नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in काथ्याकूट
24 Dec 2010 - 7:07 am
गाभा: 

नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या दहा सवयी

कोणी म्हणेल, "आ गाय मुझे मार" असा हा उद्योग आहे. पण रोज मरे त्याला कोण रडे? मेलेले कोंबडे आगीला भीत नसते. तेव्हा मी प्रथम आगीत उडी घेतो!

१) तोंडात तीळ न भिजणे.
सततची बडबड करूनही ह्यांच्या घशाला कोरड कशी पडत नाही, हे काही उमगत नाही. साधी आज घडलेली घटना सांगायची असेल तर दोन महिन्यापुर्वी घडलेल्या तिसऱ्यांच्या गोष्टी पासून सुरवात करून पूर्ण गावाच्या गप्पा ऐकवून शेवटी आज काय घडले ते सांगणारच नाही. फोनवर नुसता निरोप कधीच सांगणार नाहीत. एकदा फोन हातात घेतला, की दोन तासांची निच्छिती!

२) उड उड ग चिउ.
कुठल्याही विषयावर बोलतांना, अचानक संदर्भ बदलून दुसरेच कुठले पुराण लावणे. चिड ह्याची देखील येते, की समोरच्या दुसऱ्या बाईला हे बदलते संदर्भ सहज कळतात, आणि आपण अतीव गोंधळात पडतो. मग "हे म्हणजे अस्से आहेत" ही टिप्पणी ठरलेलीच.

३) सासरच्या वाटे कुचुकुचु काटे.
ह्याच्या कडची सगळी मंडळी एकजात बेरकी, छळवादी, हेकेखोर, दुष्ट आणि काय काय, तुम्ही रिकाम्या जागा भरा. अर्थात, माहेरचे सगळे सद्गुणाचे पुतळे, हे ओघाने आलेच!

४) विचारावे जनात, लपवावे मनात.
आज मी कोणती साडी नेसू हो? कुठलेही उत्तर ह्यांच्या पसंतीस येणार नाही. एकदा मी पद्धतशीर प्रयोगच करून पाहिला होता.
* "अग ती चंदेरी नेस ना" - "छे ती नको, तशीच साडी, ती अमकी दोन महिन्यांपुर्वी तमक्याकडे घालून आली होती."
* "साडी नको, ड्रेसच घाल" - "तुम्हाला काय, पारंपारीक कार्यक्रमात अशी गेले, तर लोक नावे मला ठेवतील!"
* "तूच ठरव." - "तुम्हाला माझ्यात इंटरेस्टच उरला नाहीये."

५) पडले तरी नाक वर.
आधी तर चूक कबूल करायचीच नाही. जर यदाकदाचित पद्धतशीरपणे वाद घालून तुम्ही कोंडीत पकडले आणि दाखवून दिले, की तिचीच चूक आहे, तर- नुसते गप्प बसणे, अशृशस्त्र उपसणे, तिथून तरातरा निघून जाणे, असे असंख्य उपाय केले जातात. "सॉरी, माझे चुकले" असे शब्द किती वेळा बायकांकडून ऐकले आहेत?

६) वड्याचे तेल वांग्यावर.
कुणी काहीतरी ह्यांच्या मनाविरुद्ध केले असते, आणि निशाणा भलतीकडेच लावतात. पुष्कळदा नवराच ह्यात सापडतो. कधी मुले चुकून हाताशी लागली तर तीही बळी पडतात.

७) काय माझ्या मनात?
ह्यांच्या रागाचे मुख्य कारण काय, ते नेहमी लपवून ठेवणार. भलत्याच बाबतीत आदळाआपट करणार. तुम्ही बरोब्बर ओळखावे अशी अपेक्षा असते. मग तुम्ही तसे प्रयत्न करायला लागलात की जाळ्यात सापडता, आणि ह्या स्वत:ची करमणूक करून घेतात.

८) आरशा सांग कशी दिसते मी?
कितीही वेळा सांगा, तू खूप सुंदर दिसतेस, पुन्हा तोच प्रश्न वेगळ्या शब्दात तुमच्याकडे येईल. तोच प्रकार ही डीश कशी झालीय, किंवा हा ड्रेस कसा दिसतोय इत्यादी बाबतीत. तुम्ही वाचास्पती असलात तरी समाधान करणे कठीणच.

९) एक आणि एक साडेअकरा.
स्त्रियांचे तर्कशास्त्र पूर्णपणे समजू शकणारा कोणी पुरुष दाखवा आणि लाख रुपये कमवा अशी जाहिरात दिली तर....?

१०) दुरीतांचे तिमीर जावो.
स्त्री आणि पुरुष ह्यांना समान अधिकार हवेत, म्हणजेच स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त समान हवेत अशी धारणा.

तुमच्या मते, तुमच्या डोक्यात सर्वाधीक तिडीक उठवणाऱ्या अशा कोणत्या दहा सवयी बायकांना असतात? हा धागा फ़क्त पुरुषांसाठी नाही. बायकांनी देखील जरूर सांगावे- त्यांच्या मते अशा कोणत्या सवयी आहेत, ज्या नवऱ्यांना सर्वाधिक छळण्यात यशस्वी होतात? (खरं तर बायकांकडून ही माहिती मिळाली तर हवीच आहे.)

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

24 Dec 2010 - 7:25 am | अभिज्ञ

तसे सांगणे अवघड आहे.
मला वाटते ह्या बाबत दहा हा आकडा फार कमी असावा.

वरील बहुतांश मुद्यांशी सहमत.
:)

अभिज्ञ.

श्रावण मोडक's picture

25 Dec 2010 - 2:53 pm | श्रावण मोडक

हा धागा वर रहावा म्हणून! ;)

अवलिया's picture

26 Dec 2010 - 11:33 am | अवलिया

अगदी असेच

अरुण मनोहर's picture

26 Dec 2010 - 12:37 pm | अरुण मनोहर

धन्यवाद.
९८ झालेत.

अवलिया's picture

26 Dec 2010 - 1:44 pm | अवलिया

आता ९९

अवलिया's picture

26 Dec 2010 - 1:45 pm | अवलिया

आणि हे १००

पेढे काढा !!

चिंतामणी's picture

26 Dec 2010 - 2:24 pm | चिंतामणी

केशरी हवेत

की कंदी पेढे हवेत.

बायकांना संधी मिळणार बोलायची की कुठल्याही बारीक सारीक गोष्टींचे "सिलेब्रेशन" करणे

;)

अरुण मनोहर's picture

26 Dec 2010 - 3:30 pm | अरुण मनोहर

;)

(संदर्भ- अभीनंदन धागा)

बरोबर मला एक अ‍ॅडिशन करायची आहे
* ज्या ठिकाणी थांबायचे आहे एक्झॅक्ट त्या ठिकाणी गाडी आल्यावर "इथे थांबव इथे थांबव" असा अचानक आदेश देणे. दोन मिनिटे अगोदर सांगणे वगैरे अशी काही पद्धतच नसते
सालं ब्रेक मारायची पंचाईत आणि पुढे जायची ही पंचाईत.........

गवि's picture

9 Mar 2012 - 6:09 pm | गवि

+ २०,०००

शुचि's picture

24 Dec 2010 - 10:03 am | शुचि

(१) नवर्‍याला सुंदर बाई दाखवून विचारणे की ही १० च्या पट्टीवर किती सुंदर आहे. म्हणजे पडला ना नवरा पेचात :-D

(२) किंवा मग जाडी बाई दाखवून विचारणे मी हिच्याइतकी जाडी नाही आहे ना? :P

(३) "तुला एक विचारू" अशा गंभीर खोल आवाजात सुरुवात केली की नवरा म्हणतो "नSSSSSको." कारण त्याला अनुभवाने माहीत असतं पुढे काय वाढून ठेवलं आहे ते. :-D ..... ५ महीन्यांपूर्वीचा काहीतरी संवेदनशील मुद्दा जो नवर्‍याच्या डोक्यावरून गेलेला असतो तो निघणार असतो.

(४) लग्न झालं की पुरुष बस/रेल्वेमधली खिडकीशेजारची जागा विसरतातच बिचारे =))

(५) रर्विवारी सुद्धा नवर्‍याने ढॅण ढॅण युद्धाचे सिनेमे लावले की यांचं (बायकांचं) मस्तकशूळ उठतं कारण यांना ते संगीत आणि हिंसाचार आवडत नाही. बरं आवडत नाही तर आतल्या खोलीत बसावं ना मुकाट्यानी पण नाही नवर्‍याबरोबर बाहेर जायचं असतं, गप्पा मारायच्या असतात एकूण काय नवर्‍याला तो सिनेमा पाहू द्यायचा नाही ;)

(६) आता जो मुद्दा सांगणार आहे तशी मी वागत नाही पण काही बायका वागताना पाहील्या आहेत. बिचार्‍या नवर्‍याचे ठराविक विनोद असतात जे तो दर सामाजिक प्रसंगी सांगत असतो आणि हशा वसूल करत असतो. खरं तर बायको तो विनोद ५० व्या वेळेला ऐकत असते. पण सौजन्य म्हणून तिने सर्वांबरोबर हसायचे असते :) ....... काही बायका हसत तर नाहीतच पण जरा कंटाळतात देखील. हा हा!! व्हेरी व्हेरी बॅड!!!

(७) नवर्‍याच्या उनाड मित्रांचा सूक्ष्म दुस्वास करणे. म्हणजे अगदी आमने सामने हातापाई नाही पण गनिमी काव्याने सुचविणे की या मित्रांना काही कामधंदा नाही का, हे का पडीक असतात? आपल्याला एकांत मिळत नाही आदि ;) ....... हे नवर्‍याच्या जानी मित्रांबरोबरचं विळी-भोपळ्याचं सख्य आयुष्यभरचं बरं का.

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 10:18 am | अरुण मनोहर

राज के पेटारे खोलल्याबद्दल शतशः धन्यवाद.

नोट करून ठेवले आहेत.

धमाल मुलगा's picture

24 Dec 2010 - 3:03 pm | धमाल मुलगा

खल्लास्स!
यवर्री पाइंट व्ह्याल्लिड..आय से! :D

शुचि, शुचि, अगं तुझा हा प्रतिसाद वाचताना आपोआप डोळे भरुन आले..अंमळ हळवा झालो. ;)

च्यायला, ह्याला म्हणतात घरोघरी मातीच्या चुली. :)

अवलिया's picture

24 Dec 2010 - 3:05 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 9:09 am | नरेशकुमार

असंल काही बाही बकलो कि घरि जोडे पडतील याची शक्यता नाकारता येती का हो ?

अविनाशकुलकर्णी's picture

24 Dec 2010 - 9:43 am | अविनाशकुलकर्णी

रात्री ढाराढुर मोठ्याने घोरत झोपणे...

स्वतःचे खरे करणे..खायला काय करु? पोहे कि शीरा? विचारायचे..
पोहे म्हटले कि....सारखे काय पोहे? आज शिराच करते....
शीरा म्हटले कि..सारख काय गोड? आज पोहेच खा...
आयला मग विचारते कशाला?

बाहेर जायचे म्हटले कि आपण तयार होवुन बसतो..हि मात्र तयार होण्याच्या नावाखाली किमान १/२ तास ताटकळत ठेवते..

आपल्या हातात पेपर पाहिला कि हिला हि "आज पेपर वाचायचा राहुनच गेला "अशी आठवण होते.

कसे वागावे याच्या सारख्या सुचना..

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 10:17 am | अरुण मनोहर

>>>पोहे म्हटले कि....सारखे काय पोहे? आज शिराच करते....
शीरा म्हटले कि..सारख काय गोड? आज पोहेच खा...<<<

मी तर कुठलाही प्रश्न ऐकला की आधीच विचारून घेतो-
"हा ट्रीक प्रश्न आहे का?"

प्रीत-मोहर's picture

24 Dec 2010 - 10:11 am | प्रीत-मोहर

शॉप्पिन्ग :)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

24 Dec 2010 - 10:26 am | जाई अस्सल कोल्हापुरी

मजा येणार!
येउ द्यात मंडळी मिपावर...!...अजुन काही आठवते आहे.

आदिजोशी's picture

24 Dec 2010 - 10:40 am | आदिजोशी

आमच्या पेंटंट विषयावर अतिक्रमण केल्या बद्दल निषेध.

उ. न. क. चे आम्ही संस्थापक आहोत. उपेक्षीत नवरे कमिटीच्या मुंबई शाखेच्या पहिल्या मिटींगचा रिपोर्ट http://adijoshi.blogspot.com/2010/03/blog-post.html

आपल्या शहरात उ. न. क. ची शाखा काढण्यासाठी गरजुंनी व्य. नि. करावा.

आपला (उपेक्षीत नवरा)

आदि जोशी

योगी९००'s picture

24 Dec 2010 - 2:25 pm | योगी९००

उ . न . क . आवडले..

उनक चा " उनाड( किंवा उंडगे) न कमावणारे " असे ही होऊ शकते..

(उंडगे चा अर्थ काय? बर्‍याच वेळा हा शब्द ऐकलाय पण अर्थ माहीत नाही.)

उंडा म्हणजे कणकेचा किंवा कोणत्याही पिठाचा गोळा.
बाकि तुम्ही समजू शकालच.;)

यशोधरा's picture

24 Dec 2010 - 11:24 am | यशोधरा

अरुणकाका, बिचार्‍या काकी. किती पिरपिरा नवरा मिळालाय त्यांना..

अवलिया's picture

24 Dec 2010 - 11:25 am | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 11:27 am | अरुण मनोहर

उलटे देखील असू शकते, ही शक्यता नाकारता येत नाही!

अवलिया's picture

24 Dec 2010 - 11:28 am | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

हां असू शकते की, पण इथे आमाला काकी दिसत नाहीयेत तक्रारी करताना, तुम्हीच दिसताय! :P

काकी अदृश्य रुपाने मिपावर असु शकतात... शक्यता नाकारता येत नाहि.

यशोधरा's picture

24 Dec 2010 - 11:32 am | यशोधरा

अच्छा! :)

मग या हो काकी इथे, ह्या काकांना घाबरु वगैरे नका! :P

नगरीनिरंजन's picture

24 Dec 2010 - 1:08 pm | नगरीनिरंजन

काकांचा आयडी हायजॅक करून काकांच्या नावे असा पिरपिरा काकु टाकण्याचे काकींचे कारस्थान असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

- (करुण मनोडर) रडिल

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 11:32 am | अरुण मनोहर

>>>पण इथे आमाला काकी दिसत नाहीयेत तक्रारी करताना,<<<
आर यू शुअर?
तुम्हाला काकींचे टोपणनाव कुठे माहित आहे?

टोपण नाव - दृश्य स्वरुप

वाचन मात्र - अदृश्य स्वरुप

माझा प्रतिसाद वाचा.
त्यातील शक्यता समजुन घ्या म्हणजे तुम्ही पण म्हणाल "शक्यता नाकारता येत नाहि."

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 11:39 am | अरुण मनोहर

मग असे म्हणायला हवे होते-

"काकी "दृश्या-दृश्य रुपाने मिपावर असु शकतात... शक्यता नाकारता येत नाहि."

ऋषिकेश's picture

24 Dec 2010 - 11:31 am | ऋषिकेश

लग्नाला वर्ष होतंय अजून त्यामुळे अजूनतरी तिडीक उठत नाही ;)

बाकी शंभर प्रतिसादांबद्द्ल आगाऊ अभिनंदन!

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 11:33 am | अरुण मनोहर

>>>बाकी शंभर प्रतिसादांबद्द्ल आगाऊ अभिनंदन!<<<

थॅन्क्स, बट नो थॅन्क्स!
इतके प्रतिसाद खरच आले तर घरी माझी शंभरी भरलीच म्हणा!

अवलिया's picture

24 Dec 2010 - 11:34 am | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 11:36 am | अरुण मनोहर

धीर देण्याचे सोडून हा कसला अवदशी प्रतिसाद? तुम्ही पण नाना?

पुरुषांना धीर देण्याचे काम आम्ही करत नाही. तुम्हाला हे माहित नसण्याची शक्यता नाकारता येत नाहि.

पंगा's picture

24 Dec 2010 - 11:47 am | पंगा

लग्नाला वर्ष होतंय अजून त्यामुळे अजूनतरी तिडीक उठत नाही

नेमक्या कोणाच्या?

(स्पष्टीकरण:कृपया हा प्रश्न 'नेमक्या कोणाच्या डोक्यात तिडीक उठत नाही?' असा वाचावा, 'नेमक्या कोणाच्या लग्नाला वर्ष होतंय अजून?' असा नव्हे, ही नम्र विनंती.)

- (अनुभवी) पंगा.

ऋषिकेश, अजून सहनशक्ती शिल्लक आहे त्याबद्दल अभिनंदन!

इंटरनेटस्नेही's picture

24 Dec 2010 - 11:44 am | इंटरनेटस्नेही

५) पडले तरी नाक वर.
आधी तर चूक कबूल करायचीच नाही. जर यदाकदाचित पद्धतशीरपणे वाद घालून तुम्ही कोंडीत पकडले आणि दाखवून दिले, की तिचीच चूक आहे, तर- नुसते गप्प बसणे, अशृशस्त्र उपसणे, तिथून तरातरा निघून जाणे, असे असंख्य उपाय केले जातात. "सॉरी, माझे चुकले" असे शब्द किती वेळा बायकांकडून ऐकले आहेत?

शत प्रतिशत सहमत. आणि यामुळेच हा अवगुणधारी काही स्त्रिया पुरुषांपेक्षा मागे पडतात हे आमचे स्पष्ट मत आहे!

रेवती's picture

24 Dec 2010 - 9:27 pm | रेवती

तुला रे कसला अनुभव?

इंटरनेटस्नेही's picture

28 Dec 2010 - 10:33 pm | इंटरनेटस्नेही

शत प्रतिशत सहमत. आणि यामुळेच हा अवगुणधारी काही स्त्रिया पुरुषांपेक्षा मागे पडतात हे आमचे स्पष्ट मत आहे!

लोल्स! फक्त पत्नीनीनेच हे करायची गरज नाही काही, सर्वच नात्यांमध्ये स्त्रीया असं करतात.

स्पा's picture

29 Dec 2010 - 7:20 am | स्पा

लोल्स! फक्त पत्नीनीनेच हे करायची गरज नाही काही, सर्वच नात्यांमध्ये स्त्रीया असं करतात

।हॅ ।हॅ ।हॅ
अनुमोदन

तुने मेरी मन कि बात छीन ली इंट्या ....

अजून एक दुर्गुण....

पुरुषांकडून वारेमाप गिफ्ट उकळायची, आणि स्वतः मात्र, 'मीच तुझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे' असे म्हणून त्यांची बोळवण करायची
(आणि अगदी कधीच गिफ्ट दिलं तर ते १००:१ या रेशो मध्ये असतं...)

-लवगुरू स्पावड्या

इंटरनेटस्नेही's picture

29 Dec 2010 - 4:23 pm | इंटरनेटस्नेही

सहमती बद्द्ल आभारी आहे!

पुरुषांकडून वारेमाप गिफ्ट उकळायची, आणि स्वतः मात्र, 'मीच तुझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे' असे म्हणून त्यांची बोळवण करायची
(आणि अगदी कधीच गिफ्ट दिलं तर ते १००:१ या रेशो मध्ये असतं...)

हेच म्हणतो.. पण अश्या दुर्मुखलेल्या जीवांकडुन काही न स्वीकारणेच योग्य. कशाला कोणाची 'डेब्ट' ठेवा?
-
(चाणाक्ष) इंट्या

विजुभाऊ's picture

24 Dec 2010 - 11:47 am | विजुभाऊ

१)माहेरी जाताना अथवा येताना नवरा म्हणजे हक्काचा हमाल असे गृहीत धरून पिशव्या वगैरे घेणे.
२) बाजारात बरोबर चालत असताना एखादी गोष्ट /वस्तु दिसली की नवर्‍याला आपल्या डोक्यातले विचार आपोआप कळतात अशी समजूत करून घेऊन अचानक यू टर्न किंवा उजवे डावे वळण घेऊन चालत सुटणे. आणि अशा वेळी आपण ही आपल्या बरोबर आहे या समजूतीने एकटेच बोलत चालत असतो. अथवा अरेच्च्या ही आत्ता तर इथे होती...अचानक गायब कुठे झाली या विचाराने आणखीनच बावळट चेहेर्‍याचे होतो.
अवांतरः हा धागा "गुंतवणुक" या सदरात का दिलेला आहे

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 11:51 am | अरुण मनोहर

काय बोललात विजुभाऊ!
यावरून आठवले-
बरोबर कुठे चालत असतांना आपल्या वेगा इतका यांचा वेग कधीच नसतो. बहुदा त्या मागे रहातात. मग आपण वेग हळू करतो, जेणे करून त्या आप्ल्याबरोबर येतील. पण लगेच त्यांचा वेग आणखी हळू होतो. मॅच कधीच होत नाही. पुन्हा वर "तुम्हाला माझ्या बरोबर रहायचे नाही तर आलात कशाला बरोबर?" हे आहेच.
मला वाटते, मुद्दाम आपल्या मागे राहून नवर्यावर लक्ष ठेवीत असाव्यात!

अवलिया's picture

24 Dec 2010 - 11:52 am | अवलिया

शक्यता नाकारता येत नाहि.

सहज's picture

24 Dec 2010 - 11:54 am | सहज

शहाण्या नवर्‍याने आपल्या बायकोचा हात हातात धरुन चालणे! दुहेरी फायदा!

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 11:56 am | अरुण मनोहर

>>शहाण्या नवर्‍याने आपल्या बायकोचा हात हातात धरुन चालणे<<
ते सगळ्यांना कसे शक्य आहे?

>मुद्दाम आपल्या मागे राहून नवर्यावर लक्ष ठेवीत असाव्यात!

त्याची गरज आहे, असे नवर्‍याच्या बायकोला अनुभवांती ठाऊक झाले असण्याची शक्यताही नाकारता येत नाही :P

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

24 Dec 2010 - 1:08 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

हे मात्र मी करते.. प्रामणिक confession!
माहेरुन येताना...घरचं हे...घरचं ते....म्हणुन वाढता वाढता वाढतात...
आणि मग नवर्‍याचा पारा शुन्यमंडळ भेदतो!

kamalakant samant's picture

24 Dec 2010 - 12:44 pm | kamalakant samant

असे वाटते की या सर्व त्रासदायक गोष्टीमधे काळाचा मोठा हातभार असावा.
लग्नान॑तर्ची काही वर्षे-त्रास जाणवत नाही.
न॑तरची काही वर्षे -त्रास जाणवू लागतो.
त्यान॑तरची काही वर्षे-चिडचिड सुरु.
त्यापुढील काही वर्षे-तोही तिच्यासारखाच होतो कि॑वाश्रवण य॑त्र काढून ठेवतो कि॑वापूर्णपणे दुर्लक्ष.

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 12:59 pm | अरुण मनोहर

काळाचा भाग येवढाच की लग्नानंतर एखाद वर्ष, हे असते, पण दृष्टीआड केले जाते. नंतर हळुहळु दृष्टी जास्त स्पष्ट होत जाते!

एव्हढे असून सुद्धा एप्रिल - मे मधे सर्व कार्यालये / हॉल्स कितीतरी आधी पासून बुक्ड असतात. जर आधी पासून बुकिंग (कार्यालय अथवा हॉल चे ) केले नाही तर लग्नाचा प्लॅन वर्ष - सहा महिन्यां साठी पोस्टपोन करावा लागतो ..

म्हणजे पुढच्यास ठेच - मागचा शहाणा ही म्हण या बाबतीत लागू होत नाही तर ..

असो !

परिकथेतील राजकुमार's picture

24 Dec 2010 - 1:07 pm | परिकथेतील राजकुमार

सिंगल मिंगल असल्याने धाग्यावर काही टिपणी नाही. धन्यवाद.

कुशंका :- धाग्यात 'गुंतवणूक' ह्या सदराचा समावेश का करण्यात आला आहे ?

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

24 Dec 2010 - 1:10 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

शहाणा असशिल तर लग्न करु नको हो!...

टारझन's picture

24 Dec 2010 - 1:16 pm | टारझन

इण्डायरेक्टली सगळ्या विवाहीतांना येथे वेड्यात काढण्यात आलेलं आहे ... बघा बॉ . .. आपण नसतं ऐकुन घेतलं ..

- येडा अण्णा

परिकथेतील राजकुमार's picture

24 Dec 2010 - 1:40 pm | परिकथेतील राजकुमार

शहाणा असशिल तर लग्न करु नको हो!...

मी शहाणाच आहे ;)

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 3:24 pm | नरेशकुमार

तु कधी शाना झाला ? काल तर..............

परिकथेतील राजकुमार's picture

24 Dec 2010 - 3:59 pm | परिकथेतील राजकुमार

तु कधी शाना झाला ? काल तर..............

शानाच आहे मी. नाहितर तुमच्या खर्‍या आणि खोट्या आयडीचे आयपी तुमच्या हापिसात पाठवले नसते का? :)

बाकी तुम्ही आमच्या फुकटच्या चौकशा करणे सोडून कामधंद्यात लक्ष घालाल तर मिळालीये ती नोकरी तरी टिकुन राहिल. नाही का ?

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 6:46 pm | नरेशकुमार

मिळाले मिळाले
माझे आठच्या आठ आयडि कशे काय मिळाले रे तुला ?
(आइला आज्काल माझ्याच लक्शात राहत नाहि, बरं झालं तु सान्गुन ठेवले ते).
आनि ते ip पन एकदम बिनचुक आहेत रे,

आनि हो, सल्ल्या साठि आभारि आहे.

धन्य आहेत तु.

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 1:11 pm | अरुण मनोहर

भाग्यवान आहात! सिंगल मिंगल आल्वेज जिंगल्स!
गुंतवणूक- हे गौडबंगाल नीट समजाऊन घेऊन भविष्यातील सुखी जीवनाची तरतूद सिंगल मिंगल्स करतील असे वाटले, तीच गुंतवणूक!

किंवा मिपाच्या चालू भाषेत- गुंतवणुकीची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वप्रथम अरुणकाकांचा निषेध की त्यांनी युयुत्सु आजोबांच्या राखीव कुरणात तोंड घातलय.

कॉलिंग युयुत्सु.....कॉलिंग युयुत्सु.....

आता अरुण काकांचे आभार. त्यांनी आमच्या दु:खाला वाचा फोडुन देणारा धागा काढुन आम्हाला मंच पुरविला.

सगळ्यात वाईट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट्ट सवय कोणती असेल ते वाद विवाद करताना बाबा आदमच्या जमान्यातल्या गोष्टी उकरुन काढणे.
एक तर देवाने स्मरणशक्ती कमी दिलेली त्यात्य यांचे असले जुने दाखले देउन वाद घालणे म्हणजे तोंड दाबुन मुक्क्या ( नीट वाचा क ला क जोडलाय ) मार. :(
बरेच वेळा विसर भोळे पणाचा गैर फायदा घेउन आम्ही न केल्लेली विधान आमच्या माथी मारली जातात.

आणि शेवटी काकांच डबल शेंचुरी बद्दल अभिनंदन.
(एक इकडे आणि दुसरी शंभरी घरी भरेल ;) )

कानडाऊ योगेशु's picture

24 Dec 2010 - 1:35 pm | कानडाऊ योगेशु

१.मॉलमध्ये एखादी गोष्टच घेण्यासाठी म्हणुन आपल्याला घेवुन जातात.पूर्ण मॉल फिरतात.आपल्यालाही फरफटत फिरवतात.दुनियेभराच्या वस्तु गोळा करतात.काऊंटवर गर्दी पाहुन फर्मान सोडतात तुम्ही रांगेत उभे राहा.मी ही आलेच.
आणि तुम्हाला रांगेत उभे करुन पुन्हा चार वस्तु पाहायला पळतात.इकडे तुम्ही कासावीस.तुमचा नंबर येतोच आहे.मागच्याला पुढे जाऊ देऊ की आताच बिल भरु.आणि अगदी नेमक्या क्षणी बरोबर हजर होतात.
(बर्याच वेळेला काऊंटरवरच घेतलेल्या वस्तुंमधील दोनचार वस्तु नको म्हणुन काढुन ठेवतात.)
२.एखाद्या घेतलेल्या ड्रेसमधले तुम्हला न दिसणार/जाणवणारे वैगुण्य त्यांना नेमके घरी आल्यावरच दिसते.आणि पुन्हा मग त्या दुकानात यात्रा.
३.रात्री झोपतानाही तुमच्याशी त्यांना अगदी भरभरुन बोलायचे असते आणि तुम्ही जर का झोपलात तर "अहो तुम्ही ऐकताय ना हो?" म्हणुन तुम्हाला हलवुन जागे करतील.

- (जोरू का गुलाम) योगेश.

योगेश ,

खरडीचा स्क्रीन - शॉट घेउ का रे ?

मॉल मधे गेल्यावर लेडिज सेक्शन मधे पाय दुखेपर्यत फिरलेलो आहे ... बरं तो म्हैलांसाठीचा सेक्शन असल्याने टाईमपास म्हणुन बघायला आमच्या साठी काही नसतं .. बर तासाभराने .. "तुला नक्की घ्यायचंय काय ? " असं विचारल्यावर .. "काही नाही रे .. असंच बघते आहे.. " असं उत्तर .. पण त्यातही मज्जा घ्यायला शिकलोय आम्ही :) कशी ? ते विचारु नका .. लेडिज पेश्शल मधे गेला असाल तर म्हाईत असेलंच =))

- ( प्रॅक्टिस मॅच मधे रमलेला ) तारझन

योगप्रभू's picture

24 Dec 2010 - 4:01 pm | योगप्रभू

चीडचीड करुन काय उपयोग?
बायकांना अजून पुरते जोखले नाही बाबांनो आपण. लई बेरकी जात. आपण येडे खुळे आहोत, हेच खरे.

१) पेठे, लागू, गाडगीळ, तनिष्क असल्या शोरुमसमोरुन जाताना नवर्‍याला हळूच ढोसायचे आणि म्हणायचे, 'ते बघ. त्या शोकेसमध्ये लावलेली ती लॅम्पशेड आहे ना. तसे डिझाईन हॉलमध्ये करुन घ्यायचे मनात आहे. जरा गाडी थांबव बघू.' यानंतर मग 'थांबला तो संपला' या वाक्याची नक्की प्रचिती येते.

२) यांची एखादी जुनी मैत्रिण वाटेत भेटली, की कुठल्या कुठल्या जुन्या आठवणी उगाळत बसायच्या आणि रस्त्यात तासभर गप्पा मारायच्या. नवरे आपले इकडे तिकडे बघत उभे. पण तेच नवरा त्याच्या मित्राशी गप्पा मारत उभा राहिला, की पाच मिनिटातच पोरं हात खेचायला लागतात. 'बाबा! चल ना घरी लवकर. मला घाईची लागलीय.' बहुतेक बाबा लोकांना या प्रकाराचा कधीच संशय येत नाही. पण ही बायकांच्या जातीची खूप जुनी युक्ती आहे.

३) किमान शब्दात कमाल पाणऊतारा करण्याची कला यांना जन्मजात साध्य असते. एका नवर्‍याचा अनुभव सांगतो. एकदा त्याच्या बायकोला बाजारात मैत्रिण भेटली. तिचे केस अगदी दाट आणि कमरेपर्यंत लांब होते. पुढे एकदा तिचा उल्लेख निघाला असताना नवरा सहज बोलून गेला, 'आजकाल केसांची इतकी निगा राखलेली आढळणे दुर्मीळच' त्यावर बायको म्हणाली, 'हो. पण काय नशिबाचा योग बघ. हिचे केस एवढे लांबसडक आणि तिला नवरा मिळाला तो टक्कलछाप विरळ केस असलेला. निदान तुझ्यासारखे राठ केस असलेला मिळता तरी चालले असते.'
(हा ज्याचा अनुभव आहे त्या नवर्‍याविषयी कृपया चौकशी करु नये. :))

हे अनुभव जनहितास्तव प्रसिद्ध केले आहेत. कळावे.
श्री. विश्वास नंदीबैल

हा ज्याचा अनुभव आहे त्या नवर्‍याविषयी कृपया चौकशी करु नये.

भापो ;)

धमाल मुलगा's picture

24 Dec 2010 - 4:32 pm | धमाल मुलगा

आपण प्रभू आहात हे सिध्द आणि योगीही आहात हे देखील सिध्द करता आहात. :)

>>यानंतर मग 'थांबला तो संपला' या वाक्याची नक्की प्रचिती येते.
आयच्च्यान्! लै जोरात आवडलं हे! शप्पथ.

यांची एखादी जुनी मैत्रिण वाटेत भेटली, की कुठल्या कुठल्या जुन्या आठवणी उगाळत बसायच्या आणि रस्त्यात तासभर गप्पा मारायच्या. नवरे आपले इकडे तिकडे बघत उभे

रोखून बघत रहायचं...मैत्रिणीकडं. न्याहाळायचं..बायकोला समजेल असं. आणि नंतर "ही ती तीच ना गं? बरीच वेगळी दिसतेय ह्यावेळी.." वगैरे काहीतरी फडतूस बोलायचं. सख्ख्या बायकोला तिच्या नवर्‍यानं जरी आज तू वेगळी दिसतेयस असं म्हणलं तरी लग्गेच विश्वास बसतो, तिथं परक्या स्त्रीबद्दल काय अविश्वास दाखवणार? ;)

पण तेच नवरा त्याच्या मित्राशी गप्पा मारत उभा राहिला, की पाच मिनिटातच पोरं हात खेचायला लागतात. 'बाबा! चल ना घरी लवकर. मला घाईची लागलीय.' बहुतेक बाबा लोकांना या प्रकाराचा कधीच संशय येत नाही. पण ही बायकांच्या जातीची खूप जुनी युक्ती आहे.

"एऽऽ..ह्याला/हिला/ह्यांना घेऊन तू घरी जा गं. मी ह्याच्यासोबत जरा जाऊन येतो.".."चल रे" असं म्हणून डायरेक्ट चालू लागायचं ;) नंतर घरी गेल्यावर काय होईल तो होईल हंगामा! अरे....मेलेलं कोंबडं काय अगीला भितं का? :D

>>किमान शब्दात कमाल पाणऊतारा करण्याची कला यांना जन्मजात साध्य असते.
ह्याला पर्याय नाय बा. आपण सोईस्कर बहिरे होणं हेच बरं.

योगप्रभू's picture

24 Dec 2010 - 4:58 pm | योगप्रभू

बायकोने पुन्हा कधीही आपल्याला तिच्या मैत्रिणीसमोर ताटकळत उभे करु नये म्हणून मला एक उपाय सुचतोय. आपण बिनधास्त आजच्या तरुणाईच्या भाषेत बायकोला म्हणायचे,' तुझी मैत्रिण म्हणजे अगदी रापचिक आयटम/चिकणा बिण्डा/कंडा पीस/ जबरी माल आहे नाही?' (सर्व देवींनी ह. घ्यावे. कोपू नये.)

खूप शिव्या खाव्या लागतील, पण काहीतरी परिणाम नक्की दिसून येईल.

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 5:01 pm | अरुण मनोहर

हे त्या मत्रिणीने ऐकायला पाहीजे अशा रितीने म्हणा. बायको रागावेल, पण मैत्रीण पटण्याचे चान्सेस खूप आहेत!

योगप्रभू's picture

24 Dec 2010 - 5:09 pm | योगप्रभू

हा हा हा
खरोखर मनोहर कल्पना. :)

धमाल मुलगा's picture

24 Dec 2010 - 5:46 pm | धमाल मुलगा

हे म्हणजे 'एक दाम मे दो काम' झालं की.
लेट'स ट्राय ;) गाजराची पुंगी, वाजली तर वाजली नायतर मोडून खाल्ली (लाथा/फटके जे असेल ते.)

श्री.श्री.श्री. योगप्रभू महाराज ( ;) ),
फारच सुंदर कल्पना आहे. (टीपः माझ्या बायकोच्या कोणत्याही मैत्रिणीचं नाव कल्पना नाही.)
नक्कीच फायदा होईलसं दिसते. यत्न करणे आपुल्या हाती..यश देणे न देणे त्या जगनियंत्याची मर्जी! पण तो व्योमाधिपती मोठा दयाळू आहे. काही ना काही कृपा करेलच. ;)

विजुभाऊ's picture

24 Dec 2010 - 5:25 pm | विजुभाऊ

श्री धमाल मुलगा ; तुमच्या या प्रतिसादाचा स्क्रीनशॉट तुमच्या शनीवारातील घरी पाठवण्यात येत आहे.
सबब आज घरी जाताना अंगभर झंडू बाम लावून जायची व्यवस्था करा.
( सध्या झंडू बामचा स्टॉक लवकर संपतो असे कळतय )

धमाल मुलगा's picture

24 Dec 2010 - 5:38 pm | धमाल मुलगा

;)
आपल्याच मित्रांनी असं वागायला लागल्यावर ह्या जगात दुष्मनाची गरजच काय?

>>( सध्या झंडू बामचा स्टॉक लवकर संपतो असे कळतय )
आँ? म्हणजे? तुम्हीही प्रयत्न करुन पाहिलेला की काय? ;)

धमाल मुलगा's picture

24 Dec 2010 - 4:16 pm | धमाल मुलगा

मजा येणार.

अरुणकाका,
नुकताच मी नविन प्रकार शिकलोय. ह्या दहा सवयींवर बर्‍याचदा लागू पडतोय. (अर्थात नविन आहे म्हणून असेल..एक्दा सवय झाली की परत नवं शोधावंच लागेल..काय करता गरज ही शोधाची जननी आहे.)
हां, तर नविन प्रकार हा, की बायकुनं असं काही विचारलं की आपण सरऽळ आध्यात्मिक व्हायचं ;) शॉल्लेड मजा येते. (पण चेहर्‍यावरचा गंभीरपणा मुळीच हटू द्यायचा नाही. फिस्सकन हसु येतं ते आवरायचं.)
उदाहरण द्यायचं झालं तरः

सततची बडबड करूनही ह्यांच्या घशाला कोरड कशी पडत नाही, हे काही उमगत नाही. साधी आज घडलेली घटना सांगायची असेल तर दोन महिन्यापुर्वी घडलेल्या तिसऱ्यांच्या गोष्टी पासून सुरवात करून पूर्ण गावाच्या गप्पा ऐकवून शेवटी आज काय घडले ते सांगणारच नाही.

मांडी घालून ताठ बसा. अशा अवस्थेत छान डुलकी काढायची सवय करुन घ्या.
एकदा प्रवचन सुरु झालं की सरळ माडी घालून बसायचं आणि मस्त झोप काढायची. नियमाप्रमाणं, "इतका वेळ मी काय बडबतेय? भिंतीशी बोलतेय का?" वगैरे समारोपाचे शब्द आपल्याला गदागदा हलवत आदळतातच. डोळे उघडून प्रसन्न हसायचं आणि म्हणायचं, "अरे, अचानक समाधीच लागली." ;)

कुठल्याही विषयावर बोलतांना, अचानक संदर्भ बदलून दुसरेच कुठले पुराण लावणे. चिड ह्याची देखील येते, की समोरच्या दुसऱ्या बाईला हे बदलते संदर्भ सहज कळतात, आणि आपण अतीव गोंधळात पडतो. मग "हे म्हणजे अस्से आहेत" ही टिप्पणी ठरलेलीच.

सहमत! ह्यावर उपाय नाही. आपण फक्त मान डोलवायची असते.

ह्याच्या कडची सगळी मंडळी एकजात बेरकी, छळवादी, हेकेखोर, दुष्ट आणि काय काय, तुम्ही रिकाम्या जागा भरा. अर्थात, माहेरचे सगळे सद्गुणाचे पुतळे, हे ओघाने आलेच!

आध्यात्मिक पोपटपंची फेकायची हो.
"जे नजरेला दिसतं तेच सत्य मानणं हे नेहमीच सत्य आचरण नसतं. ..." वगैरे वगैरे...फुल्ल ब्याटिंग करायची.

आज मी कोणती साडी नेसू हो? कुठलेही उत्तर ह्यांच्या पसंतीस येणार नाही.

उत्तरः "देह झाकायला जे जे योग्य ते ते सारेच उत्तम! आता आस लागली आहे ती मनाची कवाडं उघडण्याची! " पाऽऽर भिंगरी करुन टाकायची राव समोरच्याची.

आधी तर चूक कबूल करायचीच नाही. जर यदाकदाचित पद्धतशीरपणे वाद घालून तुम्ही कोंडीत पकडले आणि दाखवून दिले, की तिचीच चूक आहे, तर- नुसते गप्प बसणे, अशृशस्त्र उपसणे, तिथून तरातरा निघून जाणे, असे असंख्य उपाय केले जातात. "सॉरी, माझे चुकले" असे शब्द किती वेळा बायकांकडून ऐकले आहेत?

उत्तरः "सच्चिदानंद! सच्चिदानंद!! तुझ्या तोंडूनही साक्षात भगवंतच वदतो आहे, माझ्याही तोंडून तोच वदतो आहे. सारा त्याचाच खेळ! अश्रुपात करु नकोस, त्यापेक्षा शक्तीपाताची दिक्षा का घेत नाहीस तू?"

कुणी काहीतरी ह्यांच्या मनाविरुद्ध केले असते, आणि निशाणा भलतीकडेच लावतात. पुष्कळदा नवराच ह्यात सापडतो. कधी मुले चुकून हाताशी लागली तर तीही बळी पडतात.

पर्याय नाही! :(
जमलंच तर पुन्हा मांडी, पाठीचा कणा ताठ आणि झकास डुलकी..हे आपलं..समाधी! ;)

ह्यांच्या रागाचे मुख्य कारण काय, ते नेहमी लपवून ठेवणार. भलत्याच बाबतीत आदळाआपट करणार. तुम्ही बरोब्बर ओळखावे अशी अपेक्षा असते. मग तुम्ही तसे प्रयत्न करायला लागलात की जाळ्यात सापडता, आणि ह्या स्वत:ची करमणूक करून घेतात.

उत्तरः "भगवंता, तुझ्या अजाण लेकराची अशी परिक्षा घेतोस होय? तू अनादी, तू अनंत!! मी पामर काय ओळखणार? हे सद्गुरू, तूच आता त्राता. तूच मार्ग दाखव. " ;)

कितीही वेळा सांगा, तू खूप सुंदर दिसतेस, पुन्हा तोच प्रश्न वेगळ्या शब्दात तुमच्याकडे येईल. तोच प्रकार ही डीश कशी झालीय, किंवा हा ड्रेस कसा दिसतोय इत्यादी बाबतीत. तुम्ही वाचास्पती असलात तरी समाधान करणे कठीणच.

उत्तरः "माई, हे साऽरं सापेक्ष नाही का? तुझ्या मनःशांतीसाठी मी रोज प्रत्येक गोष्टीला 'छान' हे उत्तर देईनही.. तूच सांग, काय करु? मला तर आजकाल सारं जगच सुंदर दिसू लाग्लं आहे."
('माई' शब्द महत्वाचा. बायको चरकलीच पाहिजे. ;) )

स्त्रियांचे तर्कशास्त्र पूर्णपणे समजू शकणारा कोणी पुरुष दाखवा आणि लाख रुपये कमवा अशी जाहिरात दिली तर....?

'हा हा हा! तो जिवंत राहिल का? ;)

स्त्री आणि पुरुष ह्यांना समान अधिकार हवेत, म्हणजेच स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त समान हवेत अशी धारणा.

थोडे दिवस जास्त समान का? पुर्णाधिकार देऊन टाका. काहीही विचारलंच तर एकदा 'सच्चिदानंद सच्चिदानंद!'असा (किंवा तत्सम) पुकारा करुन "तूच काय ते ठरव. मला हल्ली ह्या ऐहिक जगात काहीच राम दिसत नाही की काही सुचत नाही." असं टेचदार उत्तर उत्तर द्यायचं.

थोडक्यात काय, तर "आपला नवरा आता हातात राहतो, की जातो सगळं सोडून हिमालयात" अशी भिती वाटायला लागली पाहिजे. ;)

टीपःभुमिकेला वजन येण्यासाठी आधी साधारण महिनाभर आध्यात्मिक विषयांवरचे निरनिराळे ठोकळे पुस्तकं घरी आणून ठेवावी. रोज त्यातलं थोडं का होईना वाचन करावं. त्याने ऐनवेळी फेकायला चांगल्या भरदार पल्लेदार वाक्य-शब्दांची बेगमी होते.

तीन महिन्यांनी पुन्हा या कन्सल्टेशनसाठी.
आत्ताची फी बाहेर द्या. फक्त $३०००/- ;)

हा हा हा काय चावटपणा लावलाय? धमु तू बायकांच्या भोळेपणाचा फार गैरफायदा घेतो आहेस बरं का :) ......... हा एक तर डबल बार झाला. बायको मुद्दाम लाडीक वागणार, सेवा करणार , आपलसं करून संसारात ओढायला बघणार. नवर्‍याची मजा न काय :)

धमाल मुलगा's picture

24 Dec 2010 - 4:33 pm | धमाल मुलगा

;)
काय करणार? गरज ही शोधाची जननी आहे म्हणतात. :P

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 4:53 pm | अरुण मनोहर

जगदंब! जगदंब! धम्या इश्वर तुझे रक्षण करो.

धमाल मुलगा's picture

24 Dec 2010 - 5:42 pm | धमाल मुलगा

अहो गेले दोन महिने तोच इश्वर, जगदंबा, सद्गुरू, सच्चिदानंद वगैरे सगळी मंडळी माझं रक्षण करतायत. :D

'नर्मदेऽ हर हर' पुस्तकाच्या मागच्या पानावरचा श्री.जगन्नाथ कुंटे ह्यांचा सिगारेट घेऊन असलेला फोटो दाखवून मीही टेचात सिगारेट ओढतोय...अगदी बिन्धास्त ;) वर आक्षेप आला की पुस्तकातलंच त्यांचंच वाक्य फेकतो.."शरीराचे भोग आहेत हे..भोगु दे त्याला. आपण आतुन शुचिर्भूत आहो हेच पुरेसं" वगैरे. ;)

नगरीनिरंजन's picture

24 Dec 2010 - 6:20 pm | नगरीनिरंजन

हा हा हा! लै भारी! ह. भ. प. धमुमहाराज बारामतीकर की जय!
महाराज, तुमची दीक्षा घ्यायची इच्छा आहे. तुमचा रेट काय?

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 6:28 pm | अरुण मनोहर

आम्ही आयकले की बायकास्नी वेगळा, बाप्यांस्नी वेगळा. आता तुमच्या नावाने योग्य खुलासा होतो म्हना! त्यामुळे तो पीरॉब्लेम नाही. पण उत्तर आलेच तर ते वाचून इतरांनी गैरसमज करून घेऊ नाये म्हूनशान धमुबाबांच्या तर्फे खुलासा!

धमाल मुलगा's picture

24 Dec 2010 - 6:30 pm | धमाल मुलगा

@निर्‍या:
अंय...असल्या हलकट सवयी न्हाईत मला. :D

@अरुणकाका:
ओ गपा की राव. का मला खिडकीत बशिवताय? ;)

नगरीनिरंजन's picture

24 Dec 2010 - 6:46 pm | नगरीनिरंजन

आयला मी आपलं सरळ विचारलं राव, मनोहरकाकांनी मधीच 'हिरवा' अंगठा दाखवून तुला दचकवलं.

धमाल मुलगा's picture

24 Dec 2010 - 7:10 pm | धमाल मुलगा

आणि तिकडं खोटं सांगतायत अंगठा 'भगवा' पडलाय म्हणून. =))

>>आयला मी आपलं सरळ विचारलं राव
असं 'रेट' वगैरे म्हणू नये रे. फारच थर्डरेट वाटतं ;) कन्सल्टेशन फी म्हणावं, दक्षिणा म्हणावं, गेलाबाजार 'हे ज्ञान क्येवड्याला देनार?' असंतरी विचारावं..डायरेक्ट रेट? आँ? काय माझ्यावर लोकप्रभेत लेख छापून आणायचा डाव आहे काय? ;)

अवलिया's picture

24 Dec 2010 - 7:14 pm | अवलिया

लोकप्रभेत लेख छापुन आणता येतात? आणि साप्ताहिक सकाळचे काय ?

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 7:17 pm | अरुण मनोहर

>>आणि तिकडं खोटं सांगतायत अंगठा 'भगवा' पडलाय म्हणून. =))<<

इकडचे तिकडे असे करू नाही धमु बाळा!

>>असं 'रेट' वगैरे म्हणू नये रे. फारच थर्डरेट वाटत<<

ह्या लीडींग वर्डमुळेच मी मिसगाईड झालो होतो. रेट लीड्स टू ....

धमाल मुलगा's picture

24 Dec 2010 - 7:25 pm | धमाल मुलगा

>>इकडचे तिकडे असे करू नाही धमु बाळा!
करावं. नायतर मग ह्या लेखात पडलेत तसे प्रश्न पडतात. :P

>ह्या लीडींग वर्डमुळेच मी मिसगाईड झालो होतो. रेट लीड्स टू ....
हौ ना राव.

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 7:32 pm | अरुण मनोहर

>>करावं. नायतर मग ह्या लेखात पडलेत तसे प्रश्न पडता>><<

उपदेश वरवर ठीक आहे. पण डेंजरस आहे. काहीही होउ शकते. तुम्हाला काही चांगला अनुभव आहे का? (इकडचे तिकडे करून)

धमाल मुलगा's picture

24 Dec 2010 - 7:34 pm | धमाल मुलगा

वरच उदाहरणं दिली की..
आध्यात्मातलं प्रपंचात, प्रपंचातलं आध्यात्मात ... :D

'नर्मदेऽ हर हर' पुस्तकाच्या मागच्या पानावरचा श्री.जगन्नाथ कुंटे ह्यांचा सिगारेट घेऊन असलेला फोटो दाखवून मीही टेचात सिगारेट ओढतोय...
धम्या तुला एक आयडिया देतो.
बायकोला सातारा रस्त्यावरच्या शंकर महाराज मठात ने........ तेथे उदबत्यां ऐवजी सिगारेटी लावलेल्या असतात.
( एक काळजी घे पोराला नेऊ नकोसंआयतर तुझा पाकिटातल्या सिगरेटी तुला देवघरात सापडतील )

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 7:29 pm | नरेशकुमार

बायकोला जागेवर आनन्याचे 'धम्याचे' १०१ उपाय.
पुस्तिका काढत आहे. ५०-५०

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 7:33 pm | अरुण मनोहर

आमची कापी नोंदवायची आहे. धम्या डिसकाउंट मिळेल ना?

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 7:37 pm | नरेशकुमार

आप्ल्याला एक कापि फ्री-गिफ्ट.

आप्ल्यामुळं तर हि शिक्रेटं भायेर आलि नव्हं

धमाल मुलगा's picture

24 Dec 2010 - 7:43 pm | धमाल मुलगा

समाजातील एका प्रबळ संख्येच्या, परंतु शोषित आणि हतबल अशा एका मुख्य वर्गाला जर ह्यातून आधार मिळणार असेल, होणार्‍या अन्यायाविरुध्द दृढ उभे राहणे होणार असेल तर मी लेखक ह्या नात्याने रॉयल्टी घेणेचे नाकारत आहे. पुस्तकाचे प्रकाशन आणि वितरणदेखील पारंपारिक साखळीतून न व्हावे ह्याबाबत आग्रही असेन. जेणेकरुन इतर पुस्तकांना जेव्हढा 'डिस्काउंट' मिळतो तेव्हढ्या किमतीत हे पुस्तक सर्वस्तरीय वाचकांपर्यंत पोहोचावे. कोणासही केवळ आर्थिक कारणाने वंचित रहावे लागू नये हीच इच्छा!

@नरेशकुमारः
ते 'बायकोला जाग्यावर आणण्याचे.' वगैरे टायटल जास्तच प्रक्षोभक होईल असं वाटत नाही का? की अशा नावाने हुल्लड व्हावी अन 'एनी पब्लिशिट्टी इज गुड पब्लिशिट्टी' ह्या न्यायाने असे शिर्षक योजले आहे?

कळावे,
आपला अविश्वासू
धम्या बारामतकर. (व्ह.फा. फेल)

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 7:49 pm | नरेशकुमार

धमुराव, तुम्हिह्च सान्गा काय शिर्शक ठुवायचे ?

धमाल मुलगा's picture

24 Dec 2010 - 7:59 pm | धमाल मुलगा

>>बायकोला जागेवर आनन्याचे 'धम्याचे' १०१ उपाय
'दुर्बलांचा लढा'
'हू मूव्ह्ड माय पनीर?'
'येस! यु कॅन विन'
'यशाचे सोपान'
'द मॅन हू टर्न्ड इन टू मॉन्क'
'हे भलते अवघड नसते...'
'नवरेहितवादी ह्यांची निवडक पत्रे'

ह्यातलं कोन्तं ठीक वाटतं?

टीपः अर्पणपत्रिकेत २ नावं हवीत. आदरणीय श्री.युयुत्सु आणि ज्यांची विचारचक्रासाठी मोलाची मदत घडाली ते श्री. अरुणकाका मनोहर.

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 8:07 pm | नरेशकुमार

'दुर्बलांचा लढा'

हे कसं एकदम आतुन आल्यावानि वाटतं. नाव वाचुन लढ्यात जिव झोकुन देन्याचि खुमारि येते.

नगरीनिरंजन's picture

25 Dec 2010 - 7:53 pm | नगरीनिरंजन

द माँक हूज वाईफ सोल्ड हिज फेरारी.

kamalakant samant's picture

27 Dec 2010 - 10:37 am | kamalakant samant

सुरेख प्रतिसाद.

पैसा's picture

24 Dec 2010 - 7:42 pm | पैसा

शुचि वगळता आतापर्यंत एकाही बाईने आपली ट्रेड शिक्रेट सांगितली नाहियेत! इतक्या सहज ती तुमच्या हाती कशी लागतील हो?

उलट नवर्‍यांच्या वाईट सवयींबद्दल मी ५० मुद्दे सांगू शकेन. पण ते माझ्या नवर्‍याने वाचलं तर मी त्यांचा वापर नंतर आताच्याएवढ्या यशस्वीपणे करू शकणार नाही, तस्मात "मौनं सर्वार्थसाधनं|"

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 8:08 pm | नरेशकुमार

तुमचि, खोटे बोलन्याचि शक्यता नाकारता येत नाही.

हेलिअम घ्या.

अरुण मनोहर's picture

24 Dec 2010 - 8:16 pm | अरुण मनोहर

हो हे मात्र खरे! बायका सगळी गुपीते किती लपवून ठेवतात नै! सिक्रेट एजंट म्हणून बायकांनाच नेमावे! राष्ट्राची गुपीते कधीच बाहेर फुटणार नाहीत!

पैसा's picture

24 Dec 2010 - 8:35 pm | पैसा

या वक्रोक्तीबद्दल वहिनींशी कानगोष्ट करावी काय?

प्रीत-मोहर's picture

24 Dec 2010 - 9:14 pm | प्रीत-मोहर

मी आणि आई ठरवुन बाबांना त्रास देतो...वेळेवर घरी नाही आले की :)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

29 Dec 2010 - 4:27 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

>>>>>> बायका सगळी गुपीते किती लपवून ठेवतात नै!<<<<<<<
हे वाक्य..
बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही या वाक्याशी विरोधाभास प्रूव्ह करणारे आहे!

वपाडाव's picture

9 Mar 2012 - 5:49 pm | वपाडाव

बायका सगळी गुपीते किती लपवून ठेवतात नै & बायकांच्या तोंडात तीळ भिजत नाही

यावाक्यांत काहीही विरोधाभास नाही... कारण जी काही बडबड करतात ती अगदीच वायफळ प्रकारची असते...
अन गुपीत म्हणजे गुप्प्पीत म्हणजे गुप्प्पीत म्हणजे गुप्प्प्पीत हो ते कसं बरं फुटणार एखादीकडून...
असं आहे तर अन तुम्हाला वाटते मजाक ऐ...

सुहास..'s picture

24 Dec 2010 - 8:42 pm | सुहास..

वक्रोक्तीबद्दल >>>>
=))

ज्यो तुला या शब्दाबद्दल आपल्या " मिपा शब्द ऑफ द इयर " असा माझ्यातर्फे अवार्ड देतो आहे ..कृपया खवतुन स्विकार करावा

कानडाऊ योगेशु's picture

24 Dec 2010 - 9:45 pm | कानडाऊ योगेशु

ह्या विषयावर मी अगोदर एक कविता लिहीली होती.

उल्हास's picture

25 Dec 2010 - 6:17 pm | उल्हास

सुट्टीच्या दिवशी आपण जरा तंगड्या पसरुन आरामात बसलो तर बायकोला त्या दिवशी घर स्वच्छ करायची लहर येते मग काय आपल्याला कामाला जुंपले जाते

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

29 Dec 2010 - 4:28 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

सुट्टीच्या दिवशी जरा घर आवरावे...म्हटलं तर तंगड्या पसरून बसायची हौस येते!

१. कुथल्याही फाल्तु विशयाव्र बडब्ड करने. दुसर्याने ति षान्त ऐकुन घेने, अस आगरह करने.
०२. थोडा काइ वाद झाल्यास दिवसभर मला बरपुर काम असते. माज्यावर जलु नका असे सान्गते.
०३. सविस्त्र नन्तर.

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Dec 2010 - 9:56 am | ज्ञानोबाचे पैजार

हजारो वर्षांपासुन आगतिक पुरुषवर्गावर होणार्‍या र्निघ्रुण निर्दय अत्याचारांना वाचा फोडणारा लेख आणि त्यावरील तितक्याच उत्कट प्रतिक्रिया,
पहिल्या पाना वरुन वाहुन जाउ नये म्हणुन

अन्नू's picture

9 Mar 2012 - 3:30 pm | अन्नू

लग्न झालेल्या पुरुषांची गाथा, आणि
अनुभवधारी मिपा सदस्यांच्या प्रतिक्रीया पाहुन ड्वाळे पाणावले.Smiley

चौकटराजा's picture

9 Mar 2012 - 4:47 pm | चौकटराजा

आमच्या येथील केस पूर्णपणे लिहायची तर बी आर चोप्राना इहलोकात बोलावून म्हा भा.............रत अशी सीरीज काढावी लागेल.
तो विषय विस्ताराने इथे दिला तर मेमरी चा इशू होईल यास्तव मालकानी समज दिली आहे.

चौकटराजा's picture

9 Mar 2012 - 6:32 pm | चौकटराजा

हा विषय " चार दिवस सासूचे " या मालिकेलाही मागे टाकेल या बाबतीत मी बेटींग लावायला तयार आहे !

अन्नू's picture

9 Mar 2012 - 8:11 pm | अन्नू

म्हणूनच आंम्ही नवीन पुरुष सिरिअल्स काढण्याचे योजले आहेत.
आमच्या नव्या सिरिअल्सची नावे=>
१> चार दिवस नवर्‍याचे, (सासर्‍याचे जुने आहे, नवर्‍याचे लेटेस्ट!)
२> नव'वरु', (नवीन लग्न झालेल्या पतीची कथा)
३> कुल 'वरु', (पतीजात रुढीने जगणार्‍या पतींची गाथा)
४> सांभाळ रे, ('मरशील नाहीतर' हे सबटायटल!)
५> आल्या घरी तु निट रहा, (पुरुषाला उद्देशून ;) )
६> बे-ताल, (धर पाय न्हायतर सोस हाल)
७> हा भास हा! (नव मुलीं पाहण्याचा)
८> ह्या गोजिरवाण्या गुत्त्यात, (रमणीय क्षण)
८> दोन चपट्या दोघे आपण, (रमणीय क्षण पार्ट-२)
९> एकाच या जन्मी टळू, (भांडणकल्लोळ/ वास्तवदर्शी मालिका)
१०> पिंजरा (फॉर मेन)
११> सासरा पण कधी जावई होता. (नवीन मराठी आवृत्ती)
१२> एका लग्नाची तिसरी बायको (डॉक्टरसाहेब स्पेशल सुखांत सिरिअल)=> (न स्थिरावलेला सुखी पुरुष!)
१३> पुढच पाऊल (मागे जाताना)
१४> बांध बायकोचे (पतीमर्यादा)
१५> मुक्तीबंधन (एक केविलवाणा ध्यास)
१६> होम मिनिस्टर (पती स्पेशल= सुत्रधार होम मिनिस्टर 'राखी सावंत')

(सुचना:-
राखी सावंत चालणार नसेल तर तसे आमच्या चॅनलला व्यनी करुन कळवा. आंम्ही तात्काळ तिच्या जागी नवीन स्वस्तातली होम मिनिस्टर निवडू! ;) )

सध्या एक चित्रपट काढायचाही विचार आहे. त्याचे नाव "कामाच्या नंतर लग्गेच घरात!" असं आहे.
तरी पुरुष ऑडीशन्स साठी नावे देऊ शकतात. पिडीत व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल तसेच
पिडून हैराण झालेल्या व्यक्तीला विशेष हिरोचा रोल राखीव ठेवण्यात आला आहे. याची नोंद घ्यावी!

(लोहे को लोहाच काटता है म्हणून चॅनेलचा मुहुर्त आमावस्येलाच ठेवण्यात आला आहे.
सर्वांची उपस्थिती आवश्यक आहे. घरुन पोट भरुन जेऊन या येथे जेवणाची अपेक्षा करु नका.)

कामाच्या नंतर लग्गेच घरात!" असं आहे.
तरी पुरुष ऑडीशन्स साठी नावे देऊ शकतात. पिडीत व्यक्तींना प्राधान्य देण्यात येईल तसेच
पिडून हैराण झालेल्या व्यक्तीला विशेष हिरोचा रोल राखीव ठेवण्यात आला आहे. याची नोंद घ्यावी!

ह्यी आडीशान घेयाची म्हंजी त्येची लाईन क्व्यवढी लागंल ? वरळी पासून सुरू हून शान पार चांदोबा वरील sea of tranquility पातुर वाडंल .
आनी त्येना सम्द्याना घरचा धाक लइ . तवा येकत्र तारका कया म्यीळनार ?

आसंच आमालाबी वाटंतयं म्हणून शिरिअल वरच जास्त जोर दिल्याला हाय!

चौकटराजा's picture

9 Mar 2012 - 6:35 pm | चौकटराजा

सगळ्यात भयाण संवय म्हणे " आज माझं डोकं दुखतंय ....चा बहाणा !! ( इथे डोळा मिचकावलेली स्माईली आहे असे समजावे)

किचेन's picture

9 Mar 2012 - 9:46 pm | किचेन

गेले अनेक महिने माझ्या मनात 'पुरुष अधिकार समिती ' स्थापन करावी असा विचार आहे.एकंदरीत बघितलं तर पुरुषांची स्थिती सध्या अतिशय दयनीय आहे.आपल्यावर वर्षानुवर्षे होणाऱ्या अन्यायाची पुरुषांना जाणीव नाही.जर असेल तर त्याविरुध्द आवाज उठवण्याची त्यांची ताकद नाही.घरी-दारी,जळी-स्थळी,बस- ट्रेन-रस्ता सगळीकडे स्त्रियांकडून पुरुषांचा मानसिक छळ होत असतो.कधी गोड बोलून, कधी आवाज चढवून , कधी डोळ्यातून अश्रूंची टाकी रिकामी करून,तर कधी जगातल्या सर्वात गरीब आपणच अस दाखवून त्या पुरुषांचे मानसिक संतुलन बिघडवतात.समस्त पुरुषांना ह्या अन्यायाच्या दलदलीतून बाहेर काढायचे असेल तर समिती स्थापन करणे गरजेचे आहे.
मी स्त्री आहे मग मी पुरुषांच्या बाजूने का आहे.असा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित आला असेल.तर समस्त पुरुष वर्गाचे एका बाबतीत स्त्रियांवर अनेक उपकार आहेत.ती म्हण्जे शिक्षण...अगदी स्वामी विवेकानंद ते फुले,कर्वे सगळ्यांनीच आम्हाला साक्षर करण्याच जे काम केल आहे त्याची परतफेड म्हणून मी सर्व पुरुषांचे मन:पूर्वक आभार मनात आहे.

ह्ये म्हणजे उंदराला मांजर साक्षीदार असं वाटाया लागलय! Smiley

लपु नका.अस लपुन चालणार नहि. तुम्हाला पुढे यायलाच हव.सध्या नवर्यावर होणाऱ्या अत्याचारांची मी साक्षीदार आहे.बायको, आई आणि काम यांमध्ये होणार त्याच ३ इन १ sanadwich बघवत नाही रे.
घरोघरी मातीच्या चुली हि म्हण काही उगीच आली नाही.मी ह्या समितीसाठी मेंबर गोळा करतीये.पण लोकलज्जेस्तव कोणी पुढे येण्यास तयार नाही.पण हळूहळू जनजागृती होत आहे.दिवसांमागून दिवस जातील आणि पुरुषहि आपल्या मनातल्या भावना स्पष्ट बोलू शकतील अशी मला आशा आहे.

अन्नू's picture

9 Mar 2012 - 10:53 pm | अन्नू

दिवसांमागून दिवस जातील आणि पुरुषहि आपल्या मनातल्या भावना स्पष्ट बोलू शकतील अशी मला आशा आहे.

या भावना व्यक्त होण्यासाठीच तर आंम्ही वर नमुद केलेल्या नवीन सिरिअल्य काढण्याचे योजले आहे. Smiley

चांगली गोष्ट आहे.या ना त्या मर्गने तुम्हि जनजाग्रुति करताय हे बघुन आनन्द झाला.

श्रावण मोडक's picture

9 Mar 2012 - 11:38 pm | श्रावण मोडक

दिवसांमागून दिवस जातील आणि पुरुषहि आपल्या मनातल्या भावना स्पष्ट बोलू शकतील अशी मला आशा आहे.

असं काही तरी लिहित जाऊ नका हो... ;)

रघु सावंत's picture

9 Mar 2012 - 11:33 pm | रघु सावंत

नवऱ्यांच्या डोक्यात सर्वात जास्त तिडीक उठवणाऱ्या, बायकांच्या बर्‍याच सवयी आहेत.
प्रेषक शुचि Fri, 24/12/2010 - 10:03 यांच्या प्रतिक्रियेशी मी एकदम सहमत आहे.

रघू सावंत

प्रसन्न शौचे's picture

10 Mar 2012 - 8:39 pm | प्रसन्न शौचे

अरुण राव ५०% विचार करा

प्रसन्न शौचे's picture

10 Mar 2012 - 8:40 pm | प्रसन्न शौचे

अरुण राव ५०% विचार करा