Skip to main content

चिकन आणि भाकरी

लेखक जासुश यांनी सोमवार, 21/02/2011 16:40 या दिवशी प्रकाशित केले.
चिकन आणि भाकरी चिकन-५००ग्रॅम दहि हळद लाल तिखट-२ चमचे मीठ तेल चिकन मसाला टोमॅटो-१ चिरुन वाटण साहित्य सुके खोबरे - अरधी वाटी कांदे- ४ लसूण-२० पाकळ्या आले हिरवी मिरची-७-८ जिरे कोथिंबीर. चिकन ला १चमचा दही लावून मुरत ठेवावे. खोबर्‍याचे काप तव्यावर भाजून घ्यावेत. थोडे तेल तव्यावर टाकून कांदे चांगले तपकिरी होई पर्यंत भाजा.मिक्सर मधे खोबरे,कांदे आणि वाटना चे बाकीचे साहित्य थोडे पाणी घालून वाटून घ्यावे. कढईत तेल टाकून त्यात वरील वाटण टाकावे. थोडे फ्राइ झाल मग त्यात हळद, मिठ, लाल तिखट,चिकन मसाला टाकावा. मसाल्याचा एक सुगंध येऊ लागेल मग टोमॅटो टाकावेत आणि फ्राइ करावे मग त्यात चिकन टाकावे. आणि चिकन पूर्ण शीजल्यावर भाकरी सोबत सर्व करावे.....

वाचने 12978
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

In reply to by गणपा

हो ना.... अगदी मुहुर्त शोधला आहे यांनी. आम्ही साबुदान्याची खिचडी खातोय आणि हे मस्त चिकन वोरपतायत.

वा चिकन तर मस्तच दिसतय !आणि भाकरी कसली आहे ?चिकन आणि भाकरी नाव दिले आहे पण भाकरीची पाकृ.दिलेली नाही .

In reply to by कच्ची कैरी

ओ भाकरी तांदुळाची आहे. चिकन बरोबर मी तांदळाची भाकरीच खाते आणि मटन असले की बाजरीची.. हा रविवारचा बेत होता.. :)

In reply to by निवेदिता-ताई

निवेदिता-ताई , तांदुळाची भाकरी बनवायला अगदी सोपी असते..आणि खायला तर अहाहा....अगदी मौ असते. भाकरी सोबत लोणचे जरी खाल्ले तरी छान लागते. दुसर्या भाजीची गरजच नाही..अर्थात मला भाकरी बनवायची तेवढी सवय नाही..पण ताटात जशी भाकरी आहे त्याची रेसिपी मी टाकिन.

असह्य भूक चाळवली.. काय ब्रं क्रावं.. फक्कड पाकृ.. धन्यवाद..

ताटात बाजूला फक्त लिंबाची फोड ठेवलीय. मीठ आणि कांदा कोण ठेवणार? ताट वाढा म्हटले, की बसले आपले भाकरी, रस्सा आणि थोडासा भात घेऊन. तांदळाची भाकरी ठेवलीय, पण सोलकढीची वाटी कुठय? हे असलं अर्धमुर्ध ताट आमच्यासारख्या खानदानी घरात चालत न्हाय. -म्हातारबाबा- (मजेत घ्या हो. :))

In reply to by निवेदिता-ताई

शिक्रण चालेल काय?
"शिक्रण ही तर आयत्या वेळी उपटलेल्या पाहुण्याची बोळवाबोळव आहे." - पु.ल. देशपांडे. (लेखः 'माझे खाद्यजीवन', संग्रहः 'हसवणूक'. स्मरणातून उद्धृत; शब्दावलीत किंचित फेरफार शक्य.)

झणझणीत दिसते आहे चिकन! झक्कास ! भाकरी पण मस्त दिसते आहे! फोटो पाहूनच पोट दुखायला लागले.