चकली भाजणी---

निवेदिता-ताई's picture
निवेदिता-ताई in पाककृती
29 Oct 2010 - 12:19 pm

साहित्य-- एक किलो तांदूळ, अर्धा किलो चना डाळ, पाव किलो उडीद डाळ, वाटीभर पोहे, एक डाव धने, एक डाव जिरे.

कॄती----- तांदूळ व चना डाळ धुवून पसरुन ठेवावी, जरा वाळत आली की भाजायला घ्यावी,
मुठ शेकी ( म्हणजे भाजणी खमंग न भाजता त्यातून चांगल्या गरम वाफ़ा येउ लागल्या की भाजणे बंद करावे.) ,
भाजणी नेहमी मंद आचेवर भाजावी,उडीद डाळ धुवु नये, तशीच भाजावी,
धने - जिरे भाजावेत.पोहे भाजावेत. गार झाल्यावर बारीक दळून आणावी.

प्रतिक्रिया

स्पंदना's picture

29 Oct 2010 - 12:37 pm | स्पंदना

थँक्स निवेदिता ताई .
या फराळाला मी तुमची काजु कतली करणार आहे.
चकली भाजणी आजच तयार केली माझ्या पद्धतीने.

ज्योति प्रकाश's picture

30 Oct 2010 - 12:04 am | ज्योति प्रकाश

चकलीच्या भाजणीचा नविनच प्रकार दिसतोय ह्या दिवाळीला नक्की करुन बघते.

निवेदिता-ताई's picture

30 Oct 2010 - 8:42 am | निवेदिता-ताई

ज्योती हा प्रकार नविन नाहीय, जुना पारंपारिक आहे, माझी आई हेच प्रमाण घेत होती.

सूड's picture

31 Oct 2010 - 1:27 am | सूड

+१