गुळाची पोळी........

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
10 Jan 2011 - 8:36 pm

साहित्य--- एक वाटी बेसन पिठ, एक ते दीड वाटी रिफ़ाईंड, पांढरे तिळ एक वाटी, गुळ चांगला पिवळा दोन ते अडीच वाट्या, वेलदोडा पुड एक चमचा,तांदूळ पिठी.
पारीसाठी- एक वाटी मैदा, अर्धी वाटी कणीक,चिमुटभर मिठ, एक चमचा कडकडीत तेलाचे मोहन घालुन पिठ घट्ट भिजवुन ठेवा.

कॄती--- एक वाटी तेलावर एक वाटी बेसन खमंग भाजुन घ्या (बेसन लाडू प्रमाणे मस्त वास येइपर्यंत),
त्यावर थोडेसे दुध शिंपडा म्हणजे बेसन फ़ुलुन येइल, गुळ खिसुन घ्या, तिळ खमंग भाजून त्याचे कूट करा,
बेसन कोमट असतानाच त्यात खिसलेला गुळ व तिळाचे कूट , वेलदोडा पुड घालून चांगले मळुन घ्या.
हातात घेतले तर त्याचा मुटका झाला पाहिजे, इतके मळून घ्या, हा झाला पोळीचा गुळ तय्यार.

आता भिजवुन ठेवलेल्या पिठाचे एका चपातीला घेतो तेवढा गोळा घ्या , त्याच्या दोन पार्या तयार करा,
त्या दोन पारिच्या दुप्पट गुळ घेउन त्याचा गोळा तयार करुन त्या दोन पारीच्या मध्यभागी ठेवा, कडा दुमडुन घ्या , तांदळाच्या पिठिवर हलक्या हाताने लाटा, म्हणजे गुळ कडेपर्यंत जाईल,
आता लाटलेली पोळी मध्यम आचेवर गव्हळी, गव्हळी भाजा,
भरपुर साजूक तुपा बरोबर खायला द्या.

फ़ोटो पोळी केली कि लगेच येइल इथे...........:)

प्रतिक्रिया

कौशी's picture

10 Jan 2011 - 11:07 pm | कौशी

वाट बघतेय्.....छान पाकक्रुती आहे.

निवेदिता-ताई's picture

11 Jan 2011 - 7:09 pm | निवेदिता-ताई

तिळ खमंग भाजा--

खिसलेला गुळ----

बेसन पिठ तेलावर भाजते आहे-

ही घ्या गुळ-पोळी तय्यार ----

निवेदिता-ताई's picture

15 Jan 2011 - 7:16 pm | निवेदिता-ताई

ओ निवेदिता-ताई... कितीवेळचा झालं वाट बघतोय..
कुठं आहे तुमची गूळ पोळी?
आमच्याकडे गूळ पोळीसारखाच "मलिदा" केला जातो..

स्वैर परी's picture

11 Jan 2011 - 9:34 am | स्वैर परी

या कडाक्याच्या थंडीत अशी उबदार पाकृ म्हणजे छानच! गूळ , तीळ आणि तूप म्हणजे शरिरात उब निर्माण करणारे घटक.
बरेच दिवस मला ही पाकृ हवी होती. धन्यवाद ताई, अशी सोपी आणि सध्या आवश्यक असलेली पाकृ दिल्याबद्दल! :)

वा.. गुळाची पोळी .. अत्यंत आवडता पदार्थ..

विशेष म्हणजे गार झाली तरी छानच लागते.

पुरणपोळी मात्र गरमच जास्त छान.

अशीच एक सांज्याची पण बनवतात्से वाटते.

साखरेची पोळी हा प्रकार खूप पूर्वी खाल्ला होता आणि तोही अत्यंत आवडला होता.

पण आता साखर घालून करु गेले तर जळते. ज्या कोणी खाऊ घातली त्याने कशी केली होती त्या वेळी साखरेची पोळी काय माहीत..

प्राजु's picture

11 Jan 2011 - 9:33 pm | प्राजु

ग वी,
साखरेची पोळी माझ्या सासूबाई करतात.
त्यासाठी कच्ची साखर (त्याला बहुधा भारतात लिसा साखर म्हणतात) लागते. इकडे ब्राऊन शुगर जी किंचित ओलसर असते त्याची पोळी मी केली आहे. चांगली होती. गूळाच्या पोळीपेक्षा सुटसुटीत प्रकार. ;)

गवि's picture

11 Jan 2011 - 10:18 pm | गवि

wah, thanks.

But, what about my problem, "साखर घालून केली तर जळते..?"

निनाद's picture

11 Jan 2011 - 11:16 am | निनाद

ओह गुळाची पोळी! माझी अत्यंत आवडती.
आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
या निमित्ताने मला माझे आई सोबत घालवलेले मस्त दिवस आठवले...

स्मिता.'s picture

11 Jan 2011 - 11:21 am | स्मिता.

परवाच मला गूळाच्या पोळीची आठवण आली होती आणि इकडे आईची कमतरता जाणवली.
पाकृ वाचून पुन्हा आठवण झाली. आता मलाच करावी लागेल असं वाटतंय...

कवितानागेश's picture

11 Jan 2011 - 11:59 am | कवितानागेश

या पोळीचा गूळ कसा करायचा ते मला नीट माहीत नव्हते. म्हणून मी तिच्या कधी वाटेला गेले नव्हते.
आता करून बघेन.

प्राजु's picture

11 Jan 2011 - 8:53 pm | प्राजु

मी करते पण त्या काही फार ग्रेट नाही होत.

निवेदिता ताई, पोळी भाजताना तव्यावर तेल सोडून भाजायची का?
दुसरी गोष्ट बेसन इतकी पातळ झालं तर, गूळ त्यात घातल्यावर तो विरघळेल ना. म्हणजे आणखीनच पातळ होईल का?

निवेदिता-ताई's picture

11 Jan 2011 - 10:01 pm | निवेदिता-ताई

तव्यावर पोळी भाजताना तेल न सोडता भाजायची,

आणी बेसन जरी पातळ दिसले तरी त्यात तिळाचे कूट व किसलेला गुळ घातला की ते छान मिळून येते,
करुन बघ.

प्राजु's picture

13 Jan 2011 - 12:55 am | प्राजु

अच्छा! बघते करून या वेळी.

मदनबाण's picture

12 Jan 2011 - 6:05 am | मदनबाण

मस्त... :)

(खादाड)

विनायक बेलापुरे's picture

12 Jan 2011 - 12:43 pm | विनायक बेलापुरे

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jan 2011 - 2:20 pm | परिकथेतील राजकुमार

तै कधी येउ ग?

पराभौ.. आपण नुस्ते असे विचारत बसायचे आणि मिटक्या मारत बघत बसायचे.

त्यापेक्षा मी सुचवतो.

पुण्यातील प्रत्यक्ष निवासी मिपाकरांपैकी प्रत्येक पाकृ एक्पर्टने एकेक पाकृ घेऊन एका ठिकाणी जमावे आणि सर्वांनी आस्वाद घ्यावा. मनापासून दाद मिळेल आणि गप्पाही होतील.

कट्टा वगैरे असे नाव दिले नाही तरी चालेल.

बोला २९ जानेवारीचा शनिवार धरुया का?

ठिकाण आणि वेळ तुम्ही सांगा. काहीतरी करु अरेंजमेंट.

मी आज केल्या. निवेदीता ताई.. तुझ्या पद्धतीने केल्या. खरंच खूप मस्त झाल्या.
धन्यवाद.

दिपाली पाटिल's picture

20 Jan 2011 - 12:42 pm | दिपाली पाटिल

निवेदिता ताई, या प्रमाणात किती पोळ्या होतील आणि शेकताना काही तेल-तुप लावायचे कां?

दिपाली :)

अमोल केळकर's picture

20 Jan 2011 - 1:20 pm | अमोल केळकर

वा वा सुंदर

अमोल

मितान's picture

15 Jan 2015 - 7:26 am | मितान

आज ही पोळी करणार. पण मैदा वापरणार नाही.
सर्वांना संक्रांतीच्या शुभेच्छा !

सविता००१'s picture

15 Jan 2015 - 10:28 am | सविता००१

एक दिवस खा मैदा थोडासा.
मैद्याने खुटखुटित होते पोळी. कणकेने मऊ पडते.
स्वानुभव हीच गॅरंटी....

मितान's picture

22 Jan 2015 - 7:40 am | मितान

मैदा न घालता पण पोळी खुटखुटीत झाली वो ताई...
शिवाय मैदा नको म्हणून मऊ पोळी खाण्याची तयारी असतेच आपली :)

सविता००१'s picture

22 Jan 2015 - 10:13 am | सविता००१

मॅड्म
मी खाते राव एखादेवेळी मैद्याचे पदार्थ.

पण मैदा वापरणार नाही.

मैदा वगळण्याला +१

स्पंदना's picture

16 Jan 2015 - 9:18 am | स्पंदना

धन्यवाद निवेदिता ताई!! कसली मस्त झाली गुळाची पोळी!! बघ ना!

मदनबाण's picture

22 Jan 2015 - 7:13 am | मदनबाण

आहाहा... :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Oi Amma Oi Amma... ;) - { Mawaali }

निवेदिता-ताई's picture

14 Jan 2016 - 11:59 am | निवेदिता-ताई

संक्रांती स्पेशल

जागु's picture

14 Jan 2016 - 2:27 pm | जागु

छानच.

आमचे काल तिळगुळ झाले आता शनिवारी किंवा रविवारी पोळ्या करायचा विचार आहे.