हा केक ,माझ्या माहेरी आणि सासरी, एकदम सुपर हिट! हा केक कधीच उरला तर काय असा प्रश्न पडत नाही - कारण केल्या केल्या लगेच त्याचा चट्टा मट्टा होतो. हि रेसिपी 'Cooking from peasants and their wives' नावाच्या एका खूप जुन्या पुस्तकातली आहे. ह्या पुस्तकाची डिस्कवरी मला एका रद्दी च्या दुकानात झाली होती. करून बघू म्हणून अगदी पौंड चे ग्राम चे कप असे हिशोब करून मग, पहिल्यांदा हा केक करून बघितला होता. ह्या केक ची ब्युटी त्याच्या versatility मध्ये आहे. एकदा हि बेसिक रेसिपी जमली कि मग त्याचे विविध फ्लेवर्ड वर्जन करता येतात. उ.दा. त्यात लिंबाची साल किसून आणि एक चमचा लिंबाचा रस घालून, लेमन केक तयार होतो. तसाच, ऑरेंज केक पण करता येतो. चोकॉचीप्स घातल्या कि चोकलेट चीप केक झाला. आणि हो, तुमच्या सर्वांच्या आग्रहास्तव ह्याच्यात थोडे फेरफार करून एक 'लो फॅट' वर्झन देत आहे.
सामग्री:
१ १/२ कप मैदा (सेल्फ रेसिंग फ्लौर वापरत असल्यास बेकिंग पाउडर घालू नका)
३/४ कप बारीक साखर/ पिठी साखर/ कॅस्टर शुगर/ जाड साखर (जाडी साखर वापरली तर जास्त वेळ बटर आणि साखर क्रीम करत बसाव लागत)
१०० ग्राम अमूल बटर
३ मोठी अंडी
१ tsp बेकिंग पाउडर
१/४ कप दूध
१ tsp vanilla essence
कृती:
- ओव्हन १८० डिग्री ला प्रिहिट करा.
- सर्व सामग्री रूम टेम्परेचर ला असावे. आधी बटर आणि साखर नीट फेटून घ्या. साखर विरघळून ते एकदम क्रिमी दिसायला लागलं पाहिजे. मग त्यात एक एक अंड घालून फेटा.
- एका वेगळ्या भांड्यात, मैदा आणि बेकिंग पाउडर चाळून घ्या. आता हा मैदा थोडा अंड्याच्या मिश्रणात घाला आणि कालवा. मग दुधात vanilla essence घालून, ते त्या केक च्या मिश्रणात कालवा. उरलेला मैदा घालून स्मूथ मिश्रण तयार करा.
- पाऊंड केक सहसा लोफ टिन मध्ये बेक करतात. पण तुमच्या कडे दुसर्या आकाराचे केक चे भांडे असेल तरी चालेल. पसरट भांड असेल तर केक बेक करायला कमी वेळ लागेल. ज्या भांड्यात केक बेक करायचा आहे त्याला तेल,तूप, किंवा बटर ने ग्रीज करा आणि मग त्यात एक चमचा मैदा घालून तो त्या भांड्याच्या सगळया बाजूला लागेल असे पसरवा. ह्याला बेकिंग टिन प्रीपेर करणे म्हणतात.
- केक चे मिश्रण ह्या टिन मध्ये घालून त्याला १८० डिग्री ला ३०-४० मि बेक करा. पूर्ण घरात केक चा खमंग आणि वनीला चा मस्त वास सुटला कि केक ची 'done test' करा. केक च्या मध्य भागी एक सळी (skewer), सुरी घालून त्याला ओलं मिश्रण चिकटत नाही न ते बघा. जर ती सळी एकदम स्वच्छ निघाली, तर केक फस्त करनेको तय्यार!
प्रतिक्रिया
30 Dec 2010 - 12:31 pm | पिंगू
खादाड ताय, अंड्याला काही पर्याय सुचव ना.. तसा केक मला भलताच आवडला...
- खादाड पिंगू
30 Dec 2010 - 12:42 pm | खादाड अमिता
पाऊंड केक मधे अन्ड्याला पर्याय नाही. पण एक अशिच बिन अन्ड्याच्या केक ची रेसिपि पोस्ट करेन.
30 Aug 2013 - 9:41 pm | अग्निकोल्हा
मिल्कमेड वापरता येते व पदार्थाचा टेस्ट अँड फिल एक्सपिरीअन्स विषेश बदलतही नाहि.
30 Dec 2010 - 1:09 pm | विजुभाऊ
या वर्षी १० किलोवजन कमी करायच्या बेताला तुम्ही बहुतेक हरताळ फासणार असे वाटतय
30 Dec 2010 - 1:10 pm | कच्ची कैरी
काय अमिता काय चाललयं काय्?तु तर एकदम सपाटाच लावला आहेस.चांगले आहे कीप इट ऑन.
30 Dec 2010 - 1:47 pm | स्वाती दिनेश
एकदा हि बेसिक रेसिपी जमली कि मग त्याचे विविध फ्लेवर्ड वर्जन करता येतात.
हे खरे..
एक सूचना- १०० ग्राम अमूल बटर लिहिले आहेस, अनसॉल्टेडकी सॉल्टेड?
अनसॉल्टेड (आणि लो फॅट :) )बटर घेतले तर अधिक चांगले.
मी लो कॅल केक करता कमी फॅटचे बटर वापरते.
स्वाती
30 Dec 2010 - 1:58 pm | खादाड अमिता
कमी फॅटचे बटर - बटर नसून वेजिटेबल ओईल्स पासून बनवलेले मार्जरीन असते. मुळातच कमी बटर घालून केलेला केक हा जास्त लो कॅलोरी असतो, बटर substitute वापरण्या पेक्षा.
30 Dec 2010 - 2:05 pm | स्वाती दिनेश
मार्गारीन वेगळे आणि लो फॅट बटर वेगळे..
आमच्याकडे प्लांट फॅटचे, सनफ्लॉवरचे मार्गारिन मिळते.. आणि ३९ % फॅटचे बटरही मिळते. नेहमीचे बटर ८५% फॅटचे असते.त्यामुळे ८५% फॅटवाले बटर न घेता मी ३९% वाले बटर घेते.
कमी बटर घालून किवा अजिबात बटर न घालताही लो कॅल केक करता येतो.
स्वाती
30 Dec 2010 - 2:11 pm | गवि
अजिबात बटर न घालता केल्यास केकऐवजी शिरा होईल अशी भिती कम शंका वाटते..
तज्ञांनी दूर करावी..
30 Dec 2010 - 2:17 pm | स्वाती दिनेश
त्या दुव्यावर टिचकी मारा, म्हणजे शंका दूर होईल.
स्वाती
30 Dec 2010 - 2:26 pm | गवि
ते खरंच आहे स्वातीताई, पण ते सगळे फोटोत.. एक्सपर्टनी केलेले.
प्रत्यक्ष करु जाऊन अनेकदा मी असा शिरा खाल्लाय त्याचं काय ? ;)
पण मी शिकलेली एक टिपः आपण केक बनवत आहोत हे आधी डिक्लेअर न करणे. मग आपण मुळात शिराच बनवत होतो असे दाखवून मखलाशी करता येते आणि हे शिरा-केक ट्रान्सफॉर्मेशन जगापासून लपवता येते..
नाहीतर मग "एक नवा प्रकार" म्हणून काहीही दिले तरी भागून जाते.
30 Dec 2010 - 3:07 pm | खादाड अमिता
इथे मुम्बईत लो फॅट ब्रेड स्प्रेड मिळ्ते (अमुल लाइट). त्याच्या केक चे तेक्स्चर वेग्ळेच होते. केक ची मजा येत नाही.
30 Dec 2010 - 1:56 pm | आजानुकर्ण
असे व्यस्त प्रमाण घेतल्यास होणाऱ्या पदार्थाला पाऊंड केक म्हणता येईल की नाही याबाबत शंका वाटते.
30 Dec 2010 - 2:08 pm | गवि
अच्छा.. पाऊंड केक म्हणजे असे आहे होय..?
आपल्याकडे असे १:१:१:१ प्रमाण घेऊन बनवले जाणारे काही पदार्थ आठवले:
-सत्यनारायणाचा प्रसादशिरा (एकास एक तूप्,रवा,साखर्,केळं)
-रावणपिठले (एकास एक तिखटपूड, बेसन इ इ)
ह्म्म.. याला आपण बटरचे प्रमाण कमी घेतल्यास "पाव-अदपाव" केक म्हणू शकतो.
कशी आहे सजेशन? :)
30 Aug 2013 - 7:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
रावणपिठले (एकास एक तिखटपूड, बेसन इ इ) पदार्थाचे नाव एकदम फिट्ट आहे ;)
30 Dec 2010 - 2:14 pm | खादाड अमिता
असे व्यस्त प्रमाण घेतल्यास होणाऱ्या पदार्थाला पाऊंड केक म्हणता येईल की नाही?
नाही. म्हणूनच ह्याला 'गॉन इन ६० सेकंद्स- लो फॅट पाऊंड केक ' म्हणतात. :)
ओरिजिनल पाऊंड केक चे १:१:१:१ असे प्रमाण असते.
30 Dec 2010 - 2:21 pm | गवि
विकीबाबांच्या त्या लिंकवर तर उत्तम आयसिंग वगैरे दिसत आहे.
आम्ही लहानपणी केकवरचे फक्त आयसिंग आधी चाटायचो आणि उरलेला आतला कोरडा भाग ही ते आयसिंग चाटण्याची किंमत म्हणून कसातरी गिळायचो.
ओ खादाडताई , तुमच्या केकवर आयसिंग नाही वाटते? अरेरे..
30 Dec 2010 - 3:03 pm | खादाड अमिता
आहो गवि- कमी कॅलोरी च्या केक ची रेसिपी आहे... एवढ्या बटर आणि आयसिंग शुगर चे आयसिंग केले तर कसे चालेल?
30 Dec 2010 - 3:03 pm | खादाड अमिता
आहो गवि- कमी कॅलोरी च्या केक ची रेसिपी आहे... एवढ्या बटर आणि आयसिंग शुगर चे आयसिंग केले तर कसे चालेल?
30 Dec 2010 - 3:37 pm | स्वैर परी
जाणकारांकडुन हे जाणुन घ्यायला आवडेल कि, जर ओवन तसेच वनिला एसेंस नसेल, तर केक कसा बनवायचा?
31 Dec 2010 - 9:26 am | खादाड अमिता
ओवन नसेल तर केक प्रेशर कुकर मधे बनवायचा. प्रेशर कुकर च्या तळाला सधारण ३ इन्च जाद वाळु चा थर करुन त्यावर एक जाळी ठेवुन मग त्याच्यावर केक चे भान्डे ठेवायचे. कुकर चि रिन्ग काढुन झाकण लावायचे. अश्या रीते केक करताना फक्त तो किति वेळ भाजत ठेवला आहे ह्याचि नोन्ध ठेवावी लागते.
वनिला एसेंस नसेल, तर वेलची ची पूड घालून पण छान कार्डामम केक करता येतो.
31 Dec 2010 - 3:01 pm | स्वैर परी
ह्म्म्म!!! बर्र्र्र्र्र्र्र्र्र्र! करुन पाहीन! :)
धन्यवाद अमिता!
30 Aug 2013 - 5:55 pm | विहंग
कधीही रोजच्या वापरातला कुकर ड्राय हिट करायचा नाही. मॅन्युअल मधे स्पष्ट उल्लेख असतो तसा. कुकर धोकादायक बनतो त्याने.