मराठी शब्द हवा

अविनाश ओगले's picture
अविनाश ओगले in काथ्याकूट
23 Feb 2011 - 9:59 pm
गाभा: 

पोथी खालच्या पाटाला, जो पोथी वाचताना उघडून ठेवतात व नंतर घडी घालून मिटता येतो त्याला मराठी अथवा संस्कृत शब्द कोणता?

प्रतिक्रिया

नारयन लेले's picture

24 Feb 2011 - 10:04 am | नारयन लेले

त्याला पोथीचा पाट म्हणाव्हे.

विनित

नारयन लेले's picture

24 Feb 2011 - 10:08 am | नारयन लेले

त्याला पोथीचा पाट म्हणाव्हे.

विनित

प्रास's picture

24 Feb 2011 - 1:27 pm | प्रास

पोथी खालच्या पाटाला, जो पोथी वाचताना उघडून ठेवतात व नंतर घडी घालून मिटता येतो त्याला मराठी अथवा संस्कृत शब्द कोणता?

त्याला "ग्रंथपीठ" असं म्हणता येईल.

वारकरि रशियात's picture

24 Feb 2011 - 2:09 pm | वारकरि रशियात

रयाळ

येथील तज्ञ / जाणकार मंडळी आणखी प्रतिशब्द सुचवतील / यात दुरुस्ती करतील / या शब्दाचा अर्थ - व्युत्पत्ती यावर अधिक प्रकाश टाकतीलच.

पर्नल नेने मराठे's picture

24 Feb 2011 - 2:25 pm | पर्नल नेने मराठे

हिन्दीत 'रियाल' म्हणतात. आताच एका मुस्लिम कलिगला विचारले.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Feb 2011 - 2:13 pm | परिकथेतील राजकुमार

पायदान ?

विजुभाऊ's picture

24 Feb 2011 - 2:31 pm | विजुभाऊ

पायदान ?

ए पर्‍या..... झोपेत आहेस का.
पायदान म्हणजे पायरी. बीनाका गीतमालेत अमीन सयानी नेहमी वापरायचा हा शब्द.
पोथी ठेवायच्या घडीच्या टेबलासाठी ग्रंथपीठ हा शब्द योग्य ठरेल.
आमच्या घरी त्याला "पोथी ठेवायचे" असाच उल्लेख व्हाय्चा. स्वतन्त्र नाव कधीच मिळाले नाही

परिकथेतील राजकुमार's picture

24 Feb 2011 - 2:33 pm | परिकथेतील राजकुमार

शब्दापुढे प्रश्नचीन्ह त्यासाठीच दिले आहे इजुभौ :)

मस्त कलंदर's picture

25 Feb 2011 - 12:35 am | मस्त कलंदर

पायखाना का म्हणून विचारलं नाहीस ते!!!!

ग्रंथ, आसन, पोथी, पाट..... असल्या सगळ्या पोथ्या आणि त्या स्टँडच्या संदर्भात येणार्‍या शब्दांत तुला नेमका हा पाय कसा आणि कुठे दिसला जरा प्रकाश टाकता का हो जाणकार???

गवि's picture

24 Feb 2011 - 2:46 pm | गवि

म्हणजे हेच का? की कोणत्याही बैठकीला घडवंची म्हणतात. "घडी"चा काही संबंध नसावा बहुतेक.

बाय द वे:

त्या फोल्डिंग स्टँडला पोथीचे "आसन"ही म्हणतात.

चिं.विं.च्या "चिमणराव ज्ञानेश्वरी वाचतात" मधे चौरंग असाही उल्लेख आहे. पण तो खरा मोठा चौरंग की हे घडीचे छोटे पोथ्यासन काय माहीत..

मेघवेडा's picture

25 Feb 2011 - 5:20 am | मेघवेडा

घडवंची.. बरोब्बर..

आजी म्हणायची.. कालपासून आठवायचा प्रयत्न करत होतो शब्द आठवत नव्हता पण.. घडवंची म्हणतात खरं. :)

नगरीनिरंजन's picture

25 Feb 2011 - 8:47 am | नगरीनिरंजन

पोथीस्टँडला घडवंची म्हणत नाहीत. घडवंचीचा संबंध घडीशी नसून घड्याशी आहे. कोणताही घडा ठेवण्याचे आसन म्हणजे घडवंची.
पोथीस्टँडला रयाळ हाच शब्द योग्य आहे.

असेच वाटते. आमच्या कडे असलेल्या धातुच्या तीन पायी स्टँडला घडवंची म्हणतात.

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Feb 2011 - 9:14 am | llपुण्याचे पेशवेll

आमच्याकडे त्या तीन पायी स्टँडला तिवई म्हणतात.
पोथीची मांडणी असे म्हटल्याचेही आठवते.

गवि's picture

25 Feb 2011 - 9:20 am | गवि

"पोथीची मांडणी" असे म्हटल्याचेही आठवते.

"पोथीची मांडणी" Seems right...

तिवई सहसा घडवंची पेक्षा उंच असते असे वाटते.

तिवई वर माठ किंवा पिंप ठेवतात , पोथी नव्हे .........घडवंची किंवा ग्रंथपीठ , पोथीपाट योग्य वाटते ........

त्याला जुन्या मराठीत "घडवंची" असादेखील शब्द आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Feb 2011 - 8:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शब्दाच्या शोधात मीही खूप विचारपूस केली पण शब्द काही सापडला नाही. काही उगाच डोळ्यासमोर शब्द आहे म्हणत होते. ओठावर आहे असे म्हणत आहेत. पण अजून काही शब्द काही कोणाला सांगता आला नाही. :(

”व्यासपीठ’ [वारकरी लोक हा शब्द वापरतात] ’आडणी’ ”घोडी’* असे शब्द मिळाले पण वरीजनल त्यासाठी काय शब्द आहे, तो काही सापडला नाही. शोध मोहीम सुरु आहे.

*[घोडी हा शब्द किर्तनाच्या वेळेस मृदंग उभे राहून वाजवतांना ज्या लाकडी स्टँडवर ठेवतात त्यासाठी वापरतात]

-दिलीप बिरुटे

llपुण्याचे पेशवेll's picture

25 Feb 2011 - 9:16 am | llपुण्याचे पेशवेll

घोडी हा शब्द ४ पाय असणार्‍या शीडीसाठी पण वापरतात.
आणि हो घोड्याच्या बायडीला पण घोडी म्हणतात.

मुलूखावेगळी's picture

25 Feb 2011 - 1:19 pm | मुलूखावेगळी

ह्यासाठी व्यासपीठ हाच शब्द मला सांगितला गेला.

योगप्रभू's picture

25 Feb 2011 - 2:36 pm | योगप्रभू

मित्रांनो,
धर्मग्रंथ ठेवायच्या स्टँडला समर्पक शब्द नसेल तर अडून बसू नका. चांगलासा शब्द तयार करा आणि वापरायला सुरवात करा.

मला 'आधारिणी' हा शब्द वापरावासा वाटतोय. म्हणजे जी फळी/आसन/घडवंची ग्रंथाला आधार देते ती.
पण संस्कृत शब्दच वापरायचा असा आग्रह नाही. बोली भाषेत अजुन सोपा शब्द तयार करता आला तर उत्तम.

गवि's picture

25 Feb 2011 - 3:12 pm | गवि

ग्रंथासन सुचवलाच आहे.
शिवाय,
पोथीधर
ग्रंथपाट
ग्रंथाधार

-बोलीभाषेत

मिटफळी
पोथीफळी
पोथ्यासन
पोथीपाट
चौकडी
घडीचा चौरंग
पुस्तकपाट
फुली

कृपया माझा प्रतिसाद पुन्हा एकदा नजरेखालून घालावा.

त्याला "ग्रंथपीठ" असे म्हणतात आणि हा शब्द किमान गेली २० वर्षे तरी माझ्या वापरात आहे.

सुनील's picture

3 Oct 2012 - 2:34 am | सुनील

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16646980.cms

हे तेच अविनाश ओगले काय?

श्रद्धांजली!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Oct 2012 - 8:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बातमी वाचून खूपच दु:ख होतंय.. अविनाश ओगले यांची माझी ओळख मिपावरच झाली. आम्ही कधी एक-दोन वेळा बोललोही होतो. संदर्भ कविताच.
दिवाळी अंकात की कोणत्या मासिकात त्यांच्या एका कवितेचा उल्लेख होता तेव्हा त्यांनी मला तो संदर्भ पाठवायचा सांगितला होता.
मी पाठवलाही. महिनाभरापूर्वी मी त्यांना क्षणभरासाठी मिपावर ऑनलाईन आलेलं पाहिलं.

सुनिल यांनी आता ही बातमी दिल्यावर आता त्यांच्याबद्दल कळतंय, खूपच दु:ख होतंय.

-दिलीप बिरुटे

जेनी...'s picture

3 Oct 2012 - 9:08 am | जेनी...

श्रद्धांजली .!

तर्री's picture

3 Oct 2012 - 9:10 am | तर्री

ही अपेक्षा .