नवलकोल आणि मुळ्याच्या पानांचा भगरा/झुणका

जागु's picture
जागु in पाककृती
4 Jan 2011 - 4:49 pm

काल मी नवअलकोल आमटीसाठी आणि कांदेमुळा सॅलेडसाठी आणला होता. आणि हा जिवनसत्ववाला पाला टाकुन देण जिवावर आल. म्हणुन दोन्हींचा मिळून भगरा केला.

नवालकोलचा पाला

कांदेमुळ्याचा पाला

साहित्य :
नवअलकोल चा पाला चिरुन
कांदेमुळ्याचा पाला चिरुन
कांदा १ ते २
राई, जिर
हिंग
हळद
बेसन
मिरच्या चिरुन २-३
मिठ,
चिमुटभर साखर
अर्धा चमचा गोडा मसाला
१ चमचा लिंबाचा रस
तेल

पाककृती :
भांड्यात तेल गरम करुन त्यावर राई जिर चांगल तडतडल की त्यावर कांदा, मिरची घाला. (कधी कधी मिरची दिसत नाही आणि तोंडात येते आणि वयस्कर व लहान असे दोन्ही गट घरात असल्याने मी मिरची न घालण्याची खबरदारी घेतली. )

कांदा परतवुन त्यात हिंग, हळद घालुन नवअलकोल व मुळ्याचा पाला घाला. मिरची ऐवजी मी मसाला घातला आहे.

झाकण ठेउन थोडा शिजु द्या. मग त्यावर बेसन, गोडा मसाला घाला.

ढवळून शिजु द्या. शिजत आले की त्यावर मिठ, साखर व लिंबाचा रस पिळून वाफ आणा. करत असतानाच खमंग वास सुटतो आणि भुक लागते.

मी मुळा आणि गाजर सॅलेड साठी कापले होते. त्याचेच ह्यावर डेकोरेशन केले. त्यामुळे एक प्लेटही वाचली.

प्रतिक्रिया

चिंतामणी's picture

4 Jan 2011 - 4:54 pm | चिंतामणी

आवडली पाकृ.

पण अनेकांना मुळा आणि नवलकोल या भाज्याचे वावडे असते. कितीजण करून बघणार जरा शंका आहे.

sagarparadkar's picture

4 Jan 2011 - 6:23 pm | sagarparadkar

मी अजून तरी नवलकोल "पूर्णपणे" शिजलेला पाहिलेला नाही. भाजी खाताना मधेच एकदम दाताखाली एखादा चिवट सालीचा तुकडा येतोच, त्यामुळे मग ती भाजीच नकोशी वाटते ...

नवलकोल पूर्णपणे शिजवण्याची काही युक्ती आहे का?

सागर हा पाला जाड असतो. पण हा बारीक चिरुन भगरा केला की काही नाही वाटत .भगर्‍यात पुर्ण मिळून जातो.

प्राजक्ता पवार's picture

4 Jan 2011 - 4:57 pm | प्राजक्ता पवार

जागु ताई , पाकृ छान आहे :)

वाह!!!! मस्त प्रकार असतो हा. :)
नवलकोल + कोलंबी तसचं मुळा + बोंबलाच कालवण ए१ लागतं.
घरी कधी हे दोन्ही प्रकार झाले की वरची भाजी (पीठं न पेरता) ठरलेली असायची.

सध्या इकडे नवलकोल आणि बोंबील दोन्ही मिळत नाहीत. :(

सुनील's picture

4 Jan 2011 - 5:18 pm | सुनील

मस्त!

कुठल्याही भाजीचा पाला फेकू नये. पातीच्या कांद्यांचाही असाच झुणका करता येतो आणि तोही छान लागतो!

ह्यात बेसन असे थेट घालण्यापेक्षा आधी थोडे कोरडे भाजून घेतले तर?

रेवती's picture

4 Jan 2011 - 5:57 pm | रेवती

खमंग लागते ही भाजी!
मला आवडते.
फोटू छानच!

पिंगू's picture

4 Jan 2011 - 9:59 pm | पिंगू

छान पाककृती... उरलेल्या पानांचा सुंदर उपयोग..

- झाडपालाप्रेमी पिंगू

धनंजय's picture

4 Jan 2011 - 10:06 pm | धनंजय

कित्येकदा मी बारक्या-किरट्या नवलकोलांची जुडी पाल्यासाठीच घेतो.

या पाककृतीमध्ये मसाला आणि गोडा मसाला दोन्ही घातले आहेत... (इथे मसाला म्हणजे कुठला मसाला? घरी करण्याइतपत सोपा आहे, की बाजारातून आणलेला कुठलासा मसाला आहे?)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

5 Jan 2011 - 2:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

(कधी कधी मिरची दिसत नाही आणि तोंडात येते आणि वयस्कर व लहान असे दोन्ही गट घरात असल्याने मी मिरची न घालण्याची खबरदारी घेतली. )

असा उल्लेख लेखात आहे. इथे मसाला म्हणजे लाल तिखट असावं, गोडा (किंवा काळा) मसाला, इ. इ. मसाला 'मिक्स' वेगळे.

मसाल्याची रेसिपी देणार आहे मी. रोजचा वापरणारा लाल मसाला आहे तो.

ही आयडिया मस्तच आहे. आणि अशा पद्धतीने केल्यावर त्या मूळ भाज्यांतले नेमके नको ते गुण मास्क होऊन छान टेस्ट आणि एरव्ही न खाल्ले जाणारे घटकही खाल्ले जातील.

नवलकोलाचा सागर यांचा मुद्दा पटला. साल आणि शिवाय कधीकधी चिवट धागेही येतात ते एकदम नकोसे वाटते.

पण इथे नवलकोलाचा तो भाग नाहीच आहे. फक्त पालाच वापरलेला दिसतो आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम येऊ नये.

पाकृची नोंद घेतली आहे. करुन पाहणार हे नक्की..

सुहास..'s picture

5 Jan 2011 - 11:46 pm | सुहास..

हे कधी बनविल ?

जागुताई, आजपासन कुठली ही पाकृ टाकली की लिंक देत जा हो !!

इतकी वर्षे हाटिलात(पंचतारांकित सकट) काम करुन बी अशी पाकृ बघीतली नाही एव्हढेच म्हणतो .