पक्षी निरीक्षण

प्राजु ताइंच्या कवितेवर माझे एक विडंबन

भंकस ही करता करता, मन माझे गुंतले
मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले...

आळसावलेले पाय हे, पसरुन कट्ट्यावरी
इकडुन तिकडे फिरवी, ही मुंडी वरचेवरी
आज त्याचे ध्यान का, एकीवरचं थांबले
मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले...

टक लावुन पाहताना, तोंड का वेडावले
वळुन मागे पाहताना, मन का पस्तावले
नेहमीच्या या खेळामधले, नाविन्य का हे संपले
मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले...

नजरेत भरता शिल्प हे, हा सांड कोठून उपटला
घाम फुटुन सर्वांगाला, कंप का हा भरला
जवळ येताना पहून तो, पाय लावून पळाले
मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले...

चेतन

अवांतरः घुसखोरिबद्दल क्षमस्वः (केशवसुमार आणि प्राजु करिता)

समर्पण..

लिंक का नाही आली...????

http://www.misalpav.com/node/1658

आली आली,

लिंक इथं आली आहे. काळजी नसावी.

http://misalpav.com/node/1665

http://misalpav.com/node/1665 ही लिन्क बघा

लय भारी...

चालू द्या.
अवांतर : प्राजू कधी विडंबन करतात का? केशवसुमारांना स्पर्धक?

आळसावलेले

आळसावलेले पाय हे, पसरुन कट्ट्यावरी
इकडुन तिकडे फिरवी, ही मुंडी वरचेवरी
आज त्याचे ध्यान का, एकीवरचं थांबले
मस्त पोरी टापताना, कोण साले शिंकले...

टक लावुन पाहताना, तोंड का वेडावले
वळुन मागे पाहताना, मन का पस्तावले

नजरेत भरता शिल्प हे, हा सांड कोठून उपटला
घाम फुटुन सर्वांगाला, कंप का हा भरला

Laughing Laughing Laughing

चलने दो...एकदम चलनी दिसताय शेठ!!! (ह.घ्या.)

http://misalpav.com/node/1665