संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत अमराठी योगदान

अजय's picture
अजय in काथ्याकूट
7 May 2008 - 7:18 pm
गाभा: 

राज ठाकरेंनी मराठीचा कैवार घेऊन शिवाजी पार्कवर केलेल्या भाषणानंतर, अनेक मराठी प्रेमी शब्दांचे फुलोरे आणि भावनांचे अंगार ठिकठिकाणी लाह्यांसारखे फुलवताहेत. अमराठी माणसांना परप्रांतिय म्हणून वेगळी ओळख (?) दिली जात आहे.
पण, मराठी भाषकांच्या संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी परप्रांतीय (आजच्या भाषेत) म्हणवल्या जाणाऱ्यांनीही सक्रीय सहभाग घेतला होता. आपापल्या परिने बलिदानही दिले होते. याची माहिती सकाळ या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर वाचायला मिळाली.....

आजच्या मराठी-परप्रांतिय वादाच्या पार्श्‍वभूमीवर त्यातील संदर्भ नक्कीच महत्त्वाचे आहेत. आपणा सर्वांच्या विचार मंथनासाठी

http://www.esakal.com/esakal/05012008/Maha_DinB377984A0E.htm

(मिपा वर बाहेरील संकेतस्थळांचे दुवे देऊ नये, ही आदेशवजा सुचना असूनही त्याचा भंग करीत आहे. त्याबद्दल मनापासून दिलगिरी. आजच्या संदर्भात ते महत्त्वाचे असल्यामुळे सर्वांनी वाचावे असे वाटते...... म्हणून)

प्रतिक्रिया

विजय भांबेरे's picture

7 May 2008 - 8:30 pm | विजय भांबेरे

मित्र अजय
तु चर्चेकरीता घेतलेला मुद्दा हा चर्चेसरखाच आहे त्यावर चर्चा झलीच पाहिजे !
मला तरी वटते राजचा मुद्दा योग्य आहे परन्तु त्याचा कही प्रमाणात मार्ग मात्र चुकतोय कारण याच मुद्द्याला घेवुन बाळासाहेब मोठे झाले आणि ते मराठि माणासाला विसरले प्रामाणिक पणे या मुद्द्याला घेवुन काम करणारा माणुस हवाय!
राज ठाकरे या मुद्द्याला कितपत न्याय देतात तेच बघाचय !

विकि's picture

8 May 2008 - 12:28 am | विकि

त्या भाषणाचा आणि या विषयाचा संबंध काय आहे? आजच्या विषयावर भाष्य करा.
आपला
कॉ.विकि

इनोबा म्हणे's picture

8 May 2008 - 1:25 am | इनोबा म्हणे

त्या भाषणाचा आणि या विषयाचा संबंध काय आहे? आजच्या विषयावर भाष्य करा.
कॉ.विकि यांच्याशी सहमत

सकाळमधील लेख वाचल्यानंतर असे मानावे लागेल की,बरेचसे लोक पोलिसांच्या चूकीमूळे हूतात्मे झाले असावे.(पहा:कोण होते हे हूतात्मे?) पाहूण्यांना सोडून घरी परतत असताना,घराजवळ आंदोलन बघत उभे असताना आणि गच्चीवर नळ बंद करायला गेले असताना पोलिसांच्या गोळीची शिकार झालेल्या हुतात्म्यांचा(?) यात उल्लेख केला आहे.मात्र प्रत्यक्ष आंदोलनात भाग घेतला असताना हूतात्मा झालेल्या एकाचाही यात स्पष्ट उल्लेख नाही.याच प्रकारे काही परप्रांतियांचा बळी गेलेला असू शकतो,ही शक्यता नाकारता येत नाही.महत्वाची गोष्ट म्हणजे लोकसत्ताच्या राजू परुळेकरांचा "होय,हा महाराष्ट्र धर्म आहे!" हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतरच सकाळला 'परप्रांतियांचे हौतात्म्य' का आठवले? याचे कारण म्हणजे राजू परुळेकरांच्या त्या लेखामध्ये सकाळने संयूक्त महाराष्ट्र चळवळी दरम्यान आंदोलन विरोधी भूमिका घेत काँग्रेसला कशी साथ दिली होती,याचा स्पष्ट उल्लेख केला आहे,हे असु शकते. आचार्य अत्रेंसारख्या लोकप्रिय लेखकाने/नेत्याने सकाळवर त्यावेळी टिका केली होती. याचे कारण एकच होते.महाराष्ट्रविरोधी भूमिका!(पहा: होय,हा महाराष्ट्रधर्म आहे!) आजही सकाळ तेच करते आहे.

सकाळला जर परप्रांतियांचा एवढा पूळका असेल तर त्यांनी परप्रांतिय पत्रकारांना नोकर्‍या द्याव्या.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

llपुण्याचे पेशवेll's picture

8 May 2008 - 1:39 am | llपुण्याचे पेशवेll

हे म्हणजे "मोर्चा येत होता आणि तो मी वडापाव च्या गाडी शेजारी उभा राहून बघत होतो. तेवढ्यात पोलिसानी गोळीबार चालू केला. त्यात निष्कारण माझा बळी जाऊ नये म्हणून पळून जाऊ लागलो तोच रस्त्यावरच्या शेणावरून पाय घसरून पडलो. तर पोलीसानी मला आंदोलनकर्ता म्हणून गोळी मारली. आणि मी मेलो. आणि झालो हुतात्मा संयुक्त महाराष्ट्रासाठीचा" अशातला प्रकार झाला तो. सकाळच्या या भूमिकेचा अत्र्यांच्या शब्दातच विरोध केला पाहीजे असे वाटते.
पुण्याचे पेशवे

रम्या's picture

8 May 2008 - 12:46 pm | रम्या

अगदी सडेतोड उत्तर !!!!
विद्वत्तेचा प्रदर्शानाचा रोग या महाराष्ट्राला जडलेलाच आहे. आणि हा रोग चुकिच्या वेळीच डोकं वर काढतो.
मूळ चर्चेच्या अगदी वेगळी भुमिका घेऊन 'आम्ही बघा कसे सर्व बाजूने विचार करत आहोत, तुम्ही मात्र फारच संकूचित विचार करणारे बुवा' असं दर्शवण्याचा प्रयत्नच आजकाल फार दिसतो.
निखिल वागळे नावचा स्वघोषीत विद्वान प्राणि आज फार चेकाळलाय.
ब्रेकिंग बातम्यांच्या शोधात पिसाटलेल्या वृत्तवाहिन्यांना सुद्धा असेच स्वघोषित विद्वान खाद्य पुरवतात असं माझं मत आहे.
राज ठाकरेंच्या सभेचं थेट प्रक्षेपण सुरू असताना एका वाहिनीवर या प्राण्याला विद्वत्ता ओकायला बोलावलं होतं. हा चक्क म्हणाला "राज ठाकरेंच्या सभेला काही विशेष गर्दी झाली नाही"! आम्हाला मात्र या सभेत शिवाजी पार्क तुडुंब भरण्याएवढी माणसं दिसली. राज ठाकरेंच्या भाषेत बोलायचं तर हा निखिल वागळे काहीही बोलणार आम्ही विश्वास ठेवायला आम्ही काय च्युतिये आहोत का??

राजू परूळेकरांनी लेखात स्पष्ट पणे सांगितलं आहे. राज ठाकरेंनी भूतकाळात काय केलं, ते भविष्यात 'ब' आणि 'ऊ' ठाकरेंसारखे वागणार नाहीत हे कशावरून? हे मुद्दे फिजुल आहेत. महाराष्ट्राच्या हिताआड येणार्‍यांना आता लोळवणे हाच खरा धर्म आहे." पण हे तथाकथित विद्वान (सकाळ आणि निखिल वागळे) सारखे नेमके याच्या उलट करत आहेत.

मन's picture

8 May 2008 - 3:36 pm | मन

सकाळमधील लेख वाचल्यानंतर असे मानावे लागेल की,बरेचसे लोक पोलिसांच्या चूकीमूळे हूतात्मे झाले असावे.(

चुकुन पडलं अन् दंडवत झालं

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

धमाल मुलगा's picture

8 May 2008 - 3:31 pm | धमाल मुलगा

बरं मग?
थोडा वेळ धरु आपण गृहित की काही अमराठी जनांनी 'संयुक्त महाराष्ट्रा' साठी छातीवर गोळ्या झेलल्या.
पण त्यांनी का झेलल्या त्या गोळ्या? महाराष्ट्रासाठी ना?
मग ह्या उपर्‍या हलकटांनी ठेवावा ना त्यांचा आदर्श! रहावं ना नीट मिळून मिसळून...तुमच्या घरात रोज हाणामार्‍या चालतात म्हणून तुम्ही जिथं पाहूणे म्हणून आला आहात तिथंही तुम्ही तेच कसं करता? लायकीत रहा ना! तिथं तुम्हाला दोन वेळा गिळायला नाही मिळत म्हणून इथं येता ना? मग इथल्याच लोकांवर दादागिरी कशाला? व्हा ना इथल्या मातीशी एकरुप....

राजचा मुद्दा योग्य आहे परन्तु त्याचा कही प्रमाणात मार्ग मात्र चुकतोय

असेलही चुकत....पण हातापाया पडून कधी कोणी ऐकलय का महाराष्ट्राचं? टाळकी सडकल्याशिवाय येते का त्यांना अक्कल?

कारण याच मुद्द्याला घेवुन बाळासाहेब मोठे झाले आणि ते मराठि माणासाला विसरले

पण जेव्हा केलं तेव्हा मराठी माणसाला लुंगीवाल्यांच्या दहशतीतून काढलंच की बाहेर! केलेल्या कामाचं माप ज्याच्या त्याच्या पदरात टाका ना!

प्रामाणिक पणे या मुद्द्याला घेवुन काम करणारा माणुस हवाय!

१००००००००००% सहमत !!!
वाट पाहूया, कदाचित तो माणूस राज ठाकरेही असु शकतो...अपेक्षा ठेऊया ना! नाहीच पुर्ण झाली तरी लुंगीवाल्यांसारखं भैय्ये तरी नीट रहायला शिकतील ना?

रम्या's picture

8 May 2008 - 4:59 pm | रम्या

राजचा मुद्दा योग्य आहे परन्तु त्याचा कही प्रमाणात मार्ग मात्र चुकतोय
योग्य मार्ग कोणता हे सांगेल का कुणी?
हे चुक, ते चुक हे बोंबलायला कुणाच्या बापाचं काय जातयं.
तुम्हाला पोरं होत नाहीत आणि दुसर्‍यांना झालं तर ते काळं ठुणगं म्हणून विश्लेषण करता? भारतातले सगळे गांधीवाद बरोबर घेऊनच काम करतात का? एकटा राज ठाकरेचं वागणं तेवढं चूक का?
आपला फायदा बघा की? राज ठाकरे महान आहे असं कुठं म्हणतंय कोण? पण त्याच्या वागण्याचं विश्लेषण करायची हि वेळ आहे का? मराठी इथे पाय रोऊ दे. मग निवांत चालु द्या तुमचं गांधीवादाचं तुणतुणं.

वाट पाहूया, कदाचित तो माणूस राज ठाकरेही असु शकतो...अपेक्षा ठेऊया ना! नाहीच पुर्ण झाली तरी लुंगीवाल्यांसारखं भैय्ये तरी नीट रहायला शिकतील ना?
अगदी बरोबर!
तो माणूस राज ठाकरे असेल किंवा नसेल हा मुद्द बाजूला काढला तरी चालेल. पण यामुळे मराठीवर टाच आणल्यास लढवय्या मराठी माणूस कधीच सहन करणार नाही हा संदेश तरी पोहोचेल. राज ठाकरेंचं आंदोलन दाबलं तर काय साध्य होईल सांगा पाहू? उलट प्रसारमाध्यामांचा दबाव आणून मराठी चळवळ सहज तोंडघशी पाडता येईल हेच सिद्ध होईल. हे चालेल का?

यू पी बिहारी लोकांना लक्ष केलं गेलं हे तर फक्त निमित्त होतं. वास्तवि़क मला वाटतं महाराष्ट्राच्या संस्कृतिच्या आड येणार्‍या सगळ्यांनाच हा इशारा आहे असं समजायला काहीच हरकत नाही.
म्हणजे 'लेकी बोले सुने लागे ' सारखं.

मनस्वी's picture

8 May 2008 - 5:16 pm | मनस्वी

+१

बाकी "संयुक्त महाराष्ट्र निर्मितीत अमराठी योगदान" बद्दल इनोबांनी दिलेला हुतात्म्यांच्या लेखाचा दुवाच सर्व काही सांगतो.
समाजातील प्रत्येक किडीला कारणीभूत राजकारणच आहे असे मला वाटते.

विजय भांबेरे's picture

8 May 2008 - 7:37 pm | विजय भांबेरे

राजचा मार्ग चुकतोय माझे असे बोलने काहि लोकाना पटले नाहि कारण बाळासाहेबाच्या वेळी देखिल असेच झाले होते तेव्हा देखिल भावनीक मुद्यामागे धावणारी मडळी होति पुर्न महाराष्ट्राची जणता पाठिमागे होति भावनीक मुद्याच्या आधारे सत्ता मिळवुन मराठि मणासासाठि साडेचार वारशात काय दिवे लावले हे तुम्ही सागु शकता का !

आपला फायदा बघाताना डोळे उघडे ठेवुन आपला फायदा बघा!

राजनी कायदा मोडुन जर कोणतेहि आदोलन केले तर ते मोडुन काडायला वेळ लागणार नाही म्हनुन मार्ग चुकतोय असे मि म्हणट्ले !

महाराष्ट्राच्या संस्कृतिबद्द्ल बोलायच झाल्यास तिला मरण नाहि राज असो अगर नसो !

विश्लेषणाबद्दल बोलायच झाल्यास तो मरठि माणसाचा स्वभाव आहे त्याला मी अपवाद नाहि!

विजय भांबेरे

रम्या's picture

9 May 2008 - 11:13 am | रम्या

भावनीक मुद्याच्या आधारे सत्ता मिळवुन मराठि मणासासाठि साडेचार वारशात काय दिवे लावले हे तुम्ही सागु शकता का !

असं मुळीच म्हणायचं नाही आहे. राज ठाकरे सुद्धा काही भविष्यात दिवे लावतील असही छाती ठोक पणे म्हणता येणार नाही. राज ठाकरे नी मांडलेला मुद्द्याला अहिंसा, चुकिचा मार्ग, भावनिक मुद्द्याला हात घालणारे राजकारण असे संदर्भ देऊन जो बगल दिला जातोय त्याबद्द्ल आक्षेप आहे.
राज ठाकरें यांनी वापरलेली शिवराळ भाषा, त्यांची तथाकथित चिथावणीखोर वक्तव्यं यावर प्रसिद्धी माध्यमांनी बराच उहापोह केला आहे पण राज यांनी केलेल्या युक्तिवादाचा कोणत्याही वर्तमान पत्राने विशेष अशी दखल घेतल्यासारखं वाटलं नाही. अगदी मराठी वर्तमान पत्रांनीही नाही. राज ठाकरें यांनी मांडलेले मुद्दे लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. आणि कुठे हा विषय निघालाच तर मात्र पुन्हा आपले विचारवंत लगेच शिवसेनेचा पुर्वेइतिहास, शिवसेनेनी मराठी माणसांसाठी कसं काहीच केलं नाही, राज यांनी शिवसेनेत असताना काय दिवे लावले असा विषय बदल करण्यात येतो. आक्षेप याबद्द्लच आहे.
आपला फायदा बघाताना डोळे उघडे ठेवुन आपला फायदा बघा!
मग विश्लेषण करताना डोळे बंद का? मराठीची चाललेली परवड ही काय लपून राहिलेली गोष्ट आहे. महाराष्ट्रात उत्तरप्रदेश दिन साजरा करणार्‍यांचं विश्लेषण का होत नाही? हि भुमिका घेतली शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी आणि त्याच्या अगदी विरोधी भुमिका घेतली राज ठाकरेंनी त्याचं विश्लेषण करायची का लाज वाटते? पण हे नजरेआड करून विश्लेषण होतं ते फक्त राज शिवसेनेसारखं भावनेला हात घालून राजकारण करताहेत याचं. आता हेच पहा ना. मिपावर देखील 'पुण्यातल्या मराठी' बद्द्लच्या चर्चेत आपण म्हणतो मी एका मॅकडोनाल्डमध्ये जाऊन मराठीत ऑर्डर दिली. अरे दिली म्हणजे काय? महाराष्ट्रात मराठीमध्ये बोलणार नाही तर काय यूपी, बिहारमध्ये बोलणार.? पण एवढ छोटसं वाक्य आपण मराठीत बोललो याच काय अप्रुप वाटतं आपल्याला!! आपल्याला हि बात मिपावरच्या चर्चेत उत्तराला देण्याइतकी महत्वाची वाटावी आणि इतरांनी "बरं हाणलं त्या मॅक्डोनाल्डवाल्याला" अशी प्रतिक्रिया द्याविशी वाटणे यातूनच मराठीची अवस्था केविलवाणी झाली आहे हे स्पष्ट होतं. आणी वर आपण म्हणतो "महाराष्ट्राच्या संस्कृतिबद्द्ल बोलायच झाल्यास तिला मरण नाहि'' !! अरे मरणार नाही काय मेली तुमची संस्कृती आणि मेली तुमची मराठी भाषा! मॅक्डोनाल्डवाल्याला ऑर्डर मराठीत दिली हे तुम्ही अभिमानाने सांगितलं त्याच वेळी ती मेली!!

राज ठाकरे सुद्धा काही भविष्यात दिवे लावतील असही छाती ठोक पणे म्हणता येणार नाही. राज ठाकरे नी मांडलेला मुद्द्याला अहिंसा, चुकिचा मार्ग, भावनिक मुद्द्याला हात घालणारे राजकारण असे संदर्भ देऊन जो बगल दिला जातोय त्याबद्द्ल आक्षेप आहे.

जर राज ठाकरे बद्दल आणि त्यांच्या कार्याविषयी तुम्ही साशंक आसाल तर त्यांचे वकीलपत्र घेण्याचे कहीच कारण नाही.

राज ठाकरें यांनी वापरलेली शिवराळ भाषा, त्यांची तथाकथित चिथावणीखोर वक्तव्यं यावर प्रसिद्धी माध्यमांनी बराच उहापोह केला आहे पण राज यांनी केलेल्या युक्तिवादाचा कोणत्याही वर्तमान पत्राने विशेष अशी दखल घेतल्यासारखं वाटलं नाही.

या मुळेच सरकार त्याचे आंदोलन मोडून काढु शकते असे माझे म्हणणे होते.

महाराष्ट्रात उत्तरप्रदेश दिन साजरा केल्याने मराठीची परवड चाललेली या तुमच्या जावाई शोधा मागील विश्लेषण देण्याची कॄपा कराल का!

आणि तुमच्या मॅकडोनाल्ड प्रकरणामुळे मराठी संस्कृती आणि मराठी भाषा मेली हे वाचुन हसावे रडावे हेच मला कळत नाही.

आणि साहेब सर्वात म्ह्त्वाचं म्ह णजे ' तुमची संस्कृती आणि मेली तुमची मराठी भाषा! ' हे आपण वापरलेले शब्द मनाला लागणारे वाटतात
खरं पाहता माय मराठी ही आपल्या सर्वांची आहे !
ही भावना वाढीस लावणे गरजेचे आहे म्हणजे ही समस्या सुटेल
संस्कृती आणि भाषेची पाटराखन करण्यासाठी ठेक्याने देण्याची पध्दत अजुन पर्यततरी विकसीत झाल्याचे माझ्या एकीवात नाही.

सह्याद्री आणि सातपुडा मराठी संस्कृतीच्या जोपर्यत पाठीसी आहेत तो पर्यततरी आम्हाला दलालांची गरज वाटत नाही.

गोदावरी , कॄणा ,पुर्णा तीच्या इतिहासाची वहन करत राहतील !

मुघलाईच्या जुलमाखाली जीची शाही सुकली नाही तीची लोकशाहीत काळजी करण्याची गरज नाही .

फक्त 'तुमची' ,'आमची' ही दुजाभाव कारणारी मानसीकता कधी संपेल त्याची काळजी वाटते .

llपुण्याचे पेशवेll's picture

9 May 2008 - 11:32 pm | llपुण्याचे पेशवेll

महाराष्ट्रात उत्तरप्रदेश दिन साजरा केल्याने मराठीची परवड चाललेली या तुमच्या जावाई शोधा मागील विश्लेषण देण्याची कॄपा कराल का!
यासाठी उ.प्र. दिनापर्यंत पोचायची गरज नाही. त्यासाठी फक्त मुंबई किंवा पुण्यामधे जाऊन टॅक्सी किंवा रीक्षावाले कोणती भाषा बोलतात ते बघा. कॉलेजांमधे कोणती भाषा बोलली जाते ते बघा.

संस्कृती आणि भाषेची पाटराखन करण्यासाठी ठेक्याने देण्याची पध्दत अजुन पर्यततरी विकसीत झाल्याचे माझ्या एकीवात नाही.

हीच तर खरी समस्या आहे सामान्य मराठी माणसापासून राज्यकर्त्यापर्यंत कोणालाही मराठी आपली भाषा आहे आणि तिचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे किंवा ठेका आहे हे वाटत नाही. ह ठेका कोणी कोणाला द्यावा लागत नाही तो स्वतःच घ्यायचा असतो. की मराठी माझी भाषा आहे तिचे रक्षण आणि संवर्धन हे माझे कर्तव्य आहे असे वाटले पाहीजे.
मराठी शाळेतील रोडावलेली विद्यार्थीसंख्या हे कसले द्योतक आहे? रस्त्यावर ऐकू येणारी मराठी कमी झाली आहे हे कसले द्योतक आहे?

सह्याद्री आणि सातपुडा मराठी संस्कृतीच्या जोपर्यत पाठीसी आहेत तो पर्यततरी आम्हाला दलालांची गरज वाटत नाही.

गोदावरी , कॄणा ,पुर्णा तीच्या इतिहासाची वहन करत राहतील !

मुघलाईच्या जुलमाखाली जीची शाही सुकली नाही तीची लोकशाहीत काळजी करण्याची गरज नाही .

फक्त 'तुमची' ,'आमची' ही दुजाभाव कारणारी मानसीकता कधी संपेल त्याची काळजी वाटते .

कृष्णा, पूर्णा, गोदावरी, सातपुडा, सह्याद्री सर्व काही तसेच राहतील पण मराठी भाषा जर तोपर्यंत लुप्त झाली तर काय करणार आहात तुम्ही?
इथे प्रश्न माणसाला पाठींबा द्यायचा नाहीये तर भूमिकेला पाठींबा द्यायचा आहे.

पुण्याचे पेशवे

आता थकलो.
वेताळ्,इनोबा,मनोबा(म्हंजे मी) आणि पेशवे ह्यांच्या
कोणत्याही शंकेला,प्रश्नाला आणी मुद्द्यांना आतापर्यंत उत्तर मिळालेले नाही.
कुणी मुद्द्यांना उत्तर द्यायला तयारच नाहिये.

केवळ सर्वांना आठवण असावी, म्हणुन त्यातलेच काही मुद्दे पुन्हा इथे उद्धृत करतोय्,जसेच्या तसे.

>> इंटरनेट सारख्या महाजालावरून आपण एकमेकांशी मतभेद व्यक्त करतो आहोत,
हे जरी खरे असले तरी, महा जालावर मराठीचा नक्की वापर किती होतो, हे आपणही जाणताच.
जगामध्ये हिब्रु भाषिक पाचेक कोटिंच्या घरातही नसताना, त्यातील नव्व्याण्णव टक्के लोक हिब्रुच वापरतात महा जालावर.
ती एक प्रमुख नेट्-भाषा बनुन बसली आहे.(जॅपनीज्,मँड्रिक ह्या नॉन्-युरोपिअन भाषांप्रमाणे)

आता मला सांगा दहा एक कोटी मराठी भाषिक असताना नेट्-वर मराठी वापर तो किती?
एक टक्का तरी मराठी भाषिक आपला संपुर्ण नेट्-व्यवहार मराठित करतात काय?
करु शकतात काय?

आपण वाद घालणे, चर्चा करणे ह्यासाठि वापरतो तेवढिच काय ती नेट् वर मराठी शिल्लक आहे असे वाटु लागले आहे.

आणि काही काळात तेही बंद होण्याची भीती वाटते.

३ वर्षापूर्वी कल्याणला रेल्वेच्या परीक्षेला आलेल्या बिहारी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची बातमी आपण वाचली असेलच ती मारहाण राज आणि त्याच्या लोकांनीच केली होती आणि राज तेव्हा शिवसेनेत होता. म्हणजे राजच्या मारहाणीच्या कॄत्याचे समर्थन करण्याचा हेतू हे लिहीण्यामागे नाही तर केवळ पक्षा स्थापनेच्या वेळे मुद्दा मांडला नव्हता म्हणून त्याला आत्ता पाठींबा न देण्याचे काही कारण नाही हे सांगणे आहे. उद्या हा मुद्दा शरद पवार, आराराबा कोणीही मांडला तरी माझा त्याला पाठींबा असेल.
पेशवेंशी सहमत

मुंबईतील उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून त्यांच्याकरिता हिंदीतून सामना चालू करणे,छटपूजा,उत्तर भारतीय दिवस सारखे उत्सव साजरे करणे,उत्तर भारतीयांना उमेदवारी देणे यांसारख्या कार्यक्रमांमुळेच राज यांचे उद्धवशी बिनसले होते. संजय निरुपमसारख्या बिहार्‍याला शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली,नंतर संजय निरुपम यांनी शिवसेना सोडली तेही राज यांच्याच दबावामुळे.राज यांनी शिवसेना सोडण्याचे कारण केवळ पक्षाचे प्रमुखपद न मिळणे,असे कोणी समजत असल्यास ती त्यांच्या अकलेची दिवाळखोरी आहे.अर्थात सकाळ वाचणार्‍यांना हे आतले राज'कारण कसे कळणार? कारण तिथे फक्त महाराष्ट्रवाद्यांनाच फोडले जाते.उदो उदो होतो तो केवळ काँग्रेसचा!

काँग्रेसच्या महान नेत्यांबद्दल मी काय बोलू? छत्रपती शिवाजी महाराजांना उघड उघड दरोडेखोर म्हणणार्‍या(डिस्कव्हरी ऑफ इंडीया) नेहरु आणि त्याच्या खानदानाने महाराष्ट्राचा नेहमीच तिरस्कार केला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान भारताच्या या पहील्या पंतप्रधानाने महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतली होती. याच काँग्रेसच्या मुजोर मोरारजीने नंतर आंदोलन फोडण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला. सर्वात दूखःद बाब म्हणजे यशवंतराव चव्हाणासारख्या मराठी नेत्याने महाराष्ट्रापेक्षा काँग्रेस आणि नेहरुंना मोठे ठरवले. आजही काँग्रेस मधे तेच चालू आहे.दिल्लीश्वरांचे पाय चाटणारे लाचार काँग्रेसी नेते महाराष्ट्राचे काय भले करणार? त्यांना सदा सर्वदा आपल्या पक्षातील स्थानाचीच काळजी असते.

राज ठाकरे स्वतःला महाराष्ट्राचा कैवारी समजत आहेत असे आम्हाला तरी वाटत नाही.पेप्राबिप्रात वाचून(सकाळमधील लेख वाचूनच ना?) एकदम आपल्यासारखे 'विचारवंत' तयार होत असतील (आणि आपणच तेवढे महाराष्ट्राचा,मराठीच्या भल्याचा विचार करतोय असे भासवत असतील) तर 'सैनिक' तयार होण्याला विरोध का? ते ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? काही लोक मराठीसाठी काम करतात मात्र त्यांची प्रसिद्धी करत नाहीत आणि त्याच कारणास्तव त्यांचे काम जनतेपुढे पोचत नाही. याबद्दल जनतेला दोषी धरायचे का? बरेचसे लोक मराठी आणि महाराष्ट्रासाठी काम करतात्,आम्हाला त्यांचे निश्चितच कौतूक आहे.आमचा नीलकांत,ओमकार आणि शशांक सारखे लोक,ज्यांनी मिसळपावसाठी(मराठी संस्थळासाठी) भरघोस योगदान दिले आहे किंवा आमचे कलंत्रीसाहेब ज्यांनी मराठीसाठी काम करणार्‍यांना कृतज्ञतापत्रे दिली आहेत,ते आम्हाला माहीत आहे,म्हणूनच आम्ही संधी मिळताच त्यांचे तोंडफाटेस्तोवर कौतूक करतो. मात्र बाहेरच्या जगाला त्यांच्याबद्दल माहीती नसल्यास त्याबद्दल इतर कुणालाही 'त्यांच्याकडे दूर्लक्ष केले' म्हणून दोषी धरता येणार नाही.(आपण 'दूर्लक्ष' केले नसावे ही अपेक्षा!) कारण हे सर्व लोक प्रसिद्धीपासून दूर राहूनच आपले काम चोख बजावत आहेत.

माझी प्रतिक्रीया तुम्हाला संतप्त वाटत असेल तर वाटू दे! तुमची प्रतिक्रीया मला निव्वळ शब्दच्छल करणारी वाटते. हूतात्म्यांच्या बलिदानाबाबत शंका घेण्याचे कारणच सकाळमधला तो लेख आहे.(सकाळमधील लेख वाचल्यानंतर असे मानावे लागेल की,बरेचसे लोक पोलिसांच्या चूकीमूळे हूतात्मे झाले असावे.) पोलिसांच्या चूकीमुळे एखादा मारला जात असला तरी केवळ तो मेला म्हणून त्याला हूतात्मा म्हणता येणार नाही. एखादा रस्त्याच्या कडेला हागायला बसलेला असताना पोलिसांची गोळी लागून मेला तर त्यालाही हूतात्मा ठरवले असते का आपण? जे आंदोलक खरोखरच(पोलिसांच्या चूकीमूळे नव्हे) महाराष्ट्रासाठी हूतात्मे झाले,मी त्यांचा आजन्म ऋणी राहीन.

सकाळची स्थापना मराठी आणि महाराष्ट्रासाठी झाली होती हे खरेच आम्हा सूज्ञांना माहित नाही. आणि तुम्ही कितीही घसा ताणून कोकललात तरी आम्हाला ते पटणार नाही.पंडीत नेहरूंच्या सांगण्यावरून त्यांनी (ना.परुळेकर)परराष्ट्र मंत्रालयाला सूचनाही केल्या होत्या आणि कदाचित त्याच पंडीत नेहरुच्या सांगण्यावरुन त्यांनी सं.म.चळवळीतील आंदोलकांवर टिका केली असावी.याच कारणास्तव सकाळवर आमच्या महाराष्ट्रवादी आचार्य अत्रेंनी टिका केली होती. आम्हाला तरी अत्रेंपेक्षा आपण(किंवा नाना परुळेकर) श्रेष्ठ वाटत नाही. खरेच,केवढा मोठा बुद्धीभेद झालाय आमचा.

आता तुमच्यासारखा श्रेष्ठ विचारवंत मराठीचे भविष्य सांगतोय तेव्हा आम्ही पामरांनी निश्चिंत व्हायला हरकत नसावी. नाहीतर राज्यसरकारला मराठीच्या भविष्याची चिंता लागली होती. तीही राज ठाकरेंच्या आंदोलनानंतर. चला कुणामुळे का होईना,मराठी आणि महाराष्ट्राचा पुळका आलाय सगळ्यांना.

अत्रे,पु.ल., आंबेडकर ह्यांचे दाखलेही आम्ही दिलेत.
त्याबद्दल अवाक्षरही काढत नाही कुणी.
बोलायचच नसेल तर चर्चाच द्यायची का थांबवुन आता?

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

इनोबा म्हणे's picture

10 May 2008 - 1:01 am | इनोबा म्हणे

आता थकलो.
वेताळ्,इनोबा,मनोबा(म्हंजे मी) आणि पेशवे ह्यांच्या
कोणत्याही शंकेला,प्रश्नाला आणी मुद्द्यांना आतापर्यंत उत्तर मिळालेले नाही.
कुणी मुद्द्यांना उत्तर द्यायला तयारच नाहिये.

अरे हे स्वघोषित विचारवंत असेच असतात रे! आता फाटायची वेळ आली तर बिळात लपून बसलेत. ज्या विषयी चर्चा व्हायला हवी त्याचे कोणी नावच घेत नाही.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

llपुण्याचे पेशवेll's picture

10 May 2008 - 2:28 am | llपुण्याचे पेशवेll

अरे हे स्वघोषित विचारवंत असेच असतात रे! आता फाटायची वेळ आली तर बिळात लपून बसलेत. ज्या विषयी चर्चा व्हायला हवी त्याचे कोणी नावच घेत नाही.
हेच म्हणतो मी.
पुण्याचे पेशवे

रम्या's picture

11 May 2008 - 12:17 am | रम्या

जर राज ठाकरे बद्दल आणि त्यांच्या कार्याविषयी तुम्ही साशंक आसाल तर त्यांचे वकीलपत्र घेण्याचे कहीच कारण नाही.
राज ठाकरेंचे वकिल पत्र घेण्याचं काहीच कारण नाही. त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं वकिल पत्र घेतलंय म्हणा हवं तर. त्याचा अभिमान आहे.
महाराष्ट्रात उत्तरप्रदेश दिन साजरा केल्याने मराठीची परवड चाललेली या तुमच्या जावाई शोधा मागील विश्लेषण देण्याची कॄपा कराल का!
आणि तुमच्या मॅकडोनाल्ड प्रकरणामुळे मराठी संस्कृती आणि मराठी भाषा मेली हे वाचुन हसावे रडावे हेच मला कळत नाही.

मला वाटतं पुण्याच्या पेशव्यांनी याला योग्य उत्तर दिलेलं आहे.
बाकी मराठी भाषा त्या गोदावरी, सातपुडा मध्ये लपून राहून काहीच फायदा नाही. मला वाटतं मराठी भाषेचा उघड उघड न घबरता वापर करणे महत्वाचं नाही का? मॅक्डोनाल्डचा संदर्भ तर फक्त उधडपणे मराठी बोलण्यात आपल्याला वाटणारी भिती, कौतूक यासाठी दिला होता. काय राव खूप समजावून सांगावं लगतं तुम्हाला!!.
सह्याद्री आणि सातपुडा मराठी संस्कृतीच्या जोपर्यत पाठीसी आहेत ..
अहो सह्याद्री, सातपूडा काय करणार या मध्ये ??? जे काय करायचं आहेत ते आपल्यालाच करायचं आहे!!
सह्याद्री, सातपुडा म्हणजे कोण माणसं असल्या सारखंच बोलताय बुवा तुम्ही!!! म्हणजे सह्याद्री एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात ढाल घेऊन येणार आणि म्हाणणार "ए याद राखा मराठी आणि मराठी संस्कॄतीला हात लावाल तर, मुडदे पाडीन एकेकाचे!!" काय राव काय इनोद करता का काय तुम्ही?
एखाद्या पुस्तकात शोभणारी अलंकारीक भाषा असेल तर असू द्या चालेल आम्हाला. पण अशा भाषेचा इथं काहीच उपयोग नाही.
आणि साहेब सर्वात म्ह्त्वाचं म्ह णजे ' तुमची संस्कृती आणि मेली तुमची मराठी भाषा! ' हे आपण वापरलेले शब्द मनाला लागणारे वाटतात
अहो अशीच भाषा मनाला भिडते.
..तो पर्यततरी आम्हाला दलालांची गरज वाटत नाही.
हम्म तर हि अडचण आहे होय तुमची. म्हणजे तुम्हाला मराठी संवर्धन करायला कुणाची मदत नको हवी आहे. तुम्ही त्याला दलाल म्हणता आणि आम्ही त्याला राजकिय प्रतिनिधी म्हणतो. असु दे. नाही तरी दर काही अंतरावर मराठी भाषा बदलते म्हणतात. हा अशा प्रकारचा बदल असू शकतो!!!
पण राजकारण हे एक शस्त्र म्हणुन वापरायला काहीच हरकत नसावी. शेवटी लढाई मराठी नुसतीच वापरण्याची नाही तर तिला मानसन्मान मिळण्याचीही आहे. आत तुम्ही त्या शस्त्राला दलाल म्हणू नका म्हणजे मिळवली!! नाही तर म्हणाल "मराठीच्या लढाईत शस्त्रांची आवश्यकता नाही. हा सह्याद्री आणि सातपूडा समर्थ आहेत !!!"

मुघलाईच्या जुलमाखाली जीची शाही सुकली नाही तीची लोकशाहीत काळजी करण्याची गरज नाही .
तुम्हाला विसर पडला असेल तर सांगतो मुघलाईचा काळात स्वराज्य यावे यासाठी लढणारा छत्रपती शिवाजी महाराज नावाचा एक लढवय्या होता. हा स्वराज्यासाठी लढला म्हणून मुघलाईतही मराठी टिकून राहू शकली. आज सुद्धा ही लढाईच आहे. शिवरायांनी या लढाई साठी महाराष्ट्रातील नैसर्गिक साधन संपत्तिचा, सामाजिक परिस्थितीचा पुरपूर वापर करून घेतला. त्यांची साधनं वेगळी होती पण हेतू आपली स्वतःची संस्कॄती टिकावी हाच होता ना?
संस्कॄती टिकवावी लागते, जपावी लागते. त्यासाठी उपलब्ध साधन संपत्तीचा उपयोग करावा लागतो. 'असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी' असं म्हणून भागत नाही. राजकारण हे अनेक साधनांपैकी एक साधन आहे त्याचा आपला हेतू साध्य करायला उपयोग केला तर बिधडलं कुठे? यात दलालीचा प्रश्न आला कुठे? राज ठाकरेंनी आपल्या राजकीय फायद्यासाठी का होईना पण मराठी चा प्रश्न उघडपणे मिडिया समोर, देश समोर चर्चेला आणला तरी. पाठींबा या भूमिकेला आहे, राज ठाकरे या व्यक्तिला नाही!!
शिवरायांनी सह्याद्री चा उपयोग करून आपला हेतू साध्य केला. म्हणून सह्याद्री आणि सातपुडा आम्हालाहि प्रिय आहे. पण म्हणून काय तो सह्याद्री, सातपूडा, गोदावरी, कॄष्णा आता या भैय्यांविरूद्धच्या लढाईत महत्वाची भूमिका बजावून मराठीचं रक्षण करणार असं तुम्ही सांगणार?? वा रे वा !!
"गोदावरी , कॄणा ,पुर्णा तीच्या इतिहासाची वहन करत राहतील !" पण तोपर्यंत हे भैय्ये तुमचं महाराष्ट्रातून वहन करतील त्याचं काय?

आमचा तर एकच घोष आहे बुवा. ज्यावेळी अन्याय होतोय असेल तर त्याला विरोध करा. तो विरोध तुम्हाला जमेल त्या पद्ध्तीने करा. त्यावेळी आपापसातील हेवेदावे विसरा. एखादा तलवार घेऊन विरोध करील, दुसरा लेखणी घेऊन विरोध करील. तलवारीचं काम तलवारीला करू द्यावं ,लेखणीचं काम लेखणीला करू द्यावं. शेवटी दोघांचाही हेतू एकच. लढाई जिंकणं. ऐन लढाईच्या वेळी लेखणीने तलवारीला उपदेश देऊन लढाईकडे तलवार आणि लेखणी दोघांचही दुर्लक्ष होऊ देऊ नये. तो पर्यंत शत्रू तुमच्यावर घाव सुद्धा घालील.

इनोबा म्हणे's picture

11 May 2008 - 12:40 am | इनोबा म्हणे

राज ठाकरेंचे वकिल पत्र घेण्याचं काहीच कारण नाही. त्यांनी घेतलेल्या भूमिकेचं वकिल पत्र घेतलंय म्हणा हवं तर. त्याचा अभिमान आहे.
बरोबर बोललास रम्या. काम करणारं कुणीही असो. भूमिकेला पाठींबा हवा.

अहो सह्याद्री, सातपूडा काय करणार या मध्ये ??? जे काय करायचं आहेत ते आपल्यालाच करायचं आहे!!
सह्याद्री, सातपुडा म्हणजे कोण माणसं असल्या सारखंच बोलताय बुवा तुम्ही!!! म्हणजे सह्याद्री एका हातात तलवार आणि दुसर्‍या हातात ढाल घेऊन येणार आणि म्हाणणार "ए याद राखा मराठी आणि मराठी संस्कॄतीला हात लावाल तर, मुडदे पाडीन एकेकाचे!!" काय राव काय इनोद करता का काय तुम्ही?
एखाद्या पुस्तकात शोभणारी अलंकारीक भाषा असेल तर असू द्या चालेल आम्हाला. पण अशा भाषेचा इथं काहीच उपयोग नाही.

अगदी योग्य मूद्दा. पुस्तकी भाषा पुस्तकातच बरी वाटते. प्रत्यक्षात तिचा उपयोग केवळ प्रोत्साहन देण्याकरिताच होऊ शकतो. पण शेवटी कृतीच महत्वाची.

मुघलाईच्या जुलमाखाली जीची शाही सुकली नाही तीची लोकशाहीत काळजी करण्याची गरज नाही .

हम्म तर हि अडचण आहे होय तुमची. म्हणजे तुम्हाला मराठी संवर्धन करायला कुणाची मदत नको हवी आहे. तुम्ही त्याला दलाल म्हणता आणि आम्ही त्याला राजकिय प्रतिनिधी म्हणतो. असु दे. नाही तरी दर काही अंतरावर मराठी भाषा बदलते म्हणतात. हा अशा प्रकारचा बदल असू शकतो!!!
पण राजकारण हे एक शस्त्र म्हणुन वापरायला काहीच हरकत नसावी. शेवटी लढाई मराठी नुसतीच वापरण्याची नाही तर तिला मानसन्मान मिळण्याचीही आहे. आत तुम्ही त्या शस्त्राला दलाल म्हणू नका म्हणजे मिळवली!! नाही तर म्हणाल "मराठीच्या लढाईत शस्त्रांची आवश्यकता नाही. हा सह्याद्री आणि सातपूडा समर्थ आहेत !!!"

महाराजांनी हातात तलवार घेऊन गनिमांचा सामना केला म्हणून आजच्या काळात ही तलवार घेऊन रस्त्यात उतरावे का? आजचा लढा आणि ती लढण्याची साधनेही बदलली आहेत. राजकारण ही अशाच प्रकारचे एक साधन आहे,ते वापरले तर बिघडले कुठे?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन's picture

11 May 2008 - 1:02 am | मन

अगदि खणखणीत बडवुन काढलास की रम्या!

आपलाच,
रम्याच्या मुद्द्यांना कोणी तर्कसंगत उत्तर देतय का, ह्याची वाट पाहणारा
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

रम्या's picture

12 May 2008 - 3:14 pm | रम्या

धन्य झालो मनोबा आणि इनोबा राव! शेवटी कुणाला तरी पटलं माझं म्हणणं!! :D

असेलही चुकत....पण हातापाया पडून कधी कोणी ऐकलय का महाराष्ट्राचं?
अरे हाता पाया नका ना पडू. पण त्यांची सत्ता होती तेव्हा ही काय घोडे मारले बा ?
आणि अशी ही मुंबई पालिकेत आहेच ना त्यांची सत्ता. पण अनधिकृत फेरिवाल्यांना हाकलतात का अधिकारी?
नाही ना ...
पैसे खाऊन सोडूनच देतात ....

सकाळला जर परप्रांतियांचा एवढा पूळका असेल तर त्यांनी परप्रांतिय पत्रकारांना नोकर्‍या द्याव्या

सकाळ पेपर चे नामांतर सुबह करावे. निखिल वाकडे (वागळे ) हे कधी सरळ बोलतात का? त्यानी दाढी ठेवली आहे त्यामुळे तर त्यांना प्रितिश नंदी असले सारखे वाटत आहे. त्याना कधीच मराठी माणसाबद्दल कळवळा वाटला नाही. एकाद्या परप्रांतीय वाहनचालकाला मारले की ह्याना त्याचा खुप कळवळा येतो.सर्व मराठी लोक त्याना गुंड वाटतात. परंतु एकद्या परप्रांतीय नोकराने मराठी घरमालकाची पैशा साठी हत्या केली तर त्याची दखल घ्याविशी वाटत नाही. स्वःताचे दैनिक मोडुन खाल्ल्यामुळे ते आता एका परप्रांतीयाच्या दैनिकात घरगडी आहेत.

वेताळ

अजय's picture

8 May 2008 - 9:43 pm | अजय

मित्रांनो,
चर्चेची लिंक याच्या साठी दिली होती, की त्यावर मराठी माणसाप्रमाणे विचार व्हावा. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांप्रमाणे नव्हे.
सर्व मित्रांच्या आक्षेपांना स्वतंत्र उत्तर देता येईल. पण ते तुटक होईल या भितीने आणि विचार शृंखलेत वारंवार व्यत्यय आणण्याचा अपराध पत्करुन हे एकत्र दीर्घोत्तर लिहीत आहे.

राज ठाकरेंचे भाषण भावनांना हात घालणार होते याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही, आणि त्याच्या विरोधात मत व्यक्त केले म्हणून इतरांना मराठी अथवा महाराष्ट्राच्या विरोधात नेऊन बसविण्याचे कंत्राटही घेतल्याचे कुणी समजण्याचे कारण नाही.
केवळ भावना भडकवून मराठीचे किंवा महाराष्ट्र धर्माचे काय साधले जाणार आहे, याचा विचार केला तर? विध्वंसात्मक बोलण्याचा भारी सोस आणि रचनात्मक कार्याच्या नावाने बोंबाबोंब, अशी आजची परिस्थिती आहे. राज ठाकरे त्याला आजिबात अपवाद नाही. मला राज ठाकरे या विषयाला धरून प्रतिक्रिया याव्यात हे अपेक्षित नव्हते. पण आता विषय निघाला आहेच, तर बोलणेही भाग आहे.

"मराठा तितुका मेळवावा , महाराष्ट्र धर्म वाढवावा' या उक्तीच्या आधारेच जर महाराष्ट्र धर्माची व्याख्या केली जात असेल तर संघटनेच्या प्रमुखपदी मला बसवत नाही म्हणून मी वेगळी संघटना बांधतो अशांकडून महाराष्ट्र धर्माचे पालन तरी कसे व्हावे. नवी संघटना स्थापन करून दोन वर्ष झाली. तेव्हा मराठीचा विषय का नव्हता? "यशवंतराव ते विलासराव' सारेच मुख्यमंत्री मराठी होते ना? तरीही अन्याय? मराठी राज्य स्थापन होऊन 40 हून अधिक वर्ष झाली तरीही मराठी वर अन्यायाचा विषय वारंवार समोर येत असेल तर त्याला कारणीभूत मुठभर परप्रांतिय की आपले मराठी राज्यकर्ते, याच विचार न करता कोणी तरी भावना भडकवणार आणि आपण त्यावर बोलत बसणार. गेली अनेक वर्षे तेच चालले आहे. काय रचनात्मक काम झाले मराठीच्या विषयावरून?

निदान कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी पैसा खाल्ला असेलही पण त्यांच्या सोसायट्या, साखर कारखाने, शिक्षण संस्थांमधून मराठी मुलेच पोट भरता आहेत. आजच्या तथाकथीत नेत्यांसारखे नाही, ज्यांची धंद्यातली भागिदारी परप्रांतियांसमवेत, धंदे परदेशातही आहेत. इतरांना नालायक म्हणून आपण लायक आहोत, असे सिद्ध होत नाही. त्यासाठी अंग मोडून कामच करावे लागते. संस्था उभाराव्या लागतात. माणसं उभी करावी लागतात. त्यांना बळ द्यावे लागते. विशेष म्हणजे त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आपण इतरांच्या पुण्याईवर नेते झालो की या झुलीचा अभिमान वाटायला लागतो आणि झटपट रिझल्टही मिळावा असे वाटू लागते. या वाटण्यातूनच असली काही भंपक भूमिका समोर येते.

मित्रांनो, राज ठाकरेंच्या भाषणात कोणत्याही रचनात्मक कार्याचा, विधायक कामाचा उल्लेख नाही. (चित्रपट पहाण्याव्यतिरिक्त. याला धोरणात्मक कार्यक्रम म्हणावा का?) "मीच फक्त मराठीचा आणि महाराष्ट्राचा राखणदार' हेच राज ठाकरेंच्या भाषणाचे एकच सार असेल तर त्यातून एक गोष्ट आपसूकच वर येते ती म्हणजे या राखणदारीसाठी सत्ता हातात द्यावी. अशी सत्ता हातात घेण्यासाठी संघटना म्हणून नव्हे तर राजकीय पक्ष म्हणून काम करावे लागते. आपणही चार भिंतीच्या आत सुरक्षित राहून, पेप्राबिप्रात वाचून एकदम "सैनिक' होऊन विचार करण्यापेक्षा खऱ्या महाराष्ट्र धर्माविषयी आणि मराठीसाठी विचार केला तर बरे होईल.......
मित्रांनो, माय मराठीसाठी कळकळीने झटणारे अनेक जण होते, आहेत. ते काम करता आहेत. केवळ त्यांच्याकडे अशी गर्दी जमविण्याची कला नाही, पैसा नाही आणि इतरांना शिव्या घालण्याकडे शब्दही नाहीत, म्हणून त्यांच्या कामाकडे आपणच दुर्लक्ष करतो आहोत हे खरे नाही काय?

बऱ्याच विद्वान मित्रांनी आपल्या प्रतिक्रिया संतप्त शब्दांत व्यक्त केल्या आहेत. ते आंदोलनात बळी पडलेल्यांच्या "बलिदाना'विषयी शंका घेत आहेत. एकदम मान्य. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते गंमत पाहत असतील आणि गोळी लागून ठार झाले असतीलही. पण त्यांचे मरण तर खोटे नव्हते. या मंडळींच्या "गंमत पाहताना गोळी लागून मरण्यावरच' आक्षेप असेल तर त्यातून तयार झालेल्या संयुक्त महाराष्ट्राचा, त्याच्या तथाकथित महाराष्ट्र धर्माचा आणि राजकीय अस्तित्वासाठी झगडताना दोन वर्षांनंतर मराठीसाठी झगडण्याचा अभिनिवेश आणणाऱ्यांबद्दल अभिमान तरी का बाळगावा? (वाचताय ना पुण्याचे पेशवे)

मित्रांनो. ज्या "महाराष्ट्र धर्म' या राजू परुळेकरांच्या लेखाची लिंक दिली आहे, त्यात शिवसेनेने महाराष्ट्राच्या गळ्याला नख लावले, असा उल्लेख आहे. भावनिक प्रश्‍नांना हात घालून आणि मुलभूत मुद्दे सरळ फाट्यावर मारत निव्वळ झुंडशाहीच्या जोरावर यशस्वी राजकारण कसे करता येते ते यापूर्वी शिवसेनेने दाखवून दिले आहे. तीच री आताही ओढली जात आहे. मात्र या गळ्याला नख लावण्याच्या कार्यात "स्थानिय लोकाधिकार समितीचा' वाटा कसा हेही स्पष्ट करता आले असते तर अधिक बरे झाले असते. निव्वळ झुंडशाहीच्या जोरावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेने मात्र, रचनात्मक काम कसे असावे आणि ते चिकाटीने कसे पार पाडावे हे स्थानिय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून दाखवून दिले. (यातली सत्यता मुंबईतल्या रिझर्व बॅंकेत किंवा नरिमन पॉंईट भागातील वेगवेगळ्या बॅंका, विमा कंपन्यांच्या आस्थापनांमध्ये जाऊन, मराठीत बोलून पडताळून पाहता येईल). आता "मनसेने'ला तसे काही जरी काम जमले तरी देव पावेल.

ज्या "सकाळ'चा उल्लेख येथे केला गेला, त्या सकाळची स्थापनाही महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी झाली होती याची आपल्या सुज्ञ वाचकांना माहिती नसावी, असे वाटते.
सकाळचे संस्थापक नानासाहेब परुळेकर हे "ल मॉंद' आणि "वॉशिंग्टन पोस्ट' या जगप्रसिद्ध वृत्तपत्रांचे भारतातले प्रतिनिधी होते. त्या काळातल्या अनेक देशांच्या प्रमुख राष्ट्रप्रमुखांशी त्यांचे व्यक्तिगत पत्रव्यवहाराइतके उत्तम संबंध होते. मध्यपूर्वेतल्या घडामोडींवर त्यांचा चांगला अभ्यास होता. त्याच्याच आधारे या भागातील देशांशी भारताचे परराष्ट्र धोरण कसे असावे यावर पंडीत नेहरूंच्या सांगण्यावरून त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाला सूचनाही केल्या होत्या. अशा दूरदृष्टीच्या संपादकाने केवळ महाराष्ट्रीय जनतेला विकासाभिमुख पत्रकारितेची, त्यांच्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या परिणाम करणाऱ्याजगभरातील घडामोडींशी मातृभाषेतून ओळख व्हावी यासाठी 1932 मध्ये पुण्यात मराठीतून बातमीपत्र सुरू केले. येथे बातमीपत्र हा शब्द जबाबदारीने वापरत आहे. त्यावेळी सर्व पत्रे (वर्तमानपत्रे) ही मतपत्रे होती, बातमी देणारी नव्हती. त्यावेळी सकाळ सुरू करून मराठी माणसांमध्ये तो रुजवला. आणि ज्या महाराष्ट्र धर्माच्या कथित विरोधाबद्दल सकाळ ला बोल लावले जात आहे, त्याची तेव्हाची भूमिका संयुक्त महाराष्ट्राला विरोधाची नव्हे तर भाषावार प्रांतरचनेलाच होती. अशी रचना म्हणजे देशाच्या एकसंघतेवरच घाला असेल, (पंजाब, आसाम, तामिळनाडू या राज्यातील चळवळी पाहता ती भीती खरीच ठरली) ही भूमिका होती. त्यातून विरोध केला तर महाराष्ट्राचा द्रोह कसा होतो.
याच नानासाहेबांनी गोव्यातील पोर्तुगिजांच्या इन्क्विझिशनच्या काळात गोमंतकीय बांधवांवर कसे अत्याचार झाले, त्या इंग्रजी पुस्तकाचे मराठीत भाषांतर करून सकाळ मध्ये छापले होते. (संदर्भ - "निरोप घेता - ना. भि. परुळेकर, आत्मचरित्र)
तरीही ते महाराष्ट्र धर्माचे विरोधक होते असे म्हणणार का?
"सकाळ'वर टीका करणाऱ्या मित्रांनी याचीही माहिती करून घेतली तर बुद्धीभेद नक्कीच होणार नाही.

अकराव्या शतकात मुकुंदराजांनी प्रथम मराठीत ग्रंथ निर्मिती केली. ते आजपर्यंतच्या विसाव्या शतकापर्यंत. मराठी आहे तशीच आहे. मराठी संस्कृती आहे तशीच आहे. आणि महाराष्ट्र धर्मही वाढलेला आहे. एवढ्या शतकांमध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यांनंतरही त्याला फरक पडला नाही तर तो मुठभर भैय्यांमुळे पडेल काय? 1927 मध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून भाषण करताना इतिहासाचार्य राजवाडेंनी "आपल्या भाषिक अनास्थेपायी मराठी मृतप्राय होईल', असा इशारा दिला होता. आज इतक्‍या वर्षांनंतर त्याच मराठी भाषेत तेही इंटरनेट सारख्या महाजालावरून आपण एकमेकांशी मतभेद व्यक्त करतो आहोत, हे त्या मराठी भाषा-संस्कृतीच्या जिवंतपणाचे की मृतावस्थेचे लक्षण आहे?.......

धम्मकलाडू's picture

9 May 2008 - 12:17 pm | धम्मकलाडू

मित्रांनो,
चर्चेची लिंक याच्या साठी दिली होती, की त्यावर मराठी माणसाप्रमाणे विचार व्हावा. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांप्रमाणे नव्हे... विरोधात मत व्यक्त केले म्हणून इतरांना मराठी अथवा महाराष्ट्राच्या विरोधात नेऊन बसविण्याचे कंत्राटही घेतल्याचे कुणी समजण्याचे कारण नाही.
केवळ भावना भडकवून मराठीचे किंवा महाराष्ट्र धर्माचे काय साधले जाणार आहे, याचा विचार केला तर? विध्वंसात्मक बोलण्याचा भारी सोस आणि रचनात्मक कार्याच्या नावाने बोंबाबोंब, अशी आजची परिस्थिती आहे. राज ठाकरे त्याला आजिबात अपवाद नाही. मला राज ठाकरे या विषयाला धरून प्रतिक्रिया याव्यात हे अपेक्षित नव्हते. पण आता विषय निघाला आहेच, तर बोलणेही भाग आहे.

सहमत आहे अजय. मुद्याचे सोडून शिव्या द्या आणि टाळ्या घ्या; असा हा एकंदर प्रकार आहे. राज ठाकरेला फक्त सत्ता काबीज करायची आहे. तो सेनेत होता तेंव्हाही उत्तर भारतीयांचे लोंढे मुंबईत येत होता. तेंव्हा का गप्प बसून होता राज ? जाऊ द्या.

धम्मकलाडू

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

विजय भांबेरे's picture

9 May 2008 - 7:25 pm | विजय भांबेरे

सहमत यार !

अगदी बरोबर .....!

भंबेरे साहेब्,अजय साहेब आपल्या . आम्ही गरिब्,सामान्य घरातील मराठी तरुण वाट पाहतोय उत्तराची..
काही मुद्दे उपस्थित केलेत्,प्रश्न टकलेत पुढ्यात इनोबा , वेताळ आणि पुण्याच्या पेशव्यांनी.

त्याला बगल देउन आत्म मग्न राहुन "जितं मया " म्हणत बसताहात असं दिसतयं.

आपलाच,
मराठ मोळा ,मराठी साठी भंडणारा,वाइट पणा घेणारा मनोबा.
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

इनोबा म्हणे's picture

9 May 2008 - 7:45 pm | इनोबा म्हणे

त्याला बगल देउन आत्म मग्न राहुन "जितं मया " म्हणत बसताहात असं दिसतयं.
त्या मुद्द्यांबाबत कुणीच काही बोलायला तयार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर,आचार्य अत्रे आणि पु.ल. देशपांडेंसारख्या दिग्गजांनी जे मुद्दे मांडले आहेत ते लक्षात घेण्याजोगे आहेत.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन's picture

8 May 2008 - 10:10 pm | मन

>> इंटरनेट सारख्या महाजालावरून आपण एकमेकांशी मतभेद व्यक्त करतो आहोत,
हे जरी खरे असले तरी, महा जालावर मराठीचा नक्की वापर किती होतो, हे आपणही जाणताच.
जगामध्ये हिब्रु भाषिक पाचेक कोटिंच्या घरातही नसताना, त्यातील नव्व्याण्णव टक्के लोक हिब्रुच वापरतात महा जालावर.
ती एक प्रमुख नेट्-भाषा बनुन बसली आहे.(जॅपनीज्,मँड्रिक ह्या नॉन्-युरोपिअन भाषांप्रमाणे)

आता मला सांगा दहा एक कोटी मराठी भाषिक असताना नेट्-वर मराठी वापर तो किती?
एक टक्का तरी मराठी भाषिक आपला संपुर्ण नेट्-व्यवहार मराठित करतात काय?
करु शकतात काय?

आपण वाद घालणे, चर्चा करणे ह्यासाठि वापरतो तेवढिच काय ती नेट् वर मराठी शिल्लक आहे असे वाटु लागले आहे.

आणि काही काळात तेही बंद होण्याची भीती वाटते.
मी चुक सिद्ध झाल्यास मला आनंदच होइल.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

llपुण्याचे पेशवेll's picture

9 May 2008 - 12:12 am | llपुण्याचे पेशवेll

आपण राजू परुळेकरांचा लेख वाचला असेलच अशी आशा करतो.
"मराठा तितुका मेळवावा , महाराष्ट्र धर्म वाढवावा' या उक्तीच्या आधारेच जर महाराष्ट्र धर्माची व्याख्या केली जात असेल तर संघटनेच्या प्रमुखपदी मला बसवत नाही म्हणून मी वेगळी संघटना बांधतो अशांकडून महाराष्ट्र धर्माचे पालन तरी कसे व्हावे. नवी संघटना स्थापन करून दोन वर्ष झाली. तेव्हा मराठीचा विषय का नव्हता? "यशवंतराव ते विलासराव' सारेच मुख्यमंत्री मराठी होते ना? तरीही अन्याय? मराठी राज्य स्थापन होऊन 40 हून अधिक वर्ष झाली तरीही मराठी वर अन्यायाचा विषय वारंवार समोर येत असेल तर त्याला कारणीभूत मुठभर परप्रांतिय की आपले मराठी राज्यकर्ते, याच विचार न करता कोणी तरी भावना भडकवणार आणि आपण त्यावर बोलत बसणार. गेली अनेक वर्षे तेच चालले आहे. काय रचनात्मक काम झाले मराठीच्या विषयावरून?
३ वर्षापूर्वी कल्याणला रेल्वेच्या परीक्षेला आलेल्या बिहारी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची बातमी आपण वाचली असेलच ती मारहाण राज आणि त्याच्या लोकांनीच केली होती आणि राज तेव्हा शिवसेनेत होता. म्हणजे राजच्या मारहाणीच्या कॄत्याचे समर्थन करण्याचा हेतू हे लिहीण्यामागे नाही तर केवळ पक्षा स्थापनेच्या वेळे मुद्दा मांडला नव्हता म्हणून त्याला आत्ता पाठींबा न देण्याचे काही कारण नाही हे सांगणे आहे. उद्या हा मुद्दा शरद पवार, आराराबा कोणीही मांडला तरी माझा त्याला पाठींबा असेल. राहीला प्रश्न मराठी बद्दल रचनात्मक कार्याचा. किती लोक आपापल्या मुलांना मराठी शाळेत घालतात. म्हणजे जर सामान्य माणूसच मराठीबद्दल एवढा उदासीन असेल तर राज्यकर्ते काय कप्पाळ रचनात्मक कार्य करणार आहेत?

ते आंदोलनात बळी पडलेल्यांच्या "बलिदाना'विषयी शंका घेत आहेत. एकदम मान्य. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते गंमत पाहत असतील आणि गोळी लागून ठार झाले असतीलही. पण त्यांचे मरण तर खोटे नव्हते.

ते मेलेले खरेच असतील पण म्हणून ते संयुक्त महाराष्ट्राचे अमराठी हुतात्मे नव्हेत. आणि यालाच विरोध आहे आमचा. आणि गंमत पाहणारे लोक मरण पावले म्हणून काही संयुक्त महाराष्ट्र घडलेला नाही. त्यामुळे
'या मंडळींच्या "गंमत पाहताना गोळी लागून मरण्यावरच' आक्षेप असेल तर त्यातून तयार झालेल्या संयुक्त महाराष्ट्राचा, त्याच्या तथाकथित महाराष्ट्र धर्माचा आणि राजकीय अस्तित्वासाठी झगडताना दोन वर्षांनंतर मराठीसाठी झगडण्याचा अभिनिवेश आणणाऱ्यांबद्दल अभिमान तरी का बाळगावा? (वाचताय ना पुण्याचे पेशवे)'
हा तुमचा युक्तिवाद येथे चुकीचा ठरतो. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक भाग म्हणजे हे हुतात्मे होते. आणि हे सर्व अमराठी हुतात्मे मोर्चात सहभागी झाले होते? का फक्त मोर्चा बघायला आले होते?
पण संयुक्त महाराष्ट्र चळवळ त्यापेक्षाही जास्त व्यापक होती हे.वे.सां. न. ल.

आता मुद्दा सकाळने दिलेल्या बातमीचा. जर समजा हे लोक (जे सकाळने वर्णिले आहेत ते) आंदोलन कर्ते नसतील तर मग त्यांचा मृत्यू खरा असेल पण त्याला बलिदान म्हणता येणार नाही. आणि सकाळने हेच लिहून आपली लाचारी सिध्द केली आहे.
निदान कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी पैसा खाल्ला असेलही पण त्यांच्या सोसायट्या, साखर कारखाने, शिक्षण संस्थांमधून मराठी मुलेच पोट भरता आहेत. आजच्या तथाकथीत नेत्यांसारखे नाही, ज्यांची धंद्यातली भागिदारी परप्रांतियांसमवेत, धंदे परदेशातही आहेत. इतरांना नालायक म्हणून आपण लायक आहोत, असे सिद्ध होत नाही. त्यासाठी अंग मोडून कामच करावे लागते. संस्था उभाराव्या लागतात. माणसं उभी करावी लागतात. त्यांना बळ द्यावे लागते. विशेष म्हणजे त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आपण इतरांच्या पुण्याईवर नेते झालो की या झुलीचा अभिमान वाटायला लागतो आणि झटपट रिझल्टही मिळावा असे वाटू लागते. या वाटण्यातूनच असली काही भंपक भूमिका समोर येते.
त्यांच्या शि़क्षण संस्थांमधून जास्तीत जास्त परप्रांतीयच शिक्षण घेत आहेत(वाट्टेल तो पैसा मोजून). आणि पोट भरणारे मराठी लोक करत आहेत चपराशी गिरी कॉलेजांमधे.

अजून बरेच लिहीणे आहे. वेळ मिळाला की उर्वरीत प्रतिसाद देईन.

पुण्याचे पेशवे

रम्या's picture

9 May 2008 - 11:33 am | रम्या

..सहमत!!
रम्या

इनोबा म्हणे's picture

9 May 2008 - 3:35 am | इनोबा म्हणे

३ वर्षापूर्वी कल्याणला रेल्वेच्या परीक्षेला आलेल्या बिहारी विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची बातमी आपण वाचली असेलच ती मारहाण राज आणि त्याच्या लोकांनीच केली होती आणि राज तेव्हा शिवसेनेत होता. म्हणजे राजच्या मारहाणीच्या कॄत्याचे समर्थन करण्याचा हेतू हे लिहीण्यामागे नाही तर केवळ पक्षा स्थापनेच्या वेळे मुद्दा मांडला नव्हता म्हणून त्याला आत्ता पाठींबा न देण्याचे काही कारण नाही हे सांगणे आहे. उद्या हा मुद्दा शरद पवार, आराराबा कोणीही मांडला तरी माझा त्याला पाठींबा असेल.
पेशवेंशी सहमत

मुंबईतील उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून त्यांच्याकरिता हिंदीतून सामना चालू करणे,छटपूजा,उत्तर भारतीय दिवस सारखे उत्सव साजरे करणे,उत्तर भारतीयांना उमेदवारी देणे यांसारख्या कार्यक्रमांमुळेच राज यांचे उद्धवशी बिनसले होते. संजय निरुपमसारख्या बिहार्‍याला शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली,नंतर संजय निरुपम यांनी शिवसेना सोडली तेही राज यांच्याच दबावामुळे.राज यांनी शिवसेना सोडण्याचे कारण केवळ पक्षाचे प्रमुखपद न मिळणे,असे कोणी समजत असल्यास ती त्यांच्या अकलेची दिवाळखोरी आहे.अर्थात सकाळ वाचणार्‍यांना हे आतले राज'कारण कसे कळणार? कारण तिथे फक्त महाराष्ट्रवाद्यांनाच फोडले जाते.उदो उदो होतो तो केवळ काँग्रेसचा!

काँग्रेसच्या महान नेत्यांबद्दल मी काय बोलू? छत्रपती शिवाजी महाराजांना उघड उघड दरोडेखोर म्हणणार्‍या(डिस्कव्हरी ऑफ इंडीया) नेहरु आणि त्याच्या खानदानाने महाराष्ट्राचा नेहमीच तिरस्कार केला आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीदरम्यान भारताच्या या पहील्या पंतप्रधानाने महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतली होती. याच काँग्रेसच्या मुजोर मोरारजीने नंतर आंदोलन फोडण्यासाठी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला. सर्वात दूखःद बाब म्हणजे यशवंतराव चव्हाणासारख्या मराठी नेत्याने महाराष्ट्रापेक्षा काँग्रेस आणि नेहरुंना मोठे ठरवले. आजही काँग्रेस मधे तेच चालू आहे.दिल्लीश्वरांचे पाय चाटणारे लाचार काँग्रेसी नेते महाराष्ट्राचे काय भले करणार? त्यांना सदा सर्वदा आपल्या पक्षातील स्थानाचीच काळजी असते.

राज ठाकरे स्वतःला महाराष्ट्राचा कैवारी समजत आहेत असे आम्हाला तरी वाटत नाही.पेप्राबिप्रात वाचून(सकाळमधील लेख वाचूनच ना?) एकदम आपल्यासारखे 'विचारवंत' तयार होत असतील (आणि आपणच तेवढे महाराष्ट्राचा,मराठीच्या भल्याचा विचार करतोय असे भासवत असतील) तर 'सैनिक' तयार होण्याला विरोध का? ते ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? काही लोक मराठीसाठी काम करतात मात्र त्यांची प्रसिद्धी करत नाहीत आणि त्याच कारणास्तव त्यांचे काम जनतेपुढे पोचत नाही. याबद्दल जनतेला दोषी धरायचे का? बरेचसे लोक मराठी आणि महाराष्ट्रासाठी काम करतात्,आम्हाला त्यांचे निश्चितच कौतूक आहे.आमचा नीलकांत,ओमकार आणि शशांक सारखे लोक,ज्यांनी मिसळपावसाठी(मराठी संस्थळासाठी) भरघोस योगदान दिले आहे किंवा आमचे कलंत्रीसाहेब ज्यांनी मराठीसाठी काम करणार्‍यांना कृतज्ञतापत्रे दिली आहेत,ते आम्हाला माहीत आहे,म्हणूनच आम्ही संधी मिळताच त्यांचे तोंडफाटेस्तोवर कौतूक करतो. मात्र बाहेरच्या जगाला त्यांच्याबद्दल माहीती नसल्यास त्याबद्दल इतर कुणालाही 'त्यांच्याकडे दूर्लक्ष केले' म्हणून दोषी धरता येणार नाही.(आपण 'दूर्लक्ष' केले नसावे ही अपेक्षा!) कारण हे सर्व लोक प्रसिद्धीपासून दूर राहूनच आपले काम चोख बजावत आहेत.

माझी प्रतिक्रीया तुम्हाला संतप्त वाटत असेल तर वाटू दे! तुमची प्रतिक्रीया मला निव्वळ शब्दच्छल करणारी वाटते. हूतात्म्यांच्या बलिदानाबाबत शंका घेण्याचे कारणच सकाळमधला तो लेख आहे.(सकाळमधील लेख वाचल्यानंतर असे मानावे लागेल की,बरेचसे लोक पोलिसांच्या चूकीमूळे हूतात्मे झाले असावे.) पोलिसांच्या चूकीमुळे एखादा मारला जात असला तरी केवळ तो मेला म्हणून त्याला हूतात्मा म्हणता येणार नाही. एखादा रस्त्याच्या कडेला हागायला बसलेला असताना पोलिसांची गोळी लागून मेला तर त्यालाही हूतात्मा ठरवले असते का आपण? जे आंदोलक खरोखरच(पोलिसांच्या चूकीमूळे नव्हे) महाराष्ट्रासाठी हूतात्मे झाले,मी त्यांचा आजन्म ऋणी राहीन.

सकाळची स्थापना मराठी आणि महाराष्ट्रासाठी झाली होती हे खरेच आम्हा सूज्ञांना माहित नाही. आणि तुम्ही कितीही घसा ताणून कोकललात तरी आम्हाला ते पटणार नाही.पंडीत नेहरूंच्या सांगण्यावरून त्यांनी (ना.परुळेकर)परराष्ट्र मंत्रालयाला सूचनाही केल्या होत्या आणि कदाचित त्याच पंडीत नेहरुच्या सांगण्यावरुन त्यांनी सं.म.चळवळीतील आंदोलकांवर टिका केली असावी.याच कारणास्तव सकाळवर आमच्या महाराष्ट्रवादी आचार्य अत्रेंनी टिका केली होती. आम्हाला तरी अत्रेंपेक्षा आपण(किंवा नाना परुळेकर) श्रेष्ठ वाटत नाही. खरेच,केवढा मोठा बुद्धीभेद झालाय आमचा.

आता तुमच्यासारखा श्रेष्ठ विचारवंत मराठीचे भविष्य सांगतोय तेव्हा आम्ही पामरांनी निश्चिंत व्हायला हरकत नसावी. नाहीतर राज्यसरकारला मराठीच्या भविष्याची चिंता लागली होती. तीही राज ठाकरेंच्या आंदोलनानंतर. चला कुणामुळे का होईना,मराठी आणि महाराष्ट्राचा पुळका आलाय सगळ्यांना.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन's picture

9 May 2008 - 3:36 am | मन

>> ते ठरवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? काही लोक मराठीसाठी काम करतात मात्र त्यांची प्रसिद्धी करत नाहीत आणि त्याच कारणास्तव त्यांचे काम जनतेपुढे पोचत नाही. याबद्दल जनतेला दोषी धरायचे का?
असतील उत्तरं (मुद्द्यांसहीत) तर द्या आता तथाकथित विचारवंतांनो.
ब्रेव्हो मिस्टर इनोबा...
चालु द्या.

पण शक्यतो

एखादा रस्त्याच्या कडेला हागायला बसलेला असताना पोलिसांची गोळी लागून मेला तर त्यालाही हूतात्मा ठरवले असते का आपण?

अशी ग्राम्य भाषा वापरु नका.
आपल्याकडे कणखर मुद्दे आहेत्.आपण अचुक तार्किकतेने आपलं म्हणणं मांडु शकतो.(जे आपण मांडलेलच आहे आधिच्या परिच्छेदात.)

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

रम्या's picture

9 May 2008 - 11:45 am | रम्या

एखादा रस्त्याच्या कडेला हागायला बसलेला असताना पोलिसांची गोळी लागून मेला तर त्यालाही हूतात्मा ठरवले असते का आपण?

अशी ग्राम्य भाषा वापरु नका.

त्याचं काय हाय मनोबा. प्रेमळ वाक्यांकडे दुर्लक्ष होऊ शकतं. पण अशी ग्राम्य भाषा थेट जिव्हारी लागते !! म्हणुनच कधी कधी वापरावी लागते!!

मन's picture

9 May 2008 - 3:40 am | मन

त्या नाना परुळेकराचा थेट "पार्-लुळे -कर" करुन टाकला असता त्यांनी ,खास त्यांच्या शैलीत.
नाय तर लिहिला असता अग्रलेख "नाना करी ठनाना"

:-)) :-)) :-)

अत्रे साहेब, क्षमा असावी, आज तेव्हढी तळमळ असली तरी आपल्याइतके सामर्थ्य नाही ह्यांना धडे शिकवायला.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

इनोबा म्हणे's picture

9 May 2008 - 3:49 am | इनोबा म्हणे

त्या नाना परुळेकराचा थेट "पार्-लुळे -कर" करुन टाकला असता त्यांनी ,खास त्यांच्या शैलीत.
नाय तर लिहिला असता अग्रलेख "नाना करी ठनाना"

अगदी बरोबर बोललास मनोबा.

अत्रे साहेब, क्षमा असावी, आज तेव्हढी तळमळ असली तरी आपल्याइतके सामर्थ्य नाही ह्यांना धडे शिकवायला.
हेच म्हणतो. आता महाराष्ट्राला अत्रेंची गरजच आहे.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

इनोबा म्हणे's picture

9 May 2008 - 4:17 am | इनोबा म्हणे

जरा प्रांतियतेच्या धोक्यांबद्दल पु.लं. नी काय म्हटले होते तेही वाचा.
संकुचित प्रांतीयतेचे धोके

आता हे सुद्धा पटत नसेल तर मर्जी आपली. झोपलेल्या जागे करता येते,झोपेचं सोंग घेतलेल्या नाही.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

मन's picture

9 May 2008 - 1:01 pm | मन

झकास लिंक आहे इनोबा.
च्यामारी ,पण आतापर्यंत एकाचही एकाही मुद्द्याला धड उत्तर आलेलं नाहिये .
(येण्याची अपेक्षाही कमी होत चालली आहे. )

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

राज ठाकरेनी मुद्दा उचलला कि उध्द्वने मराठीचा मुद्दा उचलला हा प्रश्न गौण आहे. आज महाराष्ट्रात मराठी माणसावर अन्याय होत आहे का नाही हा प्रश्न मह्त्वाचा आहे. घटनेनुसार जर भाषावार प्रांत रचना झाली असेल तर ज्यात्या राज्यात राहयला जाणारया प्रत्येकाला ती ती भाषा निदान बोलता तरी आली पाहिजे.तसेच त्या प्रांताच्या मुळनिवासी लोकांना काही त्रास होइल असे वागुन चालणार नाही.मुळात सकाळ पेपर हा काय आहे हे इथे सांगण्याची गरज नाही. अत्रेनी सकाळ पेपर का लोकाना आवडतो ह्याचे स्पष्टिकरण केले आहे ते वाचा.

इनोबानी जी भाषा वापरली आहे (एखादा रस्त्याच्या कडेला हागायला बसलेला असताना पोलिसांची गोळी लागून मेला तर त्यालाही हूतात्मा ठरवले असते का आपण?)

ती योग्यच आहे.जे सं म. साठी हुतात्मे झाले आहेत त्या सर्वाचे आपण आयुष्यभर ऋणी राहु.
तसेच अजय तुम्ही सांगितले आहे की
निदान कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांनी पैसा खाल्ला असेलही पण त्यांच्या सोसायट्या, साखर कारखाने, शिक्षण संस्थांमधून मराठी मुलेच पोट भरता आहेत. आजच्या तथाकथीत नेत्यांसारखे नाही, ज्यांची धंद्यातली भागिदारी परप्रांतियांसमवेत, धंदे परदेशातही आहेत. इतरांना नालायक म्हणून आपण लायक आहोत, असे सिद्ध होत नाही. त्यासाठी अंग मोडून कामच करावे लागते. संस्था उभाराव्या लागतात. माणसं उभी करावी लागतात. त्यांना बळ द्यावे लागते. विशेष म्हणजे त्यासाठी वेळ द्यावा लागतो. आपण इतरांच्या पुण्याईवर नेते झालो की या झुलीचा अभिमान वाटायला लागतो आणि झटपट रिझल्टही मिळावा असे वाटू लागते. या वाटण्यातूनच असली काही भंपक भूमिका समोर येते.
आजकाल त्या संस्था ,सोसायट्या,कारखाने ह्याची हालात काय आहे हे तुम्हाला ठाउक आहे का?त्याना सतत वर्षाला मदतनिधीचे सलाईन द्यावे लागते. पण ते सलाईन हेच कारखानदार रात्री सोडा म्हणुन वापरतात.त्यात जे कोणी मराठी लोक काम करतात त्याना वर्षातुन एकदाच पगार मिळतो. कारखानदारी प. महाराष्ट्रात आहे तिथे हि शेतकरी आत्महत्या करत आहेत.कारखान्यामध्ये साखर विकत घेणारे लोक पर प्रांतीयच आहेत ते ह्या कारखानदारबरोबर काम करुन गलेलठ्ठ झाले आहेत. ह्याच्या कॉलेजात प्रवेश पण पैसा मोजुनच मिळतो आणि बहुधा ते परप्रांतीयच असतात. हे परदेशात उधोगधंदे न काढता परदेशातील बॅका कशा मोठ्या होतील ह्याकडे लक्ष देत असतात.
पु.ल. चा लेख वाचा
प्रांत म्हणजे काही रेव्हेन्यू खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या सोईसाठी केलेल तुकडे नव्हेत! आपल्या देशातल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली ती योजना आहे. खेड्यांतल्या एका कोपऱ्यात राहणाऱ्याला आपल्या राज्यकर्त्या अधिकाऱ्यांशी धिटाईनं मातृभाषेत बोलून व्यवहार करता यावा, जी भाषा त्यानं कधी ऐकली नाही, तिच्यातून शिक्षण घेण्याची सक्ती करुन त्याला कायम अडाणी ठेवण्याच्या परिस्थितीतून त्याची मुक्तता व्हावी, यासाठी भाषावार प्रांत आवश्यक आहेत. पण एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नोकरीधंद्यासाठी जाणाऱ्या लोकांनी आपण अन्य प्रांतीयांच्या अंत:करणावर, डोक्यावर आणि मुख्य म्हणजे पोटावर स्वत:च्या प्रांतीय अहंकारामुळं आणि स्वार्थानं आक्रमण करणार नाही, हे पथ्य पाळणं ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे. शेवटी दुसऱ्याची वेदना काय आहे, तो कां ओरडतो आहे, चळवळ करतो हे समजून घेणं आणि आपल्या वागणुकीतून त्याला दु:ख होतं आहे हे कळल्यावर आपली वागणूक बदलणं,
हेच वागणे आम्हाला परप्रांतीयाच्या कडुन अपेक्षीत आहे.इथे या पण इथले बनुन रहा. येताना साखर बनुन या व इथल्या तुमच्या वास्तव्याचा एक गोडवा इथे निर्माण करा. राज ठाकरेनी त्याच्या भाषणात कोणत्याच राजकिय मराठी नेत्याला शिव्या दिल्या नाहित,नीट तपासुन बघा. त्यामुळे त्याचे भाषण राजकिय होते हा आपला समज खोटा आहे. त्यानी हा जो मुद्दा उचलला आहे तो ते भविष्यात कसा वापरतात ते मह्त्वाचे आहे. परंतु एकमेकाचे पाय ओढु हाच आमचा मराठी बाणा विसरुन राज ठाकरेना आपण साथ देउया.

वेताळ.

मन's picture

9 May 2008 - 7:08 pm | मन

वेताळ, ब्रेव्हो....
अप्रतिम मुद्दे मांडलेत.
पण आतापर्यंत एकाचही एकाही मुद्द्याला धड उत्तर आलेलं नाहिये .
(येण्याची अपेक्षाही फारच कमी होत चालली आहे. )
ह्या वेताळाला उत्तर देण्याची पात्रता असलेला आहे का कुणी राजा विक्रमादित्य तुम्हा (अ)विचारवंतांपैकी.

आपलाच,
मनोबा
(उपाख्य साठ्यांचे (नाठाळ) कार्टे)

बट्ट्याबोळ's picture

10 May 2008 - 5:43 am | बट्ट्याबोळ

मी वरती बरेच प्रतिसाद वाचले. आपण एक काम करूयात. एकमेकांची उणीदुणी काढत
बसायला नको. जे काही ५-२५ मराठी न बोलणारे लोक कोणत्याही कारणास्तव सं.म. मधे
वारले - श्रद्धांजली !!!

पण त्यामुळे मराठी शी तडजोड नको. जे झालं ते झालं. आता डोळे उघडले आहेत आपले.
रा़ज काय करेल? उद्धव काय करेल ? काय केल त्यांनी ? हे मुद्दे गौण आहेत. आपण
प्रश्न विचारू, मी काय करणार ? माझ्या परीने मी मराठी चा वापर वाढवीन. माझ्या क्शेत्रात
मी मराठी साठी योगदान देईन. उदा. "याहू" हे संस्थळ मराठी मधे उपलब्ध नाही. आता यात
राज/उद्धव काय करणार ? परंतु "याहू" मधे काम करणारा मराठी माणूस आपल्या परीने प्रयत्न
करू शकतो. आणखी एक उदा. "सिफि". माझ्या परीने जिथे मला हा मुद्दा मांडता येइल तिथे
मी मांडतो. आजूनही काही उपयोग झालेला दिसत नाही, पण होईल अशी खात्री आहे.

मि.पा. स्तुत्य आहे. धन्यवाद आणि शुभेच्चा!!

इनोबा म्हणे's picture

10 May 2008 - 5:04 pm | इनोबा म्हणे

पण त्यामुळे मराठी शी तडजोड नको. जे झालं ते झालं. आता डोळे उघडले आहेत आपले.
रा़ज काय करेल? उद्धव काय करेल ? काय केल त्यांनी ? हे मुद्दे गौण आहेत. आपण
प्रश्न विचारू, मी काय करणार ? माझ्या परीने मी मराठी चा वापर वाढवीन. माझ्या क्शेत्रात
मी मराठी साठी योगदान देईन.

तू बोललास ते अगदी बरोबर आहे. माझे देखील हेच म्हणणे आहे की,प्रत्येकाने वैयक्तिकरीत्या महाराष्ट्रासाठी-मराठीसाठी योगदान द्यायला हवे. अर्थात कोणी तसे प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध करण्याऐवजी पाठींबा द्यायला हवा.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर