व्हेजिटेबल ऑ ग्रातिन : Veg Au Gratin...अर्थात बेक्ड व्हेज

जाई अस्सल कोल्हापुरी's picture
जाई अस्सल कोल्हापुरी in पाककृती
18 Dec 2010 - 8:09 pm

साहित्य :
दीड कप वाफवलेल्या भाज्या
दीड कप व्हाईट सॉस ( रेसिपी पुढे देते आहे)
२-३ क्युब्ज चीज
बटर

व्हाईट सॉस साहित्य :
दीड tbsp बटर
दीड tbsp मैदा
दीड कप दूध
चवीपुरते मीठ
ताजी ताजी मीर पूड (आपल्या खलबत्त्यात जर्राशी खरबरीत बनवलेली असेल तर उत्तम)

व्हाईट सॉस कृती :
पॅन मध्ये बटर वितळवा..... फक्त वितळवायचे आहे... पुढे गेले तर काळे काळे होते.
त्यात मैदा घाला. छान परतवा. मैद्याचा कच्चटपणा गेला पाहिजे. पण रंग बदलु देउ नका.
साधारण फेस येणं (मैद्याला :) ) बंद झालं कि मग हळू हळू दूध घाला.
सतत हलवत रहा. गुठळ्या होउ देउ नका. छान दाट झाले कि गॅस बंद करा.
मीठ व मीरेपूड घाला.
हा झाला आपला व्हाईट सॉस.

बाकी कृती :
व्हाईट सॉस मध्ये आपल्या वाफवलेल्या भाज्या घाला. नीट हलवा.
परत एकदा चव पाहुन मीठ हवे नको पहा.
आता बेकिंग डिश ला बटर लाऊन घ्या.
मिक्स केलेल्या भाज्या घाला.
चीज क्युब्ज किसून वर अशी मस्त पखरण करा...
मध्ये मध्ये बटर चे तुकडे टाका... असं पेरा.

आणि प्रीहीट केलेल्या ओव्हन मध्ये साधारण २०० % वर २० मिनिटे बेक करा.
बरचे चीज मस्त गोल्डन ब्राउन झाले आणि घरभर अस अस्वथ करणारा... जीवघेणा दरवळ सुटला कि बाहेर काढुन घ्या.
मस्त सोनेरी सोनेरी टोस्ट बरोबर ..त्यावर गार्लिक बटर लाऊन सर्व करा.... किंवा खा!
Enjoy!
:)

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Dec 2010 - 8:12 pm | बिपिन कार्यकर्ते

पत्ता कळवा!!!

पण भाज्या कोणत्या वापरायच्या?

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

18 Dec 2010 - 8:47 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

भाज्या :
फ्लॉवर , बटाटा, बीन्स (घेवडा), गाजर आणि मटार. हे आपण पुलाव साठी चिरतो तसे..किंवा मिक्स व्हेज ला चिरतो तसे चिरुन घ्यायचे.
माफीची चुकी असावी! :)

मस्तच! मी ही असेच करते. मात्र नेहमी व्हाईट सॉस गंडतोच माझा.
आता या पद्ध्तीने करून बघेन.

@ स्वानंद : भाज्या म्हणजे फ्लॉवर, ब्रॉकोली, गाजर, बटाटा, अस्पॅरॅगस, ग्रीनबीन्स (श्रावणी घेवडा), स्वीट कॉर्न चे दाणे, मटार, सिमला मिरच्या... यापैकी ज्या असतील त्या सगळ्या.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

18 Dec 2010 - 8:49 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

अगदी पटकन होतो. तु दूध गरम घालते का? कारण गरम घातले तर lumps होतात!
तुझा का हूकतो? म्हणजे नक्की काय होतं?

अगं बहुतेक बटर कमी आणि मैदा जास्त होतो. दूध एकदा कोमट घातलं .. एकदा थंड घातलं.. पण लम्प्स झाल्याच. आता या प्रमाणात करून बघते. बटर १ १/२ टेबल्स्पून म्हणजे त्या स्टिक वर मार्क केलेले असतात त्याच प्रमाणे ना?

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

18 Dec 2010 - 8:59 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

आणि दूध घातलस ना कि छान हलवत रहा मात्र. थांबु नको. पॅनच्या तळाचा लगेच शिजतो आणि परत मिक्स नाही होत.
that leads to lumps!
आणि तो झाला ना म्हणजे मैदा छान शिजला ना कि त्याला एक glaze येते. ती खुण असते. अशी वर चकाकी येते. मग बंद करुन मीठ आणि मिरेपूड घाल. किंवा कधी तरी चेंज म्हणुन जायफळ किसुन बघ्...त्याचाहि फ्लेवर मस्त लागतो!

प्राजु's picture

18 Dec 2010 - 9:04 pm | प्राजु

अच्छा!! बघते करून. धन्यवाद! :)

कवितानागेश's picture

19 Dec 2010 - 12:50 am | कवितानागेश

हे करताना शक्यतो जाड कढई/पातेले घ्यायचे, वर संगितले तसा मैदा परतला गेला की सरळ गॅस बंद करुन पटकन खाली घेउन एकीकडे दूध घालत मिश्रण हलवत रहायचे. जाड पातेले भरपूर तापलेले असल्यामूळे या मिश्रणाला पुरेशी आच मिळत रहाते. पुन्हा मंद आचेवर ठेवायचे. ४-५ मिनिटत सॉस तयार.

प्राजु... एक आणखी सोप्पी आणि 'फेल प्रुफ' व्हाईट सॉस ची कृती म्हणजे- एक चमचा बटर नोन स्टिक पान मध्ये गरम करायचा. २ tbsp मैदा १.५ कप गार दुधात कालवून घ्यायचा. आणि मग हे मैदा आणि दुधाचे मिश्रण त्या गरम बटर वर ओतून सतत हलवत राहून दात होई पर्यंत शिजवायचे. बटर वर दूध ओतल्यावर त्यात थोडी साखर घातली कि मैद्याची चव लागत नाही सोस मध्ये. सोस दाट झाले कि मग शेवटी मीठ मिरपूड घालायचे. नाही तर दूध नासेल.

स्वानन्द's picture

18 Dec 2010 - 8:56 pm | स्वानन्द

धन्यवाद.

स्वाती२'s picture

18 Dec 2010 - 9:22 pm | स्वाती२

मस्त!

एकदम नवा आणि अचाट प्रकार आहे हा माझ्यासाठी तरी.
'टु डु लिस्ट' मध्ये नोंद केली आहे.

लतिका धुमाळे's picture

18 Dec 2010 - 11:01 pm | लतिका धुमाळे

मी white sauce साठी corn flour वापरते, ते शिजवायला सोपे आणि पटकन होते. आपल्याला हवा तेव्हढा घट्ट शिजवून त्यात एक चमचा लोणी घलायचे. छान होतो. आवडत असल्यास मशरुम्स पण चांगले लागतात.
पाक्रु छान.
लतिका धुमाळे

सखे, त्याची सविस्तर पाकृ दे ना. पाकृ च्या टॅग खालीच दे. :)

रेवती's picture

19 Dec 2010 - 12:08 am | रेवती

माझी आवडती भाजी!:)
ही खाल्ल्यानंतर किती व्यायाम करू तेही सांग ना!;)
घरी बनवलेली चांगली होतेच पण जास्त आवडते ती रेस्टॉरंटाची.;)
गणपासाहेब,
काय म्हणता?
तुमच्यासाठी ही नवी आहे पाकृ?
आतामात्र मला नानांच्या (पूर्वीच्या) बोलण्यात तथ्य वाटायला लागले आहे.
सौं. गणपा सगळा स्वयंपाक करतात आणि श्रेय मात्र तुम्ही घेता हे सिद्ध झाले.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

19 Dec 2010 - 11:20 am | जाई अस्सल कोल्हापुरी

खाल्ल्यानंतर :
साधारण १० मिनिटे step exercise. २५ फ्री स्क्वॉट्स, १५-१५ लंजेस चा सेट्.आणि १० मिनिट फ्लोर exer.
बा sssssss स्स.! जास्त काही नाही!
:)

जाईताई. हेच पूर्वी एकदा कुठेतरी खाल्ले आणि बेहद्द आवडले होते.पण नाव विसरलो होतो.तुम्ही आठवण करुन दिलीतच आणि रेसिपी सुद्धा. हे पदार्थ अत्यंत आवडीचे. पण घासाघासागणिक सहस्रावधी क्यालरीज पोटात जातात. एरव्ही याचे काही वाटायला नको. पण आम्ही त्या काही अतिलठ्ठ दुर्दैवींपैकी आहोत..

इतके बटर घातले तर कितीही व्यायाम करुन हे जाळणे शक्य नाही,त्यासाठी मूळ सडपातळ शरीरयष्टीच हवी.तस्मात आमच्यासारख्या वर्धिष्णुंकरिता याची लाईट व्हर्शन देता येईल का?
बाकी रेसिपी उत्तम.तोंड पाणावले.

- (लठ्ठ) गवि

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

19 Dec 2010 - 11:17 am | जाई अस्सल कोल्हापुरी

बटर फारसं नाहीये actually.
पण चीज भरपूर आहे. ते कमी करता येउ शकते. चीज न घालता सुद्धा मस्त लागते.
दूध toned milk वापरू शकता.
मी सध्या "आहारनियंत्रण" करीत असल्याने मी माझ्यासाठी चीज न घालता केले होते.
आणि भाज्या जास्त घेउन वर फक्त छान मिक्स होण्याइतपतच व्हाईट सॉस घातला होता.
:)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

19 Dec 2010 - 11:31 am | जाई अस्सल कोल्हापुरी

:)

रश्मि दाते's picture

19 Dec 2010 - 4:01 pm | रश्मि दाते

मेदा कोरडा भाजुन toned milk वापरा,आणि चिझ कमी घाला

निवेदिता-ताई's picture

19 Dec 2010 - 9:02 pm | निवेदिता-ताई

जाई............मस्त्च आहे ग ...

काय काय सुचते बाई तुला....;)

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

19 Dec 2010 - 9:31 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

ही खुप ठिकाणी मिळते.. मला आणि लेकिला खुप आवडतं म्हणुन मी घरी करत असते.
आणि काल केलं होतं ..म्हणुन टाकेली रेसीपी.
करुन पहा. बेक न करताही छान लागेल्.(ओव्हन नसेल तर)
:)

प्राजक्ता पवार's picture

20 Dec 2010 - 11:38 am | प्राजक्ता पवार

माझी आवडती रेसेपी आहे ही.
याचप्रकारे बॉइल्ड पास्ता , मशरुम व सिमला मिरची व्हाईट सॉसमध्ये घालुन बेक केले तर तेदेखील मस्तं :)

परिकथेतील राजकुमार's picture

20 Dec 2010 - 11:57 am | परिकथेतील राजकुमार

शॉल्लेट !!

आणि व्हाईट सॉसची पाकृ दिल्याबद्दल विशेष आभार.

स्पा's picture

20 Dec 2010 - 2:07 pm | स्पा

एकदम tasty .............

तोंडाला पाणी सुटलंय.... :)

दिपाली पाटिल's picture

21 Dec 2010 - 11:11 pm | दिपाली पाटिल

मस्तंय पाकृ...करुन बघेन लाँग विकेंडला.

आजच बेक्ड व्हेजी. केली होती. मस्त झाली होती. लतिकाताईंनी सांगितल्याप्रमाणे कॉर्नफ्लोर वापरून व्हाईट सॉस केला. मैद्याच्या सॉसपेक्षा क्रिमी झाला. एक टेस्पू बटर वापरले. लोफॅट चीज, २% स्निग्धांश दूध असे प्रकार वापरून मनाचे समाधान केले.;)
ग्रोसरीत ताजा बेक केलेला सावर ब्रेड मिळाला होता तो वापरला. भाजीच्या बरोबर खायला चांगला लागला. ब्रेडलाही 'आय कान्ट बिलिव्ह इट्स नॉट बटर' लावले म्हणून आणखी बरे वाटले.;)