किंमत

अनिरुद्ध अभ्यंकर's picture
अनिरुद्ध अभ्यंकर in जे न देखे रवी...
4 May 2008 - 12:30 am

कारणे होती तशी जागायला
चांदण्या मज यायच्या भेटायला

प्रश्न हा साधाच होता पण तरी
लागली ती कारणे शोधायला

मी जरी आता सुखी दिसतो तुला
खूप किंमत लागली मोजायला

काळजी माझी नका इतकी करू
काळजी लागेल ही बोचायला

बंद मी केले इथे उमलायचे
आणि ती आली फुले मागायला

हो मला म्हटलेस तू कविते जसे
मी खुळ्यागत लागलो वागायला

भाव मी दुखःस या थोडा दिला
आसवे ही लागली माजायला

माणसे येतील ही रस्त्यावरी
भूक आहे लागली बोलायला

गझल

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

4 May 2008 - 12:37 am | विसोबा खेचर

वा अभ्यंकरशेठ,

कारणे होती तशी जागायला
चांदण्या मज यायच्या भेटायला

या पहिल्याच ओळी अतिशय सुरेख...!

अवांतर - मी आपल्यातल्या विडंबनकारापेक्षा आपल्यातल्या कवीचा अधिक चाहता आहे.. :)

आपला,
(आडनांवबंधु) तात्या.

अभिज्ञ's picture

4 May 2008 - 12:57 am | अभिज्ञ

कविता आवडलि.

काळजी माझी नका इतकी करू
काळजी लागेल ही बोचायला

बंद मी केले इथे उमलायचे
आणि ती आली फुले मागायला


हे विशेष भावले.

पुढील लेखनास शुभेच्छा.

अबब.

मदनबाण's picture

4 May 2008 - 4:09 am | मदनबाण

मी जरी आता सुखी दिसतो तुला
खूप किंमत लागली मोजायला

काळजी माझी नका इतकी करू
काळजी लागेल ही बोचायला

बंद मी केले इथे उमलायचे
आणि ती आली फुले मागायला
>>
छान मला खुप आवडली तुमची ही गझल.....

मदनबाण.....

शितल's picture

4 May 2008 - 7:55 am | शितल

मला तर सगळीच कविता खुप आवडली.

प्राजु's picture

4 May 2008 - 11:33 am | प्राजु

बंद मी केले इथे उमलायचे
आणि ती आली फुले मागायला

हे मस्तच...

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

4 May 2008 - 5:29 pm | चतुरंग

मतल्यातच पकड केलीस एकदम!

कारणे होती तशी जागायला
चांदण्या मज यायच्या भेटायला

हे पुढचे शेरही खासच!

भाव मी दुखःस या थोडा दिला
आसवे ही लागली माजायला

माणसे येतील ही रस्त्यावरी
भूक आहे लागली बोलायला

चतुरंग

अनिरुद्ध अभ्यंकर's picture

5 May 2008 - 2:21 pm | अनिरुद्ध अभ्यंकर

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)अनिरुद्ध अभ्यंकर

बेसनलाडू's picture

6 May 2008 - 10:02 am | बेसनलाडू

गझल फार छान आहे. खूप आवडली.

कारणे होती तशी जागायला
चांदण्या मज यायच्या भेटायला

बंद मी केले इथे उमलायचे
आणि ती आली फुले मागायला

हे फार आवडले.

दुसर्‍या शेरात 'पण तरी' ऐवजी 'तरीही' असे सुचवावेसे वाटले. शेवटचा शेर एकूण गझलेच्या तुलनेत जरा अशक्त वाटला. चूभूद्याघ्या.

(आस्वादक)बेसनलाडू

अनिरुद्ध अभ्यंकर's picture

7 May 2008 - 11:37 am | अनिरुद्ध अभ्यंकर

धन्यवाद!!
(आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर

जयवी's picture

6 May 2008 - 11:39 am | जयवी

बंद मी केले इथे उमलायचे
आणि ती आली फुले मागायला

.............. क्या बात है!

अनिरुद्ध अभ्यंकर's picture

7 May 2008 - 11:38 am | अनिरुद्ध अभ्यंकर

धन्यवाद!!
(आभारी) अनिरुद्ध अभ्यंकर

धनंजय's picture

7 May 2008 - 4:27 pm | धनंजय

गझल आवडली