मुखपृष्ठाकरता शब्दांकन हवे आहे, चित्रसंकलन करून हवे आहे..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
30 Oct 2010 - 4:31 pm
गाभा: 

राम राम मिपाकरहो,

योगेश यांनी मिपावर लिहिलेल्या सिंहगडावरची खादाडी या लेखावर आधारीत छानसे मुखपृष्ठ बनवायचे आहे..

आपल्याकडे अनेक संगणक करामती तज्ञ आहेत, त्याच प्रमाणे शब्दप्रभूही आहेत.

मिपावरील कुणी संगणक करामती तज्ञ संकलक मला सदर लेखातील सार्‍या चित्रांचे छानसे एकत्रित संकलन करून देईल का? संकलन करून त्याची एकच जेपीजी बनवून द्यावी.. उदाहरणादाखल मी एक संकलन केले आहे. ते येथे पाहता येईल..

त्याच प्रमाणे मिपावरील कुणी शब्दप्रभू त्या चित्राचे ८-१० ओळीतले समर्पक, खुमासदार वर्णन करून देईल का?

योगेशने आपले काम केले आहे. आता बाकी मंडळींच्या मदतीने एक चांगलेसे मुखपृष्ठ तयार करुया.. :)

करणार का मदत? वाटल्यास ही स्पर्धा समजा..!

ज्याला/जिला चित्राचे संकलन करता येईल त्याने/तिने चित्राचे संकलन करावे. ज्यांना ते जमणार नाही त्यांनी काही खुमासदार ओळी लिहायचा प्रयत्न करावा..

जे चित्र व ज्या ओळी मला पसंत पडतील त्यानुसार मी मुखपृष्ठ बनवेन व योगेशसोबत संबंधित नावेही 'सौजन्य' अंतर्गत मुखपृष्ठावर टाकेन..

चला तर, कृपया कामाला लागा..

आपला,
(मराठी संस्थळांवर मुखपृष्ठाची कल्पना सर्वप्रथम मांडून ती राबवणारा) तात्या.

प्रतिक्रिया

तुम्हाला mail करायची का ती JPEG file ?

विसोबा खेचर's picture

30 Oct 2010 - 4:37 pm | विसोबा खेचर

व्य नि ने पाठवा किंवा जाहीरपणे येथे प्रतिसादात डकवा..

काहीही चालेल..

तात्या.

प्रियाली's picture

30 Oct 2010 - 4:42 pm | प्रियाली

चित्रांसाठी गरज लागते आहे हे ठीक हो पण संकलनासाठी इतरांची मदत तुम्हाला का पडावी, शब्दप्रभू?

शब्दप्रभू हे विशेषण आवडले. :)

विसोबा खेचर's picture

30 Oct 2010 - 4:53 pm | विसोबा खेचर

संकलनासाठी इतरांची मदत तुम्हाला का पडावी, शब्दप्रभू?

पहिली गोष्ट म्हणजे मी शब्दप्रभू नाही.. मिपावरचा मी एक कडमड्या लेखक आहे! :)

एकवेळ त्या धाग्यातील चित्रांना, मुखपृष्ठाला साजेसं मी काही लिहिलंही असतं, तसा प्रयत्नही करून पाहिला परंतु त्या धाग्यातील चित्रं इतकी भन्नाट आहे की बोल्तीच बंद होते.. :)

म्हणून आज मी मग यशोधराने काढलेलं एक चित्र मुखपृष्ठावर टाकलं आहे व त्याला समर्पक काही ओळी लिहिल्या आहेत..

पण योगेशच्या त्या लेखातील चित्रं अशक्य आहेत.. :)

प्रियाली, तू करशील का प्रयत्न? पण तुला जळ्ळं त्या भुताखेतांशिवाय दुसरं काही लिहिता येत नाही.. :)

तात्या.

प्रियाली's picture

30 Oct 2010 - 5:19 pm | प्रियाली

तुला जळ्ळं त्या भुताखेतांशिवाय दुसरं काही लिहिता येत नाही..

सिंहगडावर भुतं दिसली असतील तरच मीही लिहिते. ;)

यशोधरा's picture

1 Nov 2010 - 12:21 pm | यशोधरा

>म्हणून आज मी मग यशोधराने काढलेलं एक चित्र मुखपृष्ठावर टाकलं आहे >>

हायला हे कधी झालं? मलाच बघायला नाही मिळालं!..
तात्या, धन्यवाद.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

30 Oct 2010 - 5:13 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

सिंहगडावरचा रानमेवा

दाटलेले ढग्..ओलेता दरवळ..
अधुन मधुन झरझरत्या ..रेशिम सरी..
सिंहगडावरचा रानमेवा...चाखा कधी तरी.....

नुकतीच कापलेली कोवळी काकडी
त्यावर तिखट मिठाची सुरेख रांगोळी...
तशीच तिखट मिठ ल्यायलेली कच्ची कैरी
... गडावरच्या मेव्याची चवच न्यारी...

शेंगा,आवळे ,चिंचा अन बोरं द्रोणातली ..
आंबट गोड अन किंचित मीठ लावलेली
तोंडात टाकताच अगदी लहानपणीची "बाळवाटी "आठवली..
... रानमेव्याची आठ्वण जिभेवर दाटली......

खमंग दरवळणारी खेकडा भजी..
त्यावर झटका देणारी तळलेली मिरची....
.... अन जिभेवर आणि पोटावर माया करणारे मस्त दही..
..जगात रानमेव्याच्या तोडीचं आहे का काहि?

गरम गरम पिठलं अन भाकरी...
चवीला खर्डा लागतो "जिव्हा"री
दह्याचा थंडावा ...माधुर्याचा शिडकावा..
..या अनुभवूया सिंहगडावरचा रानमेवा.....

ता.क. अर्र्र्र्र्र्... ओळी जास्त झाल्या कि....जाउ दे! :)

शुचि's picture

31 Oct 2010 - 8:14 pm | शुचि

छान ग जाई.

विसोबा खेचर's picture

31 Oct 2010 - 8:40 pm | विसोबा खेचर

मस्त लिहिलं आहे.. अजून थोडं शॉर्ट हवं असं वाटतं..

तात्या.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

31 Oct 2010 - 9:30 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

दाटलेले ढग्..ओलेता दरवळ..
अधुन मधुन झरझरत्या ..रेशिम सरी..
सिंहगडावरच्या रानमेव्याची लज्जतच न्यारी

ताज्या काकडी अन कैरीवर तिखट मिठाची सुरेख रांगोळी...
शेंगा,आवळे ,चिंचा अन बोरं द्रोणातली ..आंबट गोड अन किंचित मीठ लावलेली
तोंडात टाकताच अगदी लहानपणीची "बाळवाटी "आठवली..
... रानमेव्याची आठ्वण जिभेवर दाटली......

खमंग दरवळणारी खेकडा भजी अन तळलेली मिरची....
खर्डा पिठलं अन भाकरी...दह्याचा थंडावा ...माधुर्याचा शिडकावा..
..या अनुभवूया गडावरचा रानमेवा.....

विसोबा खेचर's picture

31 Oct 2010 - 9:37 pm | विसोबा खेचर

ओक्के..! :)

आता चित्र पाठवा..

मनापासून आभार..

तात्या.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

30 Oct 2010 - 5:05 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

झाला कि टाकेन!