मटण सीख कबाब

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
4 Mar 2011 - 2:49 am

साहित्यः

मटण खिमा - ५०० ग्रॅम
कांदा - १ बारीक चिरुन
आले लसुण पेस्ट - २ चमचा
हळद - १ चमचा
लाल तिखट - २ चमचे
गरम मसाला - १ चमचा
काळी मिरी पावडर - १ चमचा
आमचुर पावडर - २ चमचा
कोथिंबीर - १/४ कप बारीक चिरुन
अंडे - १
बटर - ३ चमचे
मिठ चवीनुसार
चाट मसाला, कांदा आणि टोमॅटोचे गोल काप सजावटीसाठी
कबाब करण्या साठी सळ्या किंवा बांबु स्टिक्स

कृती:

१. मटण खिमा स्वच्छ धुवुन, चाळणीमधे १/२ तास निथळत ठेवावा. १/२ तासानंतर खिमा paper napkin ने कोरडा करुन घ्यावा.
२. खिम्या मधे बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, गरम मसाला, काळी मिरी पावडर, आमचुर पावडर, २ चमचे बटर व मिठ टाकुन निट मिक्स करुन घ्यावा.
३. ह्या खिम्या मधे १ अंडे फेटुन टाकावे व एकत्र करुन फ्रिज मधे १/२-१ तास झाकुन ठेवावे.
४. ओवन २७५ degree celcius ला १५ मिनिटे preheat करावा.
५. खिमा बाहेर काढुन मिक्स करावा. हाताला थोडे पाणी लावुन हा खिमा सळ्यांवर लावावा. त्याला साधारण हाताच्या मुठीचा आकार द्यायचा प्रयत्न करावा.
६. ह्या सळ्या ओवन मधे ठेवुन १५ मिनिटे भाजुन घ्याव्यात. हे करताना ५ मिनिटांनी कबाबला वरतुन बटर लावुन त्याची खालील बाजु वरती करावी. त्या बाजुला सुद्धा बटर लावावे.
७. ५ मिनिटांनी कबाब बाहेर काढावेत. कबाब सळ्यांवरुन काढुन घ्यावेत.
८. आवडत असल्यास वरतुन चाट मसाला sprinkle करुन कांदा व लिंबु सोबत गरम serve करावा.

टिपः

१. तुमच्या कडे सळ्या किंवा बांबुच्या स्टिक्स नसतील, तर आपली नेहमीची लाकडी पळी, ज्याचा मागचा दांडा गोल असतो. त्या दांड्याला थोडे पाणी लावुन, त्यावर खिमा लावावा. तो खिमा अलगद हाताने काढुन ओवन मधे भाजण्या साठी ठेवावा.
२. ओवन नसल्यास खिम्याचे लांब गोळे करुन तव्यावर shallow fry केले, तरी खुप छान लागतात.
३. मटण आवडत नसल्यास त्या जागी तुम्ही चिकन, beef किंवा pork चा खिमा वापरु शकता.

प्रतिक्रिया

शेखर's picture

4 Mar 2011 - 4:49 am | शेखर

बघुनच खायची इच्छा मेली....

अवांतरः टार्‍याच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत....

टारझन's picture

4 Mar 2011 - 12:01 pm | टारझन

असेच म्हणतो . शेखर्‍याच्या प्रतिक्रीयेच्या प्रतिक्षेत.
मला सिख कबाब बघायला आवडत नाहीत ते ह्याच्या आकारामुळेच. त्यामुळे चुकुन ऑर्डर दिली तर मी "चिकण / मटण "कट" सिख कबाब " ची ऑर्डर देतो. आणि स्ट्रिक्टली कट करुन आणायला सांगतो वेटर ला.

मा.श्री. निनाद काका मुक्काम पोस्ट हडपसर , ह्यांच्या "बिका शेक कबाब " च्या पाकृच्या प्रतिक्षेत.

- टारझन

सविता's picture

4 Mar 2011 - 3:27 pm | सविता

शी बै अच्र्त

हो, तुमचे म्हणणे बरोबर आहे. सीख कबाब दिसायला एवढे खास वाटत नाहीत, पण त्याची चव मला खुप आवडते. तुम्ही पण एकदा ही कृती try करुन बघा, आणि मग मला सांगा कबाब आवडले कींवा नाही ते.

हो, तुमचे म्हणणे बरोबर आहे. सीख कबाब दिसायला एवढे खास वाटत नाहीत,

एवढे ? आहो त्या शेखर्‍याची दातखिळी बसली तिकडे .. :)

पण त्याची चव मला खुप आवडते. तुम्ही पण एकदा ही कृती try करुन बघा, आणि मग मला सांगा कबाब आवडले कींवा नाही ते.

मला ही चवंच आवडते , म्हणुनंच मी कट करुन मागवतो असे आधीच नमुद केल्या आहे. बाकी करुन बघेन आणि पाकृ देखील टाकील . फोटो मात्र कट केलेल्या कबाबांचाच देईन पण ;)

- कुंडलीनी
पापा से पैसे लुंगा .

कच्ची कैरी's picture

4 Mar 2011 - 10:43 am | कच्ची कैरी

एकदम चुम्मा दिसताय कबाब ;)

सविता's picture

4 Mar 2011 - 10:44 am | सविता

मटन चे टेक्श्चर (मराठी प्रतिशब्द?) मला फारसे आवडत नाही. फार चावत बसतोय असे वाटते!

मटन ऐवजी चिकन असेल्...तर मला भारी आवडेल.... बरोबर थोडी हिरवी चटणी, कांदा...लिंबू पिळून्..आ हा हा.....

@शेखर
इच्छा मेली तर तिला जाळून किंवा दफन करून या....
अवांतर : ती उतरन मधली इच्छा असेल तर बेष्ट च कटकट संपेल च्यामारी... किती दिवस चाललीये.. घरचे त्या वेळेत दुसरे काही पण लावू देत नाहीत!

कबाब तर आवडलेच पण उतरन बद्दल एकदम पट्ले सविता
एकदाचि मेली तर बरे होइल .............इछा

विशाखा राऊत's picture

4 Mar 2011 - 3:41 pm | विशाखा राऊत

एकदा चिकन कबाब खाल्ले पण त्याला वेगळाच स्मेल येत होता :(... परत टेस्ट करायची इच्छा गेली... बाकि रेसेपी मस्त

हो, बरेचदा कुठल्याही खिम्याचा खुप वास येतो. म्हणुन खिमा नेहमी fresh घ्यावा. आणि हा खिमा वापरताना तो २-३ वेळा धुवुन घ्यावा. त्यामुळे काही वास येणार नाही.

नगरीनिरंजन's picture

4 Mar 2011 - 3:46 pm | नगरीनिरंजन

सीख कबाब म्हणतात की शीग कबाब म्हणतात याला? माझ्या माहितीप्रमाणे सळईवर (शीगेवर) लावून भाजतात म्हणून याला शीग कबाब म्हणतात.
बाकी कबाब छान लागत असतील असा अंदाज करतो.

मला नक्की माहित नाही, पण सगळीकडे मी तरी सीख कबाब असच वाचल आहे. :)

सीख कबाबच म्हणतात त्याला शीग नव्हे
सीख = A spit is used to cook food in a barbaque

नगरीनिरंजन's picture

4 Mar 2011 - 8:48 pm | नगरीनिरंजन

धन्यवाद वाहीदा. फार दिवसांचा गैरसमज आज निर्णायकरीत्या दूर झाला.

श्रीराम गावडे's picture

4 Mar 2011 - 7:43 pm | श्रीराम गावडे

रेडिओ होटेलमधे सिख कबाब आणि रोटि छान मिळते त्याचि आठवण आली.
आणि कबाब चवदारच लागतात फक्त पोटात एखादा पेग असावा.

सानिकास्वप्निल's picture

5 Mar 2011 - 1:37 am | सानिकास्वप्निल

झकास पाकृ दिसतेय :)
नक्की करून पाहेन

खादाड's picture

5 Mar 2011 - 11:16 am | खादाड

करुन पाहणार

चिंतामणी's picture

6 Mar 2011 - 12:42 am | चिंतामणी

ही प्रतिक्रीया फोटो पाहुन देत आहे. पाकृ वाचलीच नाही.
वाचुन काय करणार? घरी करायला परवानगी नाही. तेंव्हा.......................................................

आमंत्रणाची वाट बघत आहे.;)

जाता जाता एक सांगतो. मायक्रोव्हेव ओवन पेक्षा तंदुर भट्टी अथवा कोळश्यावर भाजलेल्याची चव "न्यारी" असते.

फोतो अजिबात नाही आवद्ला