पीके - २

वेदश्री's picture
वेदश्री in काथ्याकूट
25 Apr 2008 - 5:50 pm
गाभा: 

जसे पीजे म्हणजे पकाऊ जोक तसे पीके म्हणजे पकाऊ कोडे ! हा काथ्याकूट काढण्यामागचा हेतू हा की अशी जास्तीत जास्त कोडी समजवून घेणे आणि उत्तरे देण्यातली मजा अनुभवणे.. तर करुया सुरूवात?

पहिल्या भागातील योग्य उत्तरे न मिळालेली कोडी अशी आहेत -

१. एका मुलाचे नाव प्रकाश असूनही त्याचे सगळे दोस्त त्याला 'पक्या' म्हणायचे. यावरून तो एक शास्त्रज्ञ होता हे सिद्ध करा. - वेदश्री
२. १३ च्या निम्मे ८ होतात, हे सिद्ध करा ! - वेदश्री
३. बर, सगळे प्राणी पिकनिकला जातात, फक्त जिराफ सोडुन का? - शितल

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

25 Apr 2008 - 5:52 pm | मुक्तसुनीत

३. बर, सगळे प्राणी पिकनिकला जातात, फक्त जिराफ सोडुन का? - शितल
कारण तो फ्रिजात असतो ना !

आनंदयात्री's picture

25 Apr 2008 - 5:53 pm | आनंदयात्री

वा वा ... च्यामारी शुक्रवारची संध्याकाळ साजरी झाली :)

वेदश्री's picture

25 Apr 2008 - 5:55 pm | वेदश्री

कोड्याचे लॉजिकल उत्तर जर ते कोडे विचारणारालाच द्यावे लागले, तर इतरांना काय शिक्षा? एक मिसळपाव पार्टी ! कसें?

असा जर काही नियम झाला तर मला दोन पार्ट्या मिळतील असा नूर दिसतोय एकंदरीत.. :-)

वेदश्री's picture

25 Apr 2008 - 6:00 pm | वेदश्री

अरे बापरे ! पार्टी द्यावी लागेल म्हणून सगळ्यांचा सुंबाल्या का???? मी नुसतं गमतीने म्हणाले होते.. :))))

नारदाचार्य's picture

25 Apr 2008 - 6:02 pm | नारदाचार्य

डोकं पकवणं चांगलं नव्हे. मिसळ पाठवून देतो. पण आता उत्तरं द्या.

जास्त पिळू नका.

वेदश्री's picture

25 Apr 2008 - 6:05 pm | वेदश्री

१३ च्या निम्मे ८ रोमन पद्धतीचे आकडे वापरून मिळवता येते का बघा बरं..

पक्यावाल्या कोड्याचे उत्तर द्यायला भीती वाटत आहे.. कारण ते खर्रंच पकाऊ कोडे आहे ! पकाऊ उत्तर वाचून मला मिपावरून हद्दपार केले तर काय घ्या?!!! :-)

मनस्वी's picture

25 Apr 2008 - 6:07 pm | मनस्वी

पक्यावाल्या कोड्याचे उत्तर द्यायला भीती वाटत आहे.. कारण ते खर्रंच पकाऊ कोडे आहे ! पकाऊ उत्तर वाचून मला मिपावरून हद्दपार केले तर काय घ्या?!!! :-)

आताऽऽऽऽ.... नाही दिले तर हद्दपार करू!

>आताऽऽऽऽ.... नाही दिले तर हद्दपार करू!

बापरे ! ठीके.. देते बापडी उत्तरे..

१३ हा आकडा रोमन लिपीमध्ये XIII असा लिहितात तर त्यात मध्ये आडवी रेष मारायची.. म्हणजे निम्मा केल्याचाच प्रकार ना? वरती जो भाग राहील ( VIII ) तो असेल रोमन ८ सारखा.. म्हणजे झाले की नाही १३ च्या निम्मे ८?!

आता जाऊया पक्याकडे..

प्रकाशला त्याचे दोस्त काय म्हणायचे - पक्या
पक्याच्या उलट काय होते? - कॅप
कॅप म्हणजे काय? - टोपी
टोपीच्या उलट काय? - पीटो
पीटो म्हणजे काय? - मारा
माराच्या उलट काय? - रामा
रामा हा कोण होता? - देव
देवच्या उलट काय? - वदे
वदे म्हणजे काय? - बोलो
बोलोच्या उलट काय? - लोबो
लोबो हा कोण होता - शास्त्रज्ञ.. म्हणून पक्यादेखील शास्त्रज्ञ !!! हुश्श... :-)

नारदाचार्य's picture

25 Apr 2008 - 6:16 pm | नारदाचार्य

तुमच्या पायांचा फोटो पाठवा. ते उलटे नाहीत ना पाहू द्या. सरळ असतील तर वंदन करतो. उलटे असतील तर टांगून ठेवतो. आयला काय डोकं पकवलंय... लय भारी. नारायण, नारायण...

धमाल मुलगा's picture

25 Apr 2008 - 6:19 pm | धमाल मुलगा

अरे काय हे?
काय चाललय काय नक्की?
मला माझा टी.एल. रोखून बघतोय...नजरेत "च्यायला मेंटल हॉस्पिटलात' फोन करावा लागणार " भाव!!!
मी एकटाच गडगडाटी हसतोय पण आणि स्वत:चे केस ओढतोय....
शेजारची तामिळी-कानडी गाढवं बावचळून गेलीयेत....

अगं ए वेदश्रीताई....पाय कुठायत तुझे? फोटो चढव इथेच त्यांचा...हार फुलं हळद-कुंकु वाहीन म्हणतो....

झकासराव's picture

26 Apr 2008 - 6:27 pm | झकासराव

=))

हे त्या कोडाच्या उत्तरासाठी.
धमाल माझी अवस्था देखील तुझ्यासारखीच झाली रे. फक्त आज वीकेंड असल्याने आमचा टी ली लवकर पळालाय. :)

मनस्वी's picture

25 Apr 2008 - 6:21 pm | मनस्वी

लोबोच्या उलटे काय - बोलो
बोलो म्हणजे काय - वद
वदच्या उलटे काय - दव
दवच्या उलटे काय - वद
वदतात कुठून - तोंड
तर तुझे तोंडभरून कौतुक!

नारदाचार्य's picture

25 Apr 2008 - 6:08 pm | नारदाचार्य

मिसळ पाठवतोय. आईनस्टाईनकन्ये, दे आता उत्तर. भास्कराचार्यकन्ये, दे आता उत्तर.

मनस्वी's picture

25 Apr 2008 - 6:08 pm | मनस्वी

XII आणि VII (मधे आडवी रेघ देउन.)

नारदाचार्य's picture

25 Apr 2008 - 6:09 pm | नारदाचार्य

जरा समजावून सांगा रे हे काय आहे ते....

मनस्वी's picture

25 Apr 2008 - 6:11 pm | मनस्वी

मुनीवर्य....
रोमन १३ म्हणजे XIII
आता निम्मे करायला.. बरोब्बर मधे १ आडवी रेघ द्या.. झाले ८.. म्हणजे रोमन VIII

नारदाचार्य's picture

25 Apr 2008 - 6:13 pm | नारदाचार्य

थोडं चुकलं काय मनस्वी? तिथं बारा आणि सात दिसताहेत...

वेदश्री's picture

25 Apr 2008 - 6:15 pm | वेदश्री

अरे वा ! म्हणजे नविन पीके १२च्या निम्मे ७ सिद्ध करा !!! :))

वेदश्री's picture

25 Apr 2008 - 6:20 pm | वेदश्री

एकदम सहीये मनस्वी ! मला उगाच धमकावलं म्हणजे मगाशी.. :-(

नारदाचार्य's picture

25 Apr 2008 - 6:12 pm | नारदाचार्य

निषेध, निषेध, निषेध. आमचं डोकं खाणाऱ्यांचा आणि त्यानंतर तंगवणाऱ्यांचा निषेध.

स्वाती राजेश's picture

25 Apr 2008 - 6:15 pm | स्वाती राजेश

नारायण नारायण करत नारदाचार्य तुम्ही इकडचे तिकडे करता....
साधी एक काडी तुम्हाला इकडची तिकडे करता आली नाही.;)))
तुम्ही कसले हो नारद?

ह.घ्या.:))))

नारदाचार्य's picture

25 Apr 2008 - 6:19 pm | नारदाचार्य

नारद नव्हे. नारदाचार्य. ते काड्या इकडून तिकडं करायचे. आम्ही फक्त काड्या घालत असतो.
'ह. घ्या.'ची गरज नाही हो. येऊन जाऊन चार घटका विरंगुळ्याचा इथं हेतू. त्यात ते ह. घ्या. हे टंकीत करण्याचे कष्ट कशाला. सारं काही ह.च घेऊ.

इनोबा म्हणे's picture

25 Apr 2008 - 6:20 pm | इनोबा म्हणे

ते कोडे पाहून नारद सुद्धा गारद झाला म्हणायचा.
बाकी काड्या लावणार्‍या नारदाला साधी एक काडी हलवता येऊ नये याचे आश्चर्य वाटतंय.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

मनस्वी's picture

25 Apr 2008 - 6:24 pm | मनस्वी

हे आवडले!

वरदा's picture

25 Apr 2008 - 6:16 pm | वरदा

रोमन १३ म्हणजे XIII
आता निम्मे करायला.. बरोब्बर मधे १ आडवी रेघ द्या.. झाले ८.. म्हणजे रोमन VIII

हे मला खूप आवडलं
ते पक्याचं काय? शास्रज्ञ पकाऊ असतात असं काहीतरी आहे का?

नारदाचार्य's picture

25 Apr 2008 - 6:20 pm | नारदाचार्य

थोडं वर जाऊन पहा. उत्तर पडलंय तिथं.

वरदा's picture

25 Apr 2008 - 6:24 pm | वरदा

पाहिलच नाही...सॉलीड पकाऊ आहे ... आवडलं

वेदश्री's picture

25 Apr 2008 - 6:24 pm | वेदश्री

लगोलग पैसे डबल करायचे आहेत.. काही उपाय आहे का?

इनोबा म्हणे's picture

25 Apr 2008 - 6:29 pm | इनोबा म्हणे

लगोलग पैसे डबल करायचे आहेत.. काही उपाय आहे का?
बँक ऑफ बिहार मध्ये गुंतवा.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

वेदश्री's picture

25 Apr 2008 - 6:31 pm | वेदश्री

अम्ह्म.. गुंतवा मग बँकेकडे तोंड ताणा.. वो झोल नहीं मंगता है.. अभ्भीके अभ्भी अपनका रोकडा डबल होनेको मंगता है.. :))

धमाल मुलगा's picture

25 Apr 2008 - 6:31 pm | धमाल मुलगा

दुमडा....

वेदश्री's picture

25 Apr 2008 - 6:32 pm | वेदश्री

नाही.. दुमडा, फाडा.. असे नाही करायचे.

इनोबा म्हणे's picture

25 Apr 2008 - 6:36 pm | इनोबा म्हणे

मग झेरॉक्स करा. सोप्पय की नाई?

समर्थ झेरॉक्स,डेक्कन जिमखाना,पुणे-४
(आमच्याकडे कोर्‍या कागदाच्या झेरॉक्स काढल्या जातील)

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

वेदश्री's picture

25 Apr 2008 - 6:38 pm | वेदश्री

नाही हो.. झेरॉक्स करण्याइतकापण वेळ नाहीये आपल्याकडे. लग्गोल्लग दामदुप्पट पायजेल आपल्याला..

इनोबा म्हणे's picture

25 Apr 2008 - 6:42 pm | इनोबा म्हणे

लई पकवलं.आता सांगून टाका एकदाचं.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

वेदश्री's picture

25 Apr 2008 - 6:43 pm | वेदश्री

शिंपल.. पैसे आरशासमोर ठेवायचे !!!

इनोबा म्हणे's picture

25 Apr 2008 - 6:50 pm | इनोबा म्हणे

वाटलंच होतं,हे असं काही उत्तर असेल ते.(मग सांगीतलं का नाहीस लेका?)

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

नारदाचार्य's picture

25 Apr 2008 - 6:53 pm | नारदाचार्य

पक, पक, पकाक!

वरदा's picture

25 Apr 2008 - 6:45 pm | वरदा

देऊन दोनदा सुट्टे मागा..थोडं भांडण झालं तरी चालेल ते घ्याच....

वरदा's picture

25 Apr 2008 - 6:45 pm | वरदा

मी उगाच डोकं खाजवलं.....

वेदश्री's picture

25 Apr 2008 - 6:53 pm | वेदश्री

लाल आहे पण मिरची नाही, कृष्ण आहे पण काळा नाही, आड आहे पण पाणी नाही आणि वाणी आहे पण दुकानच नाही.. असे काय?

नारदाचार्य's picture

25 Apr 2008 - 6:55 pm | नारदाचार्य

लालकृष्ण आडवाणी

वेदश्री's picture

25 Apr 2008 - 6:56 pm | वेदश्री

:-) बरोबर !

मुक्तसुनीत's picture

25 Apr 2008 - 6:57 pm | मुक्तसुनीत

अरे ..... श्वास घ्यायला जागा द्याल का नाही ! नुसते टणाटणा फुटाणे फुटत आहेत .... हापिसातले लोक मला वेड्यात काढणार ! :-)

मनस्वी's picture

25 Apr 2008 - 6:58 pm | मनस्वी

१ आहे पण २ नाही.. सांगा काय?

वरून आली घार
तिला मारले ठार
रक्त पिले घटाघटा
मास खाल्ले चटाचटा ! तर असे हे काय?

मनस्वी's picture

25 Apr 2008 - 7:00 pm | मनस्वी

कृपया बालवाडीतील कोडी घालू नयेत.

नारदाचार्य's picture

25 Apr 2008 - 7:02 pm | नारदाचार्य

हेच म्हणतोय
(दहावी फ) नारदाचार्य

वेदश्री's picture

25 Apr 2008 - 7:04 pm | वेदश्री

सॉऽऽऽरी !

नारदाचार्य's picture

25 Apr 2008 - 7:01 pm | नारदाचार्य

नारद... अरे नव्हे नारळ

इनोबा म्हणे's picture

25 Apr 2008 - 7:02 pm | इनोबा म्हणे

नारळ. हाय का नाय.

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

वेदश्री's picture

25 Apr 2008 - 7:02 pm | वेदश्री

१. हाताचे बोट म्हणजे दूध तर हलणारे बोट म्हणजे?
२. उभे बोट म्हणजे बीन तर आडवे बोट म्हणजे?
३. आडवे बोट म्हणजे साखर तर उभे बोट म्हणजे?

मुक्तसुनीत's picture

25 Apr 2008 - 7:04 pm | मुक्तसुनीत

१.मिल्कशेक
२.सोयाबीन
३. खडीसाखर