तुम्हिच सुचवा शीर्षक .........

पियुशा's picture
पियुशा in जनातलं, मनातलं
13 Dec 2010 - 12:41 pm

(जाहिरातींचे विडंबन आहे सहज म्हनुन!
खुप डोक खाजवल पन नाहि सुचल तुम्हिच करा बारस !)

सकाळचे सहा वाजले पहिला गजर झाला आणि
आणि कोणत्या गाढवाने (मीच )लावला हा असे म्हणत
तो रागारागात बंद करून मी पुन्हा झोपी गेले ,आई आली ए म्हशे (प्रेमाने म्हणते )उठ आता लवकर किती वेळ लोळणार ? ए ss तू जा ......... ग आई उठते मी २ मिनिट करता करता आठ वाजले,शेवटच ८ चा गजर झाला खडबडून जागी झाले ,
toothpest कोणती
वापरू असा विचार करत असताना आपला शाहरुख आठवला मग त्याची
Pichko -Dent लावली आणि पिवळे दात शुभ्र झाले बस दोन मिनिटात ,

मग "जन्तूर" चे चंदन स्नान केले , नाष्ट्यासाठी गेले तर हे काय !

आमचा बंटी नूडल्स खात होता, आणि आई त्याच्या तोंडातून नुडल्सचा धागा पकडून पकडा पकडी खेळत होती

आज मला घाई होती पटापट गिळले आणि scooty ला किक मारली मागून प्रश्न कुठे चालली स्वारी ? मी म्हटले "why should boys always

have fun ?"

एक तर दिन सुहाना होता आणि वरतून पहली तारीख त्यामुळे मुह मीठा होना जरुरी था,तो एक FATBURY DAIRY MILK खाल्ले ,त्यामुळे घोळ झाला न, पुढे सिग्नल लागला होता ट्राफिक हवालदार

माहिती आहेत कसे असतात सर्वाना! पण मला घाई होती न, मग मी त्याला विनवणी केली ,बैलासारखी मान हलवत नाही म्हणाला ,याला कस समजावू? हात जोडले ,थोडे हसले , डोळे मोठे केले,
(कसा नाही पटत यार बैलच दिसतो )

मग
गालातल्या गालात एक खट्याळ smile दिली
थोडे डोळे मिचकावत जाणे ss दो ss नां ss गान म्हटले , पाघळला लेकाचा शेवटी !
तुम्हाला प्रश्न पडला असेल एवढी घाई का ? (तेच तर सांगते न आज ऑडीशन आहे )
शेवटी पोहचले बर ! लांब ssssssss लचक लाईन पाहून डोके गरगरायला लागले,
डोक चोळत असताना खांद्यावर कुणीतरी हात ठेवला बाप रे टरकले चांगलीच ,एक गोड मुलगी मला म्हणाली "सर दुख रहा हे तो, ये लो अंडू बाम "

(या अंडू बाम मूळे मलाईका बदनाम झालीय म्हणे ) ,मी नो thank u म्हणाले,

शेवटी मेरा नंबर कब आयेगा करत करत माझा नंबर आला , आत गेले टीम बसलेली होती समोर प्राश्नौत्तरे झाल्यावर मी त्यांना Rat -walk पण करून दाखविली सगळे चांगले चालू असताना मधेच एक टकलू म्हणाला " चेहरा तो सुंदर हे मगर वो बात नही" (कौनसी बात ?) no no next candidate plz ..
मला चक्क रीजेक्ट केले टकलुने!
(टकलुच्या नानाची टांग....................)
बाहेर आरशात पहिले तर मेरी रुखी बेजान सावली त्वचा ने मुझे धोका दे दिया था
नही ..... नही ..... नही...... "कॅरियर स्टार्ट होने से पेहले उसकी वाट लगना, मंजूर नही मुझे ,आता काय करू ? कहा जाऊ? (माझ्या मैत्रिणी तर मला कानी मुखर्जी म्हणायच्या ),आणि हा टकला साल्ला.....
"इस टकलू को एकदिन दिखा दुंगी ,कि मी भी कूछ हु अशी शपथ लगेच घेऊन टाकली ,पण काय करावे?"
अशीच चालले होते तर कुणीतरी मर्सिडीज मधून उतरले आणि मला आवाज दिला पियू ................
मागे पहिले तर सोनिया (चिमण -चिंधी )
हा तीच ती माझी क्लासमेट
च्यायला स्वप्न पाहतेय कि काय ? सायकल रेस मध्ये खेळणारी (धडपडणारी )
सोनिया मर्सिडीज मे !!!!!
सोनिया ने तिची स्टोरी सांगितली
मी माझा लहान भैया ,मेरी मा, सोबत सगळे एका छोट्या घरात रहायचो ,माझी म्हातारी घर छोट आहे म्हणून रोज पिरपिर करायची ,
पण तुला माहित आहे ना मला सायकल चम्पियन बनायचं होत ते ?(चालवता येते का ?)
मी माझ्या म्हातारीला प्रोमिस केल होत " एक दिन मे सायकल चाम्पियन बनके दिखौंगी और वो बडा बंगला तुम्हे खरीद के दुंगी "
तर आमचा छोटू म्हणाला " दीदी तू टेनिस वेनिस खेल सायकल मे पैसा नही " पण मला माझ्या
love n fair क्रीम
वर पूर्ण विश्वास होता बै!
"फासली ना ४ आठवडे आणि बघ काय जादू ! प्रक्टिस न करताच चम्पियन झालो बुवा आपण "

मी खेळले ,जिंकले , मला किती ऑफर्स आल्या .मी Zero-Honda ची ब्रांड ambasidar झाले पण बघ, आणि आता मी मोठा बंगलापण घेतला

आज मेरे पास बडा बंगला हे ,पैसा हे ,फोरेनची Catlas ची सायकल आहे

आणि तू ?तेरे पास क्या हे? sssss हाइंग ......

(मेरे पास माsssssss हे और क्रीम हे )

किती सोप्पय एक क्रीम तर घ्यायची होती मला !

गेले आणि घेऊन आले love n fair अमावास्येपासून पौर्णिमे पर्यंत लावली आणि काय जादू झाली चंद्राचे तेज चेहरयापुढे फिके फिके वाटू लागले आता काय सांगू ,यार फोटोग्राफर काय , डिरेक्टर काय सगळे मागेच लागले हाथ धुवून, बस का छाप झाली होती ना आपली !
ना पिक्चर केलाय ,ना एखादी मैच जिंकली ,तरीपण
अवार्ड - बिवार्ड पण मिळाले मी रातोरात star झाले
(एक क्रीम और इतने फायदे सौदा घाटेका नही , )
सगळे केले आता काही करायचं बाकी राहिले नाही म्हणून म्हटलं चला लग्नच करून टाकूया

तसे पण आमचे बाबा मुलामागे फेटे घेऊन पळता -पळता दमलेच होते ना !
मग मीच त्यांना सुचविली एक साईट Barbadi .com आता सेटल झाले १ वर्षानंतर चुन्नुचे आगमन झाले तो पंधरा दिवसाचा होतोय तोच मी त्याला एक
promise करून टाकले कि में मेरे राजा बेटे को सब
कुछ अच्छा दुंगी , पण माझा राजा बेटा
रोज रात्री रडायचा, का बर ? डॉक्टरीण बाई म्हणाल्या गिली नॅपकीन कि वजह से वो रोता हे ,तुम्हे मालूम बच्चा निंद में आधा मिलीमीटर बढता हे?

( शपथ ,मम्मीच्या मम्मीला पण तपास नाही अजून )

मेरे राजा बेटे future के साथ खिलवाड नो नो नो ,मी लगेच जाऊन भारीतली भारी नापकीन " Yummy poko pant " घेऊन आले ती घालून तर राजा बेटा
it's time to disco करू लागला ,

मध्ये मध्ये जुही ,अमिताभ ,मला डोस द्यायचे बाळाला कोणता टीका द्यायचे त्याचे!
आता चुन्नू बरोबर खेळयाला मुन्नू पण आली दोघेही आता शाळेत जाऊ लागली होती ,सगळे सुरळीत चालू होते आणि एक दिवस चुन्नू शाळेतुन आल्याबरोबर माझ्यावर डाफरला ,कारन, त्याचे मात्र त्याच्या हांईट मुळे चिडवायची त्याला ,सायकलच्या पँडल पर्यंत ,झाडाला लागलेल्या अम्ब्यापर्यंत पाय पोहचत नव्हते बिचारयाचे!" त्याचा प्रश्न "में बढ़ तो रहा हु मम्मी पर बढूँगा कब? डोके सुन्न झाले माझे! खुप शोध घेउन ,डॉक्टर nutrition आणि
त्यांच्या Lab's पालथ्या घालून शेवटी एक हेल्थ ड्रिंक सापडले!

(लटकल्याने कधी हाईट वाढत नाही त्याला हेल्थ ड्रिंकच प्यावे लागते हो ) आणि

सिर्फ हाईट होनेसे strong होनेसे नही चलता बॉस !
बच्चोको चाहिये
a b c d पासून z पर्यंत सगळे विटामिन त्यासाठी आणले "BoneTuta"
"दिमाग बने बेहद मजबूत ,और बच्चे रहे तंदुरुस्त "
दिले वर्षभर !

ताडा- माडा सारख वाढल पोर माळावरच्या बरण्या पण काढून देतय आता
त्याचे निपटले तर मुन्नुची कीर -कीर "मेरे बाल लंबे क्यू नही" सांग ना "मेरे बाल लंबे क्यू नही"डोक्याचा भुगा परत !
आता मी ऑफिसमध्ये पण जात नव्हते दिवसभर घरात पडीक काय सांगू तिला ?
तिच्या मिस नेच ३ x ३ = ३ चा फोरमुला म्हणजे
Clinic All Dare दिला (अभ्यासापेक्षा मिस ला नसते उद्योग ! दुसर काय?) वापरले हातभर लांब केस झाले पोरीचे ३ महिन्यात

बोला आता !
मला आणि मुलांना शॉपिंग करायला फार आवडायचे ,पण जेव्हा जेव्हा मी यांना म्हणायचे ते आपले तोंड वेडेवाकडे करून पोटाला हात लावून बसून घ्यायचे नी म्हणायचे Acidity ,
पण ......
मी हि हुशार, त्यांना डाबरचे पुदिन पादा द्यायचे ,६ सेकंदात काम सुरु !
फुदुक फुदुक फुस्स...................
आता कुठे गाडी रुळावर येतेय तोच मुन्नू ने तक्रार केली," तुझ्यामुळे माझा सायन्स प्रोजेक्ट गेला, का ?
तर सहा आठवडे शोधून हि त्याला एक झुरळ सापडले नव्हते घरात ? रडू कि हसू यावर , पण मी काय करणार हो!
आणि डास ,रोज संध्याकाळी ,खूप सारे डास घरात घुसायचे त्यांच टोऴक पाहून माझ टाऴक जाम हलायाच बॉस !आणि वरतून त्यांचा सरदार मला डेंगू मलेरिया ची धमकी द्यायचा साल्ला ..ss...ss.....
म्हनुनच घरात मारला होता

"बाईगॉन" च शीट स्प्रे !

आता चुन्नू मुन्नू मोठी होऊ लागली होती हेल्थ ड्रिंक पिउन पिउन केवढी हुशार जाली होती ,

नवार्याचे काळेचे पांढरे झाले ! त्याला कौवाकाला हेअर डाए लावले अन आणि परत पांढर्याचे काळे झाले केस हो !
आता मी पण तिशी पार केली तसा माझा चेहरा डल दिसू लागला झुरीया !
"बढती उम्र के साथ आती हि हे, "नवरा ignore करायचा पार्टीला न्यायचा नाही ,हॉटेलात नाही ,किती म्हणूण किती छळ ! (साला बायकांनाच का हा प्रोब्लेम )
त्यावर इलाज काजोल बाइं ची

"Dholey Natural Cream "

सात दिवसात फरक , नवरा तर नवरा ,चुन्नू चे डान्स टीचर पण बघू लागले , ते मला म्हणाले वॉव , कितनी यंग collage student? नो नो

चुन्नू कि दीदी? ( ऐकून तर मी हवेतच उडू लागले )

चुन्नू लगेच मम्मी... मम्मी ...करत टपकली (नको तिथे टपकायची फार सवय )

फुटला फुगा

फुस्स ...............

नवरा खाऊन खाऊन सूट लाय , मला नको का काळजी कोले स्ट्रोल ची म्हणून "SAPOLA तेल वापरते बाई !

वरतून त्याला बर्थ डे गिफ्ट म्हणून एक फिटनेस ट्रेनर पण ठेवणार आहे (पण सीक्रेट आहे सांगू नका त्याला )

नवर्यान एक परफ्युम आणलाय

"Wax Wild "

पण तो मी कपाटात लपून ठेवलाय तो मारल्यावर म्हणे बायका वेड्या होतात , पाठीमागे लागतात्त नको ग बाई रिस्क .......

क्रमशः

विडंबन

प्रतिक्रिया

रणजित चितळे's picture

13 Dec 2010 - 12:49 pm | रणजित चितळे

छान छान

वाचतोय - पाठवा पुढचा लेख लवकर

झकास, कुरकुरीत, खुसखुशीत लेख......

:)

नन्दादीप's picture

13 Dec 2010 - 1:23 pm | नन्दादीप

लय भारी.....तेढा है पर अच्छा है....झक्कक्क्क्क्क्क्क्क्क्क्क्क्कास...

ब्रिटिश टिंग्या's picture

13 Dec 2010 - 1:35 pm | ब्रिटिश टिंग्या

=)) =))

गवि's picture

13 Dec 2010 - 2:01 pm | गवि

आवडले...छान.

sneharani's picture

13 Dec 2010 - 3:02 pm | sneharani

छान लिहल आहेस!

टारझन's picture

13 Dec 2010 - 3:17 pm | टारझन

हा हा हा हा !!!

कधी भेटताय बोला पियुशा आंटी :)

-(सौंदर्य साबण णिरमा) टारझन

पियुशा's picture

13 Dec 2010 - 3:22 pm | पियुशा

आण्टी मत कहो ना ,टा र झ न अन्कल!

टारझन's picture

13 Dec 2010 - 3:24 pm | टारझन

आण्टी मत कहो ना ,टा र झ न अन्कल!

हे वाक्य पान पराग खाऊन बोलत असाल तर मग विचार करु .. :)

- पिउद्या

पारा's picture

13 Dec 2010 - 3:25 pm | पारा

आम्ही हा धागा प्रायोजित करु इच्छितो.

संपर्कासाठी भेटा अथवा लिहा

'दिगंबर वस्त्र भांडार'
चोळखण आळी, पुणे.
प्रोप्रायटर : नागुअण्णा पटवर्धन
(आमची कोठेही शाखा नाही)

गणेशा's picture

13 Dec 2010 - 5:48 pm | गणेशा

कल्पना शक्ती जबरदस्त ...
लिखान आवडले ...

लिहित रहा... वाचत आहे

प्रकाश१११'s picture

13 Dec 2010 - 8:12 pm | प्रकाश१११

पियुषा -कशाला हवंय शीर्षक.?
एकदम भन्नाट नि छानन!!
लिहितेस .तुझ्या लिखाणात तेंडुलकरच्या ब्याटींगची सफाई आहे .
तेंडल्याने बॉल मारला तर फिल्डर क्याच नाही घेत ..बघत बसतात
तसेच तुझा लेख वाचत बसतील शिर्षक नाही बघणार .
मनापासून शुभेच्छा ..लिहित राहा ...!!!
बयो लेख वाचला बरका !!

प्रकाश१११'s picture

13 Dec 2010 - 8:14 pm | प्रकाश१११

पियुषा -कशाला हवंय शीर्षक.?
एकदम भन्नाट नि छानन!!
लिहितेस .तुझ्या लिखाणात तेंडुलकरच्या ब्याटींगची सफाई आहे .
तेंडल्याने बॉल मारला तर फिल्डर क्याच नाही घेत ..बघत बसतात
तसेच तुझा लेख वाचत बसतील शिर्षक नाही बघणार .
मनापासून शुभेच्छा ..लिहित राहा ...!!!
बयो लेख वाचला बरका !!

हा हा मस्त लिहिलय.

शिर्षक - सुपर मार्केट,
किंवा (असरानीची एक अ‍ॅड होती - बल्ब्ज ची - त्यातील पंच लाइन - पुरे घर के बदल डालूंगा त्या धर्तीवर) 'पुरे घर को बदल डाला '
किंवा - लाईफ इजी तर सगळे हॅप्पी , किंवा इजी लाइफ चं शिक्रेट