औरंगझेब - एक (बर)बादशहा !

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जनातलं, मनातलं
23 Apr 2008 - 3:24 pm

लोकसत्ता-रविवार दिनांक ०७-जानेवारी'०७ : मुखपृष्ठावरील बातमी :
"औरंगजेबाच्या मॄत्यूला फेब्रुवारीत ३०० वर्षे पूर्ण - भूषण देशमुख-नगर"

वरील लेख वाचनात आला आणि मन विषण्ण झाले ! लोकसत्ता सारख्या प्रथितयश वॄत्तपत्राने असा लेख पहिल्या पानावर द्यावा याचे आश्चर्य किंबहुना खेद वाटला ! मी सतत ३ आठवडे अगदी दिवस रात्र एक करून संशोधन करून काही लिहिले ते पुढे मांडत आहे.प्रत्येक माणसाला आपले विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे , त्यामुळे सदरचा लेख हा कुणावरही टीका अथवा कुठल्याही जाती ध्र्माबध्दल अनास्था दाखविण्यासाठी लिहिलेला नाही हे मायबांप वाचकांनी लक्षात घ्यावे अशी कळकळीची "सप्रे"म विनंती !--------------उदय गंगाधर सप्रे-ठाणे--------------------------

औरंगझेब - एक बरबादशहा !

१२-जानेवारी-१६९८ रोजी जिद्दीचा जातिवंत ऊरस्फोड अर्थात् जिजाऊ सिंदखेड राजा येथे जन्माला आल्या !
त्यांची ४०९ वी जयंती असा लेख काही लोकसत्ता मधे वाचायला जास्त आवडले असते !

ज्या औरंगझेबाच्या कबरीच्या फोटोसकट पहिल्या पानावर बातमी दिली गेली , त्या औरंगझेब बध्दल मायबाप वाचकांना अधिक माहिती मिळावी यासाठी हा सर्व ऊहा पोह ! हा लेख मी लोकसत्ता , सामना , सनातन प्रभात या तीनही वृत्तपत्रांना पाठवला होता , परंतु लेख छापणे सोडाच - त्याची साधी "पोच" सुध्दा कुणी मला आजतागायत दिलेली नाही !

ज्या तैमूरलंगाचे आपण वंशज आहोत असा औरंगझेबाला अभिमान होता, त्या तैमूरलंगा पासूनच आपण सुरुवात करुया.

मानव संहारात (हिडीस) आनंद मानणारा मध्य आशियातील एक संस्कारहीन तुर्क लुटारू म्हणजे तैमूरलंग ! युध्दात पकडलेल्या लोकांची मुंडकी तोडून त्यांचे मनोरे रचण्यात आनंद मानणारा हिडीस मनोवृत्तीचा एक नराधम म्हणजे तैमूरलंग ! दिल्लीवर १३९८ मधे स्वारी केली तेंव्हा त्याच्याजवळ एक लाख युध्द्कैदी होते आणि ते त्याचे गुलाम म्हणून राबण्यास तयार होते. पण , आपण दिल्लीच्या स्वारीत गुंतल्यावर ते बंड करतील या केवळ संशयाने त्याने त्या सर्वांचे शिरच्छेद केले !

माझ्या मूळ लेखात तुर्क लोकांची संपूर्ण वंशावळ मी दिली आहे पण या इथे ती प्रसिध्द केल्यावर नीट दिसत नाहे असे दुसर्‍या एका लेखाच्या वेळी ध्यानात आल्यामुळे ती इथे देत नाहिये. तूर्त आपण खुर्र्म ऊर्फ शाहजहानच्या अपत्यांपासून सुरुवात करू , शाहजहानला इराणी सरदार ऐतेमाद उद्दौला ऊर्फ घियास बेग याचा मुलगा आसफखान याची कन्या मुमताझ महल पासून एकूण १४ अपत्ये झाली ती पुढीलप्रमाणे :

१. मेहेरुन्निसा - ज. १६१३
२. जहाँ आरा - ०२-०४-१६१४ ते १६८१
३. दारा शुकोह - २०-०३-१६१५ ते ३०-०८-१६५९
४. शहा शुजा - २६-०६-१६१६ ते १४-०२-१६५८
५. रोशन आरा - ०३-०९-१६१७ ते ११-०९-१६७१
६. औरंगझेब - २४-१०१६१८ ते २०-०२-१७०७
७. उमेदबक्ष - १८-१२-१६१९ ते १६२१
८. सुरैय्याबानू - १६२१ ते १६२८
९. मुलगा - १६२२ - नामकरणापूर्वीच मृत्यु
१०. मुरादबक्ष - २८-०९-१६२४ ते ०४-१२-१६६१
११. लुत्फुल्ला - ०४-११-१६२६ ते मृत्यु दिनांक अज्ञात
१२. दौलतअब्जा - ०८-०५-१६२८ ते १६२९
१३. मुलगी - २३-०४-१६३० - जन्मतःच मृत्यु
१४. गौहर आरा - १७-०६-१६३१ ते १७०६

गुजरातच्या पंचमहल जिल्ह्यात दोहद येथे २४-ऑक्टोबर १६१८ रोजी जन्मलेला औरंगझेब याने जवळजवळ ५० वर्षे राज्य केलं पण अफाट वैभव , अमर्याद सत्ता असूनसुध्दा आपल्या हेकेखोर , जुलमी आणि संशयी वृत्तीमुळे , ज्या मराठ्यांना संपवायचे स्वप्न उराशी बाळगून तो दख्खनमधे उतरला , त्या दख्खनमधेच नगर येथे - म्हणजेच परमुलुखात त्याला मरण आलं !

या औरंगझेबच्या स्वभावाची आपण ओळख करून घेऊया :

१. लहानपणापासूनच बुध्दी तल्लख आणि कुशाग्र.अफाट स्मरणशक्ती.अरबी , फारसी, हिंदुस्थानी आणि तुर्की
भाषेवर प्रभुत्व ! अक्षर सुंदर व वळणदार ! कुरान आणि हादीस तोंडपाठ !

२. धैर्यशाली , धाडसी व साहसी ! याचं एक उत्तम उदाहरण : २८ मे १६३३ - शहाजहानने हत्तींची झुंज लावली होते.ती पहायला औरंगझेब आपले ३ भाऊ दारा, शुजा व मुराद यांच्यासोबत आला होता.झुंज पाहता पाहता तो भान हरपून हत्तींच्या अगदी जवळ आला.तेव्हढ्यात एक हत्ती पिसाळला आणि औरंगझेबवर चाल करून आला.पण औरंगझेब मात्र तिठं ठामपणे उभा राहिला आणि त्याने चालून आलेल्या सुधाकर नावाच्या त्या हत्तीच्या गंडस्थळांत भाला फेकून मारला.तो वार सहन करूनही हत्ती तसाच पुढे आला आणि एका धडकेत त्यानं घोड्यासहीत औरंगझेबला खाली पाडलं.औरंगझेब पुन्हा उठून उभा राहिला.हत्ती इतका जवळ आला होता की , तेव्हढ्या लवकर त्याच्या बचावासाठी कुणीही येणं शक्यच नव्हतं ! कमरेची तलवार खेचून औरंगझेब अंतिम मुकाबल्यासाठी सज्ज झाला.तेव्हढ्यात आपला घोडा फेकत शुजा आला व त्यानं आपल्या भाल्यानं हत्तीला जखमी केलं.राजा जयसिंगानं आपल्या पथकासह धाव घेऊन औरंगझेबला संर्क्षण दिलं.दारूवाल्यांनी चर्कीस ची काही दारू वापरून स्फोट घडवून आणले.यामुळे व आलेल्या बाकी भालाईत लोकांच्या हल्ल्यामुळे सुधाकर घाबरून मागे वळला.ट्यावेळी चिंतातूर बादशहाने लाख मोहोरांचे बक्षिस देऊन त्याची कानौघडणी केली.यावर गुस्ताख औरंगझेब म्हणाला,"हत्तीसारख्या बलाढ्य जनावराशी लढताना मौत आली असती तरी त्यात नाचक्की कोणती होती?मोठमोठ्या शहा सुलतानांच्या आयुष्यावर मृत्यू अचानक पडदा टाकतो.मृत्यूत नाचक्की कसली?त्यात लांज वाटायचं काय कारण?लाज तर त्यांना वाटायला पाहिजे जे अशा प्रसंगी बहादुरी न दाखवतां बुझदिलीनं वागले !" या त्याच्या बोलण्याचा रोख दारा शुकोहवर होता , पण दारा तेंव्हा खरंच खूप दूर होता. हा त्याचा जळका , मत्सरी स्वभाव त्याच्या धाडसाबरोबर मरेपर्यंत कायम होता.

३. औरंगझेब भयंकर क्रूर होता.सत्नामी , शियापंथी, बोहरी , जाट , शीख व मूर्तीभंजनाच्या आड येणारे हिंदू - यांच्या त्याने क्रूर कत्तली केल्या.जून १६८९ मधे विजापूरच्या तुरुंगातील युध्दकैदी म्हणून असलेल्या १०० मराठ्यांपैकी हिंदुराव , बहिर्जी वगैरे पळून गेले म्हणून राहिलेल्या ८० लोकांची त्याने मुंडकी उडवली.आणि हे सर्व केंव्हा , तर "शरण आलेल्या शेकडो मुसलमानांना मराठे खंडणी घेऊन सोडून देत होते" ही पहात असताना !

४. छत्रपती संभाजी सारख्या तख्तनशीन राजाचा अपमानीत अवस्थेत हाल करून वध केला.या प्रकरणात त्याने दाखविलेली हीन अभिरूची केवळ तैमूरलंगालाच शोभणारी होती !

५. औरंगझेबाचा एक वकील इराणचा शहा अब्बास यांजकडे मोठा नजराण घेऊन गेला असतां , शहाने त्याचा अपमान केला , त्याची दाढीही जाळली आणि औरंगझेबाला शिव्या दिल्या व त्याची कुचेष्टा करणारे एक पत्रही त्याच्याजवळ दिले ! औरंगझेबाच्या शियाविरोधी कारवायांमुळे हा प्रसंग उद्भवला.हे हकीकत त्या वकिलाने येवून १६६६ मधे औरंगझेबला सांगितली , परंतु औरंगझेबाची आत्मनिर्भरता एव्हढी भयंकर होती की त्याने त्या वकिलाबध्दल सहानुभूती तर दाखवली नाहीच उलट "तू तेथीच त्याचा खून का केला नाहीस?" असे म्हणून त्या वकिलास सर्पदंश करवून ठार मारले !

६. रमझानचे रोझे चालू असताना औरंगझेबने आग्रा किल्ल्याला वेढा घातला.नंतर खिज्री दरवाजाच्या बाजुनं यमुनेचं पाणी आंत जात असे ते अडवलं.शहाजहानने औरंगझेबला पत्रातून लिहिले,"माझ्या गाझी पुत्रा , झाडाचं पानही खुदाच्या इच्छेशिवाय हलत नाही.पिकल्या पानाला गळून पडण्यासाठी सुध्दा खुदाची इजाजत घ्यावी लागते.नशिबाचा हा क्रूर खेळ त्याच्या मर्जीनेच चालला आहे कांय?कालपर्यंत नऊ लाख सेवकांचा पोशिंदा असलेला हा बादशहा आज थेंबभर पाण्याला महाग झाला आहे.आम्ही ज्यांना काफेर म्हणतो , ते या देशातले हिंदू खरंच धन्य आहेत, जे मेलेल्या माणसाच्याही तोंडात पाणी घालतात आणि आमचा फर्जंद दो स्व्तःला सच्चा मुसलमान म्हणवतो, रमझानच्या महिम्यात पित्याला पाण्यापासून वंचित करतो !
कीर्तीशाली पुत्रा, या फसव्या जगाचा अहंकार धरू नकोस.बुध्दी आणि विचारांचा अहंकार बाळग.हे नाशवंत जग म्हणजे एका निनावी काळोख्या खंडाकडे जाणारा अरूंद मार्ग आहे.शाश्वत सूख आणि वैभव हवं असेल खुदावर ईमान ठेव, मनुष्यमात्रांवर दया दाखव."
पित्यानं कळकळीनं लिहिलेल्या पत्राचं उत्तर औरंगझेबाने एका वाक्यात दिलं : "हे सर्व तुमच्या कुकर्मांचं फळ आहे , तुमचं तुम्ही भोगा !"
यानंतर शरण आलेल्या शहाजहानला औरंगझेबाने कैदेत टाकले-८ जून १६५८.नंतर त्याचे खूप हाल केले व २२ जानेवारी १६६६ ल तो कैदेतच मरण पावला.

७. तत्पूर्वी औरंगझेबनं मुराद आणि शुजाला ठार केलं होतंच.दारा शुकोह व त्याचा १४ वर्षांचा मुलगा सिपिहर शुकोह यांना एका चिखलानं भरलेल्या छोट्या हत्तीणीच्या छत नसलेल्या हौद्यात बसवून रणरणत्या उन्हात दिल्लीतून धिंड काढली.खवासपुर्‍यातल्या जनतेला प्रचंड कणव होती.त्या रीत्री दिल्लीत फाका सुरू झाला, चुली पेटल्या नाहीत !
तुरुंगातून दारानं एक करून व हृदयस्पर्शी पत्र आपल्या दावेदार व शत्रु असलेल्या औरंगझेबला लिहिलं : "हमारे छोटे बिरादर और बादशहा आलम् गीर , राज्य मिळवण्याची इच्छा आता आम्हाला राहिलेली नाही.ही बादशाहत तुम्हांला आणि तुमच्या वारसांना मुबारक ठरो.तुम्ही आम्हाला ठार मारायचं ठरवलेलं आहे.पण हा विचार तुमच्या विचारी मनाला शोभणारा नाही.ही हत्या अनावश्यक आहे.एखादं मकान आणि एक नोकर तुम्ही दिलात तर यापुढचं आयुष्य आम्ही खुदाची याद करत घालवू.आमची निंदा करण्यासाठी तुम्ही आम्हांला काफीर करार दिलांत.आम्हाला त्याचा बिल्कुल राग येत नाही.तुम्ही म्हणतां ते खरंच आहे.या क्षणी आम्ही अशा अवस्थेत आहोत की, निंदा आणि स्तुतीत कसलाही भेद आम्हांस दिसत नाही.खुदा तुम्हाला सलामत ठेवो !"
यावर औरंगझेबाचण दाराला २ ओळींचं उत्तर गेलं : "यापूर्वीही तू हुकूम उदुली केली होतीस.त्याहीवेळी तू राजद्रोह्यांपैकी एक होतांस !"
यानंतर कुली बेग याने ऐरंगझेबच्या सांगण्यावरून दाराला "हलाल" करून ठार मारले.दाराचे कापलेले मुंडके औरंगझेबाकडे पाठविले.औरंगझेबाने , रक्ताने माखलेला तो चेहेरा नीट ओळखता यावा म्हणून ते मुंडके धुवून आणायला सांगितले.ते मुंडके दाराचेच आहे याची खात्री पटल्यावर दाराचे अर्धवट मिटलेले नेत्र गुलामांकडून त्याने पूर्ण उघडायला लावले.आपल्या तलवारीच्या टोकानं मस्तकाला स्पर्श करत तो उद्गारला, "अय् बदबख्त ! तुझे मारकर आज हम यकीनन् गाझी हो गए ! तू जिवंत होतास तेंव्हा तुझं तोंडही पहाण्याची अमची इच्छा नव्हती.आज तुझं तुटलेलं मस्तकही पहाण्याची आमची इच्छा नाही."
यावर तो थांबला नाही."मरणान्तराणी वैराणी" ही उक्ती माणसांसाठी असते ना ! त्याला दाराच्या धडाचीही विटंबना करायची होती.त्यासाठी त्याने दाराच्या धडाची धिंड काढायचे ठरवले.हत्तीच्या पाठीवर दारा शुकोहचं धड उलटं लटकावत ठेवलं.नक्कारे वाजवून कोतवालीचे शिपाई लोकांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेवू लागले.
हत्ती चालू लागला.
तुटलेल्या मानेतून काळपट रक्ताची धार रस्त्यावर सांडू लागली.उंच बांबूवर खोचलेलं दाराचं शीर नाचवत चेले पुढे निघाले.लोक ते दॄष्य बघून दु:खाने काळवंडले.अनेकांची वाचा बसली.दारा मेला याबध्दल लोकांची खात्री पटावी यासाठी ही धिंड काढण्यात आली.आदल्याच दिवशी म्हणजे बुधवारी जिवंतपणी आणि मेल्यावर गुरुवारी आपल्या सख्ख्या थोरल्या भावाची विटंबना करणारा औरंगझेब लोकांना सैतान वाटला.शहरभर फिरुन धिंड पुन्हा सकाळच्या दोन प्रहरी खवासपुर्‍यांत आली.दाराचं शीर आणि कबंध खवासपुर्‍यांत आणून जोडण्यात आलं.नंतर ते शहाजहानकडे पाठविण्यात आलं.पेटीत आवडत्या दाराचं प्रेत पाहिल्यावर शहाजहान बेशुध्दच पडला.जहाँ आरानं ते प्रेत पाहिल्यावर तिनेही मोठी किंकाळी फोडली.नंतर दाराचं शव हुमयूनच्या कबरीच्या आवारात पुरण्यात आलं !गुस्ल नाही , दुवा नाही, दोन आण्याचं कफनही प्रेताला लाभलं नाही !फातेहा न पढताच मुर्दा खड्ड्यात लोटण्यात आला व मातीनं बुझवण्यात आला.दाराचा मुलगा सुलेमान याला ग्वाल्हेरच्या तुरुंगात टाकून अफू मिसळलेलं पोस्ता हे पेय देऊन मे १६६२ मधे त्याचा वध करण्यात आला.
दाराच्या मृत्यूच्या आधी तो पकडला जाण्यापूर्वी , देशोधडीला लागलेल्या दाराच्या बायकोचा नादिरा बेगमचा बोलन खिंडीच्या आधी दाधरच्या अलिकडे दोन कोसांवर ६ जून १६५९ रोजी अंत झाला.मलीक जीवनच्या मदतीने शव लाहोरला पाठवलं गेलं.दाराच्या पश्चात् दाराची एक बेगम जुलेखा उदेपुरी जी जॉर्जीयन होती तिला औरंगझेबने आपल्या जनानखान्यांत ओढली.दाराची तिसरी पत्नी रानादिल ही लावण्यवती होती.ती आधी नर्तकी होती.दाराच्या मृत्यूनंतर विमनस्क अवस्थेत त्याच्या कबरीवर फातेहा पढणार्‍या रानादिलच्या सौंदर्यावर औरंगझेब भाळला.त्याने जुलेखाप्रमाणेच तिलाही निकाह लावण्याची लालूच दाखवली.पण रानादिल ही दाराशी एकनिष्ठ व पतिव्रता होती.तिने उलट निरोप पाठवला,"माझ्ह्यातलं तुला काय आवडलंय?"यावर औरंगझेबनं कळविलं,"मला तुझा सुंदर केशकलांप आवडलाय!"तेंव्हा तिने आपले सगळे केस कापून त्याच्याकडे पाठविले आणि कळविलं,"तुला हवं आहे ते घे !"एव्हढ्यानेही औरंगझेब शहाणा झाला नाही.त्याने तिला सविस्तर कळविलं की ,"मला तुझ्याशी निकाह लावायचांय्.तुला काही कमी पडणार नाही.मला दारा समजून तू माझी पत्नी हो !तुझ्या चेहेर्‍याचं सौंदर्य अपूर्व आहे , ते मला हवंय्.तू माझी हो !"
यावर त्या चारित्र्यसम्पन्न रानादिलने आप्ल्या महालात जाऊन सुरीनं सपासप आपल्या चेहेर्‍यावर जखमा करून घेतल्या.भळाभळा वाहणारं रक्त जमा करून औरंगझेबाकडे पाठवून तिने त्याला कळविलं , "तुला माझं सुंदर मुखकमल हवय, पण त्याची आता वाट लागलीय !"
एव्हढं झाल्यावर मूर्ख औरंगझेब शांत झाला !
पुढचं सारं आयुष्य दाराच्या आठवणींवर रानादिल संन्यासिनी प्रमाणे जगली !

८. आपला भाऊ दाराबाबत दाखविलेले हिडेस्स क्रौर्य त्याने परत छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबत व कवी कलश यांच्या बाबत पण दाखविले.आपली मुलगी झेबुन्निसा हिला पण त्याने तुरुंगात टाकून तिचे हाल हाल केले.त्याच्याकडून कैद व्हायचा त्याचा मुलगा अकबर एकटा वाचला पण त्यालाहे परागंदा व्हावे लागले व अखेर तो निर्वासित अवस्थेत इराणमधे मरण पावला !
झेबुन्निसा नावाप्रमाणेच "लावण्यलतिका" होती.ती फारच हुषार व चुणचुणीत होती.अल्पवयात सबंध कुराण पाठ करून तिने ३० हजार मोहोरा बापाकडून मिळवल्या होत्या.ती बापाची सर्वांत लाडकी होती पण 'अकबराच्या आपल्याविरुध्दच्या बंडात तिची सहानुभूती अहे' असे समजताच औरंगझेबने तिला कैदेत टाकले , काही वर्षांनी ती कैदेतच मरण पावली.

९. राजा जयसिंग याने दाराशी केलेल्या नमकहरामीमुळे औरंगझेबला बादशाही मिळाली.पण छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निसटून गेल्यावर त्याला जयसिंग मिर्झाचा संशय आला व त्याने त्यालाही कपटाने विषारी चिलखत वापरावयांस देवून ठार मारले !

१०. वर्षानुवर्षे मोगलांशी ईमान बाळगणार्‍या राजपुतांवर त्यने १६७९ पासून राज्य खालसा करण्यासाठी युध्द सुरु केले.

११. १६६९ मधे औरंगझेबने काशीचे विश्वेश्वराचे देऊळ व ज्याच्या बांधकामाला त्याचा मोठा भाऊ दारा याने मदत केली होती ते मथुरेचे केशव मंदिर त्याने पाडले.या देवळे पाडण्याच्या मोहिमेत ज्या हिंदूंनी विरोध केला, त्यांच्या सरसकट कत्तली केल्या.नंतर त्याने जेजूरीच्या खंडोबाचे व पंढरपूरच्या विठोबाचे देऊळ पण तोडले.

१२. आयुष्यभर त्याने हिंदूंना बाटवून मुसलमान बनविण्यावर भर दिला.मुसलमानांत सुध्दा शिया व सुन्नी असा भेदभाव केला.तुर्क / मोंगल मुसलमानांना तो हिंदुस्थानी मउसलमानांपेक्षा श्रेष्ठ समजत असे.सर्व हिंदूंवर त्याने "जिझिया" कर बसवला.

अशा प्रकारे वयाच्या ८९ वर्षांपर्यंत सतत कार्यमग्न रहाणार्‍या कुशाग्र बुध्दीच्या या धाडसी मोंगलाने आपल्या धर्मवेडाने , आत्मकेंद्रिततेने , दुष्टपणाने व क्रौर्याने मोंगल सम्राज्याचे व मोंगल घराण्याचे अपरिमित नुकसान केले आहे !

ओअण कारणे काहीही असोत् , मरणोत्तर त्याने मायमराठीच्या मनावर सत्ता गाजविणार्‍या "लोकसत्ता"मधे प्रथम पॄष्ठावर स्व्तःच्या कबरीच्या छायाचित्रासह झळकून छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांवर निस्सीम प्रेम आणि श्रध्दा बाळगणार्‍या तमाम मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून अढळपद मिळवलंय ! आजच्या २१ व्या शतकांतील ओसामा बिन् लदेन् व सद्दाम हुसैन यांसारख्या जुलूमशहांना व अतिरेक्यांना लाजविणार्‍या अशा या १७ व्या व १८ व्या शतकातील क्रूर , कपटी , नीच व कृतघ्न औरंगझेबाला "या फेब्रुवारीत मरून ३०० वर्षे पूर्ण होणार!" म्हणून मानाचे स्थान देणार्‍या नगरच्या श्री.भूषण देशमुख व लोकसत्ता यांचे कौतुक करायला गेले दोन आठवडे मी शब्द शोधतोंय , पण ते शब्द कुठेतरी रायगडच्या समाधीखाली आणि वढू बुद्रुकच्या समाधीखाली इतके रुतून बसलेत की ते काढताना माझ्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबतच नहियेत !

अरे लांगुल्चालनच करायचे असेल तुम्हाला तर , आमचे राष्ट्रपती व महान संशोधक ए.पी.जे.अब्दुल कलाम किंवा मदारी मेहेतर यांचे करा ना ! या अश्या प्रभृतींबाबत मनांत "धर्म" हा शब्दसुध्दा येत नसेल कुठल्याच हिंदुस्थानी माणसाच्या मनांत !
शेवटी इतकंच म्हणेन :

निंदकाचे घर असावे शेजारी
कपट्यांची मझार असावी "बाजारी"
तिथे जो फुले ठेवून लावेल हजेरी,
तोच गाजवील "लोकसत्ता", बाकी सर्व आजारी !

बा.भ.बोरकर म्हणाले होते,

दिव्यत्वाची जेथ प्रचिती ,
तेथे कर माझे जुळती !

आणि आजची ही परिस्थिती पाहून वाटते,

चबुतर्‍यांची जेथ प्रचिती
तेथे "मिंधे" कर जुळती !

कुठेतरी बा.भं,चा आत्मा तळतळला असेलच ना?

कुमार केतकर "मराठी" आहेत असे म्हणायची लाज वाटते आम्हास!

अशा या नरभक्षक , कपटी , कृतघ्न , धर्मांध आणि संशयाचा महामेरूमणी असलेल्या औरंगझेबचा मॄत्यु२० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगरला झाला.जसा १४ फेब्रुवारी हा व्हॅलेन्टाईन डे म्हणून साजरा करतात तसा, माझ्या मते २० फेब्रुवारी हा दिवस जगात नाहे तर किमान पक्षी हिंदुस्थानात तरी "माणुसकीचा नवा जन्मदिवस " म्हणून साजरा करायला हवा.याबाबत समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेल्या ओळी फारच समर्पक वाटतात :

बुडाला औरंग्या पापी
म्लेंच्छ सम्हार जाहला
मोडिली मांडिली क्षेत्रे
आनंदवनभुवनी !

------------------उदय गंगाधर सप्रे - ठाणे - २१-जानेवारी-२००७.-----------------------------

हे ठिकाण

प्रतिक्रिया

ध्रुव's picture

23 Apr 2008 - 3:51 pm | ध्रुव

अत्यंत सुरेख माहितीपुर्ण लेख.
असेच लेख लिहीत राहा.

- ध्रुव

भडकमकर मास्तर's picture

23 Apr 2008 - 5:00 pm | भडकमकर मास्तर

लेख खूप छान आहे.... तुमच्या अभ्यासाला सलाम....
मला वाटते, त्या काळात भावाभावांनी सत्ता काबीज करायसाठी लढायची पद्धत असावी... म्हणजे औरन्गजेबाने इतरांना मारले नसते तर त्याला कोणीतरी दुसर्‍या भावाने मारले असते आणि त्याचे प्रेत दिल्लीभर फिरले असते...असो... (हा आपला आमचा अन्दाज....त्याचे भाऊ कितपत प्रेमळ वगैरे होते ते ठाऊक नाही मला...)

मूळ लेखाची लिन्क शोधून काढली...ही घ्या लिन्क....
http://www.loksatta.com/daily/20070107/mp07.htm
.... हाही लेख माहितीपूर्ण वाटला....या लेखात मला तरी आक्षेपार्ह काही दिसले नाही...किंवा औरन्गजेबाचे वृथा कौतुक आहे असेही वाटले नाही.... ..

धमाल मुलगा's picture

23 Apr 2008 - 5:28 pm | धमाल मुलगा

छान ! आनंद वाटला...
'दै. लोकसत्ता' चे अभिनंदन. श्री.भूषण देशमुखांना शतशः आभार!
हे..हे असले 'भूषण' देशमुखीला आहेत म्हणूनच आमच्या माना खाली जातात. मात्र देशमुख तसे इमानदार हं सप्रेसाहेब, खाल्या मिठाला जागणारे! सगळ्या पिढ्या औरंग्याची थुंकी झेलून देशमुखी मिळवण्यात आणि मिळालेली टिकवण्यात कार्यरत राहिल्या असतील तर होणारे संस्कार ही असेच उच्चकोटीचे असतात..ही गोष्ट तुमच्यासारख्या ईतिहासाच्या अभ्यासकाला कळू नये?

त्यातून स्वराज्याच्या छाताडावर नाचण्यासाठी मराठी साम्राज्याविरुध्द भडवेगिरी करायची मराठी माणसाची खोड काही नविन नाही हो!

१२-जानेवारी-१६९८ रोजी जिद्दीचा जातिवंत ऊरस्फोड अर्थात् जिजाऊ सिंदखेड राजा येथे जन्माला आल्या !
त्यांची ४०९ वी जयंती असा लेख काही लोकसत्ता मधे वाचायला जास्त आवडले असते !

कोण ही बाई? कोणाबद्दल बोलताय?
अच्छा अच्छा..उस बेमुर्व्वत दख्खन के चुहे की माँ ! बरं मग? त्यांचा काय संबंध? त्या कुठे शाही घराण्यात जन्माला आल्या? त्या कुठे 'पातशाही'च्या म्हणजेच 'अल्लाहच्या मानवी रुपाच्या' मातोश्री होत?

वेडे आहात...आपण मरहट्ट्यांनी फक्त दिल्लीच्या दिशेला तोंड करुन गुढघे टेकून सज़दे करायचे असतात...

दर काही वर्षांनी आपल्या आई भवानीनं छिन्नी-हातोड्यांचे घाव सोसायचे असतात, जेजुरीच्या खंडेरायानं तोंड लपवून कडेपठारावर पळून जायचं असतं आणि आपल्यासारख्यांनी एकतर 'हे सगळं घडतंय, पण माझी तुंबडी भरतेय' म्हणून जल्लोष करायचा असतो किंवा हिजड्यासारखं हातात कांकणं भरून जोरजोरात छाती बडवत फिरायचं असतं !

मान मिळवायचा तर त्याला पातशाहीचे पाईक असणं मोठ्या गरजेचं असतं.
उगाच स्वराज्य, मराठी अस्मिता वगैरे दळभद्री कल्पना डोक्यात ठेऊन भिकेचे डोहाळेच फक्त लागू शकतात.

आजही महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळ्यावर कडक ऊन्हाच्या तिरिपी येत असतात, पण म्हराठी स्वराज्यावर पाशवी बलात्कार करणारा हरामजादा अफजल्या मात्र प्रतापगडावरच्या प्रशस्त आलिशान मशीदीतल्या कबरीत उदा-धूपाच्या दरवळात राजेशाही थाटात लोळत असतो....तिथे ह्या बातमीची ती काय मातब्बरी?

थू:! त्या मुघली अंमलात अजुनही तरंगणार्‍या हिणकसांच्या जिन्दगानीवर !
आज...गेल्या सत्तावीस वर्षांत आज पहिल्यांदा मला स्वतःच्या देशमुख असण्याची लाज वाटतीये.

-(हिंदवी स्वराज्यासाठी रक्त सांडणार्‍या, घरादारावर तुळशीपत्र ठेऊन औरंगजेबादि दुश्मनांशी लढणार्‍या खर्‍याखुर्‍या देशमुखांचा वारस) ध मा ल.

अजय's picture

23 Apr 2008 - 7:25 pm | अजय

औरंगजेबावर लिहिलेले छानच आहे. ज्या त्वेषाने लिहिले आहे. त्यातून तुम्हाला वाटणारी कळकळ दिसते. मुळ मुद्दा आहे, तो बातमीचा. औरंगजेबाच्या मृत्यूला 300 वर्षे पूर्ण होतात, यात बातमी आहे. म्हणून बातमी (लेख स्वरूपात) आहे.
केवळ अशी बातमी लिहीली, त्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण नसूनही बातमी लिहिणारा व्यक्ती नालायक आणि छापणारा पेपरही? यामागचं आपलं तर्कशास्त्र कळत नाही.
भडकमकरांनी त्या बातमीची लिंक दिली त्याबद्दल धन्यवाद. नेमके काय आहे. ते कळले तरी.
आता ज्याला तुम्ही तीन आठवड्यांचे संशोधन म्हणतात, त्याला काय आधार आहे ते तुमच्या अपार देशभक्तीने भारलेल्या लेखात कुठेही दिसत नाही.
निदान संदर्भाचा उल्लेख करावा. ऐतिहासिक कादंबऱ्यांचा नको. त्यातून माझ्या मनातल्या काही शंकाचे निरसन होईल.

1) औरंगाजेब क्रुर होताच. यात शंका नाही. तो हुशारही तितकाच होता. त्याला आपले राज्य कसे चालवावे आणि कशा पद्धतीने हे नक्कीच कळत होते. जरा या संशोधनातून हेही स्पष्ट करा, की ज्या सख्या भावाला आईवडिलांचे, सैनिकांचे संरक्षण आहे, त्याला ठार करून त्याच्या मृतदेहाची विटंबना करायला न चुकणारा औरंगजेब, हात आलेल्या शिवाजींना बराच काळ जिवंत ठेवतो कसा? कैदेतील काळात त्याला हे करणे सहज शक्‍य होते.
शिवाजी महाराजांना दिल्लीत नेताना मिर्झाराजे जयसिंग आणि त्यांचा मुलगा रामसिंग यांनी शब्द दिला होता. त्यांचा शब्द वाया गेला असता तर राजपूत दिल्ली सल्तनतीच्या विरोधात गेले असते. राजकारणातील डोकेदुखी वाढली असती, राजपुतान्यात आणि महाराष्ट्रात मोठा लोकक्षोभ उसळला असता म्हणून त्याने असे केले नाही, हे गृहीत धरले. तरीही औरंगजेबाचा स्वभाव पाहता त्याने एवढा वेळकाढू पणा का केला. (तेव्हा तो तसे करू शकला नाही, म्हणूनच तर आज आपण हे दिवस पाहतो आहोत, हे खरेच!)

2) तो फक्त इस्लामचा पाईक होता, दख्खनेतील मराठे त्याचे तीव्र शत्रू होते. हे मान्य केले तर तो आदीलशाही, कुतुबशाही, निजामशाहीच्या मागे का लागला होता? (फक्त इस्लामप्रेमासाठीच की राज्यविस्तारासाठी?)

3) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्याने राजा म्हणून आपल्या कट्टर शत्रूला मान्यता का दिली?
या तीनही प्रश्‍नांची वस्तुनिष्ठ उत्तरे मिळतील.
पुन्हा आपण बातमी का दिली किंवा लेख का छापला त्याकडे वळू या. भूषण देशमुखांनी जो काही मजकूर लिहिला, त्यात ""जगातील एका मोठ्या साम्राज्याचा प्रमुख असलेल्या बादशाहची नगरच्या भूमीत अशी अखेर झाली'' (संदर्भ- लोकसत्ता लिंक. शेवटची ओळ) हे वगळता औरंगाजेबाचे उदात्तीकरण होईल, असे काहीही लिहीलेले नाही. तरीही तुम्ही जोरदार संशोधन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र तुमच्या संशोधनपर मजकूरात -
"अशा प्रकारे वयाच्या ८९ वर्षांपर्यंत सतत कार्यमग्न रहाणार्‍या कुशाग्र बुध्दीच्या या धाडसी मोंगलाने आपल्या धर्मवेडाने , आत्मकेंद्रिततेने , दुष्टपणाने व क्रौर्याने मोंगल सम्राज्याचे व मोंगल घराण्याचे अपरिमित नुकसान केले आहे !"

ही वाक्‍ये आहेत. तो निष्कर्ष अभ्यासपूर्ण संशोधनाअंतीच आहे?
उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या "धमाल मुलगा' यांच्या आकलनक्षमतेला तुमची वरील वाक्‍ये कितपत पचनी पडतील ही शंकाच आहे.

माझी ही प्रतिक्रीया तुम्हाला डिवचण्यासाठी नक्कीच नाही, हे तुम्ही समजून घ्याल. कारण, एवढे मोठे साम्राज्य, विश्‍वासघाताची घरण्यात रुजलेली परंपरा त्याच पद्धतीने मोडीत काढून, समर्थपणे सांभाळणारा. दिल्लीचा कारभार दक्षिणेत येऊनही तेवढ्याच तडफेने प्रशासन व युद्धमोहीम सांभाळणारा औरंगजेब (शिवरायांच्या विरोधात असला तरीही) काही अंशी तरी महान असेलच ना. त्यातूनच तुम्ही "ती' वाक्‍ये लिहिली असावीत.

उदय सप्रे's picture

23 Apr 2008 - 9:40 pm | उदय सप्रे

अजय साहेब,

लेख पुन्हा एकदा वाचा ! औरंगझेबावर लिहिले म्हणून लिहिणारा नालायक किंवा पेपरही असे मी कुठेही म्हटलेले नाही.हे तुमचे विधान आहे.
माझे म्हणनी इतकेच की फक्त अल्पसंख्यांकांचेच लेख का छापता? जानेवारीतच शहाजी महाराजा>चा अंत झाला, त्याविषयी काही लिहिलेत का?जिजाऊ मॉसाहेबांच्या जन्माबध्दल काही लिहिलेत का?

आता तुमच्या दुसर्‍या मुद्द्याकडे वळूया : संदर्भ : हे काही ऐतिहासिक पुस्तक किंवा कादंबरी नव्हे की जिथे सगळे संदर्भ देणे शक्य होईल.तरी तुम्हाला सांगतो : काका विधाते यांचे दर्यादिल पासून ते पवार यांचे "संभाजी-एक विवाद्य व्यक्तिमत्व पर्यंत सगळी ऐतिहासिक पुस्तकी यात येतात्.किती नावे लिहू?

तुमच्या ३ प्रश्नांची उत्तरे:

१.औरंगजेबाचा स्वभाव पाहता त्याने एवढा वेळकाढू पणा का केला. (तेव्हा तो तसे करू शकला नाही, म्हणूनच तर आज आपण हे दिवस पाहतो आहोत, हे खरेच!) : औरंगझेब उतावळा नव्हता , महाराजांना पण एका कोठीत दुसर्‍या दिवशी नेऊन ठार करायचाच त्याचा बेत होता, पण महाराज त्याच्यापेक्षा हुशार निघाले आणि म्हणून आपण आज हे दिवस पहातो आहे ! औरंगझेबच्या वेळकाढू धोरणाने नव्हे ! रा़जपुतांच्या उठावाला घाबरून नव्हे तर महाराष्ट्रात असलेल्या जयसिंग आणि मुघल सैन्याचे डावपेच , विजापूर जिंकण्याचे केलेले डावपेच फुकट जातील म्हणून तो दमाने घेत होता.तसेच जयसिंगाने महाराजांना काय काय वचने दिली आहेत याची खातरजमा करत होता !

2) तो फक्त इस्लामचा पाईक होता, दख्खनेतील मराठे त्याचे तीव्र शत्रू होते. हे मान्य केले तर तो आदीलशाही, कुतुबशाही, निजामशाहीच्या मागे का लागला होता? (फक्त इस्लामप्रेमासाठीच की राज्यविस्तारासाठी?)
अर्थातच राज्यविस्तार प्रथम पण त्यातही अखिल हिंदुस्थानात इस्लाम बघण्याचे स्वप्न बघणारा तो एक वेडा पीर होता हे जगजाहीर आहे !

3) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्याने राजा म्हणून आपल्या कट्टर शत्रूला मान्यता का दिली?
तुम्ही इतिहासात हे कुठे वाचलेत ते मला माहित नाही की त्याने मान्यता दिली.उलट शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हा त्याने
आकांड्तांडव केले होते हा इतिहास आहे ! राजा म्हणुन त्याने फक्त एकदाच महाराजांना वस्त्र पाठविली पण ती ही राजकारणी बनूनच ! तो काही कुणी संत नव्हता !

औरंगझेब महान नक्कीच नव्हता ! एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो ! नाहीतर एव्हढे ऐश्वर्य असूनही, त्याच्या पदरी शूर लोक असूनही त्याला व्यवस्थित राज्य शकट हाकता आला नाही हे सत्य आहे ! उत्तरेमधे मुघलांचे मिंधे असलेले राजपुत यांना संभाजी महाराजांनी खूप जागविण्याचा प्रयत्न करेस्तोवर कुणीही विरोधक त्याला नव्हता , यातही त्याचे ५० वर्षे राज्य टिकण्याचे गुपीत आहे ! दक्षिणेत नंतर आदिलशाही आणि कुतुबशाही विलासात मग्न होती. जी शांतता अकबराने त्याच्या काळात आणली, ती या मूर्खाला आणता आली नाही हे सत्य आहे ! अन्यथा अकबराच्या दसपट त्याला यश निश्चित मिळाले असतेच आणि तो जर राज्यावर न येता दारा शोकोह आला असता , तर महाराजांनी मुघलांची खोड कधीच काढली नसती ! "राज्य" वाढविणे ते पण दिखाव्यासाठी हा महाराजांचा कधीच हेतू नव्हता.आंधळ्या धर्मप्रेमाने या औरंगझेबाने जर का सामान्य रयतेला गांजले नसते (यात लेखात लिहिल्याप्रमाणे हिंदुस्थानातील मुसलमान पण आले !) तर महाराज त्याच्या वाटे कधीही गेले नसते.महराश्ट्राबाहेर फार तर दक्षिणेत कर्नाटकात आणि भागानगरात (आजचे आंध्र) त्यांने विस्तार केला असता !

उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या "धमाल मुलगा' यांच्या आकलनक्षमतेला तुमची वरील वाक्‍ये कितपत पचनी पडतील ही शंकाच आहे.हे मलाही माहित नाही , पण या अशा उत्स्फुर्ततेतूनच काहितरी घडवणारे लोक जन्माला येत असतात हा इतिहास आहे.त्यांनी माझ्या लेखाला चंगले म्हटले आहे म्हणून असे लिहिण्यएव्हढा मी लहान नाही हे तुमच्याही लक्षात आले असेलच.
तुमची ही प्रतिक्रीया मला डिवचण्यासाठी नक्कीच नाही , पण बुध्दीजीवी म्हणवणार्‍या तुमच्या सारख्या काही लोकांमुळेच तर मणीशंकर अय्यर सारखे मंत्री सावरकरांची प्रतिमा डागाळतात.तुम्ही लोकसत्ता चा वृथा उदो उदो करताय ! मी ही त्यांना वाईट म्हटलेले नाही , फक्त आपल्या माणसांचे का कौतुक त्यांना नसावे हामाझा प्रामाणइक प्रश्न आहे.
मी लेखात लिहिलेच आहे योग्य माणसांचे कौतुक करावे , औरंगझेबासारख्या नालायक माणसाचे आपण कौतुक करतो आणि म्हणूनच तर दिल्लीत त्याच्या नावे रस्ते आहेत ना?
असो, मी ही कुठल्याही आकसाने लिहिले नाहिये हे तुम्हालाहे कळले आहे यात सर्व आले, पण
आपलं तर्कशास्त्र कळत नाही.
भडकमकरांनी त्या बातमीची लिंक दिली त्याबद्दल धन्यवाद. नेमके काय आहे. ते कळले तरी.
आता ज्याला तुम्ही तीन आठवड्यांचे संशोधन म्हणतात, त्याला काय आधार आहे ते तुमच्या अपार देशभक्तीने भारलेल्या लेखात कुठेही दिसत नाही.

ही तुमची वा़क्ये इतकी उपहासात्मक वाट्तात , आणि हे काम बुध्दीजीवी लोक फारच छान करतात , आपण काही लिहायचे व करायचे नाही आणि इतर कुणी लिहिले की त्याला उपहासात्मक बोलून बेजार करायचे.लेख पुन्हा एकदा शांत चित्ताने वाचा अशी विनंती आहे माझी तुम्हाला !
जमल्यास माझ्या पुढील २ ब्लॉग्ज ला भेट देवून बघा , त्यात बर्‍याच कविता आणि लेख आहेत.

उदय सप्रे

कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com/

आणि

कवितांजली :

मदनबाण's picture

24 Apr 2008 - 1:42 pm | मदनबाण

माझे म्हणनी इतकेच की फक्त अल्पसंख्यांकांचेच लेख का छापता?
एकदम बरोबर .....
(अवांतर :--पण खरच हे लोक अल्पसंख्यांक आहेत का ?)

औरंगझेब महान नक्कीच नव्हता ! एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो !

एकदम मान्य.....

उत्स्फुर्ततेतूनच काहितरी घडवणारे लोक जन्माला येत असतात हा इतिहास आहे.
व्वा,,,,, मनातल बोललात बघा.

पण बुध्दीजीवी म्हणवणार्‍या तुमच्या सारख्या काही लोकांमुळेच तर मणीशंकर अय्यर सारखे मंत्री सावरकरांची प्रतिमा डागाळतात.
या अय्यर च्या xxxxx,,,,, मायला हे हे असे आमचे नेते?????,,,,,कुठे जातात अशा वेळी हिंदूत्ववादी लोक?????
ह्या अशा राजकारणी लोकांपेक्शा हिजडे बरे हो !!!!! ते निदान फक्त ठरलेल्या दिवशीच पैसे गोळा करतात !!!!!
कोलू पिसुन दाखवा एक दिवस तरी..... मग कळेल अंदमान म्हणजे काय!!!!!

(कट्टर संभाजी व सावरकर प्रेमी )

डॉ.प्रसाद दाढे's picture

23 Apr 2008 - 7:39 pm | डॉ.प्रसाद दाढे

दिल्लीत तर और॑गझेबाच्या नावाने एक रस्तासुद्धा आहे..आणि महाराष्ट्रातही त्याच्या नावाने शहर आहेच ज्याला 'स॑भाजीनगर' कोणीही म्हणायला तयार नाही (कारण ते शिवसेनेने दिले आहे..)
सप्रेसाहेब हे तुमचे अरण्यरूदन आहे हो.. अरसिकेषू कवित्व निवेदन॑ शिरसि मा लिख मा लिख मा लिख..
उदय सप्रे या॑नी अतिशय परिश्रमपूर्वक लेख लिहिला आहे..त्या॑च्या मेहेनतीला आमचा मुजरा..
अवा॑तर: उत्सूक वाचका॑नी रवि गोडबोलेकृत 'और॑गझेबः शक्यता व शोका॑तिका' (रा.ज.देशमुख प्रकाशन) हे उत्कृष्ट पुस्तक वाचावे. गोडबोले या॑नी ते पुस्तक (प्रयत्नपूर्वक) तटस्थ दृष्टिकोनातून व कुठल्याही अभिनिवेशाशिवाय लिहिले आहे (त्यामुळे हि॑दूत्ववाद्या॑च्या विरोधका॑नीही ते वाचायला हरकत नाही

एक's picture

23 Apr 2008 - 11:25 pm | एक

"..सप्रेसाहेब हे तुमचे अरण्यरूदन आहे हो.. अरसिकेषू कवित्व निवेदन॑ शिरसि मा लिख मा लिख मा लिख.."

अत्यंत खरं आहे..असा लेख पुन्हा कधीही कुठल्याही मराठी संस्थळांवर लिहू नका ही नम्र विनंती आहे..
इथले बरेचसे स्वघोषित इतिहास संशोधक, बुद्धीजीवी, कातडी सोलायला येतील. ही लोकं भावना बघणार नाहीत पण निट्-पिकर सारखे तुमचेच दोष दाखवायला सुरूवात करतील.

उदय तुमचा लेख आवडला.धमाल मुलाचा प्रतिसाद पण आवडला.

परीचा परा's picture

23 Apr 2008 - 9:03 pm | परीचा परा

डॉक्टरसाहेब

एकदम सोळा आणे खरे बोललात.

"सप्रेसाहेब हे तुमचे अरण्यरूदन आहे हो.."

अहो कसल्या त्या औरंग्यावर लेख लिहिता? मराठी मातीचे हे दुर्दैवच आहे की आपल्या निष्ठा ह्या मराठी मातीपेक्षा दुसर्‍यांच्याच चरणी जास्त वाहिल्या जातात
एकीकडे प्राण गेला तरी तत्त्वासाठी कोणतीही तडजोड न करणारी छत्रपती संभाजीराजांसारखे छावे ह्याच भूमीत जन्माला येतात. आणि त्याच मातीत खंडोजी खोपडे सारखे गद्दारही पैदा होतात.आर्थात शिवाजी महाराजांनी मात्र खंडोजी खोपड्याचा १ हात आणि १ पाय कलम करुन त्याला अद्दल घडवली.
पण आज महाराजांचा वारसा कोण चालवणार?

इथे आपलाच मराठी बांधव एकमेकांचे पाय ओढतोय आणि आपल्याच मायभूमीत परप्रांतीय लोक दमबाजी करुन करोडपती होत आहेत
आज एक तरी मराठी माणूस मोठा बिल्डर आहे काय? सगळे सिंधी, मारवाडी आणि उत्तरेतलेच लोक आहेत ना?

त्या 'राज' ने त्या उत्तरभारतीयांना चोप देऊन लई भारी काम केले. परत मराठी माणसाच्या वाटेला जायची हिम्मत कोणी करणार नाही शिपुर्डे...

'उदय सप्रे' लगे रहो.. तुमच्याबरोबर मोठी मावळ्यांची फौज आहे .... चिंता नको.... महाराजांनी निर्माण केलेल्या मराठी साम्राज्याची चाके एवढी तकलादू नाहियेत.आजदेखील महाराजांनी पेटवलेले मराठी स्फुल्लिंग असंख्य मराठी मनांमधून धगधगत आहे.

आणि अजय साहेब.... माफ करा पण म.टा.चा जो लेख मी वाचला त्याच्या लेखक महाशयांनीदेखील त्यांच्या लेखात कसलेही पुरावे दिलेले नाहीयेत
एक कुराणाची प्रत आजही उपलब्ध आहे त्याव्यतिरिक्त.

तेव्हा उदय सप्रेंसारख्या कडव्या शिवभक्ताला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला तर ती छत्रपतींच्या पायाची एक छोटीसी सेवा होईल असे आम्हास वाटते.

बाकी महाराजांच्या अनेक पत्रांत महाराजांनी लिहिले आहे की सुज्ञांस अजून काय सांगणे....
तेव्हा आम्ही थांबावे हे बरे

जय भवानी जय शिवाजी.....

{परीच्या प्रतिक्षेत} परा ....

शितल's picture

24 Apr 2008 - 1:22 am | शितल

तुमच्या अभ्यास पुर्वक लेख वाचुन मन एकदम सुन्न झाले. तुम्ही असेच लिहा आम्हाला वाचायला आवडेल.

भडकमकर मास्तर's picture

24 Apr 2008 - 1:42 am | भडकमकर मास्तर

लोकसत्ता , सामना , सनातन प्रभात या तीनही वृत्तपत्रांना पाठवला होता , परंतु लेख छापणे सोडाच - त्याची साधी "पोच" सुध्दा कुणी मला आजतागायत दिलेली नाही !

सनातन प्रभात हे इतरांप्रमाणेच ( सामना / लोकसत्ता )वृत्तपत्र आहे का ? ...

उदय सप्रे's picture

24 Apr 2008 - 8:56 am | उदय सप्रे

होय , ते एक हिंदुत्ववादी , संकारवादी वॄत्तपत्र आहे.

पान्डू हवालदार's picture

24 Apr 2008 - 2:01 am | पान्डू हवालदार

उदय साहेब
लेख अवड्ला पण पटला नाही. मुळ लोकसत्ता लेखात फक्त ईतिहास सन्गितला आहे , औरंगझेबा ची तरिफ केलेलि नाही.

उदय सप्रे's picture

24 Apr 2008 - 8:54 am | उदय सप्रे

पान्डू हवालदार साहेब,

मुळात "अशा या नराधमाची बातमी पहिल्या पानावर येते आणि आपल्या जिजाऊंच्या जन्मतारखेवर किंवा शहाजी महाराजांच्या त्याच (जानेवारी) महिन्यातील निर्वाणावरून त्यांना मानाचा मुजरा देणारा लेख हेच वॄत्तपत्र पहिल्या पानावर देऊ शकत नाही " यापेक्षा वेगळी तारीफ आणि कोणती असेल?

देशाच्या सीमेवर आपले प्राण खर्ची घालून आपल्यासारख्या तमाम सिव्हिलियन्सना शांतपणे झोपता यावं यासाठी झटणार्‍या सैनिकांऐवजी पहिल्या पानावर सलमान खान आणि संजय दत्त यांच्यावरील कारवाया या बातम्या येतात , त्यात त्यांचं अवास्तव महत्व वाढतं असं आपलं माझ्या अल्पबुध्दीला वाटलं !

वास्तवाचं भान न ठेवून आपण पेपर वाचतो आणि त्यामुळेच असले पोटार्थी पेपर्स खपतात हे एक विदारक सत्य स्वीकारलंय आम्ही साहेब ! मी प्रामाणिकपणे लिहिलंय , सगळ्यांनाच माझी मते पटावीत असा आग्रह धरणारा मी कोण?

पुढील दोन वर्षे पुरतील असे लेख माझ्या पोतडीत आहेत , पण सत्य ऐकायचे असेल तर ऐका, म.टा. वाले म्हणाले की "ऐतिहासिक" विषय आमच्याकडे कॉलम नसतो , ते आमचे धोरण (स्ट्रॅटेजी!) नाही. आता बोला राव !

असो, राग नाही , आपण सगळे स्वतःला बुध्दीजीवी म्हणवतो आणि आपल्या तख्तनशीन राजाला कुत्र्याची मौत मारणार्‍या नालायक माणसाचा लेख पहिल्या पानावर पाहून पेटून उठत नाही , हीच जर का शिक्षणाची देणगी असेल तर मी स्वतःला अशिक्षित म्हणवून घेणंच जास्त पसंद करीन ! आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे ! नाही तर आजचा "अफजल" जीवंत नसता ! आणि कलाम साहेबांसारख्या महान संशोधकाला राष्ट्रपती पदावरून खाली यावं लागलं नसतं ! आपण फक्त आपली खळगी कशी भरेल हे पहातो हे दुर्दैव आहे ! योग्य माणसांचे कौतुक करा - आम्ही औरंगझेबासारखे धर्मांध नाही ! पण नीचांचे कौतुक कराल तर मी असे वारंवार लिहिणारच !

राग नसावा साहेब , काहीही झाले तरी तुम्ही एक "भारतीय" आहात आणि म्हणून माझे बांधव आहात हे मी कधीही विसरणार नाही , मग तुम्ही हइंदू असा वा ज्यू !

उदय सप्रे

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2008 - 10:49 am | प्रभाकर पेठकर

श्री. उदय सप्रे,

आपण सगळे स्वतःला बुध्दीजीवी म्हणवतो आणि आपल्या तख्तनशीन राजाला कुत्र्याची मौत मारणार्‍या नालायक माणसाचा लेख पहिल्या पानावर पाहून पेटून उठत नाही

बुद्धीजीवींनी पेटून उठावे म्हणजे काय करावे? समाजातल्या किती अनिष्ट गोष्टींनी पेटून उठावे? तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोणीच तुमचे लेख छापत नाहीत म्हणून सर्व बुद्धीजीवींनी सर्व मराठी वृत्तपत्रांवर बहिष्कार घालावा का? तुम्ही तरी घातला आहे का? वृत्तपत्रावर, वाहिन्यांवर, रेडीओवर बहिष्कार घाला, शक्य आहे का ते?

हीच जर का शिक्षणाची देणगी असेल तर मी स्वतःला अशिक्षित म्हणवून घेणंच जास्त पसंद करीन!
शिक्षण काय फक्त अस्मितेचीच देणगी देते? तुम्हाला जे इतिहास प्रेम मिळाले आहे ते शिक्षणातूनच मिळाले आहे नं? जे नोकरी-धंद्यासाठी आवश्यक असे ज्ञान आहे ते शिक्षणानेच दिले आहे नं? ज्या ज्ञानाच्या जोरावर आज तुम्ही आम्ही पैसे कमवून टॅक्स भरतो आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावतो ती शिक्षणाचीच देणगी असते नं?

आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे !

बरे झाले हे वास्तव आपण सुवाच्य भाषेत आमच्या लक्षात आणून दिलेत. उद्याच बाजारात कुठे एखादी तलवार मिळते का ते पाहतो आणि कापूनच काढतो त्या वृत्तपत्रवाल्यांना ज्यांनी तुमचे लेख छापले नाहीत.

नाही तर आजचा "अफजल" जीवंत नसता ! आणि कलाम साहेबांसारख्या महान संशोधकाला राष्ट्रपती पदावरून खाली यावं लागलं नसतं
आजच्या 'अफजल्'च्या जिवंत असण्याला आणि कलाम साहेबांच्या राष्ट्रपती पदाच्या खुर्चीवरून पायउतार होण्याला मराठी GXXX फाटूपणा कारणीभूत आहे असा जावईशोध आपण कसा लावलात?

पण फक्त आपली खळगी कशी भरेल हे पहातो हे दुर्दैव आहे
हे जहाल वास्तव आहे. ही समाजाची असहाय्यता आहे. स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारण्यांनी समजाला निष्प्रभ करून टाकले आहे. महागाईने पिचलेला समाज तुटपुंज्या कमाईत घर कसे चालवावे, आरक्षणाच्या राजकारणात स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशे कुठुन उभे करावे? राहायला निवारा कसा मिळवावा? ह्या विवंचनेत आहे. त्याला उच्च विचार पटतात पण झेपत नाहीत. मनाने तो तुमच्या सोबत येऊ शकतो पण कृतीत साथ देऊ शकत नही. त्याला त्याच्या वरील सर्व विवंचनांतून आधी सोडवा तो तुम्हाला कृतीतही साथ देईल. बुद्धीजीवींना झोडपल्यामुळे आपण विचारवंत ठरत नाही.

योग्य माणसांचे कौतुक करा - आम्ही औरंगझेबासारखे धर्मांध नाही!
हल्ली धर्मांधपणा फक्त मुसलमानांमध्येच राहिलेला नाही ख्रिश्चन समाजातही आहे आणि दुर्दैवाने राजकारण्यांनी तो हिंदूंमध्येही पसरवला आहे.

पण नीचांचे कौतुक कराल तर मी असे वारंवार लिहिणारच !
लिहीत राहा. आम्ही वाचत राहू. पण एकटा औरंगझेब नीच होता अशा भावनेत लिहू नका. आपल्या सामजात बलात्कार करणारे आहेत. खून करणारे आहेत, खेडोपाडी वीज पोहोचली नसताना मुलाच्या लग्नात आठवडा आठवडा भपकेबाज रोषणाई करणारे मुख्यमंत्री आहेत, अन्नधान्याची साठेबाजी करणारे आहेत, संरक्षण खात्यात भ्रष्टाचार करणारे आहेत, नकली डॉक्टर्स आहेत, नकली औषधे बनविणारे आहेत, नकली दूध बनविणारे आहेत, सलमान खान सारखे मद्यधुंद अवस्थेत पदपथावरील माणसांना मारून पैशाच्या जोरावर सुटनारे आहेत, बॉम्बस्फोट घडविणारे आहेत, कच्चे बांधकाम करून लोकांच्या जीवाशी खेळणारे बिल्डर्स आहेत, राजकारण्यांबद्दल तर लिहायलाच नको.
हे सर्व नीच आहेत हे विसरू नका.

उदय सप्रे's picture

24 Apr 2008 - 11:02 am | उदय सप्रे

पेठकर साहेब ,

एकूणच आपण लिहिलेल्या सगळ्या प्रतिसादामधे तुम्ही मला माझी "जागा" दाखविण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केलेला आहे.

मी काय काय जावई शोध लावले यापेक्षा ही जास्त , "तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोणीच तुमचे लेख छापत नाहीत म्हणून सर्व बुद्धीजीवींनी सर्व मराठी वृत्तपत्रांवर बहिष्कार घालावा का?" हा तुमचा "सासरेबुवा" शोध फारच मनोरंजक आणि अगदीच बाळबोध वाटतो आहे !

असो, माझ्याच तोंडून ऐकायचे हौस असेल तर ऐका , मी अगदे स्वच्छ मनाने कबूल करतो की आपण माझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीत महान आहात ! आपण जिथे आहात तिथे रहा आणि मला पण माझ्या लहान पणातच राहु द्या ही विनंती !

बाकी तुमची पुधील विधाने पण फारच करमणूक करून गेली :

बुद्धीजीवींनी पेटून उठावे म्हणजे काय करावे?
असे लिहिणार्‍याच्या विरोधात लिहीत सुटावे !

शिक्षण काय फक्त अस्मितेचीच देणगी देते? तुम्हाला जे इतिहास प्रेम मिळाले आहे ते शिक्षणातूनच मिळाले आहे नं? जे नोकरी-धंद्यासाठी आवश्यक असे ज्ञान आहे ते शिक्षणानेच दिले आहे नं? ज्या ज्ञानाच्या जोरावर आज तुम्ही आम्ही पैसे कमवून टॅक्स भरतो आणि देशाच्या प्रगतीत हातभार लावतो ती शिक्षणाचीच देणगी असते नं?

नकीच नाही , आपण त्यातून काय ते घ्यायचे असते , शिक्षण काहीच देत नाहे - जर का घेणारा डोळे मिटून बसला तर ! आणि मला वाटते जागे असून झोपेचे सोंग घेणार्‍या काही लोकांना कसे जागे करणार हो?

हे जहाल वास्तव आहे. ही समाजाची असहाय्यता आहे. स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारण्यांनी समजाला नष्प्रभ करून टाकले आहे. महागाईने पिचलेला समाज तुटपुंज्या कमाईत घर कसे चालवावे, आरक्षणाच्या राजकारणात स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशे कुठुन उभे करावे? राहायला निवारा कसा मिळवावा? ह्या विवंचनेत आजचा सर्वसामान्य समाज आहे. त्याला उच्च विचार पटतात पण झेपत नाहीत. मनाने तो तुमच्या सोबत येऊ शकतो पण कृतीत साथ देऊ शकत नही. त्याला त्याच्या वरील सर्व विवंचनांतून आधी सोडवा तो तुम्हाला कृतीतही साथ देईल. बुद्धीजीवींना झोडपल्यामुळे आपण विचारवंत ठरत नाही.

मग काय अशा लेखांवरती प्रतिक्रिया देऊन तो विचारवंत ठरतो का? आपण तर फारच थोर विचारवंत आहात !

लिहीत राहा. आम्ही वाचत राहू. पण एकटा औरंगझेब नीच होता अशा भावनेत लिहू नका.

साहेब, एकटा औरंबझेब नीच होता अशा भावनेतून ते लिहिलेलेच नाहिये, असे इतर कुणीही त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटलेले नाही ! लेख पुन्हा एकदा वाचा - त्याची सुरुवातच मुळी औरंगझेबाच्या सद्गुणांपासून केली नाहिये का? पण मुद्दा असा आहे की - त्याचे कौतुक तुम्हाला दिसले नाही पण नीच्पणा दाखवून दिला तो मात्र इतका झोंबला की तुम्ही अगदी रस्त्यावर मारामारी करणार्‍या मुलांप्रमाणे आमच्यावर चिखलफेक केलीत !

असो , तुमच्यासारर्खे विचारवंत आणि कुणी न भेटोत ही ईश्वर चरणी प्रार्थना !

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2008 - 12:45 pm | प्रभाकर पेठकर

आपण सगळे स्वतःला बुध्दीजीवी म्हणवतो आणि आपल्या तख्तनशीन राजाला कुत्र्याची मौत मारणार्‍या नालायक माणसाचा लेख पहिल्या पानावर पाहून पेटून उठत नाही

ह्या वाक्याने तथाकथित सर्व बुद्धीजीवींना हिणवले आहे. एवढे करून बुद्धीजीवींनी पेटून उठावे म्हणजे काय करावे? ह्या माझ्या प्रश्नाला बगल दिली आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोणीच तुमचे लेख छापत नाहीत म्हणून सर्व बुद्धीजीवींनी सर्व मराठी वृत्तपत्रांवर बहिष्कार घालावा का? हा माझा वास्तवाला धरून विचारलेला प्रश्न तुम्हाला खटकलेला दिसतो आहे. त्याच प्रमाणे आपण सर्व बुद्धीजीवी पेटून उठत नाही ह्या तुमच्या विधानात तुम्ही तुमच्या प्रमाणे मलाही गोवलेत हे मलाही खटकले. पेटून उठणे म्हणजे काय? तुम्ही नक्की काय करता? ह्यावर दोन शब्द लिहिले असतेत तर ते समर्पक उत्तर झाले असते.

मी काय काय जावई शोध लावले यापेक्षा ही जास्त , "तुमच्या म्हणण्याप्रमाणे कोणीच तुमचे लेख छापत नाहीत म्हणून सर्व बुद्धीजीवींनी सर्व मराठी वृत्तपत्रांवर बहिष्कार घालावा का?" हा तुमचा "सासरेबुवा" शोध फारच मनोरंजक आणि अगदीच बाळबोध वाटतो आहे !

मनोरंजक वाटला असेल तर माझा काहीच आक्षेप नाही पण बाळबोध म्हणणे म्हणजे आपला चडफडट नक्की कशाने झाला आहे ह्याचे त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून परिक्षण न करणे आहे. असे परिक्षण करायला मनाची ताकद लागते.

असो, माझ्याच तोंडून ऐकायचे हौस असेल तर ऐका , मी अगदे स्वच्छ मनाने कबूल करतो की आपण माझ्यापेक्षा सगळ्याच बाबतीत महान आहात ! आपण जिथे आहात तिथे रहा आणि मला पण माझ्या लहान पणातच राहु द्या ही विनंती !

राग-राग, चीडचिड करणे सगळ्यात सोप्पे. मुद्देसूद प्रतिवाद करणे कठीण असते.
पुन्ह औरंगझेब विषयाकडे वळून एकच सांगू इच्छितो की शत्रूच्या गुणांचेही मोठ्या मनाने कौतुक करावे. औरंगझेब क्रूर जरूर होता पण तुम्ही म्हणता तसा मूर्ख अजिबात नव्हता. असो. तुम्हाला तुमच्या मतांचा अधिकार आहे पण तसाच मलाही माझ्या मतांचा अधिकार आहे हे लक्षात असू द्या. उगीच सरसकट सर्व बुद्घीवाद्यांना झोडपायचा उद्योग करू नका.

बाकी तुमची पुधील विधाने पण फारच करमणूक करून गेली :

तुम्ही स्वतःची करमणूक कशी करून घ्यावी हे मी कोण सांगणार. आपण आपल्या विचारांचे स्वामी आहात.

बुद्धीजीवींनी पेटून उठावे म्हणजे काय करावे?
असे लिहिणार्‍याच्या विरोधात लिहीत सुटावे !

विरोधात लिहिलेले नाही. फक्त 'मूर्ख' ह्या शब्दावर माझा अक्षेप होता आणि आहे. औरंगझेब एक सद्गुणी राजा होता असे विधान मी केले असते तर ते तुमच्या लिखाणाच्या विरोधात लिहिल्यासारखे झाले असते.

शिक्षण काय फक्त अस्मितेचीच देणगी देते?
नकीच नाही , आपण त्यातून काय ते घ्यायचे असते , शिक्षण काहीच देत नाहे - जर का घेणारा डोळे मिटून बसला तर ! आणि मला वाटते जागे असून झोपेचे सोंग घेणार्‍या काही लोकांना कसे जागे करणार हो?

माझा प्रश्न हा तुमच्या बुद्धीजीवी पेटून उठत नाहीत तर शिक्षणाचा उपयोग काय? ह्या विचारांच्या संदर्भात आहे. झोपेचे सोंग घेण्याची मला गरज काय? तिरकस बोलण्यातूल तुम्हाला प्रचंड आनंद मिळवायचा असेल तर मिळवा बाबा! मी ,मुद्दा सोडून बोलणे भांडखोर पणाचे मानतो त्यामुळे मी मुद्दा सोडणार नाही.

हे जहाल वास्तव आहे. ही समाजाची असहाय्यता आहे. स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारण्यांनी समजाला नष्प्रभ करून टाकले आहे. महागाईने पिचलेला समाज तुटपुंज्या कमाईत घर कसे चालवावे, आरक्षणाच्या राजकारणात स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैशे कुठुन उभे करावे? राहायला निवारा कसा मिळवावा? ह्या विवंचनेत आजचा सर्वसामान्य समाज आहे. त्याला उच्च विचार पटतात पण झेपत नाहीत. मनाने तो तुमच्या सोबत येऊ शकतो पण कृतीत साथ देऊ शकत नही. त्याला त्याच्या वरील सर्व विवंचनांतून आधी सोडवा तो तुम्हाला कृतीतही साथ देईल. बुद्धीजीवींना झोडपल्यामुळे आपण विचारवंत ठरत नाही.

मग काय अशा लेखांवरती प्रतिक्रिया देऊन तो विचारवंत ठरतो का? आपण तर फारच थोर विचारवंत आहात !

मी उद्घृत केलेल्या एकाही समस्येवर उत्तर देणे दूरच राहो साधी सहमती दर्शविण्याचे सौजन्यही तुम्ही दाखवू शकला नाहीत. कसा वाद घालावा कोणी तुमच्याशी?

साहेब, एकटा औरंबझेब नीच होता अशा भावनेतून ते लिहिलेलेच नाहिये, असे इतर कुणीही त्यांच्या प्रतिक्रियेत म्हटलेले नाही ! लेख पुन्हा एकदा वाचा - त्याची सुरुवातच मुळी औरंगझेबाच्या सद्गुणांपासून केली नाहिये का? पण मुद्दा असा आहे की - त्याचे कौतुक तुम्हाला दिसले नाही पण नीच्पणा दाखवून दिला तो मात्र इतका झोंबला की तुम्ही अगदी रस्त्यावर मारामारी करणार्‍या मुलांप्रमाणे आमच्यावर चिखलफेक केलीत !

तुमचा लेख आणि माझी त्यावरील प्रतिक्रिया तुम्हीच एकदा नीऽऽऽट वाचा. औरंगझेबाचा नीच पणा मला क्शला झोंबावा? तो काही माझा बाप नव्हे. पण शिवाजी महाराजांच्या तुल्यबळ शत्रूला सरसकट मूर्ख हे लेबल चिकटवलेत ते चूकीचे होते एवढेच दाखऊन देण्याचा प्रयत्न केला. आता तेही तुम्हाला झोंबेल ह्याची काय कल्पना?

असो , तुमच्यासारर्खे विचारवंत आणि कुणी न भेटोत ही ईश्वर चरणी प्रार्थना !
हेच विचार वाचकांचेही लेखकाबद्दल असू शकतात हे कायम ध्यानात ठेवा.

विसोबा खेचर's picture

24 Apr 2008 - 8:19 am | विसोबा खेचर

यावर गुस्ताख औरंगझेब म्हणाला,"हत्तीसारख्या बलाढ्य जनावराशी लढताना मौत आली असती तरी त्यात नाचक्की कोणती होती?मोठमोठ्या शहा सुलतानांच्या आयुष्यावर मृत्यू अचानक पडदा टाकतो.मृत्यूत नाचक्की कसली?त्यात लांज वाटायचं काय कारण?

क्या बात है! हे आवडलं...!

सप्रेसाहेब, तुमच्या अभ्यासपूर्ण लेखाला सलाम!

औरंग्या होताच मुळी कपटी आणि क्रूर!

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2008 - 9:49 am | प्रभाकर पेठकर

लहानपणापासूनच बुध्दी तल्लख आणि कुशाग्र.अफाट स्मरणशक्ती
एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो

श्री. उदय सप्रे ह्यांच्या लिखाणात वरील दोन परस्पर विरोधी विधाने आढळली . त्यांच्या दूसर्‍या विधानातील मूर्ख ह्या शब्दावर माझा आक्षेप आहे. म्हणून हा लेखन प्रपंच.

औरंगझेब क्रुर असेल, धर्मांध असेल, नव्हे होताच, पण मूर्ख खचितच नव्हता. एवढे मोठे साम्राज्य उभारायचे, सांभाळायचे, पदोपदी होणारी बंडाळी यशस्वी पणे मोडून काढायची. कानाकोपर्‍यातील बातम्या वेळ न दवडता मिळवायच्या, प्रतिस्पर्ध्याच्या संभाव्य चालींचा विचार करून आधीच रणनिती आखायची अशा अनेक गोष्टीत तो वाकबगार होता असे अनेकदा वाचनात आले आहे. फक्त त्याला कोणी विरोधक नव्हता म्हणून तो राज्य करू शकला हे विधान फारच भाबडेपणाचे वाटते.
त्याचा कोणावरच विश्वास नव्हता. तत्कालीन सामाजिक, राजकिय आणि मुसलमान धर्मियांची वैचारीक बैठक बघता त्याचे वागणे अत्यंत चलाख राज्यकर्त्याचे होते.
औरंगझेब दक्षिणेत सरदार म्हणून कारभार पाहत असताना जसे शहाजहानने औरंगझेबाच्या शिक्षणाच्या निमित्ताने एक मौलवी स्वतःचा हेर म्हणून त्याच्या बरोबर ठेवला होता तसेच औरंगझेबानेही शहाजहानच्या दरबारातील बित्तमबातमी मिळविण्यासाठी स्वतःच्या बहिणीलाच फितवून ठेवले होते.
सत्तेसाठी भावाभावांमध्ये, बाप-लेकांमध्ये मारामर्‍या ही त्या काळातली, मुस्लीम घराणातली परंपरा होती. औरंगझेब मूर्ख असता तर तो गाफिल राहिला असता आणि त्याच्या भावांनीच त्याला ठार मारले असते. पण औरंगझेब मूर्ख नव्हता.
शत्रू कितीही क्रूर, बलाढ्य असला तरी त्याला मूर्ख समजणे चूक होते. शत्रूची बलस्थानं आधीच ओळखून आपली रणनिती ठरवावी लागते. शिवाजी महाराजांना ह्या सर्व गोष्टींचा पुरेपुर अंदाज होता. अखिल हिन्दूस्थानात मुघल बादशहा औरंगझेब हाच एकमेव स्वराज्याचा बलाढ्य शत्रू आहे हे त्यांनी मनोमनी जाणले होते. खुद्द त्यांनीही औरंगझेबाला मूर्ख मानले नाही.
असो. मी कोणी इतिहासकार नाही. ज्या काही ऐतिहासिक कादंबर्‍या वाचल्या आहेत त्यावरून माझी मते बनलेली आहेत.

उदय सप्रे's picture

24 Apr 2008 - 10:18 am | उदय सप्रे

तुमच्या या वृत्तीला सलाम !

लहानपणापासूनच बुध्दी तल्लख आणि कुशाग्र.अफाट स्मरणशक्ती
एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो

श्री. उदय सप्रे ह्यांच्या लिखाणात वरील दोन परस्पर विरोधी विधाने आढळली . त्यांच्या दूसर्‍या विधानातील मूर्ख ह्या शब्दावर माझा आक्षेप आहे. म्हणून हा लेखन प्रपंच.

तुम्हाला औरंगझेब मूर्ख होता याचे एक मोठ्ठे उदाहरण देतोच आता :

शायिस्तेखान पुण्यात उतरला होता त्याच वेळेस सिद्दी जौहर पन्हाळ्याला वेढा घालून बसला होता.जर त्यावेळी औरंगझेबाने शायिस्तेखानाला सांगून विजापूरकरांशी संधान साधले असते , तर.....(असे लिहिताना पण मनाला असंख्य यातना होतायत , पण हे लॉजि़क आहे म्हणून लिहितोय, महाराज माफी असावी!).....तर "स्वराज्य" केवळ एका आठवड्यात संपले असते ! औरंगझेबाच्या जागी शहाजहान असता , तर त्याने नक्कीच ही संधी सोडली नसती , तो शासक होता आणि म्हणूनच त्याने विजापूरकरांशी संधान बांधून शहाजीराजांना माहुली गडावर कोंडून शरण आणले आणि कोवळ्या मुर्तुझा निजामाबरोबरच निजामशाही संपवली , हा इतिहास आहे.ज्या शासकाला या इतिहासापासून धडा घेता येत नाही तो मूर्ख नव्हे शतमूर्ख होय ! निव्वळ तैमूरलंगासारखे क्रूर असून भागत नाही , शासकाला थोर राजकारणी पण असावे लागते ! याबाबत विजापूरकरांना आणि निजामशाहीला जास्त गूण देता येतील ! कारण अफझलखानाच्या स्वारीच्या वेळी पण बड्या साहेबीणीने फार दूरचे राजकारण साधले होते ! निजामशाह तर त्यापेक्षा एक पायरी वरचढ होता म्हणून तर मालोजी राजेंपासून ते शहाजी पर्यंत त्याने सर्वांना आपल्या पदराखाली ठेवले होते ना?

इतिहास फक्त कादंबर्‍यात वाचायचा नसतो , आधी डोक्यात पण लॉजिक बसवावे लागते.

आण्खीन एक उदाहरण औरंग्याच्या मूर्खपणाचे : कुतुबशाही विरुध्द लढताना ऐन युध्दात तो रणात नमाझ पढायला बसला होता , एक गोळा त्याच्या अंगरक्षकाला लागून तो ठार झाला , हे असे काही मूर्ख्पणाचे कॄत्य शिवाजी महाराजांनी केले असते कां? याचा विचार करा.

ज्याला राज्य करावयाचे आहे त्याला "डोके" वापरावे लागते , जो स्वतःच्या चुकांमधून शिकतो तो शहाणा आणि जो इतरांचा चुकांमधून शिकतो तो चतुर आणि जो कुणाच्याच चुकांमधून काहीच न शिकता समोरचा कधी चूक करतोय ही वाट बघत बसतो आणि आपल्या माणसांनी अशा वेळी चूक केली तर त्यांना क्रूर पणे सझा देतो - स्वतःचे असलेले डोके वापरत नाही , तो मूर्खच नव्हे तर शतमूर्ख होय !हे सगळे गून (?) औरंगझेबाकडे होते !

असो, औरंगझेबासारख्या नालायक माणसाला मूर्ख म्हटल्यावर आक्षेप घेण्याच्या तुमच्या बुध्दीजीवी वॄत्तीला मानाचा मुजरा रांव !

विसोबा खेचर's picture

24 Apr 2008 - 10:58 am | विसोबा खेचर

औरंगझेबासारख्या नालायक माणसाला मूर्ख म्हटल्यावर आक्षेप घेण्याच्या तुमच्या बुध्दीजीवी वॄत्तीला मानाचा मुजरा रांव !

सप्रेसाहेब, केवळ मुद्द्याने मुद्दा खोडून काढा. पेठकरसाहेबांवर व्यक्तिगत शेरे नकोत..

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2008 - 2:34 pm | प्रभाकर पेठकर

धन्यवाद श्री. विसोबा खेचर.

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2008 - 11:30 am | प्रभाकर पेठकर

लहानपणापासूनच बुध्दी तल्लख आणि कुशाग्र.अफाट स्मरणशक्ती
एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो

श्री. उदय सप्रे ह्यांच्या लिखाणात वरील दोन परस्पर विरोधी विधाने आढळली .

आपण इतिहासकार आहात. मी कोण? एक अज्ञ वाचक. पण आपण स्वतःच्याच लिखाणात दोन परस्पर विरोधी विधाने केली आहेत. त्यावर काहीही भाष्य आपल्या प्रतिसादात दिसले नाही ह्याचे वैषम्य वाटले.

शायिस्तेखान पुण्यात उतरला होता त्याच वेळेस सिद्दी जौहर पन्हाळ्याला वेढा घालून बसला होता.जर त्यावेळी औरंगझेबाने शायिस्तेखानाला सांगून विजापूरकरांशी संधान साधले असते , तर.....(असे लिहिताना पण मनाला असंख्य यातना होतायत , पण हे लॉजि़क आहे म्हणून लिहितोय, महाराज माफी असावी!).....तर "स्वराज्य" केवळ एका आठवड्यात संपले असते !

मानायला पाहिजे तुम्हाला. जे इतके वर्षांनी नुसती कागदपत्रे वाचून तुमच्या लक्षात आले ते काश्मिर ते महाराष्ट्र बॉर्डर पर्यंत राज्य करणार्‍या आणि हाताशी अनेक मुत्सद्दी, विचारवंत असताना, प्रत्यक्ष परिस्थितीत असताना, प्रत्यक्ष राजकारण खेळताना औरंगझेबाच्या लक्षातच नाही आले.

औरंगझेबाच्या जागी शहाजहान असता , तर त्याने नक्कीच ही संधी सोडली नसती , तो शासक होता आणि म्हणूनच त्याने विजापूरकरांशी संधान बांधून शहाजीराजांना माहुली गडावर कोंडून शरण आणले आणि कोवळ्या मुर्तुझा निजामाबरोबरच निजामशाही संपवली , हा इतिहास आहे.ज्या शासकाला या इतिहासापासून धडा घेता येत नाही तो मूर्ख नव्हे शतमूर्ख होय ! निव्वळ तैमूरलंगासारखे क्रूर असून भागत नाही , शासकाला थोर राजकारणी पण असावे लागते ! याबाबत विजापूरकरांना आणि निजामशाहीला जास्त गूण देता येतील !

म्हणजेच विजापूरकर आणि निजाम हे औरंगझेबापेक्षा जास्त हुषार होते. मग त्यांनी मूर्ख नव्हे शतमूर्ख औरंगझेबाला हरवून मोंघलांना त्यांच्या मायदेशी पिटाळून का लावले नाही? ह्म्म्म कदाचित दया दाखवली असेल. शत्रूला दया दाखवणे मूर्खपणाच नाही का? मग त्यांना मोघलांपेक्षा जास्त गुण का?

म्हणून तर मालोजी राजेंपासून ते शहाजी पर्यंत त्याने सर्वांना आपल्या पदराखाली ठेवले होते ना?
पण हा मालोजीराजे आणि शहाजीराजांचा नाकर्तेपणाही असू शकतो. शहाजी राजे शूर होते तितकेच विलासीही होते असे वाचले आहे.

इतिहास फक्त कादंबर्‍यात वाचायचा नसतो , आधी डोक्यात पण लॉजिक बसवावे लागते.

सप्रे साहेब आपण स्वयंघोषित इतिहासकार आहात. वाचकांच्या डोक्यात लॉजिक नसते तो फक्त एका लेखकाचेच विचार वाचून स्वतःचे मत बनवितो असा गैर समज करून घेऊ नका. नाहीतर एकदा बाबासाहेब पुरंदरे वाचल्यावर इनामदारांचे विचार वाचावेसे त्याला वाटणारच नाही. डायरेक्ट वाचकाच्या डोक्यावरच हल्ला केलात तर नाईलाजाने वाचकांनाही तुमच्या डोक्याबद्दल शंका येऊ शकते.

आण्खीन एक उदाहरण औरंग्याच्या मूर्खपणाचे : कुतुबशाही विरुध्द लढताना ऐन युध्दात तो रणात नमाझ पढायला बसला होता , एक गोळा त्याच्या अंगरक्षकाला लागून तो ठार झाला , हे असे काही मूर्ख्पणाचे कॄत्य शिवाजी महाराजांनी केले असते कां? याचा विचार करा.
तुम्हीच, तुमच्याच एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो ह्या विधानाचा नीट सखोल अभ्यास करा. औरंगझेब कर्मठ आणि धर्मांध होता. तो तिथे नमाजाला बसला होता. लघुशंकेला नाही. शिवाजी महाराज कर्मठ आणि धर्मांध नव्हते. कर्मठ आणि धर्मांध हि विशेषणेच माणसाला सारासार बुद्धीपासून दूर ठेवते.

ज्याला राज्य करावयाचे आहे त्याला "डोके" वापरावे लागते , जो स्वतःच्या चुकांमधून शिकतो तो शहाणा आणि जो इतरांचा चुकांमधून शिकतो तो चतुर आणि जो कुणाच्याच चुकांमधून काहीच न शिकता समोरचा कधी चूक करतोय ही वाट बघत बसतो आणि आपल्या माणसांनी अशा वेळी चूक केली तर त्यांना क्रूर पणे सझा देतो - स्वतःचे असलेले डोके वापरत नाही , तो मूर्खच नव्हे तर शतमूर्ख होय !हे सगळे गून (?) औरंगझेबाकडे होते !

ह्यावर काय म्हणणार. तुम्हाला औरंगझेब द्वेषाची काविळ झाली आहे असेच नाईलाजाने म्हणावे लागेल.

असो, औरंगझेबासारख्या नालायक माणसाला मूर्ख म्हटल्यावर आक्षेप घेण्याच्या तुमच्या बुध्दीजीवी वॄत्तीला मानाचा मुजरा रांव !

आपल्याच लेखाच्या वाचकाला उद्देशून लिहिलेल्या खडूस वाक्यांनी इतिहास बदलत नसतो.
मिसळ पाव हे संस्थळ सर्वांसाठी आहे. तुम्ही काही लिखाण केलेत तर ज्याला त्याला आपल्या बुद्धीला झेपेल, रुचेल त्या प्रमाणे प्रतिसाद द्यायचा हक्क आहे असे मला वाटते. माझ्या वाटण्यात कांही वावगे असेल तर श्री. तात्यांनी मला तसे सांगावे मी कोणालाच प्रतिसाद देणार नाही.

उदय सप्रे's picture

24 Apr 2008 - 12:11 pm | उदय सप्रे

पेठकर साहेब,

तुमच्या एकूणच लिहिण्याच्या पध्दतीवरून सारसार विचार करण्याची कुवत तुमच्याकडे असेल्से वाटत नाही्ए माझे शेवटचे उत्तर :

"आपण इतिहासकार आहात. मी कोण? एक अज्ञ वाचक. पण आपण स्वतःच्याच लिखाणात दोन परस्पर विरोधी विधाने केली आहेत. त्यावर काहीही भाष्य आपल्या प्रतिसादात दिसले नाही ह्याचे वैषम्य वाटले."

साहेब , मी एक नगण्य असा लहान माणूस आहे , काही ऐतिहासिक लेख लिहिले , कविता केल्या , खूपशी ऐतिहासिक प्स्तकी वाचली म्हणजे आपण इतिहासकार झालो अशा गोड गैरसमजामधे मी कधीही नव्हतो , आज नाही आणि इथून पुढेही नसेन !
शासक म्हणून औरंगझबाने केलेल्या चुकांमुळे त्याला मूर्ख म्हटले आहे."त्याच्याकडे असलेल्या गुणांच्या बळावर तो खूप काही करू शकला असता पण ते त्यानी आपल्या दुराग्रही स्वभावामुळे केले नाही"अशी या विधानाची दुसरी बाजू तुमच्या ध्यानात कशी बरे यावी?

"सप्रे साहेब आपण स्वयंघोषित इतिहासकार आहात. वाचकांच्या डोक्यात लॉजिक नसते तो फक्त एका लेखकाचेच विचार वाचून स्वतःचे मत बनवितो असा गैर समज करून घेऊ नका. नाहीतर एकदा बाबासाहेब पुरंदरे वाचल्यावर इनामदारांचे विचार वाचावेसे त्याला वाटणारच नाही. डायरेक्ट वाचकाच्या डोक्यावरच हल्ला केलात तर नाईलाजाने वाचकांनाही तुमच्या डोक्याबद्दल शंका येऊ शकते."

पुन्हा एकदा सांगतो , मी एक नगण्य माणूस आहे ! कुठलीही ङ्होषणा मी केलेली नाही आणि करणारही नाही ! लॉजिक वाचकाने वापरायचे असते एव्ह्ढेच म्हणायचे होते मला ! "तुमच्या विधानातच विरोधाभास आहे : एका लेखकाचे विचार वाचून स्वतःचे मत बनवितो असा गैर समज करून घेऊ नका !"अहो, मी पण हेच म्हणतोय , की सगळ्यांचे वाचून हे लॉजिक विचार तरी कराल की नाही?

"तुम्हीच, तुमच्याच एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो ह्या विधानाचा नीट सखोल अभ्यास करा. औरंगझेब कर्मठ आणि धर्मांध होता. तो तिथे नमाजाला बसला होता. लघुशंकेला नाही. शिवाजी महाराज कर्मठ आणि धर्मांध नव्हते. कर्मठ आणि धर्मांध हि विशेषणेच माणसाला सारासार बुद्धीपासून दूर ठेवते"

व्वा ! तुमचेच विधान नीट वाचा आता - औरंगझेब कर्मठ आणि धर्मांध होता. तो तिथे नमाजाला बसला होता. लघुशंकेला नाही. शिवाजी महाराज कर्मठ आणि धर्मांध नव्हते. कर्मठ आणि धर्मांध हि विशेषणेच माणसाला सारासार बुद्धीपासून दूर ठेवते .....म्हणजेच तुम्ही कबूल नाही का केलंत की औरंगझेब शासक म्हणून मूर्ख होता ?

"ह्यावर काय म्हणणार. तुम्हाला औरंगझेब द्वेषाची काविळ झाली आहे असेच नाईलाजाने म्हणावे लागेल"

मला काय झाले आहे यापेक्षा तुम्ही आधी वैयक्तीक विधाने करण्याच्या स्वतःच्या काविळीवर उपाय करावा हे बरे !

"आपल्याच लेखाच्या वाचकाला उद्देशून लिहिलेल्या खडूस वाक्यांनी इतिहास बदलत नसतो.
मिसळ पाव हे संस्थळ सर्वांसाठी आहे. तुम्ही काही लिखाण केलेत तर ज्याला त्याला आपल्या बुद्धीला झेपेल, रुचेल त्या प्रमाणे प्रतिसाद द्यायचा हक्क आहे असे मला वाटते. माझ्या वाटण्यात कांही वावगे असेल तर श्री. तात्यांनी मला तसे सांगावे मी कोणालाच प्रतिसाद देणार नाही. "

छान , आम्ही लिहिले तर ते खडूस आणि तुम्ही जी मुक्ताफळे उधळली आहेत ते काय आहे? प्रतिसाद जरूर द्यावा.....

"पण हा मालोजीराजे आणि शहाजीराजांचा नाकर्तेपणाही असू शकतो. शहाजी राजे शूर होते तितकेच विलासीही होते असे वाचले आहे. "

साहेब , तुम्हाला मी अतिशय प्रामाणिकपणाने सांगू इच्छितो की मला बोललात ते ठीक आहे हो , पण निदान त्या थोर लोकांना तरी नाकर्तेपणा आणि विलासी अशी विशेषणे लावण्याआधी हजार वेळा विचार करा ! शहाजीराजे जरूर विलासी होते , पण त्यांनी शिवाजी महाराजांच्या ही आधी ३ वेळा स्वराज्याचे प्रयत्न केलेले होते हा इतिहास विसरलात का?

नुसती नावे ठेवण्याने काहेच साध्य होत नाही राव, "म्हणजेच विजापूरकर आणि निजाम हे औरंगझेबापेक्षा जास्त हुषार होते. मग त्यांनी मूर्ख नव्हे शतमूर्ख औरंगझेबाला हरवून मोंघलांना त्यांच्या मायदेशी पिटाळून का लावले नाही? ह्म्म्म कदाचित दया दाखवली असेल. शत्रूला दया दाखवणे मूर्खपणाच नाही का? मग त्यांना मोघलांपेक्षा जास्त गुण का?" ही वाक्ये तुमच्या विचारशक्तीची मर्यादा दाखवून देतात !

असो, तुम्ही चिखलफेक करत रहा , तात्यांना मी आधीच लिहिले आहे , माझी चूक आहे असे त्यांना वाटले आहे म्हणून मी माफी ही मागितली आहे त्यांची !

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2008 - 1:42 pm | प्रभाकर पेठकर

तुमच्या एकूणच लिहिण्याच्या पध्दतीवरून सारसार विचार करण्याची कुवत तुमच्याकडे असेल्से वाटत नाही्ए माझे शेवटचे उत्तर :

तुम्ही असे वैयक्तीक हल्ले करता म्हणून नाईलाजाने मलाही तसेच शब्द वापरावे लागतात. तुम्ही संयमाने लिहा मग माझे लिखाण पहा कसे बदलते. जे पेराल तेच उगवेल.

आपण स्वतःच्याच लिखाणात दोन परस्पर विरोधी विधाने केली आहेत. त्यावर काहीही भाष्य आपल्या प्रतिसादात दिसले नाही ह्याचे वैषम्य वाटले."
साहेब , मी एक नगण्य असा लहान माणूस आहे , काही ऐतिहासिक लेख लिहिले , कविता केल्या , खूपशी ऐतिहासिक प्स्तकी वाचली म्हणजे आपण इतिहासकार झालो अशा गोड गैरसमजामधे मी कधीही नव्हतो , आज नाही आणि इथून पुढेही नसेन !
शासक म्हणून औरंगझबाने केलेल्या चुकांमुळे त्याला मूर्ख म्हटले आहे."त्याच्याकडे असलेल्या गुणांच्या बळावर तो खूप काही करू शकला असता पण ते त्यानी आपल्या दुराग्रही स्वभावामुळे केले नाही"अशी या विधानाची दुसरी बाजू तुमच्या ध्यानात कशी बरे यावी?

तुम्ही त्याला मूर्ख आणि शतमूर्ख संबोधिले आहे. त्याच बरोबर त्याच्या कडे कुशाग्र बुद्धीमत्ता होती असेही म्हणता. हे चूक आहे. तो मूर्ख आणि शतमूर्ख नव्हता तो हुशार होता पण त्यानेही काही चुका केल्या असे लिहायला हवे होते.

लॉजिक वाचकाने वापरायचे असते एव्ह्ढेच म्हणायचे होते मला !
म्हणजेच ते लॉजिक वापरायला मी वाचक म्हणून असमर्थ ठरलो आहे असा सूर/आरोप तुमच्या वाक्यात आहे.

"तुमच्या विधानातच विरोधाभास आहे : एका लेखकाचे विचार वाचून स्वतःचे मत बनवितो असा गैर समज करून घेऊ नका !"अहो, मी पण हेच म्हणतोय , की सगळ्यांचे वाचून हे लॉजिक विचार तरी कराल की नाही?
पण तुमची काही मते मी खोडून काढायचा प्रयत्न केला म्हणजे मी 'लॉजिकल विचार केलेला नाही' किंवा 'माझी तेवढी कुवत नाही ' असेच तुम्ही तुमच्या सोयी साठी गृहीत धरलेले आहे.

"तुम्हीच, तुमच्याच एक अत्यंत कर्मठ आणि धर्मांध मूर्ख माणूस होता तो ह्या विधानाचा नीट सखोल अभ्यास करा. औरंगझेब कर्मठ आणि धर्मांध होता. तो तिथे नमाजाला बसला होता. लघुशंकेला नाही. शिवाजी महाराज कर्मठ आणि धर्मांध नव्हते. कर्मठ आणि धर्मांध हि विशेषणेच माणसाला सारासार बुद्धीपासून दूर ठेवते"

व्वा ! तुमचेच विधान नीट वाचा आता - औरंगझेब कर्मठ आणि धर्मांध होता. तो तिथे नमाजाला बसला होता. लघुशंकेला नाही. शिवाजी महाराज कर्मठ आणि धर्मांध नव्हते. कर्मठ आणि धर्मांध हि विशेषणेच माणसाला सारासार बुद्धीपासून दूर ठेवते .....म्हणजेच तुम्ही कबूल नाही का केलंत की औरंगझेब शासक म्हणून मूर्ख होता ?

धर्मांधतेच्या संदर्भात सारासार बुद्धी नसणे आणि शासक म्हणून मूर्ख असणे हे एकच कसे? धर्मांध औरंगझेब आणि शासक, राजकारणी औरंगझेब ह्या दोन भिन्न प्रवृत्ती आहेत.

मला काय झाले आहे यापेक्षा तुम्ही आधी वैयक्तीक विधाने करण्याच्या स्वतःच्या काविळीवर उपाय करावा हे बरे !

वैयक्तिक विधाने आपण टाळलीत तर मला हौस नाही .

छान , आम्ही लिहिले तर ते खडूस आणि तुम्ही जी मुक्ताफळे उधळली आहेत ते काय आहे? प्रतिसाद जरूर द्यावा.....
तुमच्या प्रत्येक मुद्याला मी ते ते मुदे ठळक अक्षरात लिहून त्या त्या मुद्यांखाली माझा प्रतिवाद केला आहे. त्याला मुक्ताफळे म्हणत नाहीत. तुम्हाला म्हणायचे असेल तर तसे म्हणा. म्हणणार्‍याचे तोंड धरता येत नाही.

"पण हा मालोजीराजे आणि शहाजीराजांचा नाकर्तेपणाही असू शकतो. शहाजी राजे शूर होते तितकेच विलासीही होते असे वाचले आहे. "

साहेब , तुम्हाला मी अतिशय प्रामाणिकपणाने सांगू इच्छितो की मला बोललात ते ठीक आहे हो , पण निदान त्या थोर लोकांना तरी नाकर्तेपणा आणि विलासी अशी विशेषणे लावण्याआधी हजार वेळा विचार करा !

बाबासाहेब पुरंदरे, ना. स. इनामदार वगैरे मात्तबरांच्या कादंबर्‍यावाचून माझे हे मत झाले आहे. मालोजीराजे, शहाजीराजे हे मा़णूसच होते त्यांनी कधी चुका केल्याच नाहीत असे समजायला मी त्यांना देव मानत नाही. आणि खुद्द देवही चुका करतो. लुळे-पांगले, जन्मांध, एकमेकांना जोडलेले जीव जन्माला घालतो. तिथे मानवाची काय मातब्बरी?

शहाजीराजे जरूर विलासी होते , पण त्यांनी शिवाजी महाराजांच्या ही आधी ३ वेळा स्वराज्याचे प्रयत्न केलेले होते हा इतिहास विसरलात का?

ते प्रयत्न असफल झाले हे तुम्ही विसरताय का? विलासी माणसाला विलास , सुख प्रिय असते. स्वराज्य उभारण्यातील कष्टप्रद जीवन नको असते. त्या मुळे असे काही प्रयत्न पुन्हा पुन्हा करण्यापेक्षा सरदारकी सांभाळावी स्वार्‍या-शिकारी कराव्यात आणि मदीरा आणि नृत्यांगनांना जवळ करावे हा नाकर्तेपणा नाही का?

"म्हणजेच विजापूरकर आणि निजाम हे औरंगझेबापेक्षा जास्त हुषार होते. मग त्यांनी मूर्ख नव्हे शतमूर्ख औरंगझेबाला हरवून मोंघलांना त्यांच्या मायदेशी पिटाळून का लावले नाही? ह्म्म्म कदाचित दया दाखवली असेल. शत्रूला दया दाखवणे मूर्खपणाच नाही का? मग त्यांना मोघलांपेक्षा जास्त गुण का?" ही वाक्ये तुमच्या विचारशक्तीची मर्यादा दाखवून देतात !

पाहिलंत, काढलीत नं शेवटी माझी विचारशक्ती? कारण काय? तुमची अविचारशक्तीच नं शेवटी? मुद्याला धरून बोला. माझ्या प्रश्नांना उत्तर असेल तर बोला. अन्यथा......

असो, तुम्ही चिखलफेक करत रहा , तात्यांना मी आधीच लिहिले आहे , माझी चूक आहे असे त्यांना वाटले आहे म्हणून मी माफी ही मागितली आहे त्यांची !

धन्यवाद.

धमाल मुलगा's picture

24 Apr 2008 - 10:56 am | धमाल मुलगा

आम्ही कोणी इतिहास संशोधक नाही, ना इतिहासाचे गाढे अभ्यासक!
आमचं भाषाज्ञानही तसं यथा-तथाच! त्यामुळे....

"अशा प्रकारे वयाच्या ८९ वर्षांपर्यंत सतत कार्यमग्न रहाणार्‍या कुशाग्र बुध्दीच्या या धाडसी मोंगलाने आपल्या धर्मवेडाने , आत्मकेंद्रिततेने , दुष्टपणाने व क्रौर्याने मोंगल सम्राज्याचे व मोंगल घराण्याचे अपरिमित नुकसान केले आहे !"

ह्या अभ्यासपुर्ण संशोधनाअंतीच्या निष्कर्षातल्या वाक्यांचं पचन कदाचित आम्हाला झालं नसेल.....

उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या "धमाल मुलगा' यांच्या आकलनक्षमतेला तुमची वरील वाक्‍ये कितपत पचनी पडतील ही शंकाच आहे.

:-))))))))))))))))))))))))))))))))
शंकेला जरुर वाव आहे !

पण........

आमची पचनशक्ति तशी कमजोरच आहे!

आम्हाला जिजाऊंच्या ४०९ जयंतीच्या बातमीऐवजी 'महान'..(निदान काही अंशी !) औरंग्याच्या मृत्यूची (..की पुण्यतिथी म्हणावं बरं?) पहिल्या पानावर आलेली बातमीही पचनी पडली नाही! खचितच तो हलकट जिजाऊंपेक्षा मोठा...महान नाही! की इथंही चुकलं बुवा आमचं?

अल्पसंख्यांकाचं काही ना काही कारणानं केलेलं तुष्टीकरणही आमच्या कधीच पचनी पडत नाही..

महाराष्ट्रातल्या 'संभाजीनगर' ला अजुनही 'औरंगाबाद' संबोधलेलं आमच्या पचनी पडत नाही!

कारण अजुनही आमच्या रक्तातून लाव्हा वाहतो....मिंधेपणाचं गटार नव्हे!

आम्ही घडणार्‍या घटनांमुळे आमच्या माणसांना त्याचा प्रत्यक्ष / अप्रत्यक्षपणे जर त्रास होत/होणार असेल तर त्याविरोधात आवाज हा नक्कीच उठवणार!

त्या घटनांची साधकबाधक चर्चा सदरेवरची पंतमंडळी करतील...ते बुध्दीजीवी...आम्ही फक्त समशेरबहाद्दर!!!!!

आमच्यासारख्यांची विचारांची अशी मूस तयार होण्यामागेही तशी कारणं असतात ह्याची दखल असावी...वैचारिक गुर्‍हाळं मांडून त्यातून शब्दांचा चोथा करायला वेळ असावा लागतो...समोरची तेग जेव्हा आपल्या गर्दनीचा वेध घ्यायला धावते तेव्हा विचार-बिचार सगळे पन्नास कोंसावर जाऊन थांबतात...तिथे घ्यावा लागतो तो पवित्रा....करावा लागतो तो हल्ला....

आम्ही दिल्हेला जवाब हा फक्त आणि फक्त त्या लेखकाने आणि दैनिकाने थोरल्या आऊसाहेबांच्या जयंतीऐवजी औरंग्याच्या मरणाची आठवण करवणारा लेख लिहिण्याबद्दल आणि तोही पहिल्या पानावर छापण्याबद्दल होता...ह्याची जाणिव आमच्यासारखे हात-पाय चालवण्याऐवजी सुपीक बुध्दीचं बळ वापरुन शब्दच्छल मांडणार्‍यांना असेलच...कारण हे समजणं हे बुध्दीवाद्यांचं लक्षण आहे असं मी मानतो!

मला वाटतं माझ्या

आजही महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळ्यावर कडक ऊन्हाच्या तिरिपी येत असतात, पण म्हराठी स्वराज्यावर पाशवी बलात्कार करणारा हरामजादा अफजल्या मात्र प्रतापगडावरच्या प्रशस्त आलिशान मशीदीतल्या कबरीत उदा-धूपाच्या दरवळात राजेशाही थाटात लोळत असतो....तिथे ह्या बातमीची ती काय मातब्बरी?

ह्या वाक्यांकडे त्या दुर्लक्ष झालेलं दिसतंय, काय? नाही का?

असो, आम्ही वयाने लहान आहो, रक्तातला खानदानी जोश आमच्या दिमागास शांत बसु देत नाही...तोंडून कधी मोठा घासही घेतला जातो, पण आमचं चुकलं माकलं मोठ्या दिलानं स्विकारलं जाईल ह्याची आम्हाला खात्री आहे.

पण या अशा उत्स्फुर्ततेतूनच काहितरी घडवणारे लोक जन्माला येत असतात हा इतिहास आहे.

:-)) सप्रेसाहेब, आम्ही इतकेही मोठे कर्तबगार नाही आहो की आम्हा संदर्भात अशी वाक्यं यावीत! तरीही आमच्या भावना समजावून घेतल्याबद्दल आभार!

-(महाराष्ट्राचा पुढचा शिवराय माझ्या पोटी यावा अशी ओढ लागलेला) शिवबांचा मावळा, धमालराव देशमुख-पाटील.

इनोबा म्हणे's picture

24 Apr 2008 - 11:30 am | इनोबा म्हणे

त्या घटनांची साधकबाधक चर्चा सदरेवरची पंतमंडळी करतील...ते बुध्दीजीवी...आम्ही फक्त समशेरबहाद्दर!!!!!

आमच्यासारख्यांची विचारांची अशी मूस तयार होण्यामागेही तशी कारणं असतात ह्याची दखल असावी...वैचारिक गुर्‍हाळं मांडून त्यातून शब्दांचा चोथा करायला वेळ असावा लागतो...समोरची तेग जेव्हा आपल्या गर्दनीचा वेध घ्यायला धावते तेव्हा विचार-बिचार सगळे पन्नास कोंसावर जाऊन थांबतात...तिथे घ्यावा लागतो तो पवित्रा....करावा लागतो तो हल्ला....
आम्ही दिल्हेला जवाब हा फक्त आणि फक्त त्या लेखकाने आणि दैनिकाने थोरल्या आऊसाहेबांच्या जयंतीऐवजी औरंग्याच्या मरणाची आठवण करवणारा लेख लिहिण्याबद्दल आणि तोही पहिल्या पानावर छापण्याबद्दल होता...ह्याची जाणिव आमच्यासारखे हात-पाय चालवण्याऐवजी सुपीक बुध्दीचं बळ वापरुन शब्दच्छल मांडणार्‍यांना असेलच...कारण हे समजणं हे बुध्दीवाद्यांचं लक्षण आहे असं मी मानतो!
आम्ही तुमच्याशी सहमत आहोत...

उदयरावांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा!

(तुकोबाचा वारकरी आणि शिवबाचा धारकरी)-इनोबा
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

बगाराम's picture

24 Apr 2008 - 7:16 pm | बगाराम

आमच्यासारख्यांची विचारांची अशी मूस तयार होण्यामागेही तशी कारणं असतात ह्याची दखल असावी समोरची तेग जेव्हा आपल्या गर्दनीचा वेध घ्यायला धावते तेव्हा विचार-बिचार सगळे पन्नास कोंसावर जाऊन थांबतात...तिथे घ्यावा लागतो तो पवित्रा....करावा लागतो तो हल्ला....

बापरे तुमच्या इतरत्र दिलेल्या प्रतिसादांवरुन तुही आयटी मध्ये वगैरे काम करता असा माझा गैर समझ झाला होता. पण हे काही भलतेच की हो.

तुम्ही इराक/अफगाणिस्तान वगैरे प्रातांत असता का?

विजुभाऊ's picture

28 Apr 2008 - 3:42 pm | विजुभाऊ

-(महाराष्ट्राचा पुढचा शिवराय माझ्या पोटी यावा अशी ओढ लागलेला) शिवबांचा मावळा, धमालराव देशमुख-पाटील.
धमाल राव देशमुख पाटील या वाक्यात तुम्हाला माझ्या पोटी या ऐवजी माझ्या घरात असे म्हणायचे आहे का?

धमाल मुलगा's picture

28 Apr 2008 - 4:04 pm | धमाल मुलगा

ह्म्म..जरा विचारांच्या तेजतर्रार वेगापायी गडबड झाली खरं...

माझ्या घरात असेच वाचावे.

विजुभाऊ, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल आभारी आहे.
धन्यवाद!

भडकमकर मास्तर's picture

24 Apr 2008 - 2:48 pm | भडकमकर मास्तर

आम्ही सर्व मते बारकाईने वाचण्याचा प्रयत्न केला ....सगळेच मुद्दे ठळक दिसत आहेत त्यामुळे कोणास कोण काय म्हणाले याचा अभ्यास अशक्य झालाय....

मनस्वी's picture

24 Apr 2008 - 2:51 pm | मनस्वी

सगळेच मुद्दे ठळक दिसत आहेत त्यामुळे कोणास कोण काय म्हणाले याचा अभ्यास अशक्य झालाय....

+१

सगळी अक्षरे आपोआपच ठळक होतायत बहुतेक.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Apr 2008 - 3:03 pm | llपुण्याचे पेशवेll

औरंगजेब द्वेषाची काविळ जर उदयजीना झाली असेल तर ती मलाही होवो... कारण तसा कर्मठ, शिवभक्त रावण पण होता. पण म्हणून रावणाचा उदो उदो काही लुंगीवाले दाक्षिणात्य लोक सोडले तर इतर कोण करताना दिसत नाही.
औरंगजेबाचा मनोसोक्त द्वेष करण्याने काही फार मोठी चूक होत आहे असे मला तरी वाटत नाही....
आणि वरील विधाने लिहील्याबद्दल जर कोणी माझ्या बुध्दीची कीव केली तर मला मुळीच वाईट वाटणार नाही...औरंगजेबाचा द्वेष करावा इतका मी अज्ञानी आहे याचा उलट मला आनंद वाटेल.
पुण्याचे पेशवे

नारदाचार्य's picture

24 Apr 2008 - 3:36 pm | नारदाचार्य

कादंबऱ्या वाचून मत बनवत असल्याची कबुली देऊनही प्रभाकररावांनी नीट मांडले त्यांचे म्हणणे (ते पटो ना पटो). इतिहासाचा कथित अभ्यास, जर-तरच्या मांडणीतील लॉजिक - बापरे, काय भयंकर आहे हे? धमाल मुलगा यांचा उत्साह, उर्जा समजण्याजोगी. बाकी साऱ्यांचे सारेच ठळक अक्षरातले किरकोळ... खुर्दा...
अरे लांगुल्चालनच करायचे असेल तुम्हाला तर , आमचे राष्ट्रपती व महान संशोधक ए.पी.जे.अब्दुल कलाम किंवा मदारी मेहेतर यांचे करा ना !
आवेशात किती आणि काय लिहावे, कसे लिहावे याचे भान सुटले की असे होते. या मंडळींचे लांगूलचालन करण्याची कल्पनाच भयंकर आहे. लांगूलचालन अपात्रांचेच होत असते, पात्र व्यक्तींचे नाही. त्यामुळे औरंगजेबाला अपात्र ठरवून त्याचे लांगूलचालन होतेय, असे म्हणताना कलाम, मेहतर तिथं यावेत याला लॉपसाईडेड किंवा इललॉजिक म्हणावे का? अर्थात, एकाचवेळी औरंगझेब कुशाग्रही आणि मूर्खही असेल तर असे होतेच म्हणा.
(इतिवृत्तकार) नारदाचार्य

डॉ. श्लोक _भातखंडे's picture

24 Apr 2008 - 3:38 pm | डॉ. श्लोक _भातखंडे

कोण कुठला तो औरंग्या, त्याचे इथेही वर्णन?? का का?
या औरंग्याची माहिती मिसळपावाच्या मुखपृष्ठावर पाहून फार फार दु:ख झाले.
लोकसत्तेत देशमुख वर्णन लिहिणार आणि मिसळपावावरती सप्रे....
मिसळपावासारख्या प्रथितयश संस्थळाने असा लेख पहिल्या पानावर द्यावा याचे आश्चर्य किंबहुना खेद वाटला !.
का हे लांगूलचालन??? या विषयावर कोणालाही लेख लिहावासा वाटूच कसा शकतो??तुम्हाला वाटला म्हणून कौतुक करण्यास आमचे शब्द अपुरे आहेत, शब्दसंपत्ती आटली आहे,....आणि माझे तडफडणारे मन अश्रू ढाळत आहे....

डॉ. श्लोक _भातखंडे's picture

24 Apr 2008 - 5:21 pm | डॉ. श्लोक _भातखंडे

कारणे काहीही असोत् , मरणोत्तर औरंग्याने मायमराठीच्या मनावर सत्ता गाजविणार्‍या मिसळपावामध्ये प्रथम पॄष्ठावर झळकून छत्रपती शिवाजी आणि संभाजी महाराजांवर निस्सीम प्रेम आणि श्रध्दा बाळगणार्‍या तमाम मराठी माणसांच्या नाकावर टिच्चून अढळपद मिळवलंय !....
.... खूप दु:ख झाले हे पाहून...

डॉ. श्लोक _भातखंडे's picture

24 Apr 2008 - 5:44 pm | डॉ. श्लोक _भातखंडे

आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे ! नाही तर आजचा "अफजल" जीवंत नसता ! आणि कलाम साहेबांसारख्या महान संशोधकाला राष्ट्रपती पदावरून खाली यावं लागलं नसतं !

वरील तीन वाक्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे ते अजिबात कळले नाही....तीन आठवडे अनेक पुस्तके वाचून संशोधन केले नसल्यामुळे कदाचित आमच्या मूढमतीला कळत नसेल...कृपया समजावून सांगावे.

बगाराम's picture

24 Apr 2008 - 7:07 pm | बगाराम

बुद्धीजीवी ही शिवी आहे का? मी स्वतःला बुद्धीजिवी वगैरे समजत नसलो तरी तसे बनण्याचा प्रयत्न करत असतो.टिळक, आगरकर, सावरकर इ.इ. मराठी मंडळी बुद्धीजीवी नव्हती का? ज्या कलामांचे लांगुलचालन (!)करायला सांगितले जाते आहे, (ज्यांच्या राष्ट्रपती पद जाण्याला मराठी माणूस कारणीभूत आहे) ते कलाम देखिल बुद्धीजीवीच नाहीत का?

मलाही पेठकरांचे प्रतिसाद जास्त पटले आणि त्यांची संयमीत भाषा (कि GXXX फाटू भाषा ??) आवडली.

लोकसत्ता , सामना , सनातन प्रभात या तीनही वृत्तपत्रांना पाठवला होता , परंतु लेख छापणे सोडाच - त्याची साधी "पोच" सुध्दा कुणी मला आजतागायत दिलेली नाही !

ह्यातले सनातन प्रभात सोडले तर बाकिच्या दोन्ही नियतकालीकांना एक किमान तारतम्य असावे असे वाटते. सनातन प्रभातने मात्र असले भडक साहित्य का नाकारले ते समजले नाही.

तसच ते सापेक्षपण असतात...

औरंगजेब उत्तम राजकारणी, प्रशासक, काटकसरी वगैरे वगैरे असेल पण तो ज्या प्रदेशात राज्य करत होता किंवा त्याच्या राजवटीमुळे ज्यांना फायदा झाला होता त्यांच्यासाठी..

तत्कालीन महाराष्ट्राला आणि आमच्या सारख्या काहीजणांना तो अजुनही शत्रूच वाटतो. त्याचं गूणगान आम्ही का करावं? त्याचे गूण कदाचित Appreciate करूही -जसे रावणाचे केले.. पण आमच्या लोकांवर (शिवाजी, संभाजी) अन्याय करून नाही. त्यांच्यापेक्षा त्याचं महत्त्व वाढ्वून नाही.

मला उदय च्या लेखामधे हा उद्देश दिसतो. आमच्या शत्रुची मृत्यूची तारीख लक्षात ठेवून, पहिल्या पानावर मोठा लेख देवून बातमी देणं हे कमीतकमी मराठी म्हणवणार्‍या वृत्तपत्राकडून तरी अपेक्षिलं नव्हतं. एकतर अनुल्लेखानं तरी मारायला हवं होतं किंवा त्यावर पॉझीटीव्ह स्पिन तरी हवा होता.

रावणा संदर्भात: रावण महज्ञानी, बुद्धीमान, वेदपारंगत होता पण आजही आपण रावण-दहन करतो आणि रामाची पुजा करतो. रावण मेल्याच्या दिवशी आपण आनंददिन साजरा करतो (सध्यातरी)
पण काय सांगावं, वरचे काही प्रतिसाद वाचले तर रावणाची जयंती आणि पुण्यतिथी ला शोक करणारी लोकं पण जन्माला येतील असं दिसतं आहे किंवा कदाचित आलीही असतील.

पेठकरांनी मला माझ्या वरील वाक्यातील चूक दाखवली... खरच..रावणाची जयंती आणि पुण्यतिथीला शोक करणारा एकच कसा असु शकेल..
वाक्य असं असायला हवं होतं..

पण काय सांगावं, वरचे काही प्रतिसाद वाचले तर रावणाची जयंती साजरी करणारी आणि पुण्यतिथी ला शोक करणारी लोकं पण जन्माला येतील असं दिसतं आहे किंवा कदाचित आलीही असतील.

माझा हा प्रतिसाद त्यांना उद्देशून नव्हता. हे पन लिहायचं राहिलं होतं.

भडकमकर मास्तर's picture

25 Apr 2008 - 8:12 am | भडकमकर मास्तर

परवा मी तुमचा लेख आवडला असा प्रतिसाद दिला होता.....तुमच्या अभ्यासाला सलाम असे म्हटले होते , याची आधी आठवण करून देतो....

परंतु काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात....
१. कोणत्या वर्तमानपत्रांनी तुमचा लेख रिजेक्ट केला , ही सांगणे टाळायला हवे होते....
२. मी सतत ३ आठवडे अगदी दिवस रात्र एक करून संशोधन करून काही लिहिले ते पुढे मांडत आहे
हे वाक्य टाळले असते तर बरे झाले असते... का सांगतो, कारण तुमच्या लेखाला त्यामुळे काहीच फरक पडत नाही पण लेखाला उत्तर सोडून भलत्याच प्रतिक्रिया येतात...

३.त्वेषाने लिहिताना आपण फार तलवारबाजी केली आहे , तुम्ही म्हणता, आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे ..तुमच्या या वाक्याचा मी निषेध करतो....तुमचे मत काहीही असले तरी सार्वजनिक फोरमवर समस्त मराठी बान्धवांना शिव्या दिल्याने तुमची तळमळ अधिक व्यक्त होते असे आपणास वाटत असेल तर प्रश्नच मिटला..... परंतु तसे जर वाटत नसेल तर मात्र आपण येथील समस्त मराठी बांधवांची माफी मागावी, असे मला वाटते....

आणि जो तुमच्या चुका दाखवेल तो औरंगजेबाचा मित्र
... असं गृहित धरायचं कारण नाही.... आता लगेच म्हणाल की मी कुठे तसे म्हणालो ? पण संयमित प्रतिसादांनासुद्धा पेटून उठून उत्तरे लिहिण्याची तुमची सवय मी वर पाहिली, त्यावरून असेच वाटते.......मला कृपया कोणीही औरन्गजेबाचा, रावणाचा, लोकसत्तेचा मित्र समजू नये.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Apr 2008 - 8:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सप्रे साहेब,
आपला लेख आवडलाच होता. पण आपल्या लेखाच्या निमित्ताने होणा-या चर्चेवरुन मात्र आपला तोल गेला असे वाटते. (आता तो कुठे कुठे गेला आम्ही दाखवत बसत नाही. )
वरील काही चर्चेतील मुद्यांना उत्तरे देतांना आपला संयम सुटल्यासारखा वाटला म्हणजे आपला विचार आपण लादण्याचा प्रयत्न केला.
एखाद्या अभ्यासकाने मेहनतीने लेख तयार केल्यानंतर त्यावर आलेल्या प्रतिक्रियांची उत्तरे ही वाचकांना आवडणारी नसली तरी विचार पटणारा असावा,विचार मुद्देसुद असला पाहिजे. असे असले म्हणजे त्या लेखाची, लेखकाची उंची वाढते असे आमचे मत आहे. अर्थात पेठकरसाहेबांचीच मते त्या तुलनेत आम्हाला अधिक पटलीत त्या तुलनेत आपण मुद्दे खोडण्याऐवजी लादत आहात असे वाटले. खरे तर इतिसातील मुडदे उकरुन त्यावर वर्तमानात वाद होऊ नये असे आमचे मत आहे. कोणी काय छापावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. अर्थात इतिहास बदलत असेल, इतिहास अधिक सत्याकडे जात असेल तर असा इतिहास आम्हाला वाचायला आवडतोच पण समाजात तेढ निर्माण करणा-या विचारापासून आम्ही कोसभर दूर राहू इच्छितो हेही आम्ही नम्रपणे नमुद करतो.

आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे.........या वाक्याचा आम्हीही निषेध व्यक्त करतो.

विसोबा खेचर's picture

25 Apr 2008 - 10:14 am | विसोबा खेचर

३.त्वेषाने लिहिताना आपण फार तलवारबाजी केली आहे , तुम्ही म्हणता, आप्ण सगळे मराठी GXXX फाटू आहोत हे वास्तव आहे ..तुमच्या या वाक्याचा मी निषेध करतो....तुमचे मत काहीही असले तरी सार्वजनिक फोरमवर समस्त मराठी बान्धवांना शिव्या दिल्याने तुमची तळमळ अधिक व्यक्त होते असे आपणास वाटत असेल तर प्रश्नच मिटला..... परंतु तसे जर वाटत नसेल तर मात्र आपण येथील समस्त मराठी बांधवांची माफी मागावी, असे मला वाटते....

भडकमकरांशी सहमत आहे.. उदयरावांनी माफी मागितल्यास बरं होईल...

तात्या.

आंबोळी's picture

25 Apr 2008 - 10:04 am | आंबोळी

कोणी काय XXXवे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे माझ्यामते मिसळपाववरील सर्वात विनोदी वाक्य आहे.
कारण प्रत्तेकजण हे वाक्य फेकुन समोरच्याला गप्प करत आसतो. पण वाक्य फेकताना हे विसरत आसतो की काय बोलावे/टंकावे हा समोरच्याचा प्रश्न आहे.
असो.
मुद्देसूद लिखाणामुळे पेठकरांचे म्हणणे जास्त भावले.
भावना योग्य असूनही , आकाण्ड्तांडव, चिडचिड, वैयक्तिक हल्ले यामुळे सप्रेंचे विचार लादल्यासारखे वाटतात. आणि त्यामुळेच वाचक विरोधी प्रतिक्रिया द्यायला उद्युक्त होतो असे वाटते.
बाकी चालू द्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Apr 2008 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणत्या दैनिकांनी कोणते लेख छापावेत आणि कोणते परत करावेत हा त्या त्या दैनिकांच्या विचारांचा प्रश्न आहे, असे असुनही
कोणी काय XXXवे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे माझ्यामते मिसळपाववरील सर्वात विनोदी वाक्य आहे.

हे विनोदी वाक्य असेल तर त्यात विनोद कुठे दडला आहे, ते जर स्पष्ट करुन सांगितले तर आम्हीही आपल्या विनोदी प्रतिसादाला दाद देऊ :)
पण वाक्य फेकताना हे विसरत आसतो की काय बोलावे/टंकावे हा समोरच्याचा प्रश्न आहे.

सहमत !!! कोणी काय लिहावे हा ज्याचा त्याचा प्रश्न नक्कीच आहे. पण काय लिहायचे आहे आणि काय लिहितो हे जर कळत नसेल तर अशा लिहिण्याला काहीच अर्थ नसावा असे वाटते.

आंबोळी's picture

25 Apr 2008 - 11:39 am | आंबोळी

शाळेत असताना विनोदाचे प्रकार शिकलो होतो. त्यातील विरोधाभासातून विनोद हा प्रकार फार आवडला. कारण दैनंदीन जीवनात हा प्रकार फार आढळतो.
"कारण प्रत्तेकजण हे वाक्य फेकुन समोरच्याला गप्प करत असतो. पण काय बोलावे/टंकावे हा समोरच्याचा(ज्याचा त्याचा) प्रश्न आहे." हा विरोधाभास दिसला म्हणून विनोदी म्हणालो.

बाकी
औरंगजेबाने वारसाहक्काच्या जेवढ्या लढाया केल्या नसतील तेवढ्या येथे त्याच्या नावाने येथे सुरु आहेत.
चालू द्या.

कधी कधी एकांगी विचार केला की साधकबाधक विचार आपोआपच मारले जातात. उदा घ्यायचे झाले तर नकळतच औरंगजेबाचे उदाहरण नजरेसमोर येत जाते.

१. अकबराच्या वेळेस हिंदु सरदारांची संख्या ६% होती, ती शहाजहानाच्या वेळेस १६ % झाली आणि औरंगजेबाच्या उत्कर्षाच्या काळी ३२% झाली. राजकारणाचा समतोल, स्पर्धा, कुरघोडी आणि विघटनाचा विचार केला तरी आपोआपच ( शिवाजी नसता तरी) हिंदुंचे सरदार अथवा साम्राज्य प्रबळ झालेच असते.

२. औरंगजेबापासुन किंवा त्याने भारतीय वंशाच्या लोकांचे राज्य ( मुसलमान अथवा हिंदु) असे स्थापन करण्याचा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे इराणच्या शहाशी त्याला सतत झगडावे लागले.

३. प्रचंड अंतर्विरोध : एकीकडे इस्लामचे राज्य स्थापायचे आणि दुसरीकडे कुतुबशहा, अदिलशहा इत्यादींना अदिलखान, कुतुबखान असे संबोधायचे, दुसरीकडे ही राज्य बळकावयची त्यासाठी भले परत हिंदुचे साह्य घ्यायचे. शहाजहानला कैद करायचे मात्र त्याला न मारता जीवंत ठेवायचे, दाराभाई, शुजा अणि मुराद यांची वाट लावायची, एकीकडे विस्तीर्ण साम्राज्य निर्मायचे आणि आपण मात्र काटकसरीने रहायचे.

असो.

एकदा काय झाले की औरंगजेबाला संगिताचे प्रचंड वावडे होते, तेंव्हा एका रात्री त्याला संगिता-वाद्यासह एक मिरवणुक जातांना दिसली, त्याने विचारले क्या जा रहा है, - त्याला सांगितले की संगितका जनाजा जा रहा है - अच्छा है- ऐसा दफनाओ की फिर बाहर कभी ना आये - सत्यस्थिती - आजही त्याच्या कबरीवर त्याच्या मृत्युतीथीला रात्र भर कवाली आणि भजनाचा कार्यक्रम होत असतो.

विजुभाऊ's picture

28 Apr 2008 - 3:46 pm | विजुभाऊ

( शिवाजी नसता तरी) हिंदुंचे सरदार अथवा साम्राज्य प्रबळ झालेच असते.
अरे वा.. हे नवे संशोधन....
आजही त्याच्या कबरीवर त्याच्या मृत्युतीथीला रात्र भर कवाली आणि भजनाचा कार्यक्रम होत असतो.
यालाच मेलेल्याला मारणे म्हणतात का?

कलंत्री's picture

29 Apr 2008 - 3:40 pm | कलंत्री

विजुभाऊ,

अहो, ३२ % सरदार आज नाही तर उद्या प्रबळः झाल्याशिवाय राहिले असते काय? त्यात संशोधनाची आवश्यकता आहे काय?

औरंगजेब आणि संगीत हेही एक वास्तव आहे.

शिवाजीचे मोठेपण मान्य आहेच पण त्याबरोबरही हिंदुचे असंख्य प्रयत्न चालु होते हे मान्य करायला काय हरकत आहे?

माझ्या मते कोणताही विचार कोणताही ग्रह न ठेवता केला पाहिजे.

कलंत्री

घाशीराम कोतवाल १.२'s picture

12 May 2008 - 3:38 pm | घाशीराम कोतवाल १.२

कुमार केतकर "मराठी" आहेत असे म्हणायची लाज वाटते आम्हास!

आरे पन तुम्हि का भाडताय

sandeshmule's picture

12 Sep 2017 - 12:47 am | sandeshmule

१२-जानेवारी-१६९८ रोजी जिद्दीचा जातिवंत ऊरस्फोड अर्थात् जिजाऊ सिंदखेड राजा येथे जन्माला आल्या !

येथे जन्मवर्ष १५९८ आहे. १६९८ नव्हे. चूक दुरुस्त करावी.

औरंगजेबाला असं दाखवणं हा ब्राह्मणी कावा आहे. खरा औरंगजेब हा महाराजांना सन्मान देणारा हुशार सम्राट होता. पाच हजारी मनसब दारी हा त्याचा पुरावा आहे. ब्राम्हणांनी औरंगजेबाला हिंदुविरोधी आणि म्हणून महाराजांना मुस्लिम विरोधी दाखवण्यासाठी या अफवा फैलावल्या. जहरी मनुवृत्ती च्या लोकांनी औरंगजेबाला नाहक बदनाम केले.