सिंहगडावरची खादाडी

योगेश२४'s picture
योगेश२४ in कलादालन
6 Oct 2010 - 10:41 am

छायाचित्रण

प्रतिक्रिया

योगेश तोंडाला पाणी सुटल.

विसोबा खेचर's picture

6 Oct 2010 - 11:02 am | विसोबा खेचर

सगळा प्रकार असह्य आहे..योगेशराव, मी आपला निषेध करतो..! :)

शिवरायांच्या लाडक्या तानाजीला मानाचा मुजरा..!

तात्या.

--
प्रसिद्ध मुलाखतकार, नाट्य अभिनेत्री, सूत्रसंचालक, कथ्थक नृत्यांगना, स्तंभलेखिका आणि माझी मैत्रीण संपदा जोगळेकर-कुलकर्णी हे माझ्या 'गुण गाईन आवडी..' मधील आगामी व्यक्तिचित्र असून लौकरच मिपावर येईल..

सुत्रधार's picture

6 Oct 2010 - 11:13 am | सुत्रधार

अयय्यो,
भज्याची आठवण का करुन देता? आता सहीत लिहण बन्द.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Oct 2010 - 11:46 am | परिकथेतील राजकुमार

शॉल्लेट !

फोटु बघुन आत्मा तृप्त झाला.

विजुभाऊ's picture

6 Oct 2010 - 1:01 pm | विजुभाऊ

फोटु बघुन आत्मा तृप्त झाला.

हम्म पर्‍या पितृ पक्षात ही भाषा योग्य नव्हे.
बाकी ते फोटो येकदम बेष्ट रे भाव

श्रावण मोडक's picture

6 Oct 2010 - 11:49 am | श्रावण मोडक

हा धागा उडवा... ;)

मिसळभोक्ता's picture

6 Oct 2010 - 10:50 pm | मिसळभोक्ता

एवढेच नाही, तर योगेशरावांचा आयडी ब्लॉक करावा, ही नम्र विनंती.

योगेश, कुठे फेडशील हे पाप?

गणपा's picture

6 Oct 2010 - 12:55 pm | गणपा

निषेध ! निषेध !! निषेध !!!
दुष्ट कुठला.

सहज's picture

6 Oct 2010 - 1:00 pm | सहज

छळ आहे!

प्रियाली's picture

6 Oct 2010 - 5:17 pm | प्रियाली

छळच आहे. :(

तोंडाला पाणी सुटले आहे. आता सिंहगडवारी करायला पाहीजे.

- सूर्य.

प्रकाशचित्रांतल्या सौंदर्याला कसलाही धक्का न देता टाकलेले वॉटरमार्क फार छान वाटले.
वॉटरमार्क कसे आसावेत हे दाखवुन दिल्या बद्दल धन्यवाद :)

असेच म्हणतो. उत्तम उदाहरण.

पण तरी हे जे जुलूम चालवले आहेत त्याबद्दल निषेध नोंदवल्याखेरीज राहणार नाही! ;)

भडकमकर मास्तर's picture

6 Oct 2010 - 5:53 pm | भडकमकर मास्तर

काय फोटो राव.. अहाहा.. तोंडास पाणी सुटलेच..
आणि वॉटरमार्काबद्दल सहमत.... अजिबात विरस होऊ न देता टाकलेली पाणीखूण

जेवणाच्या वेळी असे फोटु पहावेत, म्हणजे भूक वाढते म्हणतात.
बाकी फोटु सही !

च्यायला , ह्या योगेशच्या त

बिपिन कार्यकर्ते's picture

6 Oct 2010 - 5:15 pm | बिपिन कार्यकर्ते

पहिला फोटो बघून मी वारलो आहे त्यामुळे बाकीचे पदार्थ आमच्या कावळ्याला खायला घालावेत नाही तर मिपावर भुताटकी येऊन या योगेश२४ आयडीचे सगळे या आधीचे आणि या नंतरचे धागे, प्रतिसाद, खरडी, व्यनि आपोआप डिलिट होईल.

धन्यवाद.

शेवट्चे तीन फोटो बघुन तोंडाला पाणी सुटलेय अक्षरशः

अनिल हटेला's picture

6 Oct 2010 - 7:11 pm | अनिल हटेला

मी धागा उघडलाच नाही ,त्यामुळे जलजळ वगैरे होण्याचा प्रश्णच उद्भवत नाही....

:-)

योगेश२४'s picture

6 Oct 2010 - 10:24 pm | योगेश२४

सगळ्यांच्या "प्रेमळ" प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

बेसनलाडू's picture

6 Oct 2010 - 10:25 pm | बेसनलाडू

लाळ टपकते आहे!!
(खवय्या)बेसनलाडू

अरेऽऽऽ! याला कुठेतरी नेऊन धो धो धुलाई करा याची... ;)

अशक्य आहे हा धागा..

हे वागणं शोभतं का हो? आँ?;)
जाऊ दे! हा धागा मी पाहिलाच नाही! प्रश्न संपला.

नावातकायआहे's picture

7 Oct 2010 - 2:01 am | नावातकायआहे

फोटो दिसतच नायत ;-)

राजेश घासकडवी's picture

7 Oct 2010 - 2:01 am | राजेश घासकडवी

लाळ सुटण्याच्या बाबतीत सर्वांशी सहमत. आपण कशी मज्जा केली हे दाखवून लोकांना जळवण्याच्या हीन प्रकाराबद्दल इतरांप्रमाणेच निषेध.

मात्र तांत्रिक बाबी इतक्या सुंदर सांभाळल्या आहेत की त्या न जाणवता केवळ आतला ऐवजच डोळ्यावर येतो याबद्दल हॅट्स ऑफ. पहिल्या चित्रात उन्हातल्या शेंगा छान दिसतात, पण दुसऱ्या चित्रातल्या (पावसाळी ढगाळ हवेत दिसणाऱ्या) अधिक आवडल्या. आवळ्यांच्या फोटोला त्यातल्या सुरीच्या तीखटमीठवाल्या टोकाने बहार आली आहे. काकड्यांचा फोटो लाजवाब. अननस, कणसं आणि भजीही आवडली. ताटांमधल्या मांडणींची चित्रं तितकीशी आवडली नाहीत. ती इतर फोटोंना पूरक म्हणूनच छान वाटतात.

असेच छान छान फोटो काढत रहा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Oct 2010 - 11:32 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ताटाच्या फोटोत चटई धूसर केली असती किंवा काळा रंग मारला असता तर आणखी मजा आली असती.
फोटो सुंदरच आहेत. वॉटरमार्कबद्दल गणपाशी सहमत.

योगेशचा आयडी ब्लॉक करण्यालाही सहमती.

चित्रा's picture

7 Oct 2010 - 6:54 am | चित्रा

सर्वांचे बोलून झाले आहे, तेव्हा अजून काय बोलणार?

ते तिखटमीठ घातले आहे ते आमच्या जखमांवर चोळण्यासाठी असावे.

आंसमा शख्स's picture

7 Oct 2010 - 7:06 am | आंसमा शख्स

सगळे चांगले फोटो. शेवटचे जेवणाचे फोटो आवडले. भाकरी आणि पिठले. बेस्ट असते.

योगेश२४'s picture

7 Oct 2010 - 8:39 am | योगेश२४

किती त्या सुंदर सुंदर प्रतिक्रिया ;-)
फोटो दिसतच नायत>>>> :) :)

गांधीवादी's picture

7 Oct 2010 - 8:44 am | गांधीवादी

फोटो आवडले,
आम्ही सिंहगडाच्या वार्या नेहमीच करत असतो, महिन्य्तून एकदाका होईना तिथे जाने होतेच, त्यामुळे जळजळ झाली नाही.
कधीही हुक्की आली कि संध्याकाळी ४ ला गाडीला किक मारून ५, ५.३० पर्यंत सिंहगडावर. मग तिथे ५०-६० रुपयांत तिघांचे पोट भरून झाले कि परत रवाना. देव टाकीचे पाणी काय सांगू ? झक्कास.
बाकी आम्ही पण पुढे मागे DIGITAL CAMERA घेतला कि अशेच फोटो टाकू.

डावखुरा's picture

7 Oct 2010 - 12:12 pm | डावखुरा

खरंच गांधीवादी...
सग्ळ्यांच्या ईतक्या ज्वलंत प्रतिक्रीया{मी पण अपवाद नाहीच्चे मुळी}

गांधीवादी's picture

7 Oct 2010 - 12:42 pm | गांधीवादी

अहो लालसा ताई, जे सात समुद्र पलीकडे बसले आहेत त्यांनाच जाणवते अशी जळजळ.
आम्हाला परदेशी वर्णन ऐकून जळजळ होते. जे तिथे आहेत त्यांना इथली ओढ, जे इथे आहेत त्यांना तिथली ओढ. चालायचंच.

ब्रिटिश टिंग्या's picture

7 Oct 2010 - 12:54 pm | ब्रिटिश टिंग्या

शन्वारी शिंगडला जातोय....कुणी येतयं बरोबर?

ब्रिटिश टिंग्या's picture

7 Oct 2010 - 12:54 pm | ब्रिटिश टिंग्या

शन्वारी शिंगडला जातोय....कुणी येतयं बरोबर?

गांधीवादी's picture

7 Oct 2010 - 12:59 pm | गांधीवादी

तू म्होरं व्हो, मी तिकडेच भेटतो.
तुझ्याकडे DIGITAL CAMERA आहे काय ?

१ नंबर फोटोज. सर्वच छान आले आहेत. थिम पण आवडली.

धनंजय's picture

8 Oct 2010 - 3:41 am | धनंजय

उत्तम तंत्र

मदनबाण's picture

31 Oct 2010 - 9:35 pm | मदनबाण

अप्रतिम... :)

संजय अभ्यंकर's picture

31 Oct 2010 - 10:29 pm | संजय अभ्यंकर

प्रचंड निषेध!
निषेधाला शब्द अपूरे आहेत.

बोरे पाहून तोंडाला पाणी सुटले.