साहित्यः आदले दिवशीच्या उरलेल्या पोळ्या :-)(किंवा सकाळी केलेल्या पोळ्यांची संध्याकाळी ही पाककृती होऊ शकेल.), चिरलेला गूळ, तूप, वेलची पूड
क्रुति: एका बाउलमध्ये पोळ्यांचे हाताने बारीक तुकडे करून मग बारीक चुरा करावा. त्याचे ४ भाग करून १ भागाएवढा गूळ १ बाउलमध्ये घ्यावा. कढईत थोडे तूप घेऊन ती मंद गॅसवर तापत ठेवा. (तूपाचे प्रमाण आपापल्या अंदाजाने घाला. २-३ प्रयोगानंतर अंदाज येईल.) त्यात चिरलेला गूळ घालून हलवत रहा. चवीपुरती वेलची पूड घाला. गूळ छान पातळ झाला की लगेच त्यात पोळीचा चुरा घाला. गॅस बंद करा. आणि मिश्रण एकजीव करून त्याचे छोटे छोटे लाडू वळा. लाडू न वळता पदार्थ तसाच खाल्ला तर त्याला चुरमा म्हणतात.
मला हे पोळीचे लाडू अतिशय आवडतात. विशेषतः आई/आजीच्या हातचे तर खूपच आवडतात. शिळ्या पोळ्या खाण्यात कोणालाही interest नसतो. पण हे लाडू मात्र चटाचटा मटामटा खाल्ले जातात :-)
टिपः- ताज्या पोळ्यांपासून ही पाककृती बनवता येत नाही :)
प्रतिक्रिया
24 Dec 2010 - 12:45 pm | अमोल केळकर
खुप छान लागतो पोळीचा लाडू :)
अमोल केळकर
24 Dec 2010 - 12:52 pm | छोटा डॉन
माझी अत्यंत आवडती नाश्ट्याची डिश !
एकदम रापचिक आयटम आहे हा ...
फोटो दिला असता तर चारचाँद लागले असते. :)
- छोटा डॉन
24 Dec 2010 - 3:03 pm | कच्ची कैरी
माझ्या लहानपणीची आठवण करुन दिलीत ,आजी हातानेच गूळ ,तेल व पोळी कुस्करुन द्यायची त्यावेळी ते आवडायच नाही पण आता मात्र हवहवस वाटत.
24 Dec 2010 - 4:58 pm | मुलूखावेगळी
>>>>विशेषतः आई/आजीच्या हातचे तर खूपच आवडतात
सहमत
आमच्याकडे श्रावणी सोमवारी गोड पदार्थ म्हणुन असाच लाडु करतात
पण तो ताज्या पोळीचे आणि साखरेचे असतात.
24 Dec 2010 - 5:58 pm | पिंगू
मी कधी चुरमा लाडू खाल्ले नाहीत.. कोणी कधी बनवणार असेल तर आमंत्रण द्या..
- पिंगू
24 Dec 2010 - 6:03 pm | यशोधरा
मस्त. :)
24 Dec 2010 - 7:07 pm | रेवती
फोटो दिल्यास बरे वाटेल.
गुळाचा पाक होताहोता त्यात किसलेले सुके खोबरे चमचाभर घातल्यास चव खुलते.
सगळ्यांचीच आवडती पाकृ असावी.
24 Dec 2010 - 7:17 pm | परिकथेतील राजकुमार
सगळ्यात कंटाळवाणा प्रकार.
मी सरळ प्रत्येक पोळीचे ७/८ तुकडे करतो आणि मिक्सर मधुन फिरवुन घेतो.
24 Dec 2010 - 9:06 pm | मितान
मी तर गूळ, पोळी नि तूप एकत्रच मिक्सरमध्ये बरीक करते. मस्त एकच मोठ्ठाच्या मोठ्ठा लाडू तयार होतो :)
24 Dec 2010 - 9:12 pm | टारझन
सदर लाडूंसाठी लहाण असतांना आईला आदल्या दिवशी दोन पोळ्या जास्त करायला सांगायचो .
अंमळ णॉस्टॅल्जिक करणारे पाकृ !!
24 Dec 2010 - 11:59 pm | रेवती
टारझन नावाचा प्राणी नॉस्टॅल्जिक होऊ शकतो?;)
तुला हे लाडू आवडत असतील यावर विश्वास नाही रे टार्या!:)
25 Dec 2010 - 12:51 am | निनाद मुक्काम प...
ह्या सरळ सोप्या पौष्टिक लाडवाला रुचकर करण्यासाठी हि कल्पना मस्तच
आता भारतात आल्यावर एकदा परत लहान व्हायला काहीच हरकत नाही
माझ्या शाळेतल्या डब्यातील फेवरेट पदार्थ
दोन लाडू खायचे .नि water bag मधील पाणी प्यायचे .(स्वताचे संपले कि मैत्रिणीचे प्यायचे )
मज्जा होती राव .
25 Dec 2010 - 6:51 am | प्राजु
मला हे लाडू खूप आवडतात.
25 Dec 2010 - 9:01 am | टारझन
मग ह्यावेळी का नाही लिहीलंस ? 'विकांताचा मेनु पक्का झाला " म्हणुन :(
@रेवती : टारझन नॉस्टॅल्किक का होऊ शकत नाही ? लहाण असताना मी माणुस होतो =))
(प्राणी) टारझन
14 Jan 2011 - 8:26 pm | रेवती
लहाण असताना मी माणुस होतो
होय तर!
विश्वास ठेवायला जागा आहे.;)
14 Jan 2011 - 5:23 pm | विसोबा खेचर
मस्त.. :)