कालच केली होती ही चिकन करी. सगळे तुडुंब जेवले आणि मग ४ तास झोप ताणून दिली. आणि संडे साजरा झाला! असो. हि चिकन करी करायला जरा जास्त वेळ लागतो म्हणजे bachelor चिकन करी एवढी सोपी कृती नाहीये कारण ह्यात मसाला वाटून घ्यायला लागतो. पण डेफिनेटली वर्थ द एफर्ट!
सामग्री व कृती:
७५० ग्रॅम ते १ किलो चिकन
१ मोठा चमचा दही
१ चमचा हळद
२ तमालपत्र
३ बडी इलायची
१/२ चमचा मीठ
- चिकन स्वच्छ धुवून त्याला दही, हळद आणि मीठ चोळून लावावे. मग एका कुकर च्या भांड्यात हे चिकन आणि तमालपत्र व बडी इलायची घालून कुकर मध्ये (३ शिट्ट्या) शिजवून घ्यावे. भांड्यात पाणी घालायची गरज नाही.
एका नॉन स्टिक भांड्यात, १ मोठा चमचा तूप आणि एक मोठा चमचा तेल गरम करावे. त्यात २ चमचे जिरं, ५ लवंगा, २ दालचिनी, ४ कोरड्या लाल मिरच्या, ६ मिरे, २ तमालपत्र, २ बडी इलायची, १ चमचा आलं लसूण पेस्ट, आणि ५ मोठे कांदे (चिरलेले) घालावे. कांदा चांगला लालसर परतला गेला कि त्यात २-३ चमचे लाल तिखट, २ चमचे देग्गी मिर्च पावडर घालून अगदी लाल होई पर्यंत परतावे. मग ह्यात ४ टोमाटो बारीक चिरून घालावे आणि ते शिजून कांदा टोमाटो एकजीव होयीस तोवर परतावे. हवी असल्यास १ चमचा साखर घालावी म्हणजे टोमाटो चा आंबट पण कमी होतो. बडी इलायची आणि तमालपत्र बाजूला काढून ठेवावे.
आता हा कांदा टोमाटो मसाला थोडा गार झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्यावा.
परत मसाला ज्यात परतला त्या भांड्यात एक चमचा तेल घालून, त्यावर वाटलेला मसाला घालून परतावा. आता २ कप थंडगार पाणी ह्यात घालून उकळी आणायची. गार पाणी घातल्याने लाल तवंग छान येतो (खूप तेल घालावे लागत नाही). आता ह्या रस्स्यात शिजलेले चिकन आणि त्याचे पाणी घालावे. करी ला चांगली उकळू द्यावी. आपल्याया हवी तेवढी दाट झाली कि गरम गरम पोळ्यान बरोबर सर्व्ह करावी.
एव्हाना घरातल्या सर्व माणसांच्या भूका मसाल्याच्या मस्त वासानी खवळलेल्या असतीलच.. त्यामुळे, पानात वाढता क्षणी ह्यावर सगळे तुटून पडणार ह्याची खात्री!
प्रतिक्रिया
10 Jan 2011 - 12:50 pm | टारझन
फोटु पाहुन वाटते आम्हाला किमान १० -१२ डिश लागतील पंजाबी चिकन च्या :)
- पेताड पपिता
10 Jan 2011 - 1:02 pm | गवि
आलोच..
10 Jan 2011 - 1:23 pm | पियुशा
सहि !
10 Jan 2011 - 2:11 pm | दीविरा
एकदम मस्त!!
:)
10 Jan 2011 - 3:10 pm | जागु
मस्तच ग.
एक शंका - कुकरमध्ये ३ शिट्या काढल्यावर खुपच नरम होईल ना चिकन ?
10 Jan 2011 - 3:51 pm | खादाड अमिता
जागु ताई, मी केल तेव्हा खूप नरम नाही झाल. पण तुम्ही ह्या च्या एक्स्पर्ट आहात. किति शिट्या काढल्या तर व्यवस्थित शिजेल?
10 Jan 2011 - 4:56 pm | गणपा
मुळात चिकन शिजायला (मटणासारखा) वेळ लागत नाही . शिट्टी लावायची गरज नाही. चिकन शिजायला जास्तित जास्त २०-२५ मिनीटे पुरेशी होतात.
अर्थात चिकनच्या तुकड्यांच्या आकारावरही अलंबुन आहे. (तुम्ही चित्रात दाखवलेल्या तंगडीच्या आरावरुन वर दिलेली वेळ पुरेशी आहे.) आख्खी कोंबडी शिजवायला जाल तर वेळ जास्त लागेल :)
10 Jan 2011 - 4:58 pm | जागु
अमिता मी चिकन कधीच कुकरमध्ये शिजवत नाही. मटण शिजवते कुकरमध्ये. तरीपण जर चिकन शिजवायचे झाल्यास १ शिटि पुरे होईल.
10 Jan 2011 - 5:12 pm | नीलकांत
खूप छान आहे ही पाककृती. फोटो तर एकदम खल्लास.
- नीलकांत
10 Jan 2011 - 6:24 pm | स्वाती२
तोंडाला पाणी सुटले.
10 Jan 2011 - 6:43 pm | सूर्य
मेलो.. आता चिकन खाल्याशिवाय आत्म्याला शांती लाभणार नाही :)
अवांतर : तुम्ही पुण्यात असता का हो ? एकदा भेट द्यावी म्हणतोय तुमच्या किचनला.
- सूर्य.
10 Jan 2011 - 7:07 pm | ज्योति प्रकाश
काय फोटु टाकलायत लगेच खावीशी वाटते पण आज सोमवार नाईलाज्.सोमवारी मासाहारी पा कृ टाकण्यास मनाई आहे.
10 Jan 2011 - 8:11 pm | प्राजु
आह्हाह्हा!!! क्या बात है!!
10 Jan 2011 - 8:57 pm | सुनील
फोटो मस्त आणि पा़कृदेखिल रुचकर वाटतेय.
वर कुकर आणि शिट्टीवर काही प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्याबद्दल - मी स्वतः चिकन कधीही प्रेशर कुकरमध्ये शिजवत नाही कारण त्याची गरज नसते. आणि मटण जरी प्रेशर कुकरमध्ये शिजवले तरी शिट्टी कधीही काढत नाही (शिट्टी काढणे म्हणजे ऊर्जेचा अपव्यय!)