टॉमेटोच्या वड्या

ज्योति प्रकाश's picture
ज्योति प्रकाश in पाककृती
27 Oct 2010 - 12:54 am

साहित्यः-१) १ खवलेला नारळ.
२)अर्धा किलो टॉमेटो अथवा २ वाट्या टॉमेटोचा रस.
३)३ वाट्या साखर.
४)५-६ वेलदोड्याची पूड.
कॄती:- प्रथम टॉमेटो वाफवून घ्या.मिक्सर मधुन रस काढा.
खवलेला नारळ, साखर, टॉमेटोचा रस एकत्र करून शिजवा.
मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलदोड्याची पूड घाला.
नरम गोळी होइपर्यन्त शिजवा.
नन्तर तूप लावलेल्या थाळीत थापा.थन्ड झाल्यावर वड्या कापा.

फोटू टाकता येत नाहीत तरी कॄपया त्याची रेसिपी मला द्यावी हि विनैती.

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

27 Oct 2010 - 1:35 am | शिल्पा ब

ह्म्म्म...वेगळीच पाकृ आहे
बाकी फोटू मलापण टाकायला जमत नाही त्यामुळे आपल्या विनैतीचा स्वीकार करता येत नाही...खेद आहे.

चित्रा's picture

27 Oct 2010 - 1:35 am | चित्रा

फ्लिकर किंवा पिकासावर चढवून त्याचा दुवा येथे देता येईल.

फ्लिकर - http://www.flickr.com
फ्लिकरचे खाते नसले तयार करू शकता. तुमच्या काँप्युटरवरून फोटो फ्लिकरवर चढवा. चढवलेला फोटो " Share this photo" येथे क्लिक करून Grab the HTML/BBCode खालील कोड कॉपी करून इथे चित्र म्हणून चढवा.
न जमल्यास मला फोटोंचा दुवा खरडीतून पाठवा. मदत करू शकेन.

http://www.misalpav.com/node/13573

ह्या धाग्यावरून मिपावर फोटो कसे चिकटवावेत याची माहिती मिळेल.

- पिंगू