शाही शेवया

कच्ची कैरी's picture
कच्ची कैरी in पाककृती
23 Oct 2010 - 10:42 pm

shevayaaसाहित्य-
साजुक तूप्-पाव वाटी
शेवया-पाउण वाटी
साखर्-अर्धी वाटी
दूध-२ ते अडीच वाटी
केशर काड्या-७-८
सुका मेवा-आवडीनुसार व उपलब्धतेनुसार
क्रुती-
१)प्रथम एका कढईत तूप गरम करावे ,तूप गरम झाले कि त्यात शेवया लालसर रंगावर परतुन घ्याव्या.जास्त लाल होउ देउ नये.
२)शेवया लालसर झाल्या कि त्यात अडीच वाटी गरम दूध घालावे व ढवळुन घ्यावे व लगेच त्यात साखर घालुन परतावे.
३)आता लगेच यात केशर घालावे म्हणजे केशरचा रंग त्यात उतरेल.
४)१०-१५ मिनीट शिजु द्यावे ,शेवया जास्त्त घट्ट वाट्ल्यास आणखी थोडे गरम दूध घालावे.
५)काजु,बदाम पिस्त्याचे काप घालुन सजवावे.
shevayaa

प्रतिक्रिया

तर्री's picture

23 Oct 2010 - 11:24 pm | तर्री

शाही शेवया आवडल्या.
फोटो जरा फोकसात गडबडलेत का ?

निवेदिता-ताई's picture

24 Oct 2010 - 4:27 pm | निवेदिता-ताई

शेवया खिर करताना त्यात थोडी पारले जी. बिस्कीटे घालावित , चव छान येते.

पियुशा's picture

28 Oct 2010 - 10:46 am | पियुशा

MARATHI TYPE KARAYALA JAMAT NAHIYE ,RECEPI CHAN AHE AWDLI SOPI AHE KAREN NAKKI

अविनाशकुलकर्णी's picture

28 Oct 2010 - 11:27 am | अविनाशकुलकर्णी

"शाहि "म्हटले कि कसा भारदस्त पणा येतो..

परिकथेतील राजकुमार's picture

28 Oct 2010 - 11:34 am | परिकथेतील राजकुमार

खायला कधी बोलावताय ?

चिंतामणी's picture

28 Oct 2010 - 11:38 am | चिंतामणी

प रा. शी १०० % सहमत. ;)

मराठमोळा's picture

29 Oct 2010 - 12:17 pm | मराठमोळा

शेवयांची खीर. . :) माझी आवडती खीर.

दुसरा फोटु जरा गडबडला आहे खरा पण अशी खीर समोर असताना ती न खाता केवळ फोटु घेत बसणे अवघडच आहे.
गणेश शेवई उत्तम या खीरीसाठी. :)