पाटोडीची भाजी

रुपाली प्रा॑जळे's picture
रुपाली प्रा॑जळे in पाककृती
7 Jan 2011 - 9:22 pm

अस्सल झणझणीत विदर्भातली भाजी येथे देत आहे.

साहित्य : चनादाळ पिठ दिड वाटी, आले लसुन पेस्ट २ टीस्पुन, कीसलेले सुके खोबरे २० ग्राम, तेल १०० ग्राम, कडीपत्ता, हिरवि मिर्चि २, कोथी॑बीर, तिखट, मिठ, हळ्द, जिरे,का॑दा-लसुन मसाला स्वादानुसार.

कृती : चनादाळ पिठात तिखट, मिठ, हळ्द, जिरे स्वादानुसार घालुन भिजवावे. जाडसर पोळी लाटून चौकोनी काप करावेत. कढईत तेल घालुन का॑दा परतावा. त्यात चिरलेली हिरवी मिर्ची ,कडीपत्त,तिखट, मिठ, कीसलेले सुके खोबरे ,आले लसुन पेस्ट ,हळ्द, जिरे,का॑दा-लसुन मसाला स्वादानुसार घालून फोडणी द्यावी. त्यात दिड ग्लास पाणी घालुन दोन उकळ्या येवु द्याव्या. शेगडी म॑द आचेवर करुन घ्यावी. रस्स्यात चौकोनी काप घालावेत व म॑द आचेवर दोन उकळ्या येवु द्याव्यात. वरुन कोथि॑बीर भुरभुरावी.

भाकरीसोबत ही भाजी छान लागते.

फोटो खाली दिला आहे.

Image0085.jpg

प्रतिक्रिया

रुपाली प्रा॑जळे's picture

7 Jan 2011 - 9:24 pm | रुपाली प्रा॑जळे

फोटो कसा ई॑सर्त करायचा ?

गणपा's picture

7 Jan 2011 - 9:33 pm | गणपा

आपली खरड्वही पहा.

फोटो आधी पिकासा किंवा फ्लिकर मधे टाकून त्याची लिंक इथे "इमेज" च्या बटनावर क्लिक करून चढवता येइल.

भाजीची पाकृ मी शोधतच होतो. कधीतरी करून बघायची आहे. आमचे शेजारी होते एक चौधरी नावाचे. ते मुळचे भुसावळ चे त्यांच्याकडे ही (आणि फरसाणातल्या जाड्या शेवयांची) भाजी कधी केली की आठवणीने मला आणून द्यायचे. अजूनही आठवण झाली की तोंडाला मस्त पाणी सुटतं.

रुपाली प्रा॑जळे's picture

7 Jan 2011 - 10:00 pm | रुपाली प्रा॑जळे

आशिष सुर्वे's picture

8 Jan 2011 - 9:33 am | आशिष सुर्वे

शॉलेड!!

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jan 2011 - 11:08 am | परिकथेतील राजकुमार

क्या बात है ! उद्याच करुन बघतो.

शंका :- दोन हिरव्या मिर्च्यांमध्ये झणझणीतपणा कसा येणार ?

शुचि's picture

10 Jan 2011 - 4:02 am | शुचि

ढब्बू असतील =))

ही मिपा सदस्या " ढब्बु पैसा" ह्यांच्यावर वैयक्तिक टिका वाटते. संपादकांनी कृपया जातीपातीने लक्ष घालावे.

ज्योति प्रकाश's picture

8 Jan 2011 - 2:35 pm | ज्योति प्रकाश

किसलेले सुके खोबरे तसेच घालायचे कि बारीक करुन घालायचे.

रुपाली प्रा॑जळे's picture

10 Jan 2011 - 3:22 pm | रुपाली प्रा॑जळे

खोबरे भाजुन बारीक करुन घातल्यास उत्तम

याचे रेडी टु कुक पाकिट मिळते का?

सुंदर आहे पाकृ.
मला काही शंका आहेत.

तुम्ही लिहील आहे की बेसनच्या पोळ्या लाटायच्या आणि त्याचे तशेच तुकडे रश्यात घालायचे. ह्याचे पिठ रस्श्यात विरघळत नाही का ? आणि पिठ जाडसरच मळावे लागत असेल ना पोळी लाटण्यासाठी ?

रुपाली प्रा॑जळे's picture

10 Jan 2011 - 3:29 pm | रुपाली प्रा॑जळे

पिठ जाडसरच मळावे व पोळ्या जाडसरच लाटायच्या. पण रस्श्यात घालायच्या आधी शेगडी म॑द आचेवर ठेवावी व भाजीला म॑द आचेवरच उकळी आणावी.