झुक्किनी पराठे आणि शेंगदाणा चटणी

रतन's picture
रतन in पाककृती
20 Oct 2010 - 7:50 pm

नमस्कार. आजचा बेत झुक्किनी पराठे आणि शेंगदाणा चटणी.

झिंगालाला देशामधे काय खावे हा मोठा प्रश्न पडतो. एकतर ईथे पालेभाजी दिसत नाही. कधितरी पालकासारखी कोणतीतरी दिसते पण घेण्याची हिम्मत झाली नाही.

भात किंवा ब्रेड खावून कन्टाळलो आणि वीकांताला पराठे करायचे असा बेत केला. झुक्किनी पराठे आणि शेंगदाणा चटणी. आपला दोन नंबरचा आवडता मेनु . चला सुरुवात करु या.

साहित्यः
पराठ्यांसाठी:
२ लहान झुक्किनी , बारीक किसून
५ वाट्या गव्हाचे पीठ
१ वाटी बेसन पीठ
१ चमचा ओवा
कोथिंबीर बारीक चिरून
थोडेसे मीठ
चटणीकरीता:
२-३ हिरव्या मिरच्या
१२-१५ शेंगदाणे
१-२ लसूण पाकळ्या
१ चहाचा चमचा जीरे
१ चहाचा चमचा धणे
कोथिंबीर
चवीपुरते मीठ
तडक्यासाठी:
१ चमचा तेल
१/२ चहाचा चमचा मोहोरी
१ /२ चहाचा चमचा जीरे
चिमूट्भर हींग.
१ चहाचा चमचा हरभर्‍याची डाळ
३-४ कढिपत्याची पाने

पाकक्रुती:

चटणी:
हिरव्या मिरच्या तव्यावर भाजुन घ्या. भाजताना त्यावर २-३ थेम्ब तेल टाका, त्यामुळे खमंगपणा वाढतो. नन्तर तव्यावर शेन्गदाणे भाजून घ्या. शेवटी धणे आणि जीरे तव्यावर टाकुन १-२ मिनिटे भाजुन घ्या.
लसूण सोलुन घ्या. भाजलेले सामान, लसूण व कोथिंबीर मिक्सरमधे टाकुन बारीक चटणी बनवा. बारीक करताना त्यात गरजेनूसार पाणी टाका. हि चटणी वाड्ग्यात काढा आणि चटणी पातळ हवी असेल तर त्यात थोडेसे पाणी टाका. चविनूसार मीठ घाला.

एका छोट्या कढईमधे तेल गरम करा. त्यात मोहोरी टाका. मोहोरी तडतडली कि त्यात हरभर्‍याची डाळ
टाका. हि डाळ थोडिशी लाल झाली कि त्यात हींग टाका. जीरे टाका. शेवटी कढिपत्याची पाने टाका.
हि गरमागरम फोडणी (तडका) चटणीवर टाका. आअणि मिक्स करुन घ्या. झणझणीत शेंगदाणा चटणी तय्यार.

झुक्किनी पराठे

झुक्किनी धूवून बारीक किसा. परातीत गव्हाचे पीठ आणि बेसन घेवून त्यात किसलेली झुक्किनी टाका. ओवा, चिरलेली कोथिंबीर मीठ आणि गरजेनूसार पाणी टाकुन पीठ चांगले मळून घ्या.

थोडीशी कणिक घेवून जाड्सर लाटुन घ्या. बेसनमुळे हि कणिक जरा चिकट असते. त्यामुळे लाट्ताना पीठ ज्यास्त वापरावे लागते. हे पराठे तव्यावर दोन्हि बाजुनी चांगले भाजुन घ्या. पराठा चांगला भाजला गेल्यावर त्याल थोडे तेल लावा.

गरमागरम पराठे, झणझणीत चटणी आणि दहिकान्दा. बास! नाक, कान, डोळे आणि स्पर्श अशी चार इन्द्रिये बन्द करुन फक्त जिभेवर केन्द्रित करावे आणि हादडावे.

बोन अपीटी

प्रतिक्रिया

च्यामारी कोण आहे रे तिकडे ? ताबडतोब या सदस्याचा आयडी रद्द करा !

त्रास देतात सगळे भलते भलते फटु टाकुन !!

निवेदिता-ताई's picture

20 Oct 2010 - 9:11 pm | निवेदिता-ताई

झुक्किनी म्हणजे काय???????

बाकी पराठा मस्त दिसतो आहे.

बेसनलाडू's picture

21 Oct 2010 - 2:03 am | बेसनलाडू

झुकिनी हा काकडीसारखा एक पदार्थ आहे.
(माहीतगार)बेसनलाडू

पर्नल नेने मराठे's picture

21 Oct 2010 - 11:51 am | पर्नल नेने मराठे

ह्या झुकिनीला मी फार्मविल्लेत पिकवते.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Oct 2010 - 7:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

झुकिनी म्हणजे शिराळी का?

झुकिनी म्हणजे काकडीसारखी दिसणारी भाजी.
http://www.google.com/imgres?imgurl=http://tippinthescales.files.wordpre...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Oct 2010 - 8:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हे तर मलाही माहित्ये गं! ग्रिलवर भाजलेल्या कॉर्जेटमधे मटकीचं सारण भरलेलं एकदम झकास लागतं. माझा एक्स हाऊसमेट+डीनरमेट हे बनवायचा बर्‍याचदा!
पण इथे कसं शोधू हे ... मराठी नाव हवंय! हे पराठे पाहून तोंडाला पाणी सुटलंय.

हां तेही खरच! मला कधी पुण्यात झुकिनी दिसली नव्हती.:(

भारतात मिळत नाही बहुतेक. पण झुक्कीनी व्यतिरिक्त दूधी भोपळ्याचे पण पराठे छान लागतात.

ईथे दूधी मिळत नाही म्हणून झुक्कीनी वापरली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Oct 2010 - 8:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> दूधी भोपळ्याचे पण पराठे छान लागतात. <<
अगदी अगदी! आमच्या (स्वयंपाकाच्या) यादव काकू मस्त बनवतात दुधीचे पराठे आणि हळदीच्या पानांची (का कसली?) चटणी.

हळदीच्या पानांची (का कसली?) चटणी.

हे प्रथमच ऐकतो आहे. गुजरात मधे असताना ओल्या हळदिचे लोणचे खाल्ले आहे परठ्यांबरोबर.

बनवुन पहा पराठे एकदा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Oct 2010 - 9:08 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कसली चटणी ते काकूंनाच विचारायला लागेल. क्वचित कधी घरी जाणार असले तर त्या बनवून ठेवतात.

अरे अरे अरे!
एका पदार्थामुळे इनो घेउन येते तोवर त्याच्या सारख्या अजून पदार्थांची यादी आली आहे.
आता परत इनो घेण्याची वेळ आली.;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Oct 2010 - 9:37 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अंमळ घोटाळाच केला. लसूण पात + कोथिंबीर + जिरं + हिंग + मीठ अशी चटणी असते ती.

(श्रेय - यादव काकू + भावाची मावससासू.)

भारतात परतलो कि करायला सान्गतो एकदा ही चटणी.

झुकीनी म्हणजे झुकलेली काकडी का? ;-)

जी लांब फुग्यासारखी असते ???????

नुसताच फोटो पहात बसलोय. :(

मस्त ! झुकिनी ( कोर्गेट) चा अजून एक प्रकार सापडला. नुसती भाजी - कोशिंबीर करून कंटाळा आला होता. नक्की करून बघणार.

रतन's picture

20 Oct 2010 - 8:24 pm | रतन

पाकृ छानच आहे.
फोटू पाहून इनो घेतला.
जी पालकासारखी भाजी दिसते त्याला पुईसाग म्हणतात.
त्याची एकदा पालकासारखी भाजी केली पण चवीला पांचट वाटली.

पर्नल नेने मराठे's picture

21 Oct 2010 - 11:49 am | पर्नल नेने मराठे

थोडा उग्र वास पण असतो तिला...मी चुकुन एकदा आणली न भाजी आणुन निवडुन झाल्यावर लक्शात आले.

नगरीनिरंजन's picture

20 Oct 2010 - 9:20 pm | नगरीनिरंजन

जेवण झाल्यावर धागा पाहिला आणि परत भूक लागली.

स्वाती२'s picture

21 Oct 2010 - 12:00 am | स्वाती२

मस्त!

चित्रा's picture

21 Oct 2010 - 1:38 am | चित्रा

चटणी फारच छान.

मागे स्वातीने असा धागा सुरु केला होता, त्याची आठवण झाली.

प्राजु's picture

21 Oct 2010 - 1:46 am | प्राजु

अरे व्वा!! होइलच लवकर. :)

परिकथेतील राजकुमार's picture

21 Oct 2010 - 12:15 pm | परिकथेतील राजकुमार

आग लागो ह्या पाकृ विभागाला !!

sneharani's picture

21 Oct 2010 - 12:31 pm | sneharani

मस्त पराठ्याचा फोटो दिसतोय.
चटणीपण्..मस्तच.
झुक्किनी पहिल्यादांच ऐकलं.

प्रतिक्रिया देणार्‍या सर्व जणांचे मनापासुन धन्यवाद

ब्यांकॉकलाहि मिळ्ते झुक्किनी ...बनवून बघेन.....मलाही दुधी भोपळ्याची थालीपीठ आवडतात