हिंदू धर्म-वादग्रस्त विधाने

प्रचेतस's picture
प्रचेतस in काथ्याकूट
10 Dec 2010 - 9:50 am
गाभा: 

लोकप्रभेच्या ताजा अंकात संदीप जावळे यांनी हिंदू धर्माबद्दल अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत.

http://www.loksatta.com/lokprabha/20101217/pratisad.htm

मिपाकरांच्या प्रतिक्रीया वाचण्यास उत्सुक.

प्रतिक्रिया

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Dec 2010 - 10:25 am | विश्वनाथ मेहेंदळे

एक म्हण आहे हो आपल्यात, उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. त्याचे प्रत्यंतर लेख वर वर चालला तेव्हा आले.

उदा खालील परिच्छेद
"बौद्ध, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात अधिक प्रामाणिकपणाने सामावून घेतले जाते आणि एकजिनसी केले जाते. जो माणूस मुस्लिम असतो तो अखिल मुस्लिम समुदायाचा घटक असतो. तो कुठल्याही मशिदीत जाऊन नमाज अदा करू शकतो. एक मुस्लिम दुसऱ्या कुठल्याही मुस्लिमाबरोबर विवाहसंबंध जोडू शकतो. जीवनातल्या सर्व घटनांमध्ये, संस्कारांमध्ये, भोजन/ लग्न/ मृत्यू अशा महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये सहभागी होतो. त्याला कुणीही कुठेही हटकत नाही. ख्रिश्चन धर्मातही हीच गोष्ट आढळते. हिंदूंमध्ये मात्र असे दिसत नाही."

लेखकाला शिया आणि सुन्नी हे शब्द माहित दिसत नाहीत. कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट यांची लग्ने होत नाहीत, ते अनेकदा एकमेकांच्या चर्च मध्ये जात नाहीत याचा त्याला पत्ता नाही. कुठलाही सोम्यागोम्या कसल्याही अभ्यासाशिवाय हल्ली लेखन करू शकतो त्याचा परिणाम हे असे लेख.

बाकी सोडा, ज्या ठिकाणी एके काळी मास कन्वर्जन (मराठी शब्द?) झाली तिथे अनेक प्रसंगी माणसे अजूनही जातीभेद टिकवून आहेत. (एक किरीस्ताव :- आम्ही त्यांच्या पेक्षा श्रेष्ठ, आमचे पूर्वज हिंदू असताना अमुक जातीचे होते, त्यांचे तमुक जातीचे )

प्रचेतस's picture

10 Dec 2010 - 10:36 am | प्रचेतस

अगदी अगदी. हेच म्हणायचे होते.

बेसनलाडू's picture

10 Dec 2010 - 11:27 am | बेसनलाडू

लेख चाळताना हीच वाक्ये डोळ्यात खुपली आणि हेच विचार मनात पहिल्यांदा चमकले.
(सहमत)बेसनलाडू

बरोब्बर एका गोवेकर्‍याने मला त्याची जात ब्राम्हण ख्रिश्चन असे संगितल्यावर मी त्याला विचारले चर्च मध्ये तुम्ही सोवळे पाळता का?
अवांतर : बहुतेक धर्मान्तरे कनीष्ठ्/गरीब वर्गाच्या जातीत का झालेली आहेत.
( अपवादः जैन धर्मान्तरे )

चिंतामणी's picture

10 Dec 2010 - 10:28 am | चिंतामणी

सामुहिक धर्मांतर

(त्या लेखाबद्दल प्रतिक्रीया सवडीने. जागा राखून ठेवतो.)

भारी पत्रकार विचारवंत दिसतो आहे हा! याला रोजच्या बातम्याही वाचण्याची सवय दिसत नाही.
नाहीतर पाकिस्तानात काही मुसलमान लोक अहमदिया मशिदीत खुनाखुनी आणि बाँब स्फोट घडवत आहेत हे ही याच्या गावी नाही! प्रोटेस्टंट आणि कॅतोलिकांचे वैर यांना माहिती नाही.

असो,

पीतपत्रकारांचे पादशा: सुमार केतकर यांच्या समुहाचे लोकप्रभा असल्याने गुण नाही पण वाण आले असावे! किंवा हा त्यांचाच शिष्य असावा.

सुधिर बेल्हे's picture

10 Dec 2010 - 12:40 pm | सुधिर बेल्हे

वा.कोनितमगेमागे सुमार केत्कर ह शब्द वपरला होता.तसे हे सुमार केत्कर आसवेत.(लोक्प्रभत लिहिनरे)

sagarparadkar's picture

10 Dec 2010 - 2:01 pm | sagarparadkar

गुरुंची प्रतिभा मॅडमचे गुणगान करण्यात वाया गेली , मग आता कंठशोष करायला प्रतिभाच उरली नाही ... म्हणून ही उसनी अवसानं आणलेली दिसतायत ...

सुमार गुरुच्या अतिसुमार शिष्याची बेसुमार बकवास .... ह्यापलीकडे फारसं महत्व देण्याची गरज वाटत नाही .

योगी९००'s picture

10 Dec 2010 - 4:00 pm | योगी९००

सुमार गुरुच्या अतिसुमार शिष्याची बेसुमार बकवास ..
हे मस्त..

सहमत..

शिल्पा ब's picture

10 Dec 2010 - 12:45 pm | शिल्पा ब

कोण जावळे?

विश्वनाथ मेहेंदळे's picture

10 Dec 2010 - 1:16 pm | विश्वनाथ मेहेंदळे

अरेच्या !!! मला वाटले होते की हा प्रतिसाद पराने लिहिला असेल. हा काय चमत्कार ??

१९९२-९३ च्या सुमारास संदीप जावळे विद्रोही चळवळीतील उभरता कार्यकर्ता होता तेव्हा भेटला की त्याच्याकडे बघून वाटायचे, की हा नक्कीच उद्याचा सुधारक विचारवंत होणार. पण हा लेख वाचल्यावर असं दिसतंय की १८ वर्षांत संदीपचा अभ्यास काही परिपक्व झालेला दिसत नाही. विचारांना पूर्वग्रहांची चौकट घालून घेतली, की माणूस आयुष्यभर त्यातून बाहेर येत नाही, हेच खरे. प्रबुद्ध होण्याऐवजी निर्बुद्ध होण्याकडे आणि इतरांना हतबुद्ध करण्याकडे हा प्रवास होतोय की काय?

परिकथेतील राजकुमार's picture

10 Dec 2010 - 12:55 pm | परिकथेतील राजकुमार

ओक्के !

संदीप जावळे व लोकप्रभेला पत्र लिहायला घेतले आहे.

टारझन's picture

10 Dec 2010 - 1:12 pm | टारझन

त्याच्यात फ* आणि अ‍ॅ* टाकणारेस की णाही ?

शिल्पा ब's picture

10 Dec 2010 - 1:15 pm | शिल्पा ब

नाही जमलं तर आम्ही मदतीला अहोतच..

नक्की काय जमलं नाही तर आपण आहात मदतीला ? ;)

-(अचंभित)

आत्मशून्य's picture

10 Dec 2010 - 6:46 pm | आत्मशून्य

:) पत्र लिहायला जमले नाही तर त्या मदतीला आहेत असे सूचवायचे आहे.

अवांतर : "टारझन" साहेब तूमचे नाव "टारझण" असे योग्यप्रकारे लीवाकी ?

परिकथेतील राजकुमार's picture

10 Dec 2010 - 2:18 pm | परिकथेतील राजकुमार

त्याच्यात फ* आणि अ‍ॅ* टाकणारेस की णाही ?

हो म्हणजे काय? शिवाय हिंदू वाचकांमुळेच लोकसत्ता आणि लोकप्रभेचा खप कसा आहे हे पण लिहावे लागेल त्यात.

आणि कसे आहे टार्‍या समजा आपल्याला नाहीच जमले तर बसवु की एखादे माकड टंकायला ;) विजुभौ देतील त्यांच्याकडचे एक माकड थोड्यावेळासाठी.

प्रचेतस's picture

10 Dec 2010 - 12:57 pm | प्रचेतस

पत्राची एक इकडेही करा. :)

प्रचेतस's picture

10 Dec 2010 - 12:58 pm | प्रचेतस

पत्राची एक सीसी इकडेही करा. :)

नितिन थत्ते's picture

10 Dec 2010 - 1:03 pm | नितिन थत्ते

धर्म कुठलाही असो. भेदभाव उच्चनीचता सर्वत्र असते. तसेच असलेल्या उच्चनीचतेला धर्माचा आधार सांगणे सुद्धा सर्वत्र असतेच.

वल्ली ने लावलं समद्यास्नी कामाला =))

मी_ओंकार's picture

10 Dec 2010 - 11:41 pm | मी_ओंकार

वल्ली,

विषय इथे मांडल्याबद्दल आभार.
इथे दिलेला लेख वाचताना हा लेख संदीप जावळेच्या आधीच्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियेंना उत्तर म्हणून लिहिला आहे असे कळले. म्हणून आधी तो लेख वाचला. लेखाचा दुवा.

http://www.loksatta.com/lokprabha/20100924/samiksha.htm

या लेखात बरेच नवीन मुद्दे मांडलेले दिसतात. काही भडक विधानेही आहेत. यावर बाकी अभ्यासकांचे मत वाचायला आवडेल.

नवबौद्धांच्या लिखाणातील जहालता पहिल्यांदाच वाचायला मिळाली. दुसरा लेख जाऊदे. तो आलेल्या प्रतिक्रियांमुळे भडक झाला असेलही. पण पहिल्या लेखातील मुद्देही वेगळे आहेत. बाबासाहेबांचे लिखाण कोणी वाचले आहे का? त्यांनी बुद्ध धर्मावर बरेच लिखाण केले. (बुद्ध आणि त्याचा धम्म ) तसेच धर्मांतरासाठी बौद्ध धर्माची निवड करण्यामागे ही मोठी विचारधारा असेल. त्यांच्या लिखाणात असे काही संदर्भ आहेत का?

- ओंकार.

रणजित चितळे's picture

10 Dec 2010 - 3:37 pm | रणजित चितळे

प्रतिक्रिया नंतर देईन म्हणतो.

तोवर एक किलो बाकरवडी द्या !! ४ वाजता पुण्हा गर्दी होईल मग :)

अप्पा जोगळेकर's picture

10 Dec 2010 - 4:57 pm | अप्पा जोगळेकर

अवलिया's picture

10 Dec 2010 - 5:11 pm | अवलिया

ओके.

वेताळ's picture

10 Dec 2010 - 5:22 pm | वेताळ

खेद वाटला.

अविनाशकुलकर्णी's picture

10 Dec 2010 - 5:37 pm | अविनाशकुलकर्णी

जनगणनेत धर्म बौद्ध लावणार कि वर जाति पण लावणार.?
मुसलमान....ईसाई ....लोकात पण ओ.बी सी प्रकार आहे असे आदरणीय हुसेन दलवाई एका चर्चेत म्हणाल्याचे स्मरते..
-------------------------------------------------------------------------------------------
भारताचा पराभव आणि पीछेहाट याला कारण बुद्ध वगैरे लोक नाहीत. उलट बुद्ध धर्माची पीछेहाट आणि बहुसंख्य समाजाची हिंदू-वैदिक धर्माच्या नावावर शेकडो वर्षे करण्यात आलेली अमानुष पिळवणूक या गोष्टी भारत रसातळाला जाण्यासाठी कारणीभूत ठरल्या. ज्या राष्ट्रात ८० टक्के जनतेला आलिया भोगासी असावे सादर अशा पद्धतीने जगणे भाग पाडले जाते ते राष्ट्र काय दिवे लावणार?

ओबामा साहेब व जग तर म्हणत आहे कि भारत महाशक्ति होणार.....

भारताचा पराभव आणि पीछेहाट याला कारण बुद्ध वगैरे लोक नाहीत. उलट बुद्ध धर्माची पीछेहाट आणि बहुसंख्य समाजाची हिंदू-वैदिक धर्माच्या नावावर शेकडो वर्षे करण्यात आलेली अमानुष पिळवणूक या गोष्टी भारत रसातळाला जाण्यासाठी कारणीभूत ठरल्या. ज्या राष्ट्रात ८० टक्के जनतेला आलिया भोगासी असावे सादर अशा पद्धतीने जगणे भाग पाडले जाते ते राष्ट्र काय दिवे लावणार?

संदर्भ द्या

अविनाशकुलकर्णी's picture

10 Dec 2010 - 5:46 pm | अविनाशकुलकर्णी

असे जावळे साहेब आपल्या लेखात म्हणत आहेत...

अवलिया's picture

10 Dec 2010 - 5:48 pm | अवलिया

तसे म्हणा की मग तुमच्या प्रतिसादात..

उगाच लोक तुम्हाला विचारवंत समजुन टाळकं शेकुन काढतील घेणं न देणं ... !

नरेशकुमार's picture

10 Dec 2010 - 5:56 pm | नरेशकुमार

विचारवंत मन्जे काय ओ ?

घ्या ! अख्खं रामायण झाल्यावर सीता रामाची कोण असे विचारत आहात. लेख पुन्हा वाचा म्हणजे कळेल नक्की काय ते.

नरेशकुमार's picture

10 Dec 2010 - 6:21 pm | नरेशकुमार

राम, कोन राम ? आनि सिता त्याचि भैन वगेरे होति का ? का आई होति ?

लेख पुन्हा वाचा म्हणजे कळेल नक्की काय ते.
वाचन्याच्या लायकिचं काय आहे का ?

अवलिया's picture

10 Dec 2010 - 6:22 pm | अवलिया

वेगळा धागा काढा म्हणजे चर्चा करता येईल.

नरेशकुमार's picture

10 Dec 2010 - 6:27 pm | नरेशकुमार

मिसळ्पाव, धागा आनि चर्चा ,
तुमचं आप्ल काय तरीच बुवा ? जास्त अपेक्शा हैत.

नरेशकुमार's picture

10 Dec 2010 - 5:55 pm | नरेशकुमार

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Dec 2010 - 5:56 pm | निनाद मुक्काम प...

@लेखकाला शिया आणि सुन्नी हे शब्द माहित दिसत नाहीत. कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट यांची लग्ने होत नाहीत, ते अनेकदा एकमेकांच्या चर्च मध्ये जात नाहीत याचा त्याला पत्ता नाही. कुठलाही सोम्यागोम्या कसल्याही अभ्यासाशिवाय हल्ली लेखन करू शकतो त्याचा परिणाम हे असे लेख.
अगदी मनाचे वाक्य बोलला (आमच्या हॉटेलात एका शिया धर्मीय पाकिस्तानी लोकांना जरा सहानभूती दाखवली तर सुन्नी धीष्टीत इतर मुस्लीम समाज व त्यांचे ह्यांचावर अत्याचार व ह्याचा पाठीराखा एकमेव शियाबहुल इराण अश्या अनेक गोष्टी कळतात .(त्या परत कधीतरी )
असे लेख प्रसिध्धीला आले कि ह्यांना निषेधाची पत्रे भरपूर येणार हे ठावूक असते .व ह्या पत्राहून आपले मासिक कितीजण वाचतात ह्या आनंदात हि लोक असावीत असा दाट संशय येतो .
बाकी एका पंजाब मधील पाकिस्तानी युवती मला आमच्या कडे जाती पाती असून त्यातच लग्न होतात असे सांगितले .होते (हे मला उद्देशून नव्हते तर मी पंडित आहे (भट लोकांसाठी हा पाकिस्तानी सरसकट शब्द वावरतात .व भारतातील पाकिस्तानी विरोधी सर्व धोरणे हाच वर्ग चालवतो व सरकार देखील हाच वर्ग पद्यामागून चालवतो असा त्यांचा पक्का समज आहे .ठाकरे हे नाव बहुतेक सर्व पाकिस्तानी लोकांना माहित आहे .).असे कळल्यावर बाबरी व गुजरात साठी मीच ) जबाबदार आहे असे समजून त्वेषाने स्वताचा मुद्दा माझ्यापुढे मांडत होती (सदर महिला कुराण जर्मन मध्ये भाषांतरित करून येथील स्थानिक मुलांना (पाकिस्तानी कट्टर बनवत आहेत )तुर्की मोरेकन हे सुद्धा मुस्लीम बहुल लोक येथे भरपूर असून प्रत्येकाला वाटते तेच खरे इस्लामचे पाईक(ह्या लोकांमध्ये एकवाक्यता नाही .)त्यामुळे सेल्फ डिफेन्स इज नोट क्राइम ह्या न्यायाने आमच्या पुढच्या पिढीला आक्रमक बनविण्याशिवाय पर्याय नाही आहे .

विजुभाऊ's picture

10 Dec 2010 - 5:56 pm | विजुभाऊ

ज्या राष्ट्रात ८० टक्के जनतेला आलिया भोगासी असावे सादर अशा पद्धतीने जगणे भाग पाडले जाते ते राष्ट्र काय दिवे लावणार?

हे उदाहरण चीन ला देखील लागू पडते. पण चीनी फ्लोरोसन्ट दिवे जगभर लावले जातात. गणपतीत लाईटच्या माळा सुद्धा चिनी असतात.
जनता कशी आहे या पेक्षा शास्ता कसा आहे यावर देशाची उन्नत्ती ठरते.

प्रशु's picture

10 Dec 2010 - 10:20 pm | प्रशु

अतिशय रटाळ आणि बेजबादार लेख. बुद्ध धर्माचा पुरस्कार करायचा हि लेखकची भुमिका आहे आणी त्यात चुकिचं काहि नाहि पण त्यासाठी हिंदु धर्माला खाजवायची गरज काय? बुद्ध धर्म कि धम्म ? ह्याचा विचार लेखकाने करावा. त्या काळी बुद्धाने सांगितलेला आणि आज आचरणात आणला जातोय तो धर्म आहे कि धम्म ह्या वर लेखकाने लिहावे. उगाच हिंदुंवर चिखलफेक करुन काय साध्य होणार? कि हिंदु आणी बुद्ध ह्यांत तेढ वाढवायची आसा तर हेतु नाही ना लेखकाचा?

ह्यांचा पहिला लेख मी वाचला होता, त्यांत त्यांनी पंढरपुर, कोल्हापुर येथे उत्खननाची गरज आहे असे म्हटले होते. मला एक कळत नाहि ह्या विचारवंतांना अश्या गरजा वाटतात तर मग हे कार्य ते स्वतः का करत नाहित?