ण संयत..

...काहींच्या थट्टेखोर आणि शालजोडीतल्या..

कोणाच्या वळणदार पण काय ते नेमके धुक्यात ठेवणार्‍या..

कोणाच्या तडकावणार्‍या..

असे आवाहन असेल, तर प्रतिक्रीया त्याला अनुसरुनच लिहिल्या जाणार ना ? मग सरळ गवि ह्यांना हा प्रकार त्यांना वाटला तशा गमतीच्या मार्गाने न जाता भलतीकडे निघाला आहे किंवा जुने स्कोर सेटल करण्याचे प्रयत्न होत आहेत असे निदर्शनास आणून त्यांच्या संमतीने धागाच अप्रकाशीत करता आला असता. मला नाही वाटत सदर प्रकार बघता गविंनी सहकार्य नाकारले असते.

हे सर्व लिहायचे कारण येवढ्यासाठीच की मी व इतर काही लोकांच्या प्रतिक्रीया ह्या एकमेकांची खिल्ली उडवणार्‍या होत्या, ज्यांचा प्रशासनाशी अथवा जुने स्कोर सेटल करण्याशी काही संबंध नव्हता. (असे ज नजरचुकीने झाले असल्यास क्षमस्व) त्यादेखील उडाल्याने वाईट वाटले. आमचे लिखाण हे व्यास किंवा वाल्मिकींचे लिखाण नाही हे मनापासून मान्य आहे, पण नियमात बसणारे लिखाण उडाल्याने वाईट वाटले.

शेवटी प्रश्न असा उरतो की अशा लेखावर प्रतिक्रीया द्याव्या तरी कशा ?

हे भलते काही वळण लागेल असं वाटलं नव्हतं.गमतीचा भाग अपेक्षित होता.
सुरुवातीचे काही तास काहीच आक्षेपार्ह झालं नव्हतं.नंतर उशीरा काहीतरी झालं असावं.
विडंबनात्मक धागे काढण्यापूर्वी विचार करावा लागेल. हो,असं काही लक्षात आलं असतं तर मी कोण धागा उडवण्यास हरकत घेणारा..?
अचानक सकाळी उठून मोबाईलवर रिफ़्रेश केलं तर प्रतिक्रिया संपादन दिसलं.माझ्या धाग्याने जे झालं त्याबद्दल दिलगिरी.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

6 Mar 2011 - 4:19 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>माझ्या धाग्याने जे झालं त्याबद्दल दिलगिरी
कुठल्याही आणि कितीही चांगल्या धाग्याचे रुपांतर अशा धाग्यात करणे हा येथील काहीजणांच्या हातचा मळ आहे. तुम्ही दिलगीर व्हायची काहीही गरज नाही असे माझे मत आहे. सो चिल माडी.

नरेशकुमार's picture

5 Mar 2011 - 3:24 pm | नरेशकुमार

चला, या निमित्ताने पुना येकदा आढावा मिळाला.
येक लेसन लर्नट् झाला.

प्रास's picture

5 Mar 2011 - 3:40 pm | प्रास

गविजी, मला वैयक्तिकरीत्या तुमचं वरील लिखाण खूप आवडलं. त्यातही सदस्याने दुसर्‍या कुणाच्या स्टाईलने प्रतिक्रिया द्यायची हे ही 'जबरा' होतं. तशा आलेल्या प्रतिक्रिया वाचायला मजाही येत होती. मध्ये कुठे माशी शिंकली कळायला मार्ग नाही. सं.मं नि टारझन भौ यांची झकाझकी आताही मराठीच्या भाषिक संपन्नतेची ग्वाही देतेय म्हणण्यास प्रत्यवाय वाटत नाही.

असो. जे झालंय त्याला तुमचा धागा कारणीभूत होता असं वाटत तरी नाही.....

बाकी सर्व "कृष्णार्पणमस्तु।"

भडकमकर मास्तर's picture

6 Mar 2011 - 2:25 am | भडकमकर मास्तर

सहमत..
धाग्याची आयडिआ भारी होती....

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

6 Mar 2011 - 3:17 am | निनाद मुक्काम प...

धाग्याची कल्पना १ नंबर
ह्यावरून एक लग्न आठवले
माझ्या बायकोची आजी नी तिच्या आजोबांच्या लग्नाचा किस्सा (खराखुरा )
दुसऱ्या महायुद्धाचा काळ तो .पहिल्या प्रहरात आम्ही जेते होतो
.
विजयी वीर गावोगावी आले .त्याचे भरपूर कोड कौतुक झाले .त्यात आमचे आजोबा (म्हणजे बायकोचे / एकूण एकच)
रजा थोडी होती .अजून अर्धा युरोप टाचेखाली येणे बाकी होते .म्हणून एका रविवारी अचानक ह्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला .
ह्यांच्या सारख्या अनेक सैनिकांना लग्न करायचे होते .म्हणून गावचा चर्च हाउस फुल
तालुक्याच्या गावाला भव्य चर्च (जगातील पहिल्या ५ येणारे ) तेथे जाऊन लग्न करायची टूम निघाली .प्रचंड भरलेल्या बस मध्ये ( आपली एसटी ची गर्दी कल्पावी )
त्यावेळी जर्मनीत बसेस कमी आणी रणगाडे /फायटर प्लेन्स जास्त होते .

त्यांनी धावत पळत स्वताला बस मध्ये ढकलले .
ह्या गडबडीत लग्नाचे साक्षीदार मात्र खालीच राहिले .
मग आयत्या वेळी बस मधील दोन अनामिक व्यक्ती साक्षीदार म्हणून आयत्यावेळी तयार झाल्या ( सैनिक हे त्यावेळी राष्ट्राचे आवडते हिरोज होते )

सदर किस्सा आमच्या ओमाने (जर्मनीत ओमाला आजी म्हणतात ) तिच्या वाढदिवसाला सांगितला .मीच खर तर खोदून खोदून तिला विचारले तेव्हा हि हकीगत कळाली.
( माझ्या सासूने एकदा ह्या चर्च मध्ये गेल्यावर ''माझ्या आईचे आणि वडिलांचे एकच वेळी एकच दिवशी एकच ठिकाणी येथे लग्न झाले असे सांगितले होते'' )
मला प्रश्न पाडला . ''ह्यांच्या घरापासून एवढ्या लांब आणि भव्य दिव्यं चर्च मध्ये का बरे लग्न केले''
.कदाचित हेर फ्युरर ने ह्यांच्या पराक्रमाची विशेष दखल घेऊन ......
दुर्दैवाने ह्या घटनेचा फोटो नाहीं म्हणून तो टाकू शकत नाहीं .
आख्यानात ओमाच्या वाढ दिवस ह्या भागात टाकणार होतो .पण येथे संधी मिळाली (म्हणजे संधी मी निर्माण केली )

लेख काय / प्रतिक्रिया काय

शेटजी /अवाढव्य खर्च ह्यांचा ह्या प्रतिक्रियेशी काही तरी संबंध आहे का ?
स्वताची लाल करणारा
मुक्काम पोस्ट जर्मनी

प्रास's picture

6 Mar 2011 - 11:47 am | प्रास

जर्मनीत ओमाला आजी म्हणतात

कस्काय जम्तं बुवा?

माझ्या सासूने एकदा ह्या चर्च मध्ये गेल्यावर ''माझ्या आईचे आणि वडिलांचे एकच वेळी एकच दिवशी एकच ठिकाणी येथे लग्न झाले असे सांगितले होते''

एकमेकांशी असाही उल्लेख केलेला ना?

लेख काय / प्रतिक्रिया काय

शेटजी /अवाढव्य खर्च ह्यांचा ह्या प्रतिक्रियेशी काही तरी संबंध आहे का ?
स्वताची लाल करणारा

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ ह्यॅ

तेव्हढं सोडून सोडा हो आता..... :-D

मराठी_माणूस's picture

6 Mar 2011 - 11:10 pm | मराठी_माणूस

हेच म्हणतो

आमच्याकडे सगळं जमतं...लोक खूप खूप हुशार आहे...
थंडी खूप असल्याने सगळीकडे कोट घालून फिरावे लागते....इथे लग्न सुद्धा एकमेकांशीच होतात...
तुमच्यासारख्या टीनपाट माणसाला समजणार नाही...इलेक्ट्रोनिक्स मध्ये कॉम्पुटर असतं
आमच्याकडे लग्नात कमी लोक बोलावून भरपूर खाणे, गाणे, पिणे, नाचणे असते...
सगळीकडे भरीचे फर्निचर असते..त्यावर टेबल क्लोथ ठेऊन मध्यभागी एक बुके ठेवतात त्याला सेंटर पीस म्हणतात..

मला चिकन खूप आवडते...त्याबरोबर छानशी वाईन असेल तर मग काय विचारता...
आंतरराष्ट्रीय समूहात आम्हाला बरेच महत्त्व आहे...
इथे राजकारणी लोकांची चिंता करतात आणि त्यांच्या सुखासाठी काय वाट्टेल ते करतात...आता त्यातही काही

काही असे तसे लोक असतातच...
पण मग लोक त्यांना पुढच्या निवडणुकीत निवडून देत नाहीत...
तुमच्यासारख्या कंपूबाजाला उत्तर द्यायची नव्हते पण सवय अशी जाते का?

- मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी, बुद्रुक

प्रास's picture

7 Mar 2011 - 7:29 pm | प्रास

साद काय प्रतिसाद काय......?

तुमचं आपलं काहीतरीच.....

:-)

चिंतामणी's picture

6 Mar 2011 - 4:29 pm | चिंतामणी

पण आता येथे काहिही पोस्ट करायला धीर होत नाही.

कानडाऊ योगेशु's picture

6 Mar 2011 - 11:15 pm | कानडाऊ योगेशु

+ १
- छगनबिहारी

श्री गावसेना प्रमुख's picture

7 Mar 2011 - 9:06 am | श्री गावसेना प्रमुख

बी जे पी कड पन ध्यान द्या हो आमचे वरुण

कवितानागेश's picture

8 Mar 2011 - 7:27 pm | कवितानागेश

कोण श्रीमंत?
धन्यवाद.

अवांतरः जर्मनीत ओमाला आजी म्हणतात'
तसेच ओबामाला आजोबा म्हणतात काय?

कृपया राग मानू नये,..किंवा कसेही...

रोकडिया

--
प्रत्येक कंपूद्वेष्टा हा .............,... नसतो पण प्रत्येक .............,... हा कंपूद्वेष्टा असतो..

स्पा's picture

7 Mar 2011 - 2:09 pm | स्पा

.

प्रतिक्रिया संपादित केलेली आहे

परिकथेतील राजकुमार's picture

7 Mar 2011 - 1:51 pm | परिकथेतील राजकुमार

अनावश्यक अवांतर टाळल्यास कृपा होईल

-- रजनीलकांत

श्री. स्पा वरती नीलकांत ह्यांची सूचना वाचली नसल्यास खाली पुन्हा देत आहे, ती अजुन एकदा निट वाचावी.
ह्या धाग्यावर काय गोंधळ झाला हे माहिती असताना पुन्हा अशी प्रतिक्रीया कशासाठी ? तुम्ही ह्या असल्या प्रतिक्रीया देता आणि मग विनाकारण टार्‍याचे बघुन इतर पण प्रतिसाद देतात असे उगा त्या टार्‍याचे नाव खराब होते.

आपण समंजस असल्याने आपली प्रतिक्रीया बदलाल हि अपेक्षा. त्यामुळे बुच मारलेले नाही.

धन्यवाद.

अनावश्यक प्रतिक्रिया
प्रेषक नीलकांत दिनांक Sat, 05/03/2011 - 00:18.
नमस्कार,

या धाग्यावर टारझनने अनावश्यक प्रतिक्रिया देत. मिसळपावच्या व्यवस्थापकीय धाग्याची चेष्टा केली आहे. सदर बाबीची मिपा व्यवस्थापन अत्यंत गंभीर दखल घेत आहे. आणि ती प्रतिक्रिया व त्यासोबतच अन्य उपप्रतिसाद उडवण्यात येत आहेत.

याच सोबत टारझन यांना सक्त ताकीद देण्यात येत आहे की त्यांनी व्यवस्थापकीय लेखांची व सूचनांची अशी टर उडवल्यास यापुढे त्यांचे खाते कुठलीही पुर्वसूचना न देता निलंबीत करण्यात येईल.

चेष्टा मस्करी एका मर्यादेपुढे जाऊ नये हेच उत्तम होईल.

सुहास..'s picture

7 Mar 2011 - 3:45 pm | सुहास..

.

पांखडीस झोडपांडे

स्वैर परी's picture

7 Mar 2011 - 4:02 pm | स्वैर परी

पैसा आहे .. उडवा कसाही. ह्याना कोण आहे विचारायला. जनता उपाशी मेली तरी ह्यांचे काय जातेय.
नशीब निदान केटरर , कुरीअर, मंडप वल्यांची तरी कमाई होतेय. सगळे मेले सारखेच!

- मिपा ग

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Mar 2011 - 12:22 am | निनाद मुक्काम प...

हा प्रतिसादावर स्वानुभवाने सांगतो .
आंधळा नी पांगळा अनुयय करून अंकाचा पाऊस पाडून आपण एखाद्या व्यक्तीच्या मित्र मंडळीत शिरू असा गैरसमज टाळावा.

मला उमजेलेल शांतता कोर्ट सांगतो .
आपण आभासी जगतात जेव्हा एखाद्याला काल्पनिक लक्ष्य समजून टार्गेट करतो.
तेव्हा आजूबाजूचे त्याला पाठिंबा देतात (अंकाचा पाऊस किंवा वाक्यास अनुमोदन मग तिसरा त्या टार्गेट विषयी बोलतो .त्याला ही पूरक प्रतिसाद मिळतो .
मग नाटकातील काल्पनिक न्यायाधीश म्हणतात तसे '' खेळ थांबवू नका चालू राहू दे , मजा येत आहे .
हळू हळू टार्गेट वर बोलणारे वाढत जातात त्याच वेळी ह्या आभासी खेळत टार्गेट च्या मनस्थितीची कोणी कल्पना करत नाही .
त्याने उत्तर दिले कि नव्या दमाचा इसम नव्या मुद्यांसह येतो .( कारण आता आपण काहीही लिहिले तरी त्याचा खरे खोटे पणा सिद्ध करण्याची गरज नसते ) त्याच लिहिण्याच्या अनुषंगाने कथा पुढे चालत जाते .
थोडक्यात टार्गेट चा बेणारे बाई होण्याशी शक्यता असते .( माझी येथे बेणारे बाई झाली असे मी विधान करत नाही आहे .पण एखाद्याचा होण्याचा शक्यता असते .)
येथे काल्पनिक खेळात कैफ चढल्याने तो थांबवणे कुणाच्याही हाती रहात नाही .

झुंडीचे मानसशास्त्र हेच सांगते ह्यात झुंडीला विशेष फरक पडत नाही त्यांना फक्त एक बोलणारा लागतो .पण बोलणारा मात्र चटकन लोकप्रिय होतो व मात्र त्याच्या पडत्या काळात हेच पाठीराखे गायब होतात .

येथे नाट्याला थोडे वेगळे वळण लागले .

आपण लिहितो त्याला भरपूर प्रतिसाद मिळत आहे हे .पाहून मग मस्करी ची कुस्करी कधी झाली हे लक्षात येत नाही . हा संधर्भ आपल्यात इतके दिवस चाललेल्या सुसंवादावर आहे .
.( आपण केलेली साधी मस्करी हि एखाद्या व्यक्तीला ह्या बाबतीत मला साधी वाटत नाही .
.ह्यात दोन शक्यता असतात
१) तुमचा दृष्टीकोन हा त्या व्यक्तीपेक्षा वेगळा असतो
.२) दुसर्यावर जेव्हा मस्करी केली तेव्हा ती साधी वाटते पण स्वतावर अशी कोणी केली तर ती साधी वाटत नाही

उदा .( कंपूबाजी व (अनावश्यक शेरे ) हे मिपावर आढळतात तेव्हा का एवढा त्रास करून घेता / फिरून या
असा सल्ला देणे ही एक गोष्ट .व स्वतावर कोणी खरड केली ( व ती त्या व्यक्तीस अनावश्यक वाटली .कि केवढा मनस्ताप होतो . हे माझी खरडवही पाहिल्यास कळून येईन .)

तात्पर्य - ज्याचे जळते त्यालाच कळते )
स्पा आणी इतर काही सदस्यांनी आमच्या खेळात सांमत ह्यांची भूमिका वठवावी लागली ..

जेव्हा आपण आंधळा अनुयय करून एखाद्याच्या विधानांवर अंकाचा पाऊस पडतो तेव्हा आपण त्या व्यक्तीस नुकसान पोहचवू शकतो. .त्याचा राजेश खन्ना करू शकतो .( ही उपमा खिल्ली उडवण्यासाठी नसून एका मासिकाच्या संपादकाने माझ्याकडून फुकटात ३ पिग रिचवून झाल्यावर अवांतर गप्पा खूप वर्षापूर्वी केल्या होत्या ( सदर पेग हे हॉटेल मधून दिले होते .माझ्या खिशातून नव्हे) .त्याने राजेश खन्ना ह्याला त्याच्या भवतालच्या चमच्यांनी कसा संपवला हे सांगितले होते .)

ह्या लेखात टारझन ह्यांना मित्र व आंधळे अनुयायी दोन्ही दिसून आले असतील .
मला नेहमीच उस्फुर्त पणे सल्ला किंवा प्रतिक्रिया देणाऱ्या मित्र परवडतील. ( आमचा आंधळा अनुयय कोण करणार म्हणा ?)
हा सल्ला किंवा विनंती उपदेश अजिबात नसून मला उस्फुर्त पणे जे लिहावेसे वाटले ते लिहिले .

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Mar 2011 - 8:57 pm | विश्वनाथ मेहेंदळे

हे सगळे ठीक आहे. बरेच मुद्दे पटले. शांतता... मधील परिस्थितीशी केलेली तुलना पण छान आहे, पण इथे प्रतिसाद दुसऱ्याच्या शैलीत लिहिणे अपेक्षित होते ना रे. वरून हे मुद्दे पण इथल्या चर्चेला गैरलागू आहेत (लग्न किंवा धोरणात बसतील अशा प्रतिक्रिया देणे).

पण तुला काय म्हणायचे आहे याचा अंदाज आला.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Mar 2011 - 10:40 pm | निनाद मुक्काम प...

मेहंदळे साहेब आपला मुद्दा मान्य .तरी मी अवांतर केले .कारण परा ह्यांच्या प्रतिसादात पूरक असा प्रतिसाद देऊन माझी बाजू /भूमिका मांडली .माझ्या अनेक मित्र /मैत्रिणी माझ्या पासून दुरावतील तेही शुल्लक गैरसमजामुळे .हे मला मान्य नव्हते ( आधीच मी मायभूमीला दुरावलो आहे .तेच ...)म्हणून आपणास खव केली . ती जर संबंधित मान्यवर पाहतील तर माझी भूमिका अजून स्पष्ट होईन व इतर कोणाच्या लेखावर मी फक्त
विषयाला अनुरूप लिहीन

स्पा's picture

8 Mar 2011 - 7:38 pm | स्पा

??????????????????????????????????????????????????????????????????????

विश्वनाथ मेहेंदळे's picture

8 Mar 2011 - 8:57 pm | विश्वनाथ मेहेंदळे

शांतता... बघ. मग कळेल तो काय म्हणतो आहे ते.

नगरीनिरंजन's picture

25 Mar 2011 - 12:04 pm | नगरीनिरंजन

आताच्च मटा वर ही.
लिंक मिळाली आता या खर्चाने.
.
बर्‍याच लोकाना पैसा मिळाला असेल हे खर पण पइश्याची एवढी उधळपट्टी पाहून ज्या लोकना मिळाला नाही त्यांची..........
.
मी परदेशात असताना फाईव स्तार होटेलात मोठमोठे लग्न सोहळे पाहिले पण ते शक्यतो.
खाजगी
.
स्वरूपाचे असतात आणि सामान्य माणसाला ते जळवत नाहीत. या भडक प्रदर्शनाने खर्चाच्या उपयोगा पेक्षा त्यातून होऊ घातलेला
सामाजिक भडका जास्त उपदरवकारक आहे
.