फ्लावरच्या देठचि भा़जि

Shubhangi Pingale's picture
Shubhangi Pingale in पाककृती
21 Oct 2010 - 2:43 pm

first time देत आहे काहि चु़कलल्यास शमा करा
आपण फ्लावरचि भाजि करतो आणी त्याचा देठ फेकुन देतो पण तस न करता तो बारिक चिरुन घ्यावा एका टोपात पाणि आणि मिठ टाकुन थोडावेळ तसच ठेवावे.
आता फोडणी टोपात तेल घालावे राई, जीर, हळ्द, हिग घालावे कादा घालावा तो बदामि झाला कि त्यात आवडी नुसार मिरचि पावडर आणि त्यानुसार साखर घालावि न॑तर भाजि निथळून घालावि टोपावर झाकण घालुन त्यात थोड पाणी घालावे (ताटात). थोडावेळाने टोप ऊचलुन कु़कर मध्ये ठेवावे चार ते पाच शिट्टया घेवून ब॑द करावा (देठ थोडा शिजायला ‍वेळ लागतो.

प्रतिक्रिया

अवलिया's picture

21 Oct 2010 - 2:45 pm | अवलिया

>>>>(देठ थोडा शिजायला ‍वेळ लागतो.

आणि पचायला?

नाही वय झालं आहे.. विचारुन घेतो आधीच नंतर धावधाव नको.

कुंदन's picture

21 Oct 2010 - 4:22 pm | कुंदन

वय झालं आहे , गप गुमान मऊ भात खात जा.
आणि खोकला कसा आहे आता?

Shubhangi Pingale's picture

21 Oct 2010 - 2:55 pm | Shubhangi Pingale

भाजि शिजलि कि पचते पण चागलि
आणि विसरलिच कि थोडा शेगदान्याचा कुट पण टाकावा

परिकथेतील राजकुमार's picture

21 Oct 2010 - 5:54 pm | परिकथेतील राजकुमार

आणि विसरलिच कि थोडा शेगदान्याचा कुट पण टाकावा

छे छे ! अहो आमच्या नान्याला दाणे बघितले तरी पित्त होते.

वेताळ's picture

21 Oct 2010 - 6:26 pm | वेताळ

म्हणजे अजुन दात आहेत म्हणायचे.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Oct 2010 - 6:40 pm | परिकथेतील राजकुमार

हो हो ! खालचे वरचे दोन्ही छान आहेत.

दाखवायचे आणि खायचे वेगवेगळे आहेत अगदी!! ;) (नाना, हलके घ्यालच.)

शिल्पा ब's picture

21 Oct 2010 - 10:22 pm | शिल्पा ब

दोनातले दाखवायचे कोणते अन खायचे कोणते हो? ;) (तुम्हाला वाटेल तसे घ्या )

पर्नल नेने मराठे's picture

21 Oct 2010 - 3:10 pm | पर्नल नेने मराठे

टोप म्हणजे काय आहे :-/ नॉन्-स्टीकचाआ काही प्रकार आहे का ?

टोप म्हणजे पातेलं गो.. नाहीतर जिरेटोप वगैरे घेशील! :P

पर्नल नेने मराठे's picture

21 Oct 2010 - 4:04 pm | पर्नल नेने मराठे

ह्म्म ..अगदिच जिरेटोपात नाहि गेले ..पण मला वाटले भान्ड्याचा नविन ब्रान्ड आला आहे कि काय बाजारात.

विंजिनेर's picture

21 Oct 2010 - 4:26 pm | विंजिनेर

हा हा हा!!
खुर्चीतून सांडलो :D

शिवाजी म्हाराजांच्या जिरेटोपात चुचू फ्लॉवरच्या देठांची भाजी करतेय आणि महाराज हैराण होऊन चुचूकडे बघतायेत असं चित्र समोर आलं

मेघवेडा's picture

21 Oct 2010 - 6:00 pm | मेघवेडा

शक्य आहे. चुचु काहीही करू शकते यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. झाल्यास महाराज काही बोलायला जाणार इतक्यात "तुम्ही बसा हो तिथं शांतपणे" असं नुसतं डोळ्यांनीच सांगेलसुद्धा ती महाराजांना! ;)

मस्त कलंदर's picture

21 Oct 2010 - 7:46 pm | मस्त कलंदर

म्ही बसा हो तिथं शांतपणे" असं नुसतं डोळ्यांनीच सांगेलसुद्धा ती महाराजांना!

एवढं म्हणून थांबली तर ठीक आहे.. पण पुढे आच्रत-बाव्लत म्हणाली तर काय घ्या????

दिपाली पाटिल's picture

23 Oct 2010 - 1:23 am | दिपाली पाटिल

ध्यान पण म्हणेल... काही भरोसा नाही चुचुचा...

पिंगू's picture

21 Oct 2010 - 4:46 pm | पिंगू

>>> शिवाजी म्हाराजांच्या जिरेटोपात चुचू फ्लॉवरच्या देठांची भाजी करतेय आणि महाराज हैराण होऊन चुचूकडे बघतायेत असं चित्र समोर आलं..

च्यामारी फुटलो...

- पिंगू

छान आहे रेसिपी..

फ्लॉवरच्या देठांचे वाटाणे आणि मिरपूड घालून सूप छान चविष्ट होते :)

शिल्पा ब's picture

21 Oct 2010 - 8:44 pm | शिल्पा ब

देठात काही विशेष जीवनसत्व वगैरे असतं का? नाहीतर फुलं सोडून कशाला उगाच देठाची भाजी करत बसायचं?

पिवळा डांबिस's picture

23 Oct 2010 - 10:15 am | पिवळा डांबिस

नाहीतर फुलं सोडून कशाला उगाच देठाची भाजी करत बसायचं?
आम्हालाही तीच शंका आहे..
जर फ्लावर विकत घेतलाच आहे तर तो सोडून त्याच्या देठाची भाजी करण्यात काय मतलब आहे?
(बाकी फ्लावर कोलंबीची गरम मसाल्याची पातळ भाजी करावी. त्यात गावठी लादीपाव हाताने तुकडा तोडून भिजवावा... आणि अल्लगद जिभेवर सोडावा!!! ला इलाहा इल्लिलाह!!!!!!!)
:)

फ्लावर म्हणजे कोणतं फ्लावर... जास्वंदाचं, स्वस्तीकाचं, की अजून कोणतं? मराठीत फ्लावरला काय म्हणतात?

प्राजु's picture

21 Oct 2010 - 9:23 pm | प्राजु

अनामिक.. अरे धोत्र्याचं!! किंवा घाणेरीचं.. :)

सुनील's picture

21 Oct 2010 - 9:08 pm | सुनील

महाराजांविषयी भलतं-सलतं लिहिणार्‍या लेनकुळातील प्रतिसादकर्त्यांना ५० फ्लॉवर्सचे देठ (भाजी न करता) खाण्याची शिक्षा फर्मावण्यात यावी!

सुनील (स्वंयंघोषित अध्यक्ष, मंबाजी ब्रिगेड)
सदस्य भरती सुरू आहे