मासे १५) बला

जागु's picture
जागु in पाककृती
30 Oct 2010 - 1:19 pm

बला म्हणजे वाकटीचाच मोठा प्रकार. म्हणजे सिनियर वाकटी म्हणा हव तर. हा बला २ फुटा पेक्षा मोठाही असतो.
बल्याचे कालवण चांगले लागत नाही. तो तळूनच चांगला लागतो.

साहित्य :
बला (१ बला भरपुर होतो)
हिंग
हळद
मिठ
मसाला
लसुण पाकळ्या ठेचुन
तेल

कृती :
प्रथम बल्याचा किनारीचा पिसारा ओढून काढायचा. मग त्याचे डोके व शेपुट काढुन तुकडे करायचे व स्वच्छ धुवायचे.
धुतलेल्या तुकड्यांना मिठ, मसाला, हिंग, हळद चोळून घ्यायचे. तव्यावर तेल सोडून त्यात ठेचलेल्या लसूण पाकळ्या सोडून तुकड्या तळण्यासाठी टाकायच्या.

मिडीयम गॅसवर ठेवुन ५ मिनीटांनी पलटी करुन पलटी बाजू शिजल्यावर गॅस बंद करायचा. नेहमीचच हो हाय काय नी नाय काय ? झाल्या तळलेल्या तुकड्या तयार. काय पाहुनच भुक लागली की नाही ?

अधिक टिपा :
लसूण मसाल्यासोबतच मिक्स केला तरी चालतो. किंवा आललसुण पेस्ट लावली तुकड्यांना तरी चालते. पिठ किंवा रवाही लावु शकता तुकड्या तळताना.

प्रतिक्रिया

जागुचे धागे हेच "बला" असतात.. :)

विसोबा खेचर's picture

30 Oct 2010 - 1:26 pm | विसोबा खेचर

मस्त..!

स्मिता_१३'s picture

30 Oct 2010 - 1:27 pm | स्मिता_१३

मस्तच !

परिकथेतील राजकुमार's picture

30 Oct 2010 - 1:51 pm | परिकथेतील राजकुमार

आम्ही आपले हा प्रयोग घोसावळ्यावर करुन बघु :)

स्पा's picture

30 Oct 2010 - 1:58 pm | स्पा

हे हे हे .................

:)

जागु's picture

30 Oct 2010 - 2:12 pm | जागु

अवलिया, विसोबा, स्मिता धन्स.
राजकुमार त्यापेक्षा पडवळावर का नाही करत ? तसेच आणी लांबी पण तेवढीच असते म्हणुन म्हटल. आणि करुन लवकर स्पांना पाठवा. वाट पाहतेत ना.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Oct 2010 - 2:46 pm | परिकथेतील राजकुमार

राजकुमार त्यापेक्षा पडवळावर का नाही करत ? तसेच आणी लांबी पण तेवढीच असते म्हणुन म्हटल.

आयला ! त्याला पडवळ म्हणतात का? प्रतिक्रीया लिहिताना तेच डोळ्यासमोर होते पण नाव चुकले.
धन्यु धन्यु.

स्पा's picture

30 Oct 2010 - 2:15 pm | स्पा

मला घोसाळ वगेरे नकोय...................

.....

मला " बला " हवाय.. तुमच्याकडून...

(चायला lunch time ला असं काहीतरी बघितलं कि हालत खराब होते )

असुर's picture

1 Nov 2010 - 5:22 pm | असुर

>>> चायला lunch time ला असं काहीतरी बघितलं कि हालत खराब होते <<<
काय राव स्पा तुम्ही पण, पाहूनच हालत खराब होणार असेल तर खाऊन काय होईल?? एकदम डिटॉक्स इफेक्ट का? :D

जागुतैने केलेले पदार्थ (स्वत: करुन खाल्ले तरीही) बाधत नाहीत असा अनुभव आहे. त्यामुळे बिनधास्त!

त्यातूनही गरज लागलीच तर एखादी जेलुसिल आणि इनोची 'छोती बातली' राहू द्या बरोबर!! :D

-असुर

सहज's picture

30 Oct 2010 - 2:22 pm | सहज

ईल (eel) किंवा उनागी (जपानी) म्हणायचे का?

प्रियाली's picture

30 Oct 2010 - 4:10 pm | प्रियाली

ईलसारखा काहीतरी प्रकार वाटला.

चित्रा's picture

30 Oct 2010 - 5:28 pm | चित्रा

मलाही.

जागु यांचे सातत्य पाहून अतिशय कौतुक वाटते.

जागु's picture

30 Oct 2010 - 3:15 pm | जागु

स्पा तुमची पोस्ट राजकुमारजिंच्या पोस्ट खाली होती म्हणून मला तस वाटल. बर या मग बला खायला.

राजकुमारजी अस काही करु नका हो जरा सांभाळून.

सहज ह्याला बलाच म्हणतात.

स्पा's picture

30 Oct 2010 - 3:21 pm | स्पा

अवश्यम...................... :)

पण " परा" च्या हातची...... "पडवळ" डीश सुद्धा खायला आवडेल....... :)

मासळी गोळा करताना क्वचीत एखाद्या वेळी ही बला मिळायची पण काटा लागेल ह्या भितीने एखाद्या मोठ्या बाप्याला गोळा करायला सांगायचो.

chipatakhdumdum's picture

31 Oct 2010 - 3:36 pm | chipatakhdumdum

बळा असा उच्चार करतात.

बळयाचेच बल्यात रुपांतर झाले असेल. पण आमच्याकडे बलाच म्हणतात सगळे.
रामदास कित्ति छान तुम्हाला मासे पकडायला मिळायचे ते. मला खुप इच्छा आहे अजुनही एकदातरी अशी जाळी किंवा आसु घेउन मच्छी पकडायची.

कल्याण - ठाकुर्ली च्या मध्ये रेल्वे रुळांच्या बाजूला पूर्वी जी शेत होती त्या शेतांमध्ये आम्ही पावसाळ्यात मासे पकडायचो....

बहुतेक वेळा " मुशी " मिळायचे..... सोबतीला खेकडे पण असायचेच....
मग रात्री मित्राच्या घरी त्याची आई " आगरी" पद्धतीने जेवण बनवायची ,,,
आणि मस्त ते जेवण डब्यात घालून आम्ही परत...... त्या शेतात, अंधारात जायचो...
सोबतीला ब्रेड किंवा भाकऱ्या असायच्याच......

सोलिड धमाल यायची.......

स्पा. किती छान असतात ह्या आठवणी.

स्पा's picture

1 Nov 2010 - 11:53 am | स्पा

खरय......................

आता सगळ्या आग्र्यांनी ती शेतं विकून टाकली आहेत.....

आणि त्या जागी मोठी मोठी complex उभी राहिली आहेत........................

खूप मिस करतो ते दिवस........................... ;(

स्पा आमच्याकडच्यापण बर्‍याच खाड्यांना आता भराव पडला आहे. खुप वाईट वाटत. मागिल वर्शी पर्यंत त्या खाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी हिवाळ्यात भक्ष पकडण्यासाठी यायचे. फ्लेमिंगोचा थवाही यायचा. पण आता सगळ बंद झाल.

प्रशांतकवळे's picture

1 Nov 2010 - 4:20 pm | प्रशांतकवळे

ह्या माशाला "बगा" पण म्हणतात.

आजकाल ह्या माशाची निर्यात खुप होते म्हणतात; विशेषतः जपानला (माहिती - काही कोळी मित्र)

थोडी चिंच लावली तर अजून चव येते आणी माश्याचा वास पण कमी येतो.

प्रशांत

चारु राऊत's picture

10 Dec 2017 - 7:53 pm | चारु राऊत

ह्या माशाला "बगा" असेच म्हनतात बला हे चुकिचे नाव आहे

चारु राऊत.
वरसोलि

नाही आमच्याइथे बलाच म्हणतात. गावाप्रमाणे नाव बदलतात.

काटेरी मासे खाणे हि एक "बला" असलेलया माझ्या सारख्याला "फिश फिले" चाच आधार :)

परंतु पाकृ वाचून तोंपासु हेवेसांनलगे.