कुठे आणि कधी जाऊया एकदिवसीय सहलीला?

वेदश्री's picture
वेदश्री in काथ्याकूट
30 Apr 2008 - 12:57 pm
गाभा: 

एकदिवसीय सहलीच्या कौलाला एकूण २१ जणांनी मते दिली पैकी ६७% लोकांची होकार भरणारी मते मिळाली आहेत, त्यामुळे किमान १४ लोकांचा ग्रुप बनण्यास हरकत नसायला हवी. आता प्रश्न उरतो कधी आणि कुठे जायचे त्याचा. ऐन मे चा उन्हाळा बघता कुठे काढता येऊ शकेल सहल?

मे २००८ मधील विकेंडचे दिवस बघता ( ३,४,१०,११,१७,१८,२४,२५ आणि ३१ ) असे दिवस मिळू शकतात असे दिसते. यातले कोणास कोणते दिवस सहलीसाठी बाजूला काढणे जमेल ते सांगावे. एका महिन्यात एकच ( किंवा दोन ) सहल करायचे उद्दिष्ट असूनही एकाहून जास्त दिवस विचारण्यामागचा उद्देश हा की सर्वांच्या तारखा जुळवता येईलसे बघता येईल !

विजुभाऊंनी पुण्याच्या जवळपास सहलीला जाण्यास योग्य ठिकाणांची सूची बनवण्यासाठी अत्यंत उपयुक्त काथ्याकूट काढलेला आहे, जो आपल्याला आपली निवड कळवण्यास उपयोगी होईलसे वाटते.

इथे प्रतिसाद देणार्‍यांनी ( अर्थातच जे सहलीला येऊ इच्छिताहेत त्यांनी ) त्यांचे सद्यठिकाणही प्रतिसादात नमूद केल्यास सोयीचे जाईल, असे वाटते.

प्रतिक्रिया

वेदश्री's picture

30 Apr 2008 - 1:09 pm | वेदश्री

उपलब्ध दिवस ( सध्ध्यातरी ) : १०,११,१७,१८,२४,२५ आणि ३१
जावेसे वाटत असलेली ठिकाणे : बनेश्वर किंवा पाटेश्वर
सद्यठिकाण : पुणे

मन's picture

30 Apr 2008 - 4:10 pm | मन

माझ्या कडे एक एक्सेल शीट आहे.त्यात पुण्याजवळ्ची शेक्डो ठिकाणं दिली आहेत.
त्या ठिकाणचे अंतर्,जायला लागणारा वेळ्,जिल्हा ...सगळ सगळं आहे त्यात्.मला वाटतं ती नक्किच कामाला येइल सगळ्यांच्या.
पण ती ह्या संकेत स्थळावर चढ्वावी कशी(अपलोड कशी करावी), तेच कळत नाहिये.
एक तर ते तरी सांगा,किंवा आपला मेल आय डी तरी द्या,जिथे ती मी तुम्हाला पाठवु शकेन.

बाकी एक सल्ला.
पुण्याजवळ्ची सर्वच ठिकाणे झकास आहेत.
उदाहरण द्यायचं तर :-लोह गड्,वज्र गड्,पुरंदर्,कार्ले-भाजे,एकवीरा आइचे मंदीर,जवळ्ची नाथाची गुहा ,माळ्शेज, निघोज
लोणावळा,खंडाळा,माथेरान वगैरे वगैरे.
(एक शांत ठिकाण :- नारायण गाव)
प्रश्नच नाही.

पण ही ठिकाणं आपल्यातील बर्‍याच लोकांनी पाहिली असतील(विशेषतः पुणेकर्-मुम्बै करांनी.)
आमच्या गावकडे(औ.बाद ला) हि ह्याच तोडिची ठिकाणे आहेत.पण ती तितकिशी प्रसिद्ध नसल्याने,आज त्या ठिकाणांवर वर उल्लेख केलेल्या
ठिकाणा इतकी गर्दी,गज्बजाट नसते.
माझ्या गावाकड्ली ठिकाणं अजुनही तुलनेनं शांत्,कमी वर्दळ असणारी आहेत.
म्हणजे जर तुम्हा लोकांना अशा शांत ठिकाणी जायचं असेल तर काही जागा आहेत ह्या अशा:-
वेरुळ्,अजिंठा,पैठण्,बिबि का मकबरा,पाण चक्की हे तर सगळ्यांनाच माहित असणार.

पण शिवरायाचे डोंगरी किल्ले पाहिल्यावर जर "दौलताबाद्-देवगिरी" आपण पाहिलतं तर वेगळाच अनुभव येइल.
ह्याची रचना,स्थापत्य डोंगरी किल्ल्या पेक्षा जरा वेगळेच आहे. ह्यात "बांध काम" जास्त करण्यात आले आहे.
म्हण्जे एक काहि तरी वेगळ पाहिल्याचा तुम्हाला आनंद मिळेल.(तिथल्या एका भुयारातुन्/अंधार्‍या वाटेतुन जरुर जा,
भर दुपारी ही तिथे एक कणही प्रकाश नसतो.जाताना भन्नाट वाटतं त्यात.)

शूल्-भंजन म्हणुन एक ठिकाण आहे, तिथुन जवळच.(खुल्ताबाद च्या वाटेवर)
तिथे स्वतः संत एकनाथ समाधी-तपश्चर्या करण्यासाठी येत्,असे सांगतात.
(आता तिथे एक साधसं दत्त्-मंदीर आहे.)
तिथे एक मोठि शिळा आहे. तिला खडकाने वाजवले तर सप्त सुर निघतात.(असे पुजारी सांगत होता. मी
खडकानी बडवल्यावर एक गोड आवाज आला हे खरं .पण ते काही "सप्त सुर" नव्हते.

आणि हे त्या पुजार्‍याला सांगताच त्याचे "तप्त्-सुर" ऐकावे लागले. :-) असो. )

तर , त्याठिकाणी गेल्यावर, एक वेगळिच प्रसन्नता,शांतता अनुभवास येते.
तो अनुभवच प्रत्यक्ष घेता येइल,त्याचे वर्णन नेमके शब्दात करता येणार नाही, हे माझे दुर्दैव.
(शुल भंजन ला जाणार कसे? :- खुल्ता बादच्या गाडित बसुन मुख्य रस्त्यावर "शुल्-भंजन" फाट्यावर उतरावे.
तिथुन पुढे ४ किंवा साडे ४ किलोमिटर एज पायवाट आहे.जाताना दोन्ही कडे काहिच नाही,नुसते पसर्लेले मैदान,
त्यावर कधी झाडी तर कधी तळी आहेत्.दिल खुलास एकांत, प्रसन्नता,शांतता अनुभवता येते जाताना.)

शिवाय "म्हैस माळ" आहेच. हे आमच्या गावा क्डलं "महा बळेश्वर."
पण पुरेसं व्यापारी करण न झाल्यानं अगदी शांत शांत.
तिथे अगदि डिक्टो तिरुपती सारखं मंदीर उभार्ण्यात आलयं.तीही छान जागा आहे.

काय काय म्हणुन सांगु,किती किती म्हणुन सांगु.
तिथे असतो तर एकेकाला पकडुन ह्या सर्वाची सहल घडवलि असती.
असो.

आनंदयात्री's picture

30 Apr 2008 - 4:29 pm | आनंदयात्री

शुलीभंजन पहाण्याची खरी मजा पावसाळ्यातच, अर्धा डोंगर अन मंदिर सुद्धा ढगांनी वेढलेले असते, लांबच लांब हिरव्याग्गार डोंगररांगा अन खाली दिसणारी इटुकली गावं-वाड्या, छोटी छोटी तळी अन भिजलेला आसमंत. चिखल तुडवत हुंदडायला जागोजाग उमललेली रानफुले पहातांना स्वर्ग २ बोटे उरायचा, छ्या बॉ ऋषिकेशराव कालेजचे दिवस आठवले.
जवळचे गवताळा अभयारण्य तिथली पाटण्याची देवी-मागचा मोठ्ठा धबाबा कोसळणारा धबधबा, दाट्ट जंगल, निसरड्या वाटा अन कधी मधी अवचित ऐकु येणारी डरकाळी.
पितळखोर्‍याच्या गुहांचा परिसर सुद्धा मनोहारी, तासनतास निघावे वाटत नाही तिथुन.
अजुन काय काय सांगावे बॉ, मेरा गांव हैही ऐसा, अल्टीमेट.