चकलीची भाजणी

लागणारे साहित्य:
१ किलो तांदुळ
अर्धा किलो चणा डाळ
पाव किलो उडीदडाळ
२०० ग्रॅम मुगडाळ
दोन मुठ पोहे
१०० ग्रॅम जिर

क्रमवार पाककृती:
तांदुळ स्वच्छ धुवुन वाळवुन घ्या.
डाळी कडक उन्हात २-३ दिवस तापवुन घ्या म्हणजे लवकर भाजल्या जातात.
जिर निवडून घ्या.

वरील सर्व जिन्नस एक एक करुन मध्यम आचेवर खमंग वास येईपर्यंत भाजावे व दळून आणावे. दळून आणल्यावर. हवाबंद डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत सिल करुन ठेवावे म्हणजे वास उडत नाही.

अधिक टिप : आवडत असल्यास थोडे धणेही घालावेत.

प्रतिक्रिया

मस्त.............मला करायचीच आहे चकली भाजणी..

पण भाजणीतील जिन्नस जास्त भाजू नये ...चकल्या कडक होतात म्हणे.

आता ह्या भाजणीची चकली करा आणि इथं फोटू टाका.

__/\___

जागु ताई तुझा आयडी बदलुन "अन्नपूर्णा" करुन घे बघु !

निवेदिता ताई चकल्या कडक जास्त भाजल्यामुळे नाही होत. प्रमाण चुकल्यामुळे होतात. जास्त भाजणे म्हणजे करपवणे ते नाही करायच. मंद किंवा मिडीयम गॅस ठेउन चांगला वास येईपर्यंत भाजायच्या.

अनामिक फोटू दिवाळी झाल्यावर इथे मिळतील.

स्मिता, धन्यवाद ग. पण माझ्यासारखे अजुन बरेच इथे अन्नपुर्णा आहेत. मग अन्नपुर्णा १, २ असे सगळ्यांना आयडी बदलायला लागतील.

ह्या भाजणीच्या चकल्याचीं चव बाजारातील चकल्यांना क येत नाही ? हे काही "शोर्ट कट " मारतात का ?
ह्या सस्स्ल भाजणी च्या चकल्या कुठे मिळतात ?
बाकी तुमच्या पाकॄ वर आम्ही काय प्रतिक्रिया देणार ?
----"-----
एवढेच.

तर्री धन्यवाद. आहो चव आणि स्वच्छताही.