पुरातन काळात जेंव्हा आमच्याकडे ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही होता आणि फक्त दुरदर्शन हीच वाहिणी यायची , तेंव्हा मुकबधीरांसाठी खास बातम्या येत असत त्यात सगळं पाहुन ( साइन कन्व्हेण्शन्स) बातम्या समजुन घेता येत ,
ही पाककृती वाचन दृष्टया विकलांगांनाही समजावी म्हणुन एक अभिनव प्रकारे मांडल्या गेली असल्याने पाककृती क्षेत्रात मैल्याचा दगड ठरावी .
बाकी आधी ही "कोदा ची भजी " आहे असे वाटल्याने दोन सेकंद रोचक वाटुन गेले .
अंडे? ही भजी अंडे न घालता मस्त होतात.
माझ्या लग्नाच्या केळवणाला सगळ्या जेवणाबरोबर मैत्रिणीच्या घरी ही भजी केली होती.
त्यानंतर तितकी चांगली भजी खाल्ली नाहीत.
तुमच्या फोटोतील भजी जरा मध्यम आचेवर तळायला हवी होती काय?
आमच्याकडेही नैवेद्याच्या स्वयंपाकात तसेच चातुर्मास पाळणार्यासाठी कोबीची भजी करतात. कोबी बारीक चिरुन त्यात हळ्द, तिखट, मीठ घालून साधारण अर्धा तास ठेवायचे. कोबीला पाणी सुटते त्यात मावेल इतपत पीठ आणि अगदी थोडे पाणी घालून पीठ भिजवायचे. मस्त खेकडा भजी होतात.
प्रतिक्रिया
26 Feb 2011 - 4:33 pm | टारझन

- कच्चा कच पक्का पक
26 Feb 2011 - 7:00 pm | कच्ची कैरी
ही भजी करुन खाण्याची हिम्मत करावी लागेल.
26 Feb 2011 - 7:19 pm | रेवती
अंडे? ही भजी अंडे न घालता मस्त होतात.
माझ्या लग्नाच्या केळवणाला सगळ्या जेवणाबरोबर मैत्रिणीच्या घरी ही भजी केली होती.
त्यानंतर तितकी चांगली भजी खाल्ली नाहीत.
तुमच्या फोटोतील भजी जरा मध्यम आचेवर तळायला हवी होती काय?
28 Feb 2011 - 1:24 pm | परिकथेतील राजकुमार
ती उरलेल्या भाजीची नसवीत अशी आशा व्यक्त करतो आणि माझे भाषण संपवतो.
2 Mar 2011 - 1:45 am | रेवती
अरे हो, बरी आठवण झाली.
तू लग्न कधी करतोयस परा?;)
26 Feb 2011 - 10:15 pm | मुलूखावेगळी
मस्त
ही भजी आमच्याकडे सोवळ्याच्या स्वंयपाकात कांदा भज्याला ऑपशन म्हनुन करतात.
पण आमच्याकडे सोवळ्यात अंडे चालत नाही. ;)
27 Feb 2011 - 5:04 pm | स्वाती२
आमच्याकडेही नैवेद्याच्या स्वयंपाकात तसेच चातुर्मास पाळणार्यासाठी कोबीची भजी करतात. कोबी बारीक चिरुन त्यात हळ्द, तिखट, मीठ घालून साधारण अर्धा तास ठेवायचे. कोबीला पाणी सुटते त्यात मावेल इतपत पीठ आणि अगदी थोडे पाणी घालून पीठ भिजवायचे. मस्त खेकडा भजी होतात.
27 Feb 2011 - 8:06 pm | निवेदिता-ताई
ही कोबिची भाजी पांढरी का दिसतेय...
भजी मस्तच..
आणी कोबी असताना कांदा का घातलाय....दोन्ही चवी एक्त्र ...?????????
28 Feb 2011 - 11:52 am | गुड्डु
हळद कमी झाली आहे बहुतेक
28 Feb 2011 - 12:04 pm | नगरीनिरंजन
आमच्याकडे याला कोबीचे मुटके म्हणतात आणी ते भज्यासारखे डीप फ्राय न करता रोल करून शॅलो फ्राय करतात. त्यात अंडे वापरत नाहीत.
2 Mar 2011 - 11:57 pm | इंटरनेटस्नेही
चांगली पाकृ.. बाकी ते फोटो म्हणजे.. आपल्या कडे १.३ मेगापिक्सल कॅमेरा असलेला सेल आहे हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न!
19 Aug 2011 - 5:49 am | सिद्धार्थ ४
फोटो दिसत नाही आहेत..