दाल पक्वान..
(मैद्यामधे,गरम तेल,मीठ,ओवा,थोडी पिठीसाखर याचा गोळा भिजवुन पुर्या लाटुन घ्या...)
(पुदिना, कोथिंबिर,मिरची आणि मीठ याची चटणी)
(हळद,मीठ,हिंग घालुन उकडव्लेली हरभरा दाळ)
गरज वाटली तर थोडा चाट मसाला आणि तिखट पण फवारले तरी चालते..
(चिंचेची चटणी)
(कांदा-टमाटा यापेक्षा बारीक चिरला तर अजुन छान लागतो.. ;) पण खायची घाई असेल तर काय..)
(पण नेहमीप्रमाणेच कोथिंबिर नसेल तर..
घरात सुगरण नसेल तर घराला काय अर्थ तसेच पदार्थावरील सुगरणीची पदवी कोथिंबिरीला बहाल..)
आणि त्यावर बारीक शेव...
मग गट्ट्म...
चला तर पुन्हा एकदा जिभल्या चाटुयात...
प्रतिक्रिया
12 Nov 2010 - 11:39 pm | विलासराव
कधी यावं खायला?
12 Nov 2010 - 11:46 pm | डावखुरा
कधीही...स्वागतच....
धन्यवाद विलासराव..
12 Nov 2010 - 11:53 pm | बेसनलाडू
चित्र पाहून तोंडाला पाणी सुटले. आता बनवून खायला लागेलच!
(हावरट)बेसनलाडू
13 Nov 2010 - 12:11 am | डावखुरा
धन्यवाद बेलाभाउ...
बेसनलाडु तुमचे नाव वाचुनच मला तोंडाला पाणी सुटते..
(खाद्यलालसा)
13 Nov 2010 - 1:01 am | नंदन
छान पाकृ. चित्रं पाहूनच तोंडाला पाणी सुटलं :)
13 Nov 2010 - 2:49 am | चित्रा
असेच म्हणते.
13 Nov 2010 - 10:01 pm | संदीप चित्रे
डिट्टो म्हणतो
13 Nov 2010 - 1:10 am | डावखुरा
धन्यवाद नंदनभाउ आता चव पण कशीय ते सांगा खाउन...
13 Nov 2010 - 1:59 am | प्राजु
वॉव!! वॉट्ट अ पिक्चर!!!
मस्त .. मस्त मस्त...!
13 Nov 2010 - 3:02 am | सेरेपी
दिसायला भल्यामोठ्ठ्या शेवपुरीसारखं दिसतंय (म्हंजे मला आवडणारच :-) )
13 Nov 2010 - 8:29 am | डावखुरा
धन्यवाद सेरेपी(माफ करा पण तै की भौ?)..भलीमोट्ठी शेवपुरी...वा काय रम्य कल्पना आहे...
प्राजुतै आणि चित्रातै धन्यु...
टीपःपुरी जरा कडक तळली जाण्यासाठी बारीक लाटुन झाल्यावर फुगु नये म्हणुन त्यावर जरा सुरीने चरे पाडुन घ्या...
खाद्यलालसा..
13 Nov 2010 - 8:40 am | पैसा
म्हणजे ही खरंच जायंट शेवपुरी वाटणार खाताना... मस्त!
13 Nov 2010 - 8:35 am | नगरीनिरंजन
कडक!!!
मस्त!!!!
जबरदस्त!!!!
13 Nov 2010 - 8:53 am | प्रचेतस
सुरेख.
दाल पकवान हा सिंधी पदार्थ आहे. सहसा महाराष्ट्रात बघायला मिळत नाही पण जिथे सिंधी वस्ती भरपुर आहे तिथे मात्र सर्रास याची हाटेलं आढळतात. पण शक्यतो सकाळीच मिळतो. उल्हासनगरात किंवा आमच्या पिंपरीत आलात तर जरूर हा पदार्थ खावयास मिळेल.
13 Nov 2010 - 10:22 am | प्राजक्ता पवार
एका सिंधी मैत्रीणीने कॉलेजमध्ये असतांना हा पदार्थ आणला होता. छानच लागतो चविला. आज पुन्हा त्याची आठवण झाली :)
13 Nov 2010 - 10:48 am | पिंगू
कधी बोलवतोयस हादडायला... मला शेवपुरी खूप आवडते...
- खादाड पिंगू
13 Nov 2010 - 7:41 pm | रेवती
आजकाल तुम्ही एकसे बढकर एक पदार्थ आणि फोटू देण्याचा दुष्टपण का करताय?;)
13 Nov 2010 - 8:46 pm | रामदास
उल्हासनगरला तीन नंबर कँपच्या चौकात गीता भवन नावाचे एक हॉटेल आहे तेथे उत्कृष्ट मिळतो. खिशाला परवडावा म्हणून छोटा पकवान आणि बडा पकवान अशा दोन नावानी मिळतो.
लालसा पांजो दोस्तार आहे .माडू सुठो आहे. लालसाके मुंजो खास अभिनंदन .
14 Nov 2010 - 12:40 am | चिंतामणी
पाकृ दिल्याबद्दल धन्यवाद.
पण चित्रात दाखवल्याप्रमाणे खातात का अशी शंका आहे. वल्लीनी उल्लेख केलेल्या पिंप्री कॅंपातील हाटेलात अनेकदा खाल्ले आहे. पण असे खात नाहीत.
14 Nov 2010 - 9:44 am | प्रचेतस
पकवान वेगळे व दाल वेगळी असेच मिळते. दाळीत मस्त कांदा-मिरची घातलेली चिंचेची चटणी खुमारी अधिक वाढवते.
14 Nov 2010 - 2:45 am | प्रभो
आमच्या ऑफिसमधल्या सिंधी मित्राच्या घरी हा पदार्थ खायला जायचो त्याची आठवण झाली. :)
14 Nov 2010 - 7:44 am | शहराजाद
अरेच्च्या, असं असतं काय दाल- पकवान! मी हा पदार्थ बाहेर कुठेच खाल्लेला नाही. माझ्याकडच्या एका पुस्तकातली पाक्रू वाचून मी अनेक वर्षं ते करत आले आहे, पण त्यात चित्र, खाण्याची पद्ध्त, पुरी कडक की मऊ इ काही दिलं नसल्यामुळे आम्ही पुर्या कुलचा/ भटूरा सारख्या करून छोले- भटूरे खातात तसं खात असू. तेही अत्यंत चविष्ट लागतं, पण ही पद्धत आज कळली.
14 Nov 2010 - 10:48 am | निवेदिता-ताई
मी कधीच हा पदार्थ खाल्ला नाही...करुन पाहीन...छान वाटतोय !!!!!!!!!
14 Nov 2010 - 11:17 am | कुक
मधली क्रुती दाल पक्कन सोबत खालीत काय?
16 Nov 2010 - 5:07 am | शुचि
एकदम भारी!!! जीवघेणा फोटो.
16 Nov 2010 - 11:58 am | मस्त कलंदर
हा खास सिंधी पदार्थ. माझ्या सिंधी मैत्रिणीनं सांगितलं की हे पकवान खास आदल्या दिवशी केलं जातं आणि मग दुसर्या दिवशी मस्त आडवा हात मारायचा. आणि वरती कुणी म्हटलंय तसं धाग्यात दिलेल्या पद्धतीनं हे खाल्लं जात नाही. डाळ, त्यात चिंचेची आंबटगोड चटणी आणि वरून कांदा. आठवणीनेच तोंडाला पाणी सुटलं!!! :-)
सिंधी नसलेल्या किंवा उल्हासनगरमध्ये न राहणार्या लोकांसाठी: शीव(सायन)ला एस.आय.इ.एस. कॉलेजजवळ गुरूकृपा नावाचे एक हॉटेल यासाठीच प्रसिद्ध आहे. फक्त सकाळी ९-१० वाजेपर्यंत गेलं तरच दाल पकवान मिळतं नाहीतर मग ती तहान दाल-समोशावर भागवावी लागते. चेंबूरला दोन 'झामा स्वीटस' ची दुकानं आहेत. तिथेही हा पदार्थ मिळतोच मिळतो.
16 Nov 2010 - 12:07 pm | परिकथेतील राजकुमार
कृपया लालसा ह्यांचे सदस्यत्व रद्द करावे.
धन्यवाद.
अवांतर :- वरती काही तरुणींनी (?) बळच आपल्याला सिंधी मित्र मैत्रिणी आहेत हे दाखवण्याच केलेला केविलवाणा प्रयत्न बघुन फिस्सकन हसायला आले.
17 Nov 2010 - 12:12 am | शुचि
वा वा वा अशी तरुणी उपाधी मिळणार असेल तर मी देखील वर उपप्रतिसाद देते खोटा खोटाकी माझी एक सिंधी मैत्रिण आहे म्हणून ;)
17 Nov 2010 - 11:08 am | परिकथेतील राजकुमार
शुची मामी अहो तरुणी ह्या शब्दापुढचा (?) बघितला नाहीत का? ;)
16 Nov 2010 - 2:12 pm | आजानुकर्ण
पिंप्री क्यांपात एका हॉटेलात हा पदार्थ चाखून पाहिला आहे. जबरदस्त पाककृती.
16 Nov 2010 - 8:21 pm | स्वाती दिनेश
मस्तच दिसते आहे,करुन पाहिले पाहिजे.
स्वाती
17 Nov 2010 - 12:18 am | चिंतामणी
फटुत दिसते तशी (म्हणजे शेवपुरीसारखी) ही पाकृ नसते. वाटीत दाल, त्यात कांदा आणि चिंचेची चटणी असते. आणि पकवान वेगळे देतात डिशमधे.
17 Nov 2010 - 9:53 am | डावखुरा
प्रभो,प्राजक्तातै,चित्रातै,संदीप चित्रे भौ.... धन्यु..
पैसाताई जायंट शेव्पुरी ही कल्पनाच भारीये..आणि खायला खुप छान वाटते..
प्राजुतै..., नगरीनिरंजन भाउ धन्यवाद...लई भारी प्रतिक्रिया....
वल्ली तै माहितीबद्दल धन्यवाद..मी पण उल्हासनगरचं दाल पक्वान चा चाहता..
खादाड पिंगू..कधीही या घर आपलंच..आहे.
रेवतीतै ईनो संपला का? ;)
रामदास काका धन्यु..(लालसा पांजो दोस्तार आहे .माडू सुठो आहे. लालसाके मुंजो खास अभिनंदन .)पण हे काय आहे मराठीत पण समजवाना...
वल्लीजी आणि चिंतामणी काका अहो सगळे पदार्थ तेच आहेत फक्त सुटसुटीत मांडली आहे..खायला सोपी ..पहायला भारी..(त्याचे काय आहे..आई एका खुप दिवसां पुर्वी एका सिंधी मैत्रीणीच्या घरी भिशी(ती भिशी खरी आम्हा खवैय्यांसाठी पर्वणीच ठरली) साठी गेली होती तेव्हा तिथे अशाच प्रकारे सर्व्ह केले होते..आणि त्यानंतर ..घरी छोटासा कार्यक्रम ठेवला होता..प्रत्येकाला वेगळे देत बसण्यापेक्षा सगळे मस्त मसाला पापड सारखे मांडुन देउन पाहिले....)तुम्ही म्हण्ता तशी पण पाककृती द्या की ती पण ट्राय करु..
स्वाती तै...निवेदिता-ताई , शहराजाद्तै...धन्यवाद..
कुक भाउ कोण्त्या कृतीबद्दल बोलत आहात मला तर तसे काही वाटत नाहीये तरी काही कमी असेल तर कृपया सांगण्याची तसदी घ्या... धन्यु..
शुचि तै जरा सांभाळुन प्रतिक्रिया द्या..मला तर माझ्या आय्डीचा जीव जायची धमकी मिळालीय.. ;)
उपप्रतिसादाच्या प्रतिक्रियेसाठी :)
मस्त कलंदर..चांगलेच खवय्ये दिसतात हो तुम्ही..तुम्ही सांगितलेल्या ठिकाणांवर जाउन चव घेउन पाहील नक्किच..माहितीबद्दल मंडल आपले आभारी आहे..
पराभाऊ मांडवली नाही होणार का?
आजानुकर्ण काभॉ..?(अश्लील)
सगळ्या प्रतिक्रिया देणार्या मिपाकरांचे हार्दिक धन्यवाद..
17 Nov 2010 - 9:56 am | डावखुरा
प्रकाटाआ
17 Nov 2010 - 11:05 am | विसोबा खेचर
वा..!
17 Nov 2010 - 1:18 pm | डावखुरा
धन्यवाद तात्या...
17 Nov 2010 - 11:51 am | गवि
छान..
धुळ्यात खाल्याचे आठवते.
तिथे खाखरावजा पदार्थावर उसळ (मिसळीत असते तशी) घालून दिले होते.
आवडले नाही.
तुमचा पदार्थ डाळीमुळे वेगळा दिसतोय आणि आता ट्राय केलाच पाहिजे.
फोटो आणि लेख दोन्ही आवडले.
17 Nov 2010 - 1:17 pm | डावखुरा
गगनविहारी धुळ्यात?
धुळ्यात तर मी चेतना सोडुन कुठेच खाण्याचा विचार करत नाही...
हा पदार्थ नक्कि आवडेल करुन पहा मग सांगा..प्रतिक्षेत..
25 Nov 2010 - 6:22 am | गवि
ते चेतना कुठे आहे प्लीज सांगा हो.धुळे म्हणजे एरव्ही खाण्याची मारामार आहे.आजीच्या हातच्या मेजवान्या तिथेच झोडल्या. आता आजी गेली. कोणीच राहिले नाही. घर उघडतच नाही. लॉजवर राहतो. एकटेच शेतजमिनीच्या कामासाठी जाणे इतकेच हल्ली होते. उभ्या उभ्या गरम कचोरी खाऊन घेतो.रात्री रस्त्याकडेला शेवभाजी चपात्या खातो. चांगली ठिकाणे सांगितल्यास उपकृत.
Will surely try this reipe.
25 Nov 2010 - 3:17 pm | आचारी
च्य मारि आज नेमका उपवास बाकि डिश एकदम भारी
25 Nov 2010 - 5:59 pm | डावखुरा
उद्या करुन खा...आणि नक्कि सांगा कसे झाले होते ते..
10 Dec 2010 - 7:25 am | निनाद मुक्काम प...
@शीव(सायन)ला एस.आय.इ.एस. कॉलेजजवळ गुरूकृपा नावाचे एक हॉटेल यासाठीच प्रसिद्ध आहे. फक्त सकाळी ९-१० वाजेपर्यंत गेलं तरच दाल पकवान मिळतं नाहीतर मग ती तहान दाल-समोशावर भागवावी लागते. चेंबूरला दोन 'झामा स्वीटस' ची दुकानं आहेत. तिथेही हा पदार्थ मिळतोच मिळतो.
स्वामी विवेकानंद चेंबूर हे आमचे १२ पर्यत कॉलेज सगळा जमावडा सिंधी नि पंजाबी .कुर्ल्याव्रून रिक्षा केवळ १५ मिनिटे
माझ्या मते जामाची गोड बिर्याणी फेमस आहे व बाजूच्या दुकानात दल पकवान व ताक लस्सी अप्रतिम बाकी बाजूचे राज माहितच असेल
मुंबई कसब असो नाही तर पूर २४ तास हि मधुशाला उघडी .
त्याची बिर्याणी म्हणजे याव रे याव
समोरच एका धाब्यावर पराठे अप्रतिम राज मधून सकाळी सात वाजता अपेय पानाचा काम संपले कि (शिंचे कोबडे अमळ जास्तच लवकर ओरडले असे मनाशी संवाद साधून दाल पकवान ख्यायाचे किंवा चेंबूर नाक्यावरची
भटाची झणझणीत मिसळ .