पाटोड्यांची आमटी..

डावखुरा's picture
डावखुरा in पाककृती
24 Oct 2010 - 8:51 am

साहित्य..:
लसुण, खोबरे,कांदा,कोथिंबिर्,गरम मसाला,
हरभरा डाळ, बाजरी,तांदुळ,तीळ,
बेसन पीठ,तिखट,मीठ,तेल..ओवा

पुर्वतयारी:
१) हरभरा डाळ, बाजरी,तांदुळ,तीळ, हे सगळे भाजुन पीठ तयार करुन घ्या..
२) खोबरे,कांदा,लसुण मिक्सर मध्ये बारीक करुन पेस्ट करुन घ्या..
३) बेसन पीठ,तिखट,मीठ,तेल..ओवा..हे मिश्रण थोडेसे पाणी घालुन घट्ट भिजवा.

कृती:
फोडणीसाठी पातेलीत तेल घाला...
त्यावरुन जिरे,मोहरी,हिंग प्रमाणात

त्यानंतर (क्र.२)ची पेस्ट त्यात सोडा...
परतु द्या..नंतर त्यात गरम मसाला घाला...

मसाला घातल्यावर त्यात थोडेसे पाणी घालुन काही वेळ परतु द्या..

नंतर त्यात भरपुर पाणी घाला..
पाणी उकळायला लागल्यावर त्यात पुर्वतयारीतील ( क्र.१) चे पीठ २-३ मोठे चमचे...घालुन ढवळुन एकजीव करुन घ्या..

वरील सर्व कृती झाल्यावर पातेलीतील मिश्रणाला उकळी फुट्ल्यावर...
(क्र.३)चा भिजवलेला गोळा घ्यावा...
पोळपाट वर लाटुन घेउन..त्याच्या सुरीने शंकरपाळ्यासारख्या पण आकाराने मोठ्या वड्या पाडुन घ्या...
आणि तयार उकळ्लेल्या मिश्रणात हळुवार सोडा..
आता ५ मिनिटात शिजल्यावर गॅस बंद करा...

जेवायला वाढताना वरुन बारीक चिरलेली गावराणी कोथिंबिर पेरा..आणि लिंबु....
सोबत बाजरी..ज्वारी,मका कशाचीही भाकरी..भाकरी आवडत नसेल तर पोळी....
कांदा गोल चकत्या करुन...त्यावर मीठ,लिंबु.....
भातावर पण छान लागते..

मग आज रविवारचा ट्राय करणार ना...म्हणुन मुद्दाम लवकर उठुन टाकतोय...

खाद्यलालसा

प्रतिक्रिया

डावखुरा's picture

24 Oct 2010 - 9:02 am | डावखुरा

संमं कृपया मदत.....करा

पिकासा: दुवा

तर्री's picture

24 Oct 2010 - 8:59 am | तर्री

जबरद्स्त पाकॄ दिसते आहे . कधिच खाल्लेली नही / घरी करणे अशक्य . कोठे मिळ्ते ते हाटेल सांगा .

बाकी छान . येवुदेत अजून "अनवट" चिजा.

पैसा's picture

24 Oct 2010 - 9:07 am | पैसा

ते लालसाभौ आहेत. आणि ही पाकृ एवढी कठीण नाहिये. वरणफळांचा भाऊच म्हणा की. पोटभरू आणि पौष्टिक.

लालसाभौ, त्या भाकर्‍या कोणी केल्यात हो?

डावखुरा's picture

24 Oct 2010 - 9:10 am | डावखुरा

हे सगळे आईने केलंय..माझी थोडीफार लुड्बुड्सहन करुन....

पैसा's picture

24 Oct 2010 - 9:13 am | पैसा

आईना सांगा तुमच्या सगळं छान दिसतंय. भाकर्‍या अशा कशा करायच्या याची पण डिट्टेल कृति त्यांच्याकडून घ्या एकदा. म्हणजे काय आम्ही पोळीवाले. भाकर्‍या एवढ्या छान नाय जमत.

डावखुरा's picture

24 Oct 2010 - 9:22 am | डावखुरा

धन्यु ....तुमचा निरोप नक्की पोचवतो....

डावखुरा's picture

24 Oct 2010 - 10:33 am | डावखुरा

तर्रीभाउ "लालसाताई" म्हण्ण्याची ही चुक नका करु.. ;)
चुभुदेघे
तर्रीभाउ....
पहा, करा ,मग खा नाहीच जमली तर घरी या...
शेवभाजीसारखीच ऑफर ईथे द्याय्ला विसरलो.. :)

चिंतामणी's picture

28 Oct 2010 - 7:53 am | चिंतामणी

पहा, करा ,मग खा नाहीच जमली तर घरी या...

करून बघु हो. पण त्या आधी तुमच्या माउलींच्या हातच्या पाकृचा आस्वाद घ्यायला आवडेल. ते खाल्ल्यावर करायला जमेल. तेंव्हा तुमचा पत्ता व्यनी करा. तारीख व्यनी करा.

विसोबा खेचर's picture

24 Oct 2010 - 9:25 am | विसोबा खेचर

खल्लास..!

गांधीवादी's picture

24 Oct 2010 - 9:27 am | गांधीवादी

तर्री's picture

24 Oct 2010 - 10:49 am | तर्री

अनावधाने तुम्हाला ताई म्हट्ले.

सुक्या's picture

24 Oct 2010 - 11:57 am | सुक्या

आयाया .. काय भाजी असते वो. लय भारी. पाटोड्याची भाजी .. बाजरीची भाकरी, कच्चा कांदा.. बाकी काय नको. माहागड्या हाटेलातलं फुल्ल कोर्स जेवन झक मारतं यापुढं.

ते एक डुबुकड्याचीपण भाजी असते.. ती पन भारी. वेळ मिळाला तर त्याची पाकृ कुणी टाकेल काय?

निवेदिता-ताई's picture

24 Oct 2010 - 6:04 pm | निवेदिता-ताई

एकदम छान...

चित्रा's picture

24 Oct 2010 - 7:01 pm | चित्रा

काय मस्त दिसते आहे. अशी मऊ पदर सुटलेली भाकरी करायला सुगरण असावे लागते.

नगरीनिरंजन's picture

24 Oct 2010 - 7:21 pm | नगरीनिरंजन

वेड! काय ताट दिसतय अहाहा! दुपारी पोटात खड्डा पडलेला असताना अस भाकरी कालवण चुरुन मुरुन खाऊन नंतर मस्त ताणून द्यायची म्हणजे स्वर्गप्राप्ती म्हणजे काय ते कळते.

प्राजु's picture

24 Oct 2010 - 8:38 pm | प्राजु

बहोत खुब!!!
अफाट आहे फोटो.

रेवती's picture

24 Oct 2010 - 8:41 pm | रेवती

इनो घ्यायला लागावा असा फोटू.
आपल्या आई खरच सुगरण आहेत.

दीपा माने's picture

25 Oct 2010 - 1:21 am | दीपा माने

लालसा, तुमच्या सगळ्याच पाकक्रुती दिसायला आणि चवीला खुपच चान्गल्या असतात तरी नेहमी मिपावर देत जा.

मराठमोळा's picture

25 Oct 2010 - 1:42 am | मराठमोळा

जोरदार फोटू..
सॉलीट्ट भूक लागली फोटु पाहुन. आता समोर असती अशी डिश तर ४-५ भाकर्‍या हाणल्या असत्या आणि एक भला मोठा ढेकर देऊन पुन्हा ताणुन दिली असती. :)

स्वाती२'s picture

25 Oct 2010 - 7:12 pm | स्वाती२

स्स! स्स! तोंडाला पाणी! मला अशी सुरेख भाकरी कधी जमेल कुणास ठाऊक!

मस्त फोटो! चवही सह्हीच असणार!

स्पंदना's picture

25 Oct 2010 - 7:44 pm | स्पंदना

मस्त!!
हे पाक कृती बद्दल!

हाल हाल !!
हे आमच्या बद्दल!

रत्नागिरीकर१'s picture

26 Oct 2010 - 6:11 am | रत्नागिरीकर१

काय सही आहे.... बाजरी नसली तर चालेल का? खोबरे,कांदा भाजायचा नाही का?

डावखुरा's picture

28 Oct 2010 - 2:34 am | डावखुरा

धन्य्वाद....
अहो...रत्नागिरीकर१,

बाजरी नसली तर चालु शकते पण चवीत तड्जोड चालन का?
टाका की थोडी बाजरी काय बिघडतंय?
जास्त थोडीच टाकाय्चीय थोडीच आहे...

आणि हो खोबर्याची छोटी वाटी डायरेक्ट बर्नर वर चिमट्यात धरुन जाळा..(मस्त वास येतो)
आणि कांदा अखंडच तसाच भाजुन घ्या...मग दोघाचेही छोटे काप करुन लसणासोबत मिक्सर मधे वाटुन घ्या...

डावखुरा's picture

29 Oct 2010 - 1:39 am | डावखुरा

अपर्णातै : हाल हाल...नका करुन घेउ पाककृती फार सोप्या पद्ध्तीने सांगितलेय..करुन आस्वाद घ्या...
यशोधराजी.. धन्यु..
स्वाती२तै : जमेल नक्कि जमेल ..{प्रयत्ने भाकरीचे पीठ रगडिता.....} :)
दीपा तै : खुप आभारी आहे प्रोत्साहन्पर प्रतिक्रियेबद्दल धन्स...चांगला पदार्थ मिळाला की आणि आळस नसेल त्वा लगेच मिपा वर देईल.. ;)
रेवती काकु.. : कशाला ईनो घेताय..चतुर काकांना घेउन या कि घरी एकदा..मस्त बेत करु..
प्राजु तै : लाभले आम्हास भाग्य..प्राजुतै ना आम्चा पदार्थ आवड्या..पण कवीमनाला "अफाट" शब्द सुच्या???

चित्रातै : प्रयत्नांती परमेश्वर..एक्दिन आपकाभी होगा..{प्रयत्ने भाकरीचे पीठ रगडिता.....}
निवेदितातै : तुमच्याही पाकृ एकदम भन्नट बरं का...

सुक्याभौ : आता आईने डुबुकवडी केली की पहिले फोटो काढुन मिपावर पाकृ सह हजर कर्तो तुमच्या मुजर्‍याला मग तर झालं???.

नगरी निरंजन : अशा मस्त मेजवानीने पोटाचा नगारा भॡयावर स्वर्गर्रंजन होणारच..(ह.घ्या.)
धन्यवाद..
तर्रीभौ : कायची क्षमा..उलट मजा आली घरी सगळ्यांची हसुन हसुन पोटं दुखली राव.....

गांधीवादी : भावना पोहोचल्या...

तात्या आपली प्रतिक्रिया आली..सब मिल गया...(कोई मिल गया च्या चालीवर..)

मराठ्मोळा : खर्‍ंच मस्तंय चव...वाफाळ्लेल्या भातावर तर क्या केहेने.. खल्लास..

आभार्प्रदर्शन संपले..
जय हिंद जय महाराष्ट्र...

खाद्यलालसा

रत्नागिरीकर१'s picture

28 Oct 2010 - 7:03 am | रत्नागिरीकर१

अहो...मिपाचा सदस्य चवीत तड्जोड कशी करेल .... आमच्या इथे बाजरी मिळत नाही...बाकी अफाट आहे फोटो.

सहज's picture

28 Oct 2010 - 7:15 am | सहज

फार छान वन डिश मिल!

चटोरी वैशू's picture

28 Oct 2010 - 8:28 am | चटोरी वैशू

मस्तच आहे... जमल तर पुडाच्या पाटोड्यांची पण पाक्रुती टाका ना एकदा....

रत्नागिरीकर१.. आईला विचार्उन उद्या सांगतो..तोवर वेट करा..
सहज सुंदर नितळ प्रतिक्रिया..
लव्करच नवीन पाकृ येनार हायेत..

तिमा's picture

9 Nov 2010 - 8:38 pm | तिमा

तुम्हाला या प्रतिक्रियेद्वारे नोटिस बजावण्यात येत आहे की तुमच्या पाककृतीतल्या फोटुमुळे आमचा लॅपटोप खराब झाला त्याची नुस्कानभरपाई करुन देणे.

फोटु बगताक्षणी आमची अमुल्य लाळ कीबोर्डावर सांडून लॅपटोप शार्ट सर्किट होऊन म्येला.

डावखुरा's picture

11 Nov 2010 - 1:28 am | डावखुरा

तिरशिंगराव...तुमची नुस्कान भरपाई करुन देतो कुठे येउ बोला...
धन्यु....
{मिपाकरांच्या प्रतिक्रियांचा पंखा}